Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रघुनाथ गोविंद कलबर्गेकर यांजकडे लेखांक १५०. १७१५ चैत्र शुद्ध २.
पत्रें रवाना रघुनाथ गोविंद यांस.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रघुनाथपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें विशेष राजश्री त्रिंबक तुकदेव यांचे असामीबाबत दरसाल एक हजार प्रा सन १२०० व सन १२०१ दुषाला दोन हजार रु। नवाबाचे सरकारातून येणे त्याचा इजायतनामा तयार करऊन मेहरबान महमदअजीमखां अजमलमुलुक बाहादूर यांस दिल्हा त्यांची तनखा व ताकीद दोन पत्रें सिदीइमामखान यांचे नावें दोन हजार रुा पा चिटगोपें एथील माल ऐवजी तुह्मांकडे पावते करून रसीद घेणे या प्रा पा आहेत व सिदीइमामखा यांजला आक्लीहि पत्र लेहून पा असे त्यास तीन पत्रें त्यास पावती करून दोन हजार रु।। तुह्मी आपल्यापासी घेऊन त्यांजला ऐवज पावल्याची रसीद घ्यावी रुा पावल्याचें इकडे ल्याहावें वे पुण्यास राजश्री गोविंदराव यांजकडेहि लेहून पाठवावें रा छ १ माहे घाबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सिदी इमामखान यांस पत्र लेखांक १४९. १७१५ चैत्र शुद्ध २.
महिपतराव कृष्ण यांजविषई.
खांसाहेब मेहरबान दोस्तां सिदीइमामखां बाहादूर वसमत- अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैरअफीयत जाणून आपली खैर-षादमानी हमेषा कलमी करावी दिगर मजमून राजश्री महिपतराव कृष्ण यांस असामी पा अबजलपूर एथें अमीनीची दरमहा तीस रुो प्रा पेशजीपासोन नवाब शमषुलउमराबाहादूर यांजकडून चालत आली सांप्रत पामार हो माहाल आपल्याकडे जाला आहे यांची असामी यांजकडे चालण्याविषई मेहरबान अजमलमुलुकबाहादूर याणी आपल्यास पत्र लिहिलें आहे त्यास पा मारी अमीनीची असामी चालत आल्याप्रा यांजकडे चालवावी तेथें असामीची गुंजायष असेल नसेल मारनिलेस तर असामीचें वेतन करार बमोजीब जरूर पावते होणे सबब अजमलमुलुक याणी पा कलबर्गेचितापूर अबजलपूर या दो तीन महाली कोठेंहि सोय करून तीस रुा दरमहा देत जावा ऐसें लिहिलें आहे त्यास तिन्हीहि माहाल आपल्याकडेच आहेत अबजलपुरीच चालती जाल्यांत सोय जाणून लिहिलें असे तरी अबजलपूर एथें असामी चालती करून दरमहा पावता होत जावी माहे जाखर व रजब दुमाही रोजमरा यांचा येणे राहिला तो ताकीद करून देवावा व असामीसिवाय पा मारचे सिबंदींत एक माणूस यांचे तैनातीस पेशजीपासोन चालत आलें त्याप्रा चालावें मारनिले पदरचे यांचे अगत्य जाणून लिा असे रा छ १ माहे शाबान ज्यादा काय लिा हे किताबत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रवानगी पत्रें छ १ साबानी लेखांक १४८. १७१५ चैत्र शुद्ध २.
आपाजी बनाजी इंदापूरकर
याचे पत्राचें उत्तर.
राजश्रिया विराजित राजमान्य पजश्री आपीजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष तुह्मीं पत्र पा तें पावलें राजश्री महीपतराव कृष्ण यांची असामी पा अबजलपूर एथें होती ते हली चालण्यास दिकत याजकरितां असामी चालण्याविषईचा बंदोबस्त व्हावा ह्मणोन ता लिहिलें त्यावरून महमद अजीमखां यांसी बोलोन मारनिलेची असामी तीस रुपये दरमहा चालण्याविषई सिदीइमामखान यांजली पत्रें महमद अजीमखान यांचें व आमचें ऐसी निखालस देऊन मारनिलेची रवानगी माहोली केली रा। छ १ साबान बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
मोतीराम याने राय तुळजाराम लेखांक १४७. १७१४ फाल्गुन वद्य ३०.
यांस पत्र मागीतले त्याजवरून
दिले छ २८.
राजश्री राये तुळजाराम गोसावि यांस-
श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि तुह्माकडून मोतीराम आला त्याने सांगितले की आपल्यास नजर करावयाकरितां गालीचे लाखी रंगाचे तयार केले आहेत चिठी आली ह्मणजे पाठऊन देतो ह्मणोन सांगितले त्याजवरून लिा आहे तर गालीचे तयार जाले असतील ते पाठऊन द्यावे रा छ २८ रजब हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
छ २४ रजबी सुरापूरकर व्यंकटपा लेखांक १४६. १७१४ फाल्गुन वद्य ३०.
नाईक यांस पत्रे नवाब व सिवशंकर
यानी मागीतले एो दोन.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहिरी बहादूर गोसावी यास- सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष पत्र पा तें पावलें कनकगिरीकर नाईक गुडगुंट्यावरून कनकगिरीस गेल्याचें व अनीगोंदीकर जमीदाराचें पारपत्य टिपूसुलतान यांजकडील फौज येऊन ज़ालें याचा ता लिहिला तो समजला पुण्याकडून डांकेवर कांही पत्री वर्तमान आलें असल्या कळावें ह्मणोन लिा त्यास गोविंदआपा व सुभराव उभयता तेथें आहेत अद्याप कांहीं एक जाबसाल ठरल्याचें इकडे लिहिलें आलें नाही परभारा आपल्याकडे त्यांजकडून वर्तमान येत असेल नवाबाचे सरकारचा जाबसाल पेशजी ठरण्यात आला त्याचे फडच्याविषीं मंत्रीची निकड भारी यास्तव जाबसाल कोणता तो सत्वर ठरावात यावा आणि ल्याहावें त्याप्रा यांसी बोलण्यात येईल रा छ २८ रजब बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
महमद अजीमखां यजला रुका लेखांक १४५. १७१४ फाल्गुन वद्य १४.
आबू महमद याणी मागितला सबब.
सलीम आं की मिर्जा आबू महमद यांचे दरमहा बाबत ऐवजाचे हिसेबाविषई आपली परवानगी आली त्यास मुतसदी इजाफेसुधा हिसेब करण्याची दिकत करितात याजकरितां छ १ रावल पटणचे स्वारीस निघतेसमई इजाफा आपण करार करून दिल्हा याची वकफायत राये चिमणलाल यांजला आहे त्यास इजाफा करार पावल्या तारखेपासोन इजाफासमेत हिसेबाविषई राये चिमणलाल व नौबतराये यांजला ताकीद होऊन ऐवज मिर्जामार यांस पावती व्हावयाचे करावें माफीक कायदा लगायत अखेर, रजब हिसेब इजाफ्यासुधा होऊन ऐवज पावती व्हावा हे किताबत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जिवाजी बाबूराव अमील निलंगेकर लेखांक १४४. १७१४ फाल्गुन वद्य १४.
यास पत्र नरसिंव्ह बाळाजी
गजनेत्री याणी मागितलें सबब
छ २७ रजब.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री जिवाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष मौजे तगरखेडें पा निलंगे एथील मोकासा व बाबती व सावोत्र्याचा अमल राजश्री नरसिव्ह बाळाजी गजनेत्री यांजकडे आहे त्यास सन १२०२ सालचे अमलाविषई तुह्मी दिकत केली ह्मणोन कळलें त्यावरून लिा असे त्यास मौजे मारचा अमल सुदामत पेशजीपासोन मारनिलेकडे चाऊत आला त्याप्रा सालमारचे अमलाचा फडच्या करून देऊन रसीद घ्यावी फिरोन बोभाट न ये तें करावें रा छ २७ रजब बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
बापू कीरदंत मोकासदार देह लेखांक १४३. १७१४ फाल्गुन वद्य १२.
ता। लोहारे यास पत्र दिलदारखान
याणी मागितलें सबब.
राजश्री बापूजी किरदंत गोसावि यास- अखंडीतलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष मौजे नागजई व नेवली वगैरे देहात ता लोहारें या गांवावर तुह्मी स्वारी करून एकहजार गुरें कांही कारण नसतां वळून नेली याचा बोभाट नवाबाचे सरकारात आला त्यावरून लिहिलें असे त्यास मोकाशाचा आमल देहात मारचा सुरळीत सालाबादप्रा जागीरदाराकडून फडच्या असतां स्वारी करून मवेसी नेण्याची सबब काय याउपरि हरदो गांवची गुरें नेली असतील तें दिलदारखान यांजकडील नायब बजीदखां तालुके मारी आहेत त्यांजकडे पावती करून रसीद घ्यावी तुह्माकडील कांही जाबसाल असल्यास कोणी कारकून एथें पाठवावा समजोन बोलण्यात येईल रा छ २५ रजब बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
छ २५ रजबी रवानगी पत्रें लेखांक १४२. १७१४ फाल्गुन वद्य १२.
तिमाराव हरि अमील देगळूर
वगैरे यांचे पत्राचें उत्तर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमाराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मी पत्र छ १५ जावलचें पा ते छ २७ माहे मारी पावलें तुह्माकडे सरदारुदौलाबाहादूर यांजकडील मामुलतीबाबत स्वराज्याचा ऐवज हवाल्याचा छ १ रावलचे वायद्याबदल साडे बाहात्तर हजार रु।। एणे त्या ऐवजी तुह्मी हैद्राबाद एथील साहुकारावर हुंड्या पंचवीस हजार रुपयाच्या पाठविल्या सदरहू पंचवीस हजार रुो व्यंकटीदास भुकणदास साहूकार यांचे मारफातीनें साडे बाहत्तर हजार ऐवजी पावले असत बाकीचा ऐवज लौकर पाठवितों ह्मणोन लिहिलें त्यास बहुत दिवस जाले याउपरि झाड्यानसी ऐवजाच्या हुंड्या रवाना केल्या असल्यास उत्तम नसल्यास ऐवज लौकर पावता होण्याचें करावें दिवसगत लागो नये बारतरफी बालेबारगीर वगैरेनी माहली बखेडा केला येविषीचें बंदोबस्ताचा ता लिहिल्याप्रा समजला त्यावरून खांसाहेब महमदअजीमखांबाहादूर यांसी बोलोन बंदोबस्त करविला रा छ २५ रजब बहुत काय लिहिणे सु। सलास तिसईन मयां व अलफ सन फसली १२०२ हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक १४१. १७१४ फाल्गुन वद्य ११.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत-बहिरी-बाहादूर गोसावि यास- सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष राजश्री राये व्यंकटपा सरसुभेदार यांजकडे मौजे ककर आलमेलें हा गांव व पा आलमेलें व होर्ती व मेहंदरगी या तीन परगण्याचा रुसूम राजश्री रघुनाथ गोविंद सुरापुरास आले ते समई सरसुभेदार यांजकडे चालवण्याचा करार आपला असतां सदरहू प्रा मारिनिलेकडे पावत नाही ह्मणोन समजलें त्यावरून लिा असे त्यास मारनिले आपले पदरचे यांचा आगत्यवाद आपल्यास आणि इकडील यास्तव करार ठरल्याप्रा यांचेकडे गांव व सदरहू माहलाचा रुसूम चालता व्हावा रा छ २४ रजब बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.