Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १७६.
१६९८ अधिक भाद्रपद वद्य ७.
राजश्री लक्ष्मण आपाजी सो॥ यांसि :-
सु॥ सबा सबैन मया व अलफ. तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट झालें. जवाहिराविशीं जनरल याशीं बोलणें जाहलें. निकड केल्यास जवाहीर देतील. त्यास, जनराल कोषल याच्या नावें आठाआठ दिवसांच्या तफावतीनें पत्रें पाठवावीं, ह्मणोन लि।। तें कळलें. ऐशास दवणेकडे आलों. फिरंगा यांसि सीलसीला लाविला. याचें कारण मी सुरतेत राहिल्यानें पुढें बारभाईच्या फौजा येऊन उभ्या राहतील, मग मसलतीस बळ पडणार नाही. याचकरितां जलदी करून इकडे आलों. परंतु अंगरेजाचा भरवसा पक्का. थोर तरांडे. पल्यासहि याच तराड्यांत पाहोंचवावयाचें. हें समजोनच त्यास तोडावयाचे नाहींत. इकडे येऊन लहानमोठीं राजकारणें करून पाहतों. दोस्त जे कोणीं आहेत त्यांच्या गळ्यांत हात घालतों. मेळऊन घेतों. परंतु थोर जो भरवसा आहे तो एक अंगरेजाचा. तेव्हां जवाहिराविसीं निकड केल्यानें अगदींच तोडलेसें त्याच्या चित्तांत येईल. आधीं सुरतेंहून निघालों, इकडे आलों, तेसमयीं त्यास न विचारले. हें एक त्याचे चित्तांत काय आलें असेल तें न कळे. आणि जवाहीरही निकडीनें मागितल्यास त्यास परिछिन्न भासेल की, उठून गेले. आणि आह्मांस त्याचा दरकार. याजकरितां त्याजवळ झटून मागवूं नये. जवाहीर त्याजवळ असल्यानें त्यांसही हेंच समजले कीं, मसलत आह्मांवरच आहे. चार दिवस खर्चाच्या वोढीमुळें व बारभाईच्या पेंचामुळें बाहेर पडेल, पोट भरलें, परंतु अंगरेजाखेरीज दुसरा विचार नाहीं. याप्रों।। तुह्मीहि त्याची खातरदास्त करावी. संतोषानें त्याच्या चित्तांत दुसरा विचार न येतां, जवाहीर दिल्यास घेणें. परंतु जनरालाच्या समाधानानें जे गोष्ट होईल ते करणें. लिहिल्यावरून जनराल कोशल यास खलिते पाठविलें. परंतु लिहिला अन्वय सविस्तर ध्यानांत आणोन, याचे कोशल करून मनसब्यास युक्त असल्यास खलिते देणें. नाहीं तर न देणें, जाणिजे. छ २० माहे रजब.
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १७५.
१६९८ अधिक भाद्रपद वद्य २.
मंजूर
करनेल कीटिंग यासी पत्र जे :- तुह्मी पत्र छ ३ रजबचें पाठविलें तें पाऊन संतोष जाहला. विलायती जाहाज छ २ मिनहूस मुंबईस पोहचलें. सरकारचें करारमदार जाले ते कंपणीनीं मान्य केले. व जनराल व कोसलदार कलकत्तेकर यासी कंपणीचा हुकूम आला कीं, इकडील सरकारचे बंदोबस्तात अनुकूल होणें, उन्मूल हुकूम न करणें व कंपनीचा फर्मान येथों आला तो अद्यापि खुला जाला नाहीं. याचें सविस्तर वर्तमान जनरालास विचारून मागाहून लिहून पाठवूं व मिस्तर टेलरचें पत्र छ १७ जमादिलावलचें जनरालास आलें की सरकारचे बंदोबस्ताविशीं जें कोशिष होईल तें उत्तम प्रकारें करीन व सर जनराल व कोसलदार कलकत्तेकरास सरकारची पत्रें पाठवावयाविसीं कितेक मजकूर लिहिला व मुंबईकर जनरालासही पत्र लिहावें कीं, कंपणीचे सरकारची फौज सरकारचे मदतीस येईल ते सेवकाचे तैनातीस करून हुजूर पाठवावीं. ऐसे कितेक मजकूर लिहिले ते अक्षरशाह ध्यानास आले. ऐसियासीं, आह्मीं ज्या गोष्टीची मार्गप्रतीक्षा करीत होतों तेंच तुह्मीं खूषखबर विलायती जाहाज येवून पोहचल्या लिहिली. यावरून बहुतच संतोष जाहला. कंपणीचा फर्मान जनरालास आला, त्यांतील अर्थ सविस्तर लिहून पाठविणें. मिस्तर टेलर बहुत शाहाणे व सरकार कामाचे उपयोगी. ते जो उद्योग व तर्तूद करतील ते सरकारउपयोगी उत्तम करतील. सर जनराल व कोसल कलकत्तेकर यासी पत्र तुमचें लिहिल्याचे अन्वयें पूर्वीच लिहून, एक पत्र मिस्तर टेलरास ऐसी दोन पत्रें कलकत्त्यास रवाना केली. मुंबईकर जनराल हे अंत:करणापासून सरकारचे कार्यास उत्तम उद्योगप्रयुक्त आहेत. हे अर्थ अनभवास व निदर्शनास आले व पुढेंहि पुरतेंपणें येतील, बेभरवसा याचाच आहे. यासहि पत्र लिहिलें आहे व तुमची सेवाचाकरी व निष्ठेचे अर्थ हुजूर दृढतर आहेत. कंपणीचे सरकारची फौज सरकारचे मदतीस रवाना होती येसे सिध जाल्यास हे फौज तुमचे तैनातीस देऊन हुजूर रवाना करावे ह्मणून मुंबईकर जनरालास पत्र लिहिलें जाईल येविसींची खातरजमा आसो देणें. हिंदवी लाखोटा हिंदुस्थानातूंन आला ह्मणून तुह्मीं पाठविला तो पावला. जनराल करनेक यासी कंपणीनीं मुंबईचे जनरालाखाली पाठविलें ह्मणून मजकूर लिहिला तो कळला. खासा स्वारी सुरतेंत कंपनीच्या घरीं होती. परंतु खर्चाची वोढ फार व किले धार येथे कबिला व चिरंजीव लाहान आहेत. तेथें फितुरियाणीं फौज पाठवून मोरचे बसविले. सबब सुरतेहून बाहेर निघालों. सरकारचे फौजेसहि बोलाविलें आहे व सांप्रत्य विलायतेचाहि हुकूम आला आहे. तरी श्रीकृपेनें फितुरियांचे पारपत्य होऊन लवकरच बंदोबस्त सरकारचे दौलतीचा होईल. तेथें जनराल व कोशलदारांची खातरजमा आमचे तर्फेनें करणें कीं, मुंबईकर आंगरेजासी दोस्ती दिवसेंदिवस ज्यादा आहे. खर्चाचे तंगीमुळें व धारेस कबिला व चिरंजीव आहेत त्या किल्ल्यास मोर्चे बारभाईकडील लागले याजमुळें सुरतेहून बाहेर निघोन किल्ले अर्जुनगड व पारनेरा येथें आलों. कांही परगणे जफ्त केले थोडाबहुत खर्च चालतो व दमणकराचे मार्फातीनें गोवेकर फिरंगियासी संधान लाविलें. परंतु आमचें खरें लक्ष बंबईचे आंगरेजाकडे आहे. गोव्याची कुमक आली तरी येओ. कामाहि सुरूं होईल. कारण, जे दिवशीं विलायतचा हुकूम बंबईचे जनराल कोशलास येईल व त्याचे लिहिले आह्मांस येईल ते दिवशीं त्याजवळच येऊं. तूर्त त्यास खर्चाचे संकट. सबब, च्यार दिवस या मुलकांत गुजराणा करितों. जाणिजे. छ १६ रजब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १७४.
१६९८ अधिक भाद्रपद शुद्ध १२.
पु।। राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यांसि :-
सु।। सबा सबैन मया व अलफ. खासा स्वारी छत १० रजबीं, मौजे उदवाडा त॥ बादलापारडी येथून कूच होऊन अर्जुनगडानजीक कोसावर मुकामास आली. किल्ल्यांत फत्तेसिंग हवालदार होता तो खालीं उतरोन रुजूं जाहला याजमुळें त्यासच किल्ले मजकूर काईम करून ठेविला व किल्ल्यावर हुजूरचे लोक व कारकून ठेऊन बंदोबस्त केला; दवणकर जमियतसुद्धां भेटले. याजबराबर तोफाही आहेत. या दबावांनी इंद्रगड वगैरे जे बाळ त्यास आहेत त्यांवर शह टाकून हस्तगत होतील ते करीतच असो. गोव्यास पत्रें मुख्य फिरंग्यास व राजश्री जिवाजी विश्राम यास लिहून तुह्मांकडे पाठविलीं आहेत. तरी ही पत्रें जलद फिरंगियाचा कोठीवाला तेथें आहे याजवळून रवाना करवणें अगर हरतर्तुदीनें जसी तुह्मांस सोई पडेल तसी पाठवणें. तेथून लौकर सरंजाम आला पाहिजे. वरकड सविस्तर पु॥ पत्रावरून कळेल. जाणिजे. छ ११ माहे. रजब. बहुत काय लिहिणें ?
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १७३.
१६९८ अधिक भाद्रपद शुद्ध ८.
नकल पत्राची पेशवे माधवराव यांहीं कारनेल आपटणास लिहिलें त्याची नकल :-
आतां तुमचे अर्जास जाब लिहितो :-
श्रीमंत रघुनाथराव यांसी तहनामा लिहिला होता कीं, त्यास पैका आणि त्यांही राहावें तें आह्मी आता फिरवितो. त्याची वगत आह्मीं श्रीमंत रघुनाथराव यांची निशा शुद्ध हृदयापासून कबूल करितों कीं, त्याही राहावें श्रीबनारसमध्यें. त्यास पैका अथवा गांव रुपया पांच लाखांचा करार करीन, परंतु त्याही गांवामध्यें फितूर अथवा हंगामा फिरून न करावा आणि हरकोण्हापासीं हंगामाची मैत्री न करावी व आह्मांस सांगितल्याखेरीज त्याही त्याचेच मुक्काम न फिरवावे. १
आमची इच्छा सर्व जनराल कौवशेल कलकत्त्याचे त्यासि अर्जी करावी कीं, दोस्तीचें त्यांही लिहावें. बनारसवाल्यास त्याच्याच तर्फेने श्री. रघुनाथरावास पैका द्यावा. जो करार होईल तो त्यास ५ लाख रुपयास आह्मी मराष्ट्र गावांमधून काल्पी अथवा परगणें ह्या कार्यास ठराऊं. १
आह्मी हुकूम करूं त्या पैक्यास अथवा गांवासव चालता करावयासि ज्या दिवशीं रघुनाथराव कबूल करितील हा करार वरती लिहिल्याप्रमाणें त्या दिवसापासून देऊं. परंतु पैका देणें अथवा गांव श्री. रघुनाथराव बनारस पावलियानंतर. १
ह्या कार्यास थोडे दिवस बंदोबस्तास लागतील त्यास्तव मुंबईचे जनराल कौवशेल यांही श्री. रघुनाथराव यास जामीन राहावें कीं, श्रीमंतांही सुरतेस राहावें जवपर्यंत हा करारजाब ठराऊन पाठवितील; परंतु त्याहीं फितुर कार्य अथवा हंगामा न करावा. १
ह्या कार्याचा जाब लिहावयासि हैगई न करणें आणि नवा तहनामा न करावा आह्मी निश्वई केला असे याखेरीज दुसरेन करावें ऐसे असोन श्रीमंत कबूल न करतील तर इंग्रेजांनी ज्या बंदोबस्तात गुंतल्यात त्याचप्रमाणें चालावें.
तुह्मांस अर्जी करितों की ही सर्व हकीकत मुंबईच्या जनराल कौवशेल यास लिहिणें व जाहीर करणें आमचा हाच निश्वैई ज्यादा काय लिहिणें ? ता. २१ आगोस्त सन १७७६.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १७३.
१६९८ अधिक भाद्रपद शुद्ध ८.
नकल पत्राची पेशवे माधवराव यांहीं कारनेल आपटणास लिहिलें त्याची नकल :-
आतां तुमचे अर्जास जाब लिहितो :-
श्रीमंत रघुनाथराव यांसी तहनामा लिहिला होता कीं, त्यास पैका आणि त्यांही राहावें तें आह्मी आता फिरवितो. त्याची वगत आह्मीं श्रीमंत रघुनाथराव यांची निशा शुद्ध हृदयापासून कबूल करितों कीं, त्याही राहावें श्रीबनारसमध्यें. त्यास पैका अथवा गांव रुपया पांच लाखांचा करार करीन, परंतु त्याही गांवामध्यें फितूर अथवा हंगामा फिरून न करावा आणि हरकोण्हापासीं हंगामाची मैत्री न करावी व आह्मांस सांगितल्याखेरीज त्याही त्याचेच मुक्काम न फिरवावे. १
आमची इच्छा सर्व जनराल कौवशेल कलकत्त्याचे त्यासि अर्जी करावी कीं, दोस्तीचें त्यांही लिहावें. बनारसवाल्यास त्याच्याच तर्फेने श्री. रघुनाथरावास पैका द्यावा. जो करार होईल तो त्यास ५ लाख रुपयास आह्मी मराष्ट्र गावांमधून काल्पी अथवा परगणें ह्या कार्यास ठराऊं. १
आह्मी हुकूम करूं त्या पैक्यास अथवा गांवासव चालता करावयासि ज्या दिवशीं रघुनाथराव कबूल करितील हा करार वरती लिहिल्याप्रमाणें त्या दिवसापासून देऊं. परंतु पैका देणें अथवा गांव श्री. रघुनाथराव बनारस पावलियानंतर. १
ह्या कार्यास थोडे दिवस बंदोबस्तास लागतील त्यास्तव मुंबईचे जनराल कौवशेल यांही श्री. रघुनाथराव यास जामीन राहावें कीं, श्रीमंतांही सुरतेस राहावें जवपर्यंत हा करारजाब ठराऊन पाठवितील; परंतु त्याहीं फितुर कार्य अथवा हंगामा न करावा. १
ह्या कार्याचा जाब लिहावयासि हैगई न करणें आणि नवा तहनामा न करावा आह्मी निश्वई केला असे याखेरीज दुसरेन करावें ऐसे असोन श्रीमंत कबूल न करतील तर इंग्रेजांनी ज्या बंदोबस्तात गुंतल्यात त्याचप्रमाणें चालावें.
तुह्मांस अर्जी करितों की ही सर्व हकीकत मुंबईच्या जनराल कौवशेल यास लिहिणें व जाहीर करणें आमचा हाच निश्वैई ज्यादा काय लिहिणें ? ता. २१ आगोस्त सन १७७६.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १७२.
१६९८ अधिक भाद्रपद शु. ८.
कारनेल अपटण यास पत्र जे. निमकहरामी चाकरांनी फितूर केला. सबब मुंबईकरांचे विद्यमानें कंपनीच्या मोहोरेनसी इंग्रजाशीं तह करून कुमक घेतली. फितुरियांस जरबहि बसली. पुढें करारा-प्रों। मसलत सेवटास जावी, इतकियांत तुमचें येणें पुरंधरीं जालें. तेथें जसें तुमच्या समजण्यांत आलें तसा तह ठराऊन इंग्रजी कुमक महकूब केलीत त्यामुळें लढाईहि महकूब जाली. आह्मीं सुरत जागा कंपणीची जाणोन तुह्मां इंग्रज लोकांचेच भरवसीयावर तीन महिने जाऊन राहिलों. आपल्याकडील. हि इंतजारी केली कीं, आमचे पल्याशी तऱ्हें आपण काहाडतील. ती कांहीं दिसोन आली नाहीं. आह्मांस तर खर्चाची मोठी वोढ. ते कोठपरयंत सोसावी ? शहरचें राहाणें. घांस लकडी देखील विकत घ्यावीं. पैशाची तर अबादानी नाहीं. इतकी हि तसदी सोसून इंग्रजाचे भरंवसियावर राहिलो असतां किल्ले धार येथें कबिला व चिरंजीव मूल दिडावर्षाचा लाहान तेथें आहेत. त्यास फितुरियाणीं फौज पाठऊन मोर्चे लाविले. फितुरियांणी लढणें अगर बोलणें तें आह्मासी असावें. बायकोलांस तसदी करावी हें योग्य की काय ? चहूंकडून पेंचच जाणोन बाहेर निघालों. तुह्मांस हें वर्तमान कळलें असतें तरी तुह्मी त्यास निषेध केलाच असतां तस्मान तुह्मांस हे खबर नसेलसें दिसोन येतें. यास्तव हें सविस्तर तुह्मांस लिहिले असें. आमचे कार्यसिद्धि उत्तम होय ते नेकसलाह लिहिणें. छ ७ रजब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १७१.
श्रावण शुद्ध १५.
राजश्री लक्ष्मण अपाजी यांसि :-
सु॥ सबा सीतैन मया व अलफ.
तुह्मीं विनंतीपत्रें आषाढ वद्य एकादशीचीं पाठविलीं तीं छ ६ जमादिलाखरीं पावलीं.
इंग्रेज मसलत सिद्धीस नेतील हा भरंसा धरूं नये. चिरंजीव अमृतराव यास बाहेर काढावें. समागमें राजश्री आबाजी महादेव यांस देवावे. आपण सुरतेत राहावें. सेनाखासखेल यांस मेळऊन घ्यावे ह्मणोन कितेक मसलतीचा धारेवट लिहिला तो कळला. ऐशास, सेनाखासखेल याचे लक्षाचा अर्थ तरी :-बडोद्याचे मुकामींहून त्याचें जें लक्ष आहे तें समजलेंच आहे. सांप्रत त्याचीही नजर बारभाईच्याच पक्षाची जाहाली आहेसी दिसते. फत्तेसिंगव सेनाखासखेल यांच्या भेटी जाहाल्या. पुढें त्याचा काय इत्यर्थ ठरेल तो पहावें. चिरंजीवास बाहेर काढावें, तरी आपले जवळ सामान किती? त्यांत चिरंजीवाबरोबर बाहेर काय काढावे ?
खर्चाविसी बहुत प्रकारें बोलतो. परंतु मेस्तर बाडमास हुकूम केला आहे त्याप्रमाणें देतील. जाजती देत नाहीं त्यावरून जवाहीर तरी द्यावें. कोशलांत गोष्ट काढावी +++++ सालाची ++++ केली त्यास उपाय +++++ राविसी बोलतों, मागतों, नच देत तेव्हां निरोपच मागतों. ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, जवाहिराविसी कोशलांत गोष्ट निघोन इत्यर्थ ठरणार होता. त्यास कोशल होऊन इत्यर्थ ठरलाच असेल. व बंगाल्यासहि परवानगी जवाहीर द्यावयाविसी ह्मणोन मेस्तर होमासहि पत्र आलेंच होतें. त्यास, येथील खर्चाचे वोढीचे अर्थ जनरालासी बोलून, जवाहिराविसी झटून जाबसाल दोहा चहू रोजांत यावा असा आहे. तुचा जबाब साल आलाच असेल. बळ धरीत असल्यास उत्तमच आहे. इंग्रेजांकडूनहि त्यास उत्यजन देत जाणें. कलम १.
स्वामींनीं कोशेलदारास व आणखी इंग्रेजास पत्रें पाठविलीं तीं ज्याचीं त्यास प्रविष्ठ केलीं. दोन कोशलदार राहिले त्यास पत्र पाठवावें ह्मणोन लिहिलें. त्याजवर हाली मेस्तर गारडीन व मेस्तर इष्टाकहऊस यांस पत्र लिहिलें आहे व मोष्टिनाचा लखोटा होमानीं होमाचें नांवावर तें होतें ह्मणोन फोडला. त्यास, चिटणीसाजवळोन चुकोन नांव पडलें. हालीं मोष्टिनासहि पत्र लिहिलें आहे. पावतें करणें. कलम १.
आजचा निरोप मागावयाचा करार. त्यास, पुढें त्याच्या फौजा येऊन उभ्या राहातील, तेव्हां कोणेएक गोष्ट बारभाई आपटणास सांगतील आणि आपटण सांगतील आणि आपटण ह्मणतील ते गोष्ट मुंबईकरास कबूल करावी लागेल. मुंबईकराचाहि विलाज चालणार नाहीं. आणि तेव्हां राजकारणहि होणार नाहीं. यास्तव राजकारण करावयाचे दिवस हेच आहेत, राजकारण बनलें हि आहे. निरोप मागावयाचे खालीं. + + + त्यास, तो मूल खोटात्याचा मुद्दाहि सांप्रत आह्मांजवळ आहे. हें तुह्मी जनराल व कोसलासी बोलणें. कलम १.
एकूण कलमें आठ. जाणिजे. छ १३
जमादिलाखर.
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १७०.
१६९८ श्रावण शुद्ध ४.
राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यांसि :-
सु॥ सबा सबैन मया व अलफ. तुह्मी विनंतिपत्र आषाढ शुद्ध पंचमीचे जासूद जोडीबरोबर पाठविलें तें छ २६ जमादिलावली प्रविष्ट जालें.
जवाहिराविसीं निकड केल्यास जवाहिर देतील. परंतु कंपनीच्या मोहरेनसी करारमदाराचा तहनामा जाहला आहे तो मागतील. येविशीं काय आज्ञा, ह्मणोन लि॥ तें कळलें. ऐशास आमचे मसलतीचा अभिमान जनराल यासच आहे. त्यास दरमहा साठपांसष्ट हजार रुपये पाहिजे. निदान तीस पस्तीस लागतील, हें तुह्मांस वारंवार लिहीतच आहों व तुह्मीहि त्यासी बोलतच आहां. परंतु याणीं ऐवज पहिले माहांत बारा हजार रुपये दिल्हे. दुसरे महिन्यातं पंधरा दिल्हे. याणीं तो खर्च चालत नाहीं आणि त्याची तों वोढ. तेव्हां जवाहिर मागणेंच प्राप्त. ते देतात तो ऐवज व जवाहिर घेऊन, हरकोठे ठेऊन. दोन्ही ऐवजांनी खर्च लागेल, तेव्हां सवासाहा लक्षांचे जवाहिर इंग्रेजाकडे सरकारचें अनामत आहे त्यापैकीं लाख रुपयांचे जवाहिर मेस्तर शाहास द्यावें, ह्मणोन जनराल व कोपालस शहांनी सरकारचे पत्र घेतलें आहे. त्यास मेस्तर शाहा तेथें आल्यानंतर त्यापैकी लाख रुपयांचे जवाहीर मागोन घेतील. त्यास, निवड जर करून घेऊं ह्मणतील तरी ठीक कसे पडेल ? याजकरितां पेशजी व हालींही लिहिलें आहे. त्यास, जवाहीर तेतेच असेलसें वाटतें. तरी तुह्मीं तेथे जपोन सरासरी त्यांस लाख रुपयांचे जवाहीर द्यावें आणि तेथेंच जवाहिर शाहास द्यावयाचें जाहाल्यास आह्मी येथे सरासरीच त्यास देऊं. कलम १.
विलायतेहून सरकारची कुमक केल्याची खुशखबरीचें लिहिलें आलें, परंतु जनराल याचें बोलणें की कंपनीचा हुकूम येईल तो खरा, ह्मणोन लि॥ तें कळलें. ऐशास मुंबईकर जनराल तरी सर्व प्रकारें आमच्या मसलतीच्या पल्यावर आहेत, हेंही खरेंच. आपटणांनी एक पक्षी तर केला, त्यांत जनराल यांणी राखून आह्मांस कंपनीच्या पेट्यांत जागा दिल्हा. व थोडेंबहुत खर्चासहि देतात. आणि बंगालेवालेहि तिकडील पक्ष धरितील, हेंहि खरें. तेव्हां विलायतेस लेहून पाठवितील. दोन्हींकडील लिहिलीं जातील. तेव्हां तेथें कोषल होईल. तदोत्तर कोणता प्रकार ठरणें तो ठरेल. जनराल तो आमच्या कामास बहुत प्रकारे झोंबतात; परंतु विला + कीच आहे व कंपनीच्या मोहरेनसी करारमदार जाहाला आहे तो करारच असे. कलम १.
मोरोबांनीं मसलतीविसीं अभिमान फार धरला आहे. स्वामीविसीं जनराल यास व मेस्तर मोष्टीनास लिहिलें होतें. त्याची उत्तरें समर्पक पाठविली आहेत. पैकी खबर आहे व +++ त्यास लिहिलें आहे, ह्मणोन लि॥ तें कळलें. ऐशास, तुह्मी बजाबास व मोरोबास लिहिलें, उत्तम केलें. व इंग्रजाकडूनहि एविसीं त्यास उत्यजन द्यावें आह्मीही येथून लिहीतच असो. कलम १.
येकूण कलमें पांच लिहिली आहेत. जाणिजे. छ २ जमादिलाखर.
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १६९.
१३९८ श्रावण शुद्ध २.
जनराल यास व कोषलास याचप्रों। दोन पत्रें लिहिलीं आहेत.
जनराल मुंबईकर यास पत्र कीं : आपण आमची कुमक केली ती वाजवीचेच रीतीनें केली. मसलतहि तीन हिस्से जाहाली होती. इतक्यांत बंगाल्याहून मनाई आली. मागाहून कारनेल आपटण आलें. त्यांनी आह्मांस व आपल्यास कांहीयेक गोष्ट न पुसतां फितुरियांचे संमतांत मिळोन, गैरवाजवीचाच पक्ष धरून, पंचवीस हजार रुपये आह्मांस दरमहा द्यावे आणि फितुरियांची माणसें आमचे रखवालीस कोपरगांवीं रहावें-असें जालें असतां, आपण सर्व गोष्टी मान्य करून आह्मीं कंपनीच्या पेट्यांत जागा देऊन थोडें बहुत खर्चासहि देतां व आमच्या कामाकरितां विलायतेस लिहिलीं पाठविलीं आहेत. तुह्मी तर मसलत उभी करून सिद्धीस न्याय हे खातरजमा आहे. परंतु जर्सी आपली लिहिली विलायतेस गेलीं तसीं बंगाले-कराचीहि गेली असतील. तेव्हा विलायसेत कोशल होईल. उभयतांतून कोण्हाचें मंजूर पडेल ते माहितगारांचे अर्थ तुह्मी जाणा. तथापि विलायतेचीं लिहिली यावयास अवकाश तों फितुरी जबरदस्त होतात व दौलतीचीहि नुकसानी फार होते. आजतागाईत निजामअल्लीखान यास साठ लक्षांची जागीर दिल्ही. व हैदर नाईक धारवाडपर्यंत मुलूक, किल्ले, ठाणी दाबीत आले. हिंदुस्थान वगैरे मवासियानें तमाम मुलूक दाबिला. करोड सवाकरोड रुपयाचा मुलूक दौलतींतील गेला. पुढें दिवसगत लागल्यास आमचाहि बंद राहणे कठिण. आमचीं राजकारणें सरदारांची वगैरे आहेत. तीहि नाउमेद होतात. बंगालेकर सर जनराल यांस पत्र लिहिलआहे. त्याची नक्कल तुह्मांस पाहावयास पाठविली आहे. खसूसीयत दस्तगाहा लक्ष्मण अपाजी दाखवितील. आपण तरी आमच्या कार्यास सर्व गोष्टीनें उमेदवार परंतु बंगालेकरांपुढें तुह्मीं काय कराल ? बरें ! आपली दोस्ती आहे ती कायमच असावी. आमची दौलत आपण काईम करून द्यावी, ही तर तुह्मांस मोठाच चिंता आहे. त्याअर्थे कोण्हीयेक आमचा दोस्त आमची मसलत सिद्धीस न्यावयास उभा राहिल्यास, आपली मर्जी त्यांत असल्यास, कार्य लवकर घडोन येईल. कारनेल अपटण याणीं तह केला कीं, नारायणराव याचा मूल खरा. परंतु तो मूल नारायणराव याचा नव्हे. याचा मुद्दाहि बिलफैल आह्माजवळ आला आहे. चौकसी करून पाहावी. वरकड जवाहिराचा व कितेक मजकूर लक्ष्मण आपाजीस लिहिला आहे. ते सांगतील त्याजवरून कळेल. छ ३० जमादिलावल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १६८.
१६९८ आषाढ.
पु॥ विज्ञापना. हुजूर येण्यासंबंधें मार तरी : तीन प्रकारची आज्ञा एक वेळच आली. त्यास सेवकास महाराजाचे मर्जीसिवाय कोणासी दरकार नाहीं. येण्यास गुंता काडीमात्र नाहीं. बलावून घेतल्यास सेवकास फार संतोष. येथें राहिल्याने हवा मानत नाहीं. पाणी फार वाईट. बराबरील माणसेंदेखील कितेक दुखण्यांत पडली आहेत +++ अस्वस्त. लष्करांत आल्यानें फार चांगलें आहे. तीन प्रकारचे आज्ञेंतून सेवटचे पत्रांत निश्चय खास-दस्तुरें नच येणें, तेथेंच उपयोग, ऐसे लिहिलें आहे त्यावरून येण्याची जलदी न केली. जनरालाची तरी प्रसन्नता सेवकाचे ठाई बहुत दिसत्ये, परंतु येथें राहण्याविसीं पत्र मागावें तरी पूर्वकथन संपूर्ण सांगितले पाहिजे. त्यांतही करनेलीची नालीशच होते. व स्वरूपासही ठीक नाहीं तरी आबच जाईल. तथापि युक्तीनें आब राहून पत्र देतील तर पाहातों. नाहीं त्यापक्षीं निघोन यावयाचें करितों. परंतु बंगाल्याचे पत्राचा जाब काय येतो, पुढें हे काय करितात, हें सर्व मनांत आणून किटणीवर तेथील यखत्यार आहे तैसा राखतो, असें असिल्यास निघोन येतों. तूर्त मसलतीचे रीतीनें सेवकाचें येथे राहाणें यांत उपयोग फार दिसतो.
जनरालास कोसलदारास हरयेकाध गोष्टीची भीड पडोन ह्मटलें तसें ऐकतील. लक्ष्मण गोपाळ आहेत. परंतु यांचे वजन नाहीं. सेवकाचें येथे हजर जाल्यावर, मग कोणी तरी शाहाणा माणूस येथें जरूर ठेविला पाहिजे. परंतु माहीत व मातबर असा ये गोष्टीस वाकब असावा. ह्मणजे हे चहातील. लक्ष्मण गोपाळास तरी किमपि वाकबगारी नाहीं. महाराजाची वळखच नाहीं, तेव्हां माहितगारी कोठून असणार? सेवकास हुजूर आणवितों ह्मणोन किटणीसी करार महाराजांनी केला असेल. त्यांस, सेवकाचे शरीरी अस्वस्त नाहीं, हे सारे कोसलदारांस ठाऊक आहे. गोष्ट खरी आहे व जाहाजांत अस्वस्ततेुळें बसवत नाहीं. यामुळें येण्यास विलंब. हे कारण सांगितलें तरी रुचेसें आहे. बंगाल्याचे पत्राचा जाब आलियावर निघोन येतों. आणि लौकर यावेसे मर्जी असल्यास आज्ञापत्र सादर व्हावें, ह्मणजे तसाच निघोन येतों. करनेलीचे समाधानास्तव सेवकास हुजूर बलावून घेतल्यानें तरी पुढे करनेल नीट वर्ततील, ऐसे कदापि होणार नाहीं. यास्तव बलावण्याचीहि त्वरा करूं नये, हें चांगलें दिसतें.