जोधसिंग खंदारकर यांचे पत्राचें उत्तर. लेखांक २०८. १७१५ अधिक वैशाख वद्य १२.
राजश्री राजे जोधसिंग बहादूर गोसावि यास- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें माहूरप्रांतीं नाईक याचा उपद्रव भारी होता सांप्रत राजश्री रघोजी भोंसले यांजकडून सुभेदार फौजसुधा नाईकड्याचे पारिपत्यास आल्याचा मार लिहिला तो सविस्तर समजला तुमचे तालुक्यांत पायमाली सबब खासगत ऐवज येणे त्यास विलंब जाला हंगाम-सिस्तीवर हुंडी करून पाठऊ ह्मणोन लिा त्यास ऐवजास किती दिवस जाले आपली मुदत होऊन गेली याजकरितां हिसेबसहित करारबमोजीब ऐवजाची हुंडी करून पाठवावी हंगामहि ऐवजाचा जाला याजवर दिवसगतीचा प्रकार नसावा रा छ २५ रमजान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)