[१८१] श्री. २५ मार्च १७२९.
श्रीमत परमहंस बावा स्वामीचे सेवेसी:-
सेवक कान्होजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल चैत्र शुध्द चतुर्दशी मंगळवारपर्यंत जाणून आशीर्वादलेखन आज्ञा केली पाहिजे. विशेष. आपण पत्रें सुवर्णदुर्गीचे मार्गी पाठविली व लिमयाबराबर पत्र पाठविले ते प्रविष्ट होऊन साद्यंत वर्तमान कळले. त्याचीं उत्तरें व स्वामीनें जिन्नस सुरण व द्राक्षे व दारू व नारायणतेल याविशी लिहिले, ते सुवर्णदुर्गास पाठवून देतो. तेथून स्वामीजवळी प्रविष्ट होईल. स्वामीनें वर्तमान लिहिले होते, त्याचे उत्तरहि त्या जिनसासमागमें पाठवून देऊन. बहुत काय लिहिणे. हे विज्ञप्ति.
[१८२] श्री.
श्रीमत परमहंस गोसावी बावा स्वामीचे सेवेसी:-
सेवक कान्होजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वामीनें आशीर्वादलेखन करविले पाहिजे. विशेष. रामा बिन महादशेट सोनार अलिबागामध्ये गेला. त्यास तो सांप्रत अटकेंत आहे. त्यास मुक्त करणें, ह्मणून आज्ञा लिहिली. तरी त्याचा व अलिबागीचा सोनार याचा भुताचा कथळा लागला. त्याजवरून हरदूजण अटकेंत होते. त्यास स्वामीचे पत्रापूर्वी अगोदर पंधरा वीस दिवस सोडिला असे. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञप्ति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)