Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १९५.
१७०० मार्गशीर्ष शुद्ध १४.
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान सु॥ तिसा सैबन मया व अलफ. जनराल याजकडील आयन्याची जोडी नजर आली आहे ती फ्रोक्त करणें. व पोषागाबद्दल रुपये ३५०० साडेतीन हजार व शागीर्द पेशाचे इनामाबद्दल रुपये १००० एक हजार एकूण साडेचार हजार रुपये जनराल याजकडून आलेन आले ह्मणोन राजश्री त्रिंबकजी भालेराव यांस विचारणें. जाणिजे. छ १३ जिल्काद बहुत काय लिहिणे ?
(लेखनावधि:)
पौ छ १४ जिल्काद, सन तिसा. मु॥ मुंबई.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १९४.
१७०० मार्गशीर्ष शुद्ध १२.
राजश्री सदासिव धोंडदेव यांसि :-
सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तळ्याजवळ पंचमुखी माहादेव त्यापासी त्याच देवळांत भवानी आहे. तीस नथ करोन द्यावयाचा मानस आहे. तरी, तुह्मीं तेथें जाऊन चिठ्या घालाव्या कीं नथ करावी किंवा न करावी. करावी ऐसी आली, तरी मोतें, माणिक, मणी व सोनें सुद्धां, (श्रीवरळेश्वर येथील भवानीस नथ पेशजी करून दिल्ही आहे. रुपये चोवीस हालीं) हे देवीस त्याप्रों दोन अधिक अथवा दोन उणे लागले तरी नथ करून देवीच्या नाकांत घालणें. तुह्मांकडील त॥च्या ऐवजी मजुरा पडतील. जाणिजे. छ ११ जिलकाद.
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १९३.
१७०० मार्गशीर्ष शुद्ध १०.
राजश्री सदासिवपंत दाजी स्वामीस :-
पोष्य भास्कर शंकर साष्टांग नमस्कार. कोडेलशेषभट आचारी पाठविला आहे. तर त्याजपासून पंधरा दिवस चाकरी घ्यावी. कदीम आठ रुपये रोजमरा आहे व इजाफा ऐक रुपाया करून घेतो. आणि छ २० जिलकादापासून रोजमरा द्यावा आणि सदरहूप्रमाणें चाकरी घेत जावी. बहुत काय लिहिणे ? हे विनंति. छ. ९ जिलकाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १९२.
१७०० ज्येष्ठ शुद्ध ११.
यादी अजमास नेहेमीं नेमणूक मुक्काम मुंबई स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ तिसा सबैन मया व अलफ. ------------------------------------------रुपये.
३ देवाकडे कापूर व दशांग वस्ता व चंदन मिळोन दरमहा
१४ आचारी व पाणके अ॥ २
११ शागीर्द अ॥ २ ए॥
६ सदाशिव आगाशा
५ मोरोबा दामला
-------
११
४० ब्राह्मण पूजेस अ॥ २
२ कामाठी अ॥ १ एकूण अडसरीं ५॥।
४ दिवट्या अ॥ १ ए॥
४९ कारकून अ॥ ४ ए॥
२५ त्रिंबक पांडुरंग
१५ सदाशिव धोंडदेव
५ भास्कर भिमाजी
४ लक्ष्मण यशवंत
-----
४९
४० कोळी वगैरे अ॥ १० ए॥
४६ भोजन खर्च अ॥ १० दर ४॥- प्रमाणें
२१ बाग, वरल अ॥ ८
५ विश्वनाथ धनाजी
५ धनाजी द्वारकाजी
२॥ विराजी
२॥ हिराजी
६ पाणी घालावयासी माणसें अ॥ ४ दर १॥ प्रमाणें
----
२१
६ जासूद अ॥ २ दा ३ प्रमाणें
-----
२३६
दरमाहा बेगमी ९४४ रुपये
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १९१.
१६९८ .
तहनामा सरकार राजश्री रघुनाथ बाजीराव प्रधान यांचा व पुर्तकशाचा विद्यमान किल्ले गोंवेकर. सु॥ सबा सबैन मया व अलफ. सरकारची कुमक पुर्तकशांनीं करावी आणि सरकारांतून पूर्तकशास बदफत द्यावा तपशील :-
पूर्वीं फिरंगाण प्रांत गड किल्लेसह जो सरकारांत आला आहे तो दरोबस्त द्यावा. त्याप्रमाणें साष्टी अंग्रेजाकडे गेली. त्याचे ऐवजीं गोव्याचे लगता येक किल्ला व साष्टीचे बेटांत जितका ऐवज उत्पन्न होत असेल तितका ऐवजाचा मुलूख द्यावा. कलम १.
आम्हासी शत्रू घरचे व बाहेरील बेमबलक जाहाले आहेत. त्यांचा पक्ष एकंदरच कोण्ही विषईं करूं नये आमचे मर्जीप्रमाणें अनुकूल असावें. जें सरकारचे मित्र अथवा शत्रू तेच पुर्तकशानेंही आपलें जाणावें येणेंप्रमाणें कलम तिसरें ३.
पुर्तकशाची फौज गोरे व पागडीवाले मिळोन पांच हजार, निदान साडेचार हजार, असावी; व तोफा व गर्नाळा मिळोन तीस दागिने असावे. यास दारूगोळा पोख्त सामान बाळगावें. याचा खर्च वाजवी जो होईल तो गोंव्याहून सरंजाम निघेल त्या दिवसापासून ते मसलत शेवटास जाऊन सरकारांतून पुतर्कशाचे फौजेस निरोप देऊं तोंपावेतों आकार करून बंदरापावेतो ऐवज देऊं. गोंव्याहून सरंजामहुजूर येऊन पावल्यावर, सरकारचा मुलूक सुटत जाईल. त्याचा रुपाया येईल तो सरकारचे फौजेचे वगैरे खर्चाचे अजमासें व पुर्तकशाचे फौजेचे वगैरे खर्चाचे अजमासें वांटून घेत जाऊं. मसलत सेवटास जाऊन पुर्तकशाचे फौजेस रुखसत करूं तेव्हां कुलखर्चाचा आकार पुर्तकशाचा सरंजाम होईल, त्यांत हे पावती वजा करून बाकी ऐवज देऊं. हिसेबाचे रुईनें परस्पर वर्तावें कलम दुसरें.
एकूण तीन कलमें लिहिलीं आहेत. त्याप्रमाणें परस्पर चालावें. ही मसलत सेवटास गेल्यावर त्यानंतरही दिल्हासानें अनुकूल होत जावें. फौजेचा खर्च वगैरे कुमकेसंमधीं लागेल. तो देत जाऊं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १९०.
राजश्री लक्षुमण अपाजी यासि :-
प्रती सौ॥ आनंदीबाई आशीर्वाद. सु॥ सबान सबैन मया व अलफ. हरि श्यागीर्द याजबरोबर पत्रें पाठविलीं तीं पावलीं व जबानीं निरोप सांगून पाठविले ते विदित जाहाले. ज्या गोष्टी भावी असतात त्या घडतात, त्यापक्षीं आह्मी दूरच आहों, हा भ्रमच बरा. विशेष कर्मफलाच्या गोष्टी काय ल्याहाव्या ? रवीसंक्रमणाचेतील शर्करायुक्त पाठविले आहेत ते घेऊन पावल्याचें उत्तर पाठवणें व यादु येवलेकर यास तीळगुळ देणें. खरकसिंग वगैरे आणखी कोणी जे आपले मंडळीचे असतील त्यांस आमचे तीळगुळ देणें. जाणिजे. छ १ माहे जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद. नागो राम मुनसी यास तीळगुळ देणें. छ मजकूर. हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १८९.
१६९८ कार्तिक वद्य १.
राजश्री माहादजी शिंदे गोसावी यासि:-
सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्ने॥ रघुनाथ बाजीराव प्रधान आशिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. प्रस्तुत सुरतेहून बातमी आली कीं, पादशाहा व असफद्दोले फौजसुद्धां दक्षिणचे मोहिमीस येणार, अमदाबाद असफदौलास द्यावी. माळव्यापर्यंत बंदोबस्त केल्यानंतर दक्षणचा सर्व बंदोबस्त करावा. त्यास, जोर असल्यास काय त्याणीं करावयाचें आहे ? दुसरा मजकूर: धारेस चिरंजीव आहे. त्या किल्ल्यास फौजेनें वेढा घातला. यामुळें सांप्रत तसदी फार होते. याकरितां चिरंजीवास आह्माजवळ पोंहचाऊन देऊन किल्ला ज्याचा त्यास द्यावा. सांप्रत अंगरेजाखेरीज दुसरा जागा आश्रयाचा दिसत नाहीं. ह्मणोन येथें राहणें प्राप्त आहे. तुह्मासारखे मातबर सरदार असतां आमचें राहणें परकी स्थलीं व्हावें ! परंतु कालापुढें उपाय काय ? धारेचा किल्ला खंडेरायाचे हवाले करितों. चिरंजीवास व कबिल्यास पाठवणें. दौलत जेव्हां कपाळी असेल तेव्हां मिळेल. तूर्त येथें अबरूनें आहों. कोणाचे पेंचांत नाहीं, इतकेंच सुख मानून आहों. आंगरेज मैत्रकीस बहुतच उत्तम. याची तारीफ काय लिहावी ? जाणिजे. छ. १४ माहे सवाल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १८८.
१६९८ कार्तिक शुद्ध २.
गोवेकर मुख्य हालीचे सरदार यांसी:-
सरकार राजश्री रघुनाथ बाजीराव प्रधान यांजकडून करार की:- सरकारची कुमक पूर्त- कशानीं करावी. त्याची यादी अलाहिदा जाहाली आहे. त्या कराराप्रमाणें कुमक होऊन सरकारचें काम शेवटास जावें आणि सरकारांतून खुद्द तुह्मास रुपये ४,००,००० येकूण च्यार लक्ष रुपये बाजतफत्ते द्यावे. येणेंप्रमाणें करार केली आहे. या कराराप्रमाणें च्यार लक्ष रुपये देऊं. छ १ सवाल, सु॥ सबा सबैन मया व अलफ. छ मजकूर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १८७.
१६९८ आश्विन.
पावलियाचें पत्र आलें नाहीं. तोंपावेतों उवरहि देत नाहीं. व दुसरें पत्र छ २८ रमजानीं येऊन पोंहचलें, त्याचें उत्तर छ २१ जिलकादीं त्यास बहुत जबाऊ नीचे फजीत करून लिहिलें. हा भाव कोसलदार मजकूर व फारमर साहेब यांणीं सांगितला कीं, हें सर्व आदिअंत बाईस लिहून पाठविता, हे आपले वचणावर कायम आहेत. मी येथील प्रसंगीचें वर्तमान साकल्य पत्रीं लिहिलें होतें, तें सर्व कौसलदार मजकूर यास विदित केलें कीं, याजकडीलही भाव कळला. तेव्हां तें सर्व ऐकून ह्मणाले कीं, हे सर्व सत्य परंतु ऐसें ऐकिल्यास धीर पुरणार नाहीं. ऐसें ल्याहावें कीं, येथें स्वामीचे कार्यास ठेवून च्यार महिने बसल्याविना कार्य केल्या येणार नाहींच. हा निश्चय असावा. या गोष्टीस फार दिवस गेले. एका मासाचे अंतरांत आठा दिवसांत किंवा पंधरा दिवसांत निदान येक मास ऐसें लिहिणें. शत्रूचा किमपि पक्ष धरनार नाहींत. जैसें कळेल तैसें सरकार -मसलतीस सादर होऊन, बोलले. करारप्रों निश्चितार्थच जाणावा. आजपावेतों जालें वर्तमान तिकडे लिहितों, ऐसें सांगितलें. तेव्हां यासी उत्तर केलें कीं, तुम्ही जैसें आपले यजमानास लिहितां, हे आमचे हितार्थच लिहितां, तर तेच आह्मांस आज्ञा केल्या आह्मी त्याप्रों विनंतिपत्रीं अर्जी करून लिहूं. तेव्हां ते बोलले कीं, हे आह्मांत सर्व जातींत ये गोष्टीची गळ आहे. आपणांत आपुन शत्रुमित्र असलियास भेदाभेद ठेवीत नाहींत. परंतु बाध्यात किमपीही बोलत नाहीं. तुह्मास कार्यासी गरज किंवा कथेसी गरज. सारांश, जे खुसीचा भाव तें करणें. आह्मास अगत्य करणें तें तर सांगितलें. किरकोळ पदार्थ तो तुम्हीं पत्रीं लिहिला आहे. तोच येथास्थित. ते गोष्टीनें धीर पुरणार नाहीं, याजकरितां सांगितलें. त्यावरून तपसीलवार पत्र लिहिलें ते तर आरतराम त्रिवाडी गुमस्ते गोपालनाथजी या.
(पुढें गहाळ.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १८६.
१६९८ आश्विन वद्य ९
राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि:-
सुहुरसन सबा सबैन मया व अलफ. किल्ले डबाईस र॥ फत्तेसिंग गाईकवाड याणीं वेढा घातला आहे. गाईकवाड याजकडून अमीनखान व अनाजी व बाळाजी रघुनाथ व आणिखी गैरपतकें येऊन मोर्चेबंदी केली आहे. त्यास, गुदस्तां बडोद्याचें मुक्कामीं खासा स्वारी असतां, त्याजविशीं कारनेल किंटण याणीं, रदबदली करून त्याजवर सरकारांतून कृपा होत गेली. सांप्रत मशारनिलेची वर्तणूक बदराहा होऊन याप्रमाणें केलें. हें वर्तमान कारनरास सांगोन ते गाईकवाडास लेहून वेढा उठवीत असल्यास बरेंच आहे. कारनेलीचे पत्रानें काम होईलसें नाहीं; तथापि जनरालाचें व कारनेलीचें पत्र गेल्यास कांहीं उपयोग पडेल. गंभीर भडोचेस आहे. त्याणें दबाविलें तरी काम होईल. परंतु अश्या काळीं कोण साहित्य करितो ? फुकट दबावन्यास काय जातें ? परंतु दबावतीलसे दिसत नाहीं. असो! प्रयत्न जाहाल्यास जनरलाचें पत्र, कारनेलीचें व गंभीराचें जाई तें करावें. नाहीं तरी, लढाईनें तरी डबई राखीतच आहों. गारा व दारूचा आंत तोटा आहे. वरकड बाहेरील वेढा डबाईकराचे खातरेंत नाहीं. दारू व गारा रणगडास पोहचल्या तरी कांहींच फिकीर नाहीं. दोन महिन्यांनीं बडोद्याची खबर घेतली जाईल. फत्तेसिंगाचे सामान व हिंमत सर्व नजरेत आहे. जाणिजे. छ २१ रमजान.
(लेखनावधि:)