Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक १६७.


१६९८ आषाढ.

खासा स्वारी सुरतेहून बाहेर पडली. याचा कितेक अर्थ खसूसियेंत दस्तगाहा लक्ष्मण आप्पाजी तुह्मांस सांगतील, त्याजवरून कळेल. सारांश कीं, स्वारी बाहेर निघाली ह्मणोन, इंग्रेजाची दोस्ती आहे. त्यांत दुसरा विचार आहे असा अर्थ नाहीं. आह्मी बाहेर निघाल्यामुळें कदाचित् जनराल याचे मनांत विपर्यास येईल. त्यास तुह्मी सरकारचे खैरख्वा आहां. ज्या गोष्टीनें सरकारमसलतीचा उपयोग तेंच करणें. वरकड विलायतेचा हुकूम सरकारकुमकेविशी आला ह्मणजे आह्मी जवळच आहों. सरकारची व इंग्रेजाची दोस्ती आहे, तेच ज्यारी असावी, हाच इरादा आहे. ह्मणोन पत्रें :-

१    मेस्तर होम
१    मेस्तर वारलीस
१    मेस्तर इष्टोल
१    कारनेल किटिंग
---

श्री.

लेखांक १६६.


१६९८ आषाढ वद्य ६.

राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यांसि :-
सु॥ सबा सबैन मया व अलफ. तुमचीं ज्येष्ठ शुद्ध दशमीचीं पत्र आलीं. त्या अलीकडे पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं, तरी सविस्तर वरचेवर लिहीत जाणें.

येथील खर्चाची वोढ मोठी. दररोज दोन हजार रुपये पाहिजेत. त्यास, इंग्रेजाचा प्रकार वोढीचा. लिहिल्याप्रों ऐवज देणार नाहींत. याजकरितां किमानपक्ष तीस पस्तीस हजार दरमाहाची बेरीज तुह्मांस लिहिली. याणीहि खर्च चालणेंच नाहीं. तथापि च्यार दिवस हरकसी गुजराण होईल. आणि जवाहीर मागणें. त्यास, बारा हजारांचा नेमणूक जनराल याची असल्यास, यांणीं येथील खर्चाचा सेवट कसा लागतो ? याजकरितां तुह्मीं जनराल यासी बोलोन, जवाहीर तऱ्हीं मागावें. ह्मणजे जनराल याजकडील ऐवज व जवाहीर हरकोठें ठेऊन, दोनी ऐवजांनीं च्यार दिवस खर्च चालऊं. आजच कारखाने उपासी मारतां येत नाहीं. कलम १.

तिकडे भाऊचें बंड बळावलें आहे. तिकडे येखादा शाहाणा मनुष्य पाठवणें, ह्मणोन पेसजी लिहिलेंच आहे. त्यास तुह्मी ज्यास पाठवाल त्यांणी जाऊन, काय चरित्र आहे तें मनास आणावें. केवळ हुजूरूनच पाठविलें, हाहि भाव दर्शऊं नये. असें मधेचें बोट तोंडाजवळ न्यावें, तोंडांत सांपडूं देऊं तर नये. दाखवावे तर खरें. याप्रों तेथील भावगर्भ काय असेल तो मनास आणावा. याप्रों जो जाईल त्याणीं करावें. त्यास कांही आशा उपजे, असें बोलावें. परंतु दस्ताऐवज सांपडू न देणें. आह्मापासून येक अंतर तेव्हां पडलें की, रूबरू आणून पाहिलें नाहीं. दुरूनच पाहिलें. हें तर गोष्ट खरी. वरकट मातबर मुछद्दी यानें जवळून पाहून खोटा ह्मणाले. तेव्हां काय पाहावे या अर्थे न पाहिलें. हेहि भाव येथील त्यास समजावे. तुह्मांकडील कारकून अथवा खिजमतगार, असें समजल्यास दोष नाहीं. कलम १.

सदरहू आठ कलमें खास दस्तुरी लेहून याचीं पहिली रवानगी तुह्मांकडे केलीच आहे. पत्रें येऊन पोंहचलीच असतील. कलम १.

नवाब हैदरअली खानबहादर बमय फौजसुद्धां कुच दरकुच बंकापुरास येऊन बंकापूर घेतलें. पुढे दरमजल धारवाडास येऊन तें घेऊन मिर्जेस येणार. याप्रों नवाबाची पत्रें व बाजीराव गोविंद यांचीं पत्रें छ ६ रबिलावलची त्याणीं रवाना केली ते छ ८ जमादिलावली पोंहचलीं. त्यांच्या नकला तुह्मांस पाहावयास पहिले रवानगींत पाठविल्या आहेत. येऊन पावतील. तरी पुढें त्यास काय सला ल्याहावी ते सला लिहिणें. कलम १.

स्वहस्तें परहस्तें कसें तरी आमचें कार्य व्हावें, हे मर्जी पूर्वी जनराल याची होती. त्यास, याचा संदर्भ लाऊन ते संतोषानें आह्मास दुसरे स्थळी पोहचावीत असें करावें. निरोपच द्यावा. येथें दुसरें राजकारण अंगरेजाचे प्रतिमेचें आहे. परंतु याची मर्जी तोडून कसें जावें, या अंदेशांत आहों. जवाहीर घेऊन व याचें संमत घेऊन दुसरें तऱ्ही राजकारण करावें; या विचारांत आहों. कलम १.

सिद्दीं याजकडील फौजेचें राजकारण करावयाचे मांडिलें आहे. त्याचे वकील येथें आले आहेत. त्यासी बोलतच असो. होईल तेव्हा खरें. सिद्दी ह्मणजे नगर ठठ्ठा भुजे पलीकडे. तेथील फौज यावयाचा मजकूर. कलम १.

मेवा शेंपन्नासाचा अंगरेज मायेचे व कोंसलदारास खरिदी करून वाटावा. कलम १

लक्ष्मण गोपाळ याजवर बहुत ममता करीत जाणें. येविसीं याचें पत्र हुजूर येई असें करणें. कलम १.

मारवाडचें राजकारण करून फौज आणावयाकरितां राजश्री बिजेसिंग याजकडे माधवराव वैद्य रवाना केले असेत. भागोजी गवारी व कृष्णराव भास्कर तेथें आहेतच. होईल तें खरें. कलम १.

एकूण नव कलमें लिहिली आहेत. परंतु यांत सारासार पाहून छान करून बोलत जाणें. तुह्मांस मसलत सुचेल ती लिहीत जाणें. तुह्मी शाहाणेव मर्जीस वाकीफ आहां व येकनिष्ठ आहां. तुह्मी मसलत, येथील उपयोगी तेच ल्याहाल व कराल. मनसब्याचा पेंचपांच आढळल्यास उगऊन उत्तर लिहीत जाणें. येथेंहि छान होईल. फिरोन उत्तर येईल तैसें बोलावें. चार दिवस अधिक लागले तरी चिंता नाहीं. परंतु मनसुबा नांसू नये. हे मोठे शहाणपणचे उपाय आहेत. तूर्त दुसरे राजकारणावर आमचा भार आहे. परतुं याची मर्जी खटी करावयाची नाहीं व आपलें तर केलें पाहिजे. याजला विलायतेचा हुकूम लौकर येईल, हा भरंवसा येत नाहीं. यास्तव च्यार रुपये खर्चाची वोढ अधिक आगळी दाखऊन व सर्वस्वें हस्तपरहस्तें काम करून. हें पहिलें भाषण आहे. त्याजवरच कोठून रजा घ्यावी व जवाहीर घ्यावें. पुढें आंतून गुप्तरूप आमची कुमक करीत तें करावें. जाहीर न करीत तरी चिंता नाहीं. आह्मावर अंगरेजाचें, या जनरालाचें, उपकार मातबर. यासी छद्म करणें उचित नाहीं. परंतु यांणी हरयेक तजविजेनें काम आमचें करावें. यांस देऊं केलें तें देऊंच. दुसरेंही काम जाहालें तरी यासी वाकडी गोष्ट करावयाची नाही, हें खातरजमा करणें. मेस्तर शाहा विलायतेस जातात. लवकरच तेथें येथील. त्यांचे जबानीवरून कांही मजकूर कळतील परंतु दुसरी राजकारणें कोणतीं, हें त्यांस नांवनिसीं सांगितली नाहीं. तुह्मीही न बोलणें. जवाहीर सवासाहा लक्षाचें हातास आल्यावर मेस्तर शाहास रद्दकर्जी व कांही वाटखर्ची पाउण लक्षाचें ऐसीं हजारपर्यंत जवाहीर द्यावयाचें आहे. तुह्मांस पूर्वी सूचना असावी. लक्ष्मण गोपाळ ममतेत घेतल्यास तुह्मांस विचारास सोबत उत्तम होईल. आमचीही मर्जी सांप्रत कोशलांत घ्यावा, असी आहे. तेथें तुह्मांस त्याची वर्तणूक दृष्टीस पडत असेल, त्याप्रों करणें. आह्माजवळ नारो गोपाळ हा सर्वही मजकूर सांगतो. कोशलांत आहेत, यास्तव कोसल करून केल्यास पेंच पडत नाहीं. तेथें पक्की त्याची खातरजमा करून घेणें. वरकड ज्याचें त्याप्रों बोलत जाणें. इष्टोराचे मैत्र बहुत. आमचे ममतेचा. त्यासी बोलत जाणें. कारनेलीसी कार्याकारणें बोलावें. वरकडही अंगरेज ममतेंत राखावें. मेवा वाटावा. हरतऱ्हेनें कोसलदार वगैरे ममतत घ्यावे. मेहनत करावीं. सर्व मुछदी गेले. तुह्मी राहिलां. तरी सर्वांपेक्षां अधिक करून दाखवाल हा भरंवसा आहे. श्रीकृपा करणार. हा कागद दोन तीन वेळां वाचणें. मेहनत करणें. जाणिजे. छ २० जमादिलावल.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १६५.


१६९८ आषाढ शुद्ध १.

अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि :-
सेवक रघुनाथ बाजीराव प्रधान नमस्कार सु॥सबा सबैन मया व अलफ. तुह्मांकडे रु।। ३०० तीनसें पाठविले आहेत. तरी दोनशें रुपये तुह्मीं आपणास खर्चास घेणें व शंभर रुपयाची मेवा ईस्टुर वगैरे कोशलदार, आपले उपयोगीं पडत असतील, त्यांस त्यांचे मर्जी जोगा महिन्यांत येकदोन वेळा ज्या मेव्याचा जसा हंगाम असेल त्याप्रमाणें घेऊन देत जाणें. सदरहूं रु।। येथें अर्जुनजी नाथजी त्रिवाडी सुरतकर साहुकार याजकडे भरून याणीं वज्रभुकणदास तापीदास याजवर मुमईची हुंडी दिल्ही ती घेऊन पाठविली असे. तर सदरहूप्रमाणें ऐवज घेऊन पावलियाचें उत्तर पाठवणें. जाणिजे. छ २९ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ?

(लेखनावधि:)
बार.

श्री.

लेखांक १६४.


१६९८ ज्येष्ठ वद्य ११.

राजश्री लक्ष्मण अप्पाजी यांसि :-
सु।। सबा सबैन मया. आज कांहीं उणापुरा महिना होत आला. सुरतेंत दाखल जाहलों. पत्रें पांच चार तुह्मांस पाठविलीं व जनरालासहि लिहिलें. गंभीर बडमासहि बहुत सांगितलें. तेव्हां त्यांनीं मोघम बारा हजार रुपये देविले. येथे तरी दरमहा साठ निदानीं चाळिसास उणें पडत नाहीं. तेव्हां बाकीचा ऐवज कोठून आणावा ? ऐसियास, हे दरमहा काय देतात तें स्पष्ट पुसावें, तीस हजार, निदानी पंचवीस हजारहि, दिल्ह्यास हरकसेंहि चालवूं. दहाबाराच देणार, ऐसाच मजकूर असिल्यास आह्मांस जेथें जाऊं तेथें पोंहचाऊन द्यावें. जवाहिर मोडून खावें तरी जवाहिरहि जवळ नाहीं. साहा लक्षांचे जवाहिर त्याजपासींच गाहाण आहे, तें तरी निदानीं घ्यावें. च्यार महिने कारखाने यांस व जवळचे लोकांस देऊन चालऊं. उपाशी मरतील, त्यापेक्षां निरोप द्यावा. जिकडे देव बुद्धि देईल तिकडे जाऊं. दरमहा काय देतात तो मुकरर कळल्यावरी त्यासारिखा विचार ठहरविला जाईल. त्यास कोणी भ्रम घातला आहे कीं, आह्मांजवळ जवाहिर बहुत आहे. त्यास, हत्ती, घोडीं उपाशीं मरतात अद्यापि भ्रम न जाय, तरी काय इलाज करावा. निदानीं बंगाला आहे. काशी प्रयाग कोठेंहि जाऊन पोट भरोन राहूं. निदानीं हत्तीं, घोडीं, उटें विकत घेत असले तरी देऊं. निदान फुकटहि देऊं. बारभाईस मात्र न द्यावीं. वरकड फुकट मागतील तरी देऊं. आमच्यानें अत:पर खर्च चालवत नाहीं, हे पष्ट जनरालासी व कौशलासी बोलावें. भीड धरून रहावयाचा समय नाहीं. दुसरा जाहालियावरी बारभाईच्या फौजा भोवत्या येतील. वाट फुटणार नाहीं. पावसाळा हर तर्तूद करून जो आह्मांस ठेवील तिकडे जाऊं. याणीच पोंहचावून द्यावें. निदानीं महिन्याची बेगमी करून निरोप तरी द्यावा. कोठेंहि गेलों तरी इंग्रेजाची दोस्ता सोडावयाची नाहीं. विलायतचा हुकूम आल्यावरीं जवळच असिल्यास याजवळच येऊं. जाणिजे. छ २४ रबिलाखर.

(लेखनावधि:)

लक्ष्मण गोपाळासहि कामकाजांत घेत जाणें. शाहाणा आहे व मर्जीचाच आहे.

श्रीसांब: सपुत्रो विजयते.

लेखांक १६३.


१६९८ ज्येष्ठ वद्य ११.

राजश्री लक्ष्मण अप्पाजी यांसि :-
सु।। सबा सबैन मया. आज कांहीं उणापुरा महिना होत आला. सुरतेंत दाखल जाहलों. पत्रें पांच चार तुह्मांस पाठविलीं व जनरालासहि लिहिलें. गंभीर बडमासहि बहुत सांगितलें. तेव्हां त्यांनीं मोघम बारा हजार रुपये देविले. येथे तरी दरमहा साठ निदानीं चाळिसास उणें पडत नाहीं. तेव्हां बाकीचा ऐवज कोठून आणावा ? ऐसियास, हे दरमहा काय देतात तें स्पष्ट पुसावें, तीस हजार, निदानी पंचवीस हजारहि, दिल्ह्यास हरकसेंहि चालवूं. दहाबाराच देणार, ऐसाच मजकूर असिल्यास आह्मांस जेथें जाऊं तेथें पोंहचाऊन द्यावें. जवाहिर मोडून खावें तरी जवाहिरहि जवळ नाहीं. साहा लक्षांचे जवाहिर त्याजपासींच गाहाण आहे, तें तरी निदानीं घ्यावें. च्यार महिने कारखाने यांस व जवळचे लोकांस देऊन चालऊं. उपाशी मरतील, त्यापेक्षां निरोप द्यावा. जिकडे देव बुद्धि देईल तिकडे जाऊं. दरमहा काय देतात तो मुकरर कळल्यावरी त्यासारिखा विचार ठहरविला जाईल. त्यास कोणी भ्रम घातला आहे कीं, आह्मांजवळ जवाहिर बहुत आहे. त्यास, हत्ती, घोडीं उपाशीं मरतात अद्यापि भ्रम न जाय, तरी काय इलाज करावा. निदानीं बंगाला आहे. काशी प्रयाग कोठेंहि जाऊन पोट भरोन राहूं. निदानीं हत्तीं, घोडीं, उटें विकत घेत असले तरी देऊं. निदान फुकटहि देऊं. बारभाईस मात्र न द्यावीं. वरकड फुकट मागतील तरी देऊं. आमच्यानें अत:पर खर्च चालवत नाहीं, हे पष्ट जनरालासी व कौशलासी बोलावें. भीड धरून रहावयाचा समय नाहीं. दुसरा जाहालियावरी बारभाईच्या फौजा भोवत्या येतील. वाट फुटणार नाहीं. पावसाळा हर तर्तूद करून जो आह्मांस ठेवील तिकडे जाऊं. याणीच पोंहचावून द्यावें. निदानीं महिन्याची बेगमी करून निरोप तरी द्यावा. कोठेंहि गेलों तरी इंग्रेजाची दोस्ता सोडावयाची नाहीं. विलायतचा हुकूम आल्यावरीं जवळच असिल्यास याजवळच येऊं. जाणिजे. छ २४ रबिलाखर.

(लेखनावधि:)

लक्ष्मण गोपाळासहि कामकाजांत घेत जाणें. शाहाणा आहे व मर्जीचाच आहे.

श्री.

लेखांक १६२.


१६९८ ज्येष्ठ शुद्ध १४.

राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यांसि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. तुम्हीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें.

जनराल यासी जवाहिराचा मजकर बोलून पाहातों, ह्मणोन लिहिलेंत. ऐशास मेस्तर हो याचें लिहिलें तेथून आलें. त्यांणीं लिहिलें आहे कीं, आपली कुमकच होईल व आपलें जवाहीर अमानत आहे तें देववयाविसीं बंगाल्याचे कोसलदार याणीं मुंबईस लिहिलें आहे. त्यास जवाहिराविसीं परवानगी आली. आपटणांनीं केल्याचा गैरवाका सर जनराल यास समजला. त्या अर्थें मुंबईकर जनराल आमचे जवाहीर आमचे हवालीं करितील. त्यांत सध्यां विलायतेच्या लिहिल्याची शौरत जाहाली आहे, हें लिहिलें खरें. जनराल यांसहि आलें असेलच. तेव्हां लौकर मसलत मारून न्यावी हा त्याचे इराद्याचा डौल नजरेस पडत असल्यास, आजच जवाहीर मागितल्यानें मसलतीची उभारणी करीत असतां जवाहीर मागतात तेव्हां मसलत तुटते असें जनराल यास भासत असल्यास लौकर कुमक करावी, मसलत मारावी, हेंच बोलून तसेंच घडवावें तथापि या गोष्टी बादजबरसातेवर गेल्या असा अर्थ असल्यास जनराल याजवळ आपले येथील खर्चाचा मजकूर बोलून जवाहीरहि त्याजवळ मागावें. समागमें कारखाने वगैरे पागा व सिलेदार व हत्तीचा खर्च व उष्ट्रखान्याचा खर्च चालतो कसा ? जवाहीर घेऊन हरकोठें ठेऊन च्यार दिवस खर्च चालऊं. सारांश कीं, हे दोन्ही प्रकार लिहिले आहेत. सध्यांच मसलत मारून न्यावयाचा डौल नसल्यास जवाहीर जनराल याजवळ मागावेंच आणि खर्चाचीही निकड त्यास समजाऊन, खर्चाविसींही बोलावें. बाराशें रुपये नित्यचा खर्च जरूर जरूर केल्यास लागतो. त्यास, दरमहा तीस हजार रुपये दिल्हे तरी जवाहिराविसीं निकड न करणें. मागावें तरी खरेंच. निकड मात्र करूं नये. नाहीं तरी, करावी. कलम १.

फितुरी याची फाज पुढें आली होती ते माघारा कुच करून गेले. हालीं त्याचा मुक्काम सोनगडानजीक आहे. त्यांनीं डबईकडे कृष्णाजी पवार सातआठशें स्वार रवाना केले असेत. कांहीं फौज इकडे लावणीस ठेवितात. परंतु फौज बेदिल. कोणी इकडे छावणीस रहात नाहीं. याप्रमाणें वर्तमान आहे तुम्हांस कळावें. कलम १.

नबाब हैदरअल्लीखान बहादर यांचीं पत्रें व राजश्री बाजीराव गोविंद यांची पत्रें छ १० रबिलाखरी हुजूर आलीं. बाहादर बमें फौज पायदळ मिळोन साठपासष्ट हजार व तोफखाना वगैरे सरंजामानसी तुंगभद्रा उत्तरतिरीं आले. लौकरच कृष्णातीरास येऊन पोंहचणार. फितुरियास बाहादारांनीं ताण चांगला बसविला आहे. तुह्मांस कळावें. कलम १.

येथील खर्चाचा मोठा गलाठा. नित्य खर्च चालणें कठिण. जवाहिराचा येखादा दागिना मोडावा तेव्हां रोजचा खर्च दाणावैरणीचा चालतो. याप्रों दररोज चाललें आहे. खर्चाविसीं काय करावें ? इंग्रजाचे पेट्यांत आल्यावर सर्व प्रकारें भरंवसा जनराल याचा आहे. तरी खर्चाची निकड त्यास समजावून, त्याजकडून खर्चाची बेगमी होय तो अर्थ करणें. कलम १.

जवाहिरही सरल्यांत आहे. हेच फिकिरींत आहों. १

कारनेल टामस किटीण येथें कितेक कामकाजाचे अर्ध उगीच समाधानयुक्त बोलत होते ह्मणोन लिहिलें तें कळलें, ऐशास, कारनेल याजकडे फत्तेसिंग गायकवाड याजबाबत दहा लक्ष रुपयांचा हवाला आला. त्यांपैकीं बाकी ऐवज राहिला असतां, दहा लक्षांची पावती द्यावी. हें कारनेलीचें बोलणें; परंतु सरकारांतून पावती न दिल्ही, याजमुळें तें रुष्ट होऊन गेले. वाजबी ऐवज निघेल तो देवावा ह्मणोन जनराल याजवळ बोलावें. याप्रमाणें पेसजी तुह्मांस सविस्तर लिहिलेंच आहे. हल्लीं कारनेलही तेथें गेलेच आहेत. तरी हा मजकूर जनराल यासी बोलोन वाजवी ऐवज फिरले तो मागावा. फत्तेसिंगाकडील कारकून तेरा चवदा पावले ह्मणत होते. परंतु कारनेल बडोद्याचे मुक्कामीं दाहा रोख पावले ऐसें बोलले होतें. त्यास पावती आमची असे. ते वजा करून बाकीचे रुपये घेणें. पावतींत दीड लक्षाची रयात आहे. कलम १.

जनरल इत्यादिक इंग्रज यांस विलायतेचा भरंवसा फार आहे, म्हणोन लिहिलें. त्यास, विलायतेहून बादशहाचें व कंपनीचें लिहिलें आलें कीं, मुंबईकर जनराल यांणीं सरकारची कुमक केली, साष्टीचा किल्ला घेतला, हे गोष्ट उत्तम केली, आमची मसलत सेवटास न्यावी, म्हणोन कलकत्त्येकरास लिहिलें आलें. त्यांणीं लढाई सुरू करावयाची परवानगी जनराल यास पाठविली ह्मणोन कलकत्त्याहून येथें साहुकाराचीं लिहिलीं आलीं आहेत व इंग्रेजहि येथील बोलतात. मुंबईहून फत्तेमारी आली त्यास, मेस्तर बाडम यांस हा मजकूर जनराल याणीं लिहिला आहे, ह्मणोन साहुकारींत वर्तमान आहे. परंतु बाडमाचें बोलणें इतकेंच. मात्र खुशालीचें वर्तमान आहे. याप्रों येथें सर्वत्र बोलतात. तेव्हां मुंबईस लिहिलें नसेल आलें, असा अर्थ कांहीं दिसत नाहीं. हें जनराल तुम्हांसी बोलतात किंवा हा मजकूर गुप्त ठेवितात, हें न कळे आम्हांस साहुकाराकडून व इंग्रेजाकडून बातमी कळली. हा पत्तेवार अर्थ त्यास बोलावयाचा नाहीं. परंतु याप्रों लिहिलीं आलीं हे संकेतार्थ बोलून, त्याच आंगीं लावावें. ह्मणजे काय जो अर्थ असेल त्याचा खुलासा निघेल. कोणी कांहीं बातमी सांगतो त्याचीं नावें नच घ्यावीं. मोघम मात्र बोलावें. नांव घेतल्यास पत जाईल. फिरून बातमी कळणार नाहीं. सावधतेनें बोलावें. कलम १.

जनराल याणीं सांगितलें कीं, श्रीमंतांनीं आम्हांस लिहिलें आहे त्याचा जाबसाल सविस्तर मेस्तर बाडम व मेस्तर गंभीर याणीं खर्चाचा मजकूर वगैरे मजकूर लिहिला. त्याचा जाबसाल उभयतां मशारनिलेस लिहिलें आहे ते सविस्तर सांगतील. म्हणून लि॥ ऐशास, येविसीं बाडम यास विचारलें; परंतु ते म्हणतात कीं, हा मजकूर जनराल याणीं लिहिला नाहीं. मागाहून लिहिलें येईल. मेस्तर गंभीर काल छ १२ रबिलाखरीं भेटीस आले. दोहोंचहूं रोजीं गंभीर भडोचेस जाणार. कलम १.

राजश्री सखाराम हरि फितुरियाकडे गेले. त्यास फितुरी ह्मणतात कीं, श्रीमंतांनीं साहा सात लक्ष रुपयेखेरीज किल्ले करून देशीं जहागीर देतों ते कबूल करावा. आणि सर्व बंदोबस्त फितुरियानें करावा. ह्मणोन मशारनिलेनीं लिहिलें होतें. ऐशास सखाराम हरि तेथें गेले. तेव्हां ते सांगतील त्याप्रों त्यास लिहिणेंच. फितुरियांचा इतबार काय ? यांचा इतबार कोणत्याही गोष्टीचा नाहीं. निदानीं आठ नऊ कबूल होतील. परंतु ते बेइतबारी. याजकरितां भडोच सुरतेस राहूं. हाच पक्ष मशारनिलेस लिहिला आहे. कलम १.

येकूण कलमें आठ असेत. जाणिजे. छ १३ रबिलाखर.

(लेखनावधि:)

पैवस्ती छ २० रबिलाखर.

श्री.

लेखांक १६१.


१६९८ ज्येष्ठ शुद्ध १४.

पु॥ राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांस :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. मेस्तर शाहाचा इरादा विलायतेस जावयाचा आहे. त्यास सुरतेंत येऊन स्वामीस भेटोन जावें, हे त्याचें मानस. त्यास, मारनिलेस विलायतेस सरकारतर्फेचें काम सांगावें, ह्मणोन विस्तारपूर्वक लिहिलें तें कळलें. ऐशास, मेस्तर शाहा येथें येऊन भेटोन जाणार हें उत्तम आहे. तुचे लिहिल्याप्रों विलायतेचा धरबंद याचे हातून केला जाईल. जाणिजे. छ १३ रबिलावर.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १६०.


१६९८ ज्येष्ठ शुद्ध १४.
नकल पत्राची.

जनराल यास पत्र कीं :-
अलीकडे आपणाकडून खत येऊन खुषीची खबर मालू होत नाहीं. तरी ऐसें न करावें. हरवख्त आपली खुषी कलमीं करून दिलशानगी करीत जावें. दरींविला विलायतेहून बादशाहाचा व कंपनीचा अपटाणांस हुकूम आला कीं इंज्यानेबाची कुमक केली, साष्टीचा किल्ला घेतला, हे गोष्ट मोठी चांगली जाहांली. याप्रों विलायतेहून हुकूम आपल्यास आल्याचें वर्तमान आह्मीं येथें परस्परें ऐकिलें. परंतु हे खुषीची खबर आपण आह्मांस लेहून इतल्ला दिल्हा नाहीं. त्याजवरून ताजूब वाटलें. कारनेल अपटण याणीं तह करून कलकत्त्यास सर जनराल यांस लेहून पाठविलें आहे. त्यास गैरवाजवी तह केल्यामुळें सर जनरालहि या गोष्टीच्या अंदेशांत पडलेच असतील. सांप्रत मुख्य गोष्ट कीं, आपल्यास विलायतेचें लिहिलें आलें असेल मया अर्थें या गोष्टी दिरंगावर न घालाव्या.
त्सल मारून बाजू शेर करावी. आपले अभिमानाची शौरत दुनियेंत महसूर होय तो अर्थ घडवावा. येथील खर्चाचा मोठा गलाठा आहे, येविसीं लक्ष्मण आप्पाजी यास लिहिलें आहे असे. जाहीर करितील. त्याप्रों अमलांत आणावें. छ १३ रबिलाखर.

श्री.

लेखांक १५९.


१६९८ वैशाख.

यादी

१ सहा लक्षांचे जवाहिराचा मजकूर.
१ जनराल खर्चास काय देतील त्याप्रोंच द्यावें.
१ सिबंदीस निदानीं पंचवीस लक्ष... पाहिजेत. तेव्हां रुाा चा... अर्धा देऊं... त्यास जवाहीर मागोन घ्यावें. गहाण ठेऊन कर्ज रुपये घेऊन पाठवणें.
१ कंपनीचे जाग्यांत राहिल्यास पेंच न पडे ते जनरालांनीं करावें. आह्मीं येऊं अथवा सुरत भडोचेस राहूं. आणि बाळास व सदाशिव रामचंद्रास पाठऊं.
१ जनरालाखेरीज दुसरा आश्रय भूमंडळीं नाहीं.
१ पोटाचें संकट. जनावरास पाव चंदी देतों.
१ भडोचेस रहावें. पाव कोस अर्ध कोसावर राहावेसें मानस आहे.
१ धवशाचें राजकारण व जाल्यास मुंबईस येतों.
१ सिबंदीविसीं ल्याहावें. कोठें राहावें ऐसें जनरालांनीं लिहीत जावें.
१ अपटणाचीं पत्रें पाठविली. त्यांची मसुदा जनरालास दाखवावा.
१ लाख रुपये कर्ज पाठवणें. ह्मणजे येथें रोजमरा फौजेस देऊं. इतर धरणीं पारणीं होतील.
१ कोकणचे मार्गें हैदराकडे जावें तरी वाट अवघड; फौज न निभावे. तथापि विचार करून पाहतों.

येकूण पत्रें २.

श्री.

लेखांक १५८.


१६९८ वैशाख शुद्ध १०.

पुरवणी राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यांसि:-
सुहुरसन सीत सबैन. मुंबईकर जनराल व कोशलदार याणीं आमची मसलत धरिली. त्या कराराप्राणें सिद्धीस न्यावी. बंगाल्याच्या बंदीचा हुकूम आला तो याणीं न ऐकावा आणि केलें कार्य सिद्धीस न्यावें, हिम्मतीनें हा तोर राखावा, तें याच्यानें न जाहालें. तस्मात हिम्मतीचे कोते, ही गोष्ट अनभवानें कळोन आली. असो ! हालीं कलकत्त्याची परवानगी आली अझून तरी जलदी करून मसलत सिद्धीस न्यावी. तूर्त सवड आहे. हेही न होय, तेव्हां यांच्या करण्याची तारीफ काय करावी, हें कळतच आहे. तिसरा पक्ष: तूर्त खर्चास दोन चार लाख परुये घ्यावे, ह्मणजे आह्मी दोन चार महिने ढकलूं. त्यास आमचाच ऐवज याजकडे आहे. जवाहीर सव्वा सहा लक्षाचें अनामत व फत्तेसिंगाबद्दल कारनेलीकडे अडीच लक्ष व कित्ता फत्तेसिंगाकडील कारकून तेरा लक्ष म्हणून सांगतात. त्यांतील तीन लक्ष, येकूण साडेपांच लक्ष. याप्रमाणें बारा लक्षांचा ऐवज आमचाच आहे. त्यांपैकीं द्यावे अथवा तूर्त कर्जदाखल रुपये द्यावे. ह्मणजे फौजेस थोडेबहुत देऊन चार दिवस निभाऊं. कांहींच न होय, तेव्हां लाचारीस्तव बारभाईकडे सलूकाचा संदर्भ लावावा लागेल. परंतु इंग्रेज जनराल मुंबईकर यास खातरजमेनें मसलत सिद्धीस न्यावी हा अभिमान असल्यास, कोणताही विचार जलदीनें करावा. एक तूर्त मसलत जलदीनें सिद्धीस न्यावी अथवा खर्चास द्यावें, ह्मणजे चार दिवस काढावयास येतील. हें कांहींच न होय, तेव्हां पुढें करतील हें कळतच आहे. सलूक करणें प्राप्त जाहाला. त्यासही इंग्रेज दरम्यान लागतील. सबब आधीं बोलून ठेवणें. सर्व गोष्टी इंग्रजांचे बलावर आहेत. बारभाईसी सलूख कसा घडतो ? उभयपक्षीं तोड काय राहिली ? हें तुह्मांस कळतच आहे. लाचारीस उभे. गुजराथेवर तोंड पडल्यास तूर्त मसलत गा ++ ऐसे मनांत आहे. परंतु फितुरी दाहाखेरीज ऐकणार नाहीत. इंग्रजी सरंजाम माघारा सुरतेस येऊन राहिला तो बाहेर लष्कराचे राहून, पांच सात कोस कूच केलें तरी तेंही तोड पडेल. तूर्त इंग्रज माघारे फिरले, बंगालियाहून परवानगी आली, अैसे वर्तमानावरच फडके वगैरे घाबरे जाले आहेत आणि सलुख्याचें राजकारण कृष्णराव बळवंत यांणीं राजश्री सखाराम हरीचें मार्फतीनें लाविलें आहे. त्यांसी नाद लाविलाच आहे. परंतु दाहाविना तेंही शेवटास जाणें संकटच आहे. सर्वप्रकारें तूर्त गळाठा पोटाविना मसलतीचा झाला आहे. येथें सुरतेस बहुत प्रेत्न केला. परंतु लाख पन्नास हजार रुपये कर्जवामही मिळेना. यामुळें लाचार झालों आहों. गायकवाडाकडील ऐवजाचा व पावतीचा मजकूर तुम्हांस विस्तारें पूर्वीं लिहिलाच आहे. पावती दिली तरी त्यांत दरजा फार ठेविल्या आहेत, न द्यावी हे गोष्ट प्रमाण. परंतु येथील लाचारी व वक्तसमय ! करनेलीविना उपाय नाहीं. ऐसे समजोन गुणदोष पाहून केलें आहे. कसाही ताठा जाला आणि याणीं मसलत शेवटास नेली म्हणजे अवघड नाहीं व त्याशीं वादहि सांगणें नाहीं. मसलतीपुढें दाहापांच लक्षांचे कमजास्तही पेंच नाहीं, ऐसें समजोनच केलें. पावती दिलीं असतां मसलतीस री ठिकाण नाहीं आणि दिवसेंदिवस उदास व रुष्टताच कर्नेल दाखवितात ! सरकारतर्फेनें सरळतेस गुंता नाहीं. अस्तु ! तूर्त पंचाईतीसी प्रयोजन नाहीं. भलते प्रकारें लाख दोन लाख रुपये मिळालियास मसलतच मारतों, ऐशी उमेद धरितों. प्रेत्न होईल तो करणें. जाणिजे. छ ९ रबिलावल.

(लेखनावधि:)