नारायणराव पुनतांबकर यांस लेखांक २३६. १७१५ वैशाख शुद्ध १२.
पत्र छ ११ सवाल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नारायणराव स्वामीचे सेवेसी-
पोरा गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावे विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें आपलें प्रापंचिकता-पत्र याचा मार विस्तारे लेहून आज्ञा आल्यास येईल ह्मणोन लिो त्यास तूर्त च्यार महिने तुह्मी येण्याचे न करावें व सांप्रत येण्यात सोईचा प्रकार नाही यास्तव छ ७ जिलकाद नंतर एक मनुष्य पत्र देऊन पाठवावा त्याचे उत्तर इकडून लिहिण्यात येईल त्याप्रमाणे मग यावयाचें करावें कितेक उपरोधिय अर्थ पत्री लिहिला इतक्याचे कांहीं कारण नाहीं तुमचे विस्मरण व्हावयाचें नाहीं तुमचे पत्राची होती दोन च्यार वेळ स्मरण जाले इतकियात तुह्मांकडून पत्र आलें त्याजवरून तुमचे राहणे आहे तें स्थळ आणि प्रपंचाचे तापत्र याचे वर्तमान कळलें लिहिल्याप्रमाणें तुह्मांकडून मनुष्य आणि यानंतर समयोचित लिहिणें तें लेहूं राजश्री नानाकडे तुमचे जाणे व्हावें असें असल्यास राजश्री नानास पत्र पाठऊ शरीरेंकरून आणि प्रपंचाचे व्यवहारास बहुत जपत जावें ज्या वृत्तीनें परिणाम शुध असी वृत्ती असावी हेंच चागलें विशेष लिहून सुचवावे असें नाहीं रा छ ११ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)