Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक १८५.


१६९८ अश्विन शुद्ध १५.

पु॥ राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि:-
सु॥ सबा सबैन मया व अलफ. कदाचित बारभाइचा तह बनल्यास रणगडास राहावें. त्यास, राहावयास जागा मजबूद चांगली असावी. तेव्हां गढी मजबूद बांधावयास दोन तीन महिने पाहिजेत. तेव्हां भडोचेस राहावें लागेल. त्यांत दुसरें ही एक आहे कीं, फितुरियांचा पुरता इतबार पडेतों जातांही येत नाहीं. कारण कीं ते दबा धरून, विसराखालीं पाडून, आपले कर्मास चुकावयाचे नाहींत. यास्तव आम्ही दोन महिने भडोचेस, दोन महिने रणगडास या प्रमाणें राहात जाऊं. आह्मांस आश्रा तरी भडोजचाच आहे. ज्या समयीं शिंदे, होळकर व इंग्रज दरम्यान राहातील, तेव्हां या गोष्टी ते करणार नाहींतसे दिसतें, परंतु सावधगिरीनें असावें हेंच खरें. सलूख जाहाला तरी आम्हांस आंगरेज मध्यें घ्यावे लागतीलच. मध्यस्थ आंगरेज, तेव्हां त्याचे तें राहाणें अवश्यमेव प्राप्तच आहे. एविसीं अगोदर सूचना जनरालास व ममतेचे आंगरेज व कोशलदार यांस असावी. बारभाईची व भाऊची लढाई सुरूं जाहाली. आह्मीं काय करावें तें आंगरेजांनीं सलाह सांगावी जाणिजे. छ १३ रमजान.

(लेखनावधि:)

बारभाईसी सख्यच ठरहलें तरी रणगडास जाऊं. तेथें पंधरा दिवस राहून भडोचेस येऊं. रणगडास किल्ला मजबूद करावा लागेल. घर राहावयास चांगले पाहिजे. तेव्हां सहा महिने तरी जलदीनें केल्यास पाहिजेत. तेव्हां भडोचेस राहावें, उचित दिसतें. आंग्रेजाचा आश्रा पाहिजे. विलायतेच्या हुकुमाचीहि वाट पहातच आहों. बंगाली यांचा हुकूम पाठवी तों तूर्त दोन लक्ष पाठवावें, ह्मणौन धोंडो खंडोजीनें लिहिलें होतें. त्याहि तूर्त देत आहों. बंगालकरास दाहाहि अंतस्त निदानीं कबूल करणें ह्मणोन लिहिलें होते. त्याणीं लिहिलें कीं, दोन लक्ष तूर्त पावावें, ह्मणजे हुकूम पाठवितो, बाकी बादज फते मागाहून पाठवावे. त्यांस, याचेहि तर्तुदेंत असावें. भडोचेस राहूनच करावे. त्यास एविसीं जनराल-कोशलाची सूचना गंभीरास व बाडमास असावी, गुप्तरूपें असावी. छ मजकूर. कांहीं मजकूर उदेभान चौकीदार रुबरू सांगेल.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १८४.


१६९८ आश्विन शुद्ध ११.

पु॥ राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि:-
सु॥ सबा सैबन मया व अलफ. कारनेल आपटण यांणीं फितुरियांसी तह करून तहनामा मुंबईस पाठविला. त्याची नक्कल बाडमानीं हुजूर पाठविलीं आहे. व सरकारांत पत्र लिहिलें आहे. त्यास यादीची नक्कल व बाडमाच्या पत्राची नक्कल तुह्मांस पहावयास पाठविली आहे. याजवरून कळेल. याच पत्राची रवानगी पहिली केली, ते दमणास गेली. याजकरितां दुसरी रवानगी केली असे. त्यास जनराल हर्नबी याची व सरकारची दोस्ती, त्या अर्थी उचित मार्ग असेल तेच सलाह देतील. परंतु, जाहिराणा तरी यादी-प्रमाणेंच कबूल करावें, ह्मणतील. त्यास, अंतर्गती कोणती कसी सलाह देतात, हा त्याचा खुलासा काढून लेहून पाठवणें. बाडम यास पत्राचा जाब मोघम लिहिलें आहे कीं, हें जे बारीक मोठें बोलणें आहे तें लिहितां नये, यास्तव पेस्तर शाहाचें येणें झाल्यास फार उत्तम आहे, नाहीं तरी बापू कामती अगर दुसरा कोणी इतबारी पाठवावा. ह्मणोन लिहिलें असे. तुह्मास कळावें. जाणिजे. छ ९ रमजान. बहुत काय लिहिणें ? बाबूराव काणे आले ते, रेवातीरीं मर्जींचे स्थलीं राहून रूपी संख्या लक्ष घ्यावे, म्हणतात. अवतारपावेतों भाव आहे. प्रमाणेंही लाऊन देणार. परंतु येकदां करार जाहाल्यास मग फिरावयाचें संकट. यास्तव कोशल करून लिहिणें. निदानीं काय बोलावें? भाऊचें सूत्र तरी पक्केंच आहे. नरसिंहाचार्य येथें येऊन गेले. मोरोबाचेही निरोप बाबूरावा-बराबर आहेत. जीव कलतच आहे. बनोज येईल तेव्हां खरें. हजरदां बोललें आणि कांहीं जाहलों नाहीं. तेव्हां पुढें कोणता भरवसा ? जाणिजे. छ मजकूर. कलकत्त्यास व श्रीस पत्रें लिहिलीं आहेत. कोणी गलबत जाईल तेव्हां रवाना करणें.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १८३.


१६९८ आश्विन शुद्ध ३,

पु॥ राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यासि:-
सु॥ सबा सबैन मया व अलफ. तुह्मीं पूर्वीं पेशजीं सिक्केकटारीचा मजकूर लिहिला होतात व हालीं तुह्मीं राजश्री आबाजी माहादेव यांस लिहिल्यावरून सिक्केकटार तुह्मांकडे पाठविली असे; जे काम लौकर होऊन येत असल्यास त्या कामावर सिक्के करीत जाणें.

दिरंगावर असल्या हुजूर लिहिणें. खासास्वारी जवळच आहे. कार्य पाहून करावयाचें तें करणें. इतबारी कोणी सिक्के करावयास पाठवावा, ह्मणोन लि॥ त्यास, तुह्मींही सरकारचे इतबारीच आहां. तुम्हां परतां इतबारी कोण आहे ? तरी हा चित्तांत संशय न धरणें, इतबारी यख्तियारी तुह्मींच आहां. जाणिजे. छ १ रमजानखासा स्वारीहि तिकडे जलद येणार. जवळ आल्यावर तुम्हीं येणें. छ मजकूर.

(लेखनावधि:)

श्रीसांब: सपुत्रो विजयते.

लेखांक १८२.


१६९८ आश्विन शुद्ध ३.


राजश्री सुखाराव बुरुडकर गोसावी यांसी:-

अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य र॥ रघुनाथ बाजीराव प्रधान आशिर्वाद. सु॥ सबा सबैन मीया व अलफ. तुमचे एकनिष्ठेचे अर्थ कितेक र॥ लक्षुमण आपाजी यांणीं हुजूर विदित केलें. त्यावरून संतोष जाहाला. तुम्ही पुरातन सेवक, पदरचे. तीर्थस्वरूप कैलासवासी रावसाहेबांपासोन आजपर्यंत निष्ठेनें सेवा करीत आलां. दरम्यान कितेक पेच पडिले. तथापि समय रक्षून सेवटीं निष्टा साहेबसेवेवरीच ठेविलीत. शाबास तुमचे खानदानाची असे ! त्यांस या उपरी तालुके सुवर्णदुर्ग येथील ! त्यांस या उपरी तालुके सुवर्णदुर्ग येथील किल्याचा बंदोबस्त जंजिऱ्यासुद्धां अलंगनौबत चौकी पाहाऱ्याचा करून हुशार राहाणें, बारभाईचे लोक आल्यास पारपत्य करणें. याखेरीज विजयदुर्ग, अंजनवेल, रत्नागिरी येथील किलेकऱ्यांस सांगोन त्यांची खातरजमा करणें आणि हुजूर लेहून पाठवणें. ह्मणजे सनदा दिल्ह्या जातील. यासमई सेवा करून दाखविल्यास विशेष कृपा तुम्हांवर होऊन, तुमचे मनोदयानुरूप सर्व घडोन येईल. खातरजमा ठेवणें आणि किलें जितके सरकारांत रुजू होतील तितके करून घेणें. कितेक आज्ञा करणें ते तुम्ही आपलेकडील शाहाणा माणूस जलद हुजूर पाठवून देणें. सुवर्णदुर्गास आरमार आहे, तें तयार असो देणें. मागाहोन आज्ञा होईल, त्याप्रमाणें करणें.

श्रीसांब: सपुत्रो विजयते.

लेखांक १८१.


१६९८ भाद्रपद.

चालऊं. याजकरितां जवाहिर मागणें. बंगालेवाले यानीं लढाई मना करविली आणि जनराल याचे करणें आमपटणांनीं आपले जागा वाजवी असतां गैरमंजूर करून एकपक्षी तह केला. त्यास, जर विलायतेचा हुकूम लढाईचा आला तरी जवाहिराविसी अडऊन धरावें, असा कांहीं विचार नाहीं. आपटणांनीं याचें करणें गैरमंजूर केलें. परंतु, विलायतेहून मंजूरच केलें. मंजूरच केलें हा लौकिक याचा हाऊन याच अभिमानों मसलत सिद्धीस नेतील. जवाहीर आमचे हवालीं केलें ह्मणोन मसलत सोडावी, या गोष्टी जनराल याजपासून दूर आहेत. हे अंदेश त्यांनीं चित्तांत आणों नये. तुह्मींही येविसी खातरदास्त करावी. कलम १.

भाऊंचे बंड जाहालें आहे. तेथून कारकून जनराल याजकडे दोघे आले आहेत. त्यास जनराल याचें कागदावर सिक्का मुलाचे नांवें आहे व जनराल यांस पत्र लिहिल्याचा मजकूर लिहिला तो कळला. ऐशास, बंडाकडे शाहाणा मनुष्य पाठवणें ह्मणोन पेसजी तुह्मांस लिहिलेंच आहे. मुलाचे नांवें सिक्का केला आहे. तरी मूल कोणता तें लिहिलेत नाहीं. तरी लिहिणें. ज्या अर्थी त्याजकडील कारकून इकडील मसलतीचें बोलणें जनराल याजवळ बोलतात, त्या अर्थीं खऱ्याखोट्याचा संदेहच वाटतो. तुह्मीं तिकडे र॥ केलाच असाल. आह्मीही इकडून र॥ करितों. त्याजकडील कारकून तुमच्या ओळखीचे आहेत. युक्तीनें येथील नांव न कळतां त्याचा दस्तऐवज आणऊन इकडेच पाठविणें. कलम १.

मेस्तर शाहाचे ऐवजाचे मजकूर लिहिलात ऐशास शहा येथें आल्यानंतर आपले कर्जाचा ऐवज मागे. तेचा हुकूम येईल. त्यास बहुत दिवसांचा अवकाश. फितुरी जबरदस्त होतात आणि आह्मीं येथें राहिल्यानें आब रहात नाहीं. कितेक राजकारणें आहेत तींही नाउमेद होतात. त्यास, पहिले जनराल याचें बोलणें होतें कीं, तुमची मसलत कोणी करीत असल्यास करवावी, याजकरितां आमचा दोस्त कोणी मसलत करी असा उभा राहिल्यास, त्यांत जनराल याचा सला असावा. आम्हांस त्याजकडे पोहंचवावें. जाहिरात अगर अंतरगति या गोष्टीस त्याचें अनुमत असावें. येविसीं बंगालेवाले सर जनराल यास पत्र लिहिलें आहे त्याची नकल तुह्मांस व जनराल यांस पाहावयास पाठविली आहे. तरी जनराल यांस दाखविणें आणि तुह्मींही येविसीं जनराल यासि बोलून त्याचा खुलासा काढावा. त्याच्यानें आमचें साहित्य अव्वल व्हावें. तथापि न होय तरी आह्मी मसलतीस उभा करूं त्यास त्याचें अनुमत असावें हें तरी तुटून नसोत.

त त्याची व सरकारची दोस्ती आहे ते काईम असावी. वरकड जनराल ह्मणतील कीं तुमची मसलत उभी करी असा कोण आहे ? त्यास मोरोबाचें राजकारण आलें आहे. हें त्यास ठाऊकच आहे. सध्यां मोरोबाचें राजकारण. अशीं कितेक आणखीही येतात आणि मसलत करावयाचें दिवसही हेच आहेत. फितुरियास चहूंकडील ताण. थोडक्यानेंच काम होईल. पुढें दिवसेंदिवस शत्रूची प्रबलता न जाहाली तों अगोदरच जरब बसोन गुंज. श्रीकृपेनें मसलतही सिद्धीस जाईल. इकडील कुमक करीत नाहीं तेव्हां फितुरियाचीही करूं नयें. निखालस असावें. पुढें जसें घडणें तसें घडेल. तरी येविसी सविस्तर त्यासी बोलोन, या गोष्टीस त्याचा सला कसा काय आहे तो काढून या गोष्टीस पुर्ते त्याचें अनुमत घ्यावें. जनराल यांच्या अनुमतें आमचा दोस्त कोणी उभा राहून कार्य केल्यास जनराल याची व आमची दोस्ती आहे.

(लेखनावधि:)

श्रीसांब: सपुत्रो विजयते.

लेखांक १८०.


१६९८ भाद्रपद.

राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यांसि:-
सु।। सबा सबैन मया व अलफ. इकडील मजकूर तरी, जनराल यांस कळवावा यास्तव सविस्तर खुलासा मजकूर तुह्मांस लिहिला आहे. त्यास, जनराल याच्या कानावर घालून त्यास विचारणें. कोणती मसहलत सांगतात, ते आह्मांस कळावी. सांप्रतकाळीं आमचे दोस्त अंगरेज आहेत. त्यांचे सल्लेनें करणें तें करावें. येथील मजकूर :-

भाऊकडून नरसिंहाचार्य व यज्ञेश्वर दीक्षित दोघे शास्त्री आले. त्याचा मजकूर कीं, माधवराव नारायणाचें नांवें सिक्का पूर्वीं केला मोडितों. आमचें नांवें करितों, नारायणराव याचा मूल नव्हे, तो खोटा सबब आह्मीं पूर्वींच न करावा, परंतु तेव्हां गरजेसाठीं केला, आतां आपण आले ह्मणजे सर्व दौलत आपली, मजला कारभार सांगावा, आपलें आज्ञेप्रों। मी कारभार करीन, कैलासवासी तीर्थरूप नानासाहेबांचे जागीं आपण आहांत याप्रों त्याचा मजकूर. कलम १.

हा मजकूर बहुत चांगला. परंतु भाऊ खोटा असल्यास, दगासा वाटतो. खरा असिल्यास, पेंच नाहीं. आह्माकडील मजकूर तरी : येथें जमीयतदारी नाहीं. परंतु औरंगाबादेकडून कांहीं राऊत व गाडदी आणविले आहेत व डबईहून थोडेसे येतील. सुरत अठ्ठाविशींतील कांहीं मिळत नाहीं. तलासांत आहों. परंतु पांच हजार पावेंतों राऊत व प्यादे मिळतील, दिवाळीपावेतों जमा होतीलसें दिसतें. परंतु येतील तेव्हां खरें. केवळ आपलेंच बळानें मातबर मसलत होईलसे दिसत नाहीं. थोडीबहुत चालतच आहे. फिरंगी तरी लबाड व नाकुवत. अंगरेज तरी बंगाल्याचा अथवा विलायतेचा हुकूम च्याहातात. तेव्हां कसे करावें ? कलम १.

अंगरेजास दरम्यान घेतल्यानें बळकटी. परंतु आह्मी विलायतेच्या अथवा बंगाल्याच्या हुकुमाची वाट पाहतों. त्यास, हे मध्यस्त असल्यास मग लढावयास तयार कसे होतील ? हा दोष. याची काय तोड करावी ? जनरल वगैरे अंगरेजास पुसावें.
फितुरियाकडून राजश्री बाबुराव बल्लाळ काणे आले. त्याचा मजकूर : पांच सात लक्षाचे परगणे घ्यावे. रेवतीरीं राहावें. निदानीं दाहाचेही कबूल करितील व सुरळीत परगणे घ्यावे आणि होळकर सिंदे दरम्यान देतों. त्यांचे विद्यमानें रेवातीरीं राहावें. बहुधां अमदाबाद वगैरे मर्जीचप्रों पंधरा वीस लक्ष पावेतों देतील असें तर्कानें दिसतें. इतका मजकूर बाराभाईकडील नजरेस येतो. कलम १.

आह्मांस अंगरेज दरम्यान घेतल्याशिवाय भरंवसा पुरवत नाहीं. अंगरेज घेतले तरी येक दोष आहे. भारभाईस तोतियानें बहुत ताण दिल्हा आहे. तमाम किल्ले तोतियास वश जहाले. त्याजपाशीं काय करामत आहे, हें कळत नाहीं. याजमुळें आमच्या मसलतीस जीव आहे. येक महादजी सिंदा मात्र लढावयास पुढें जाहाला आहे.

तोतिया जनकोजी खरा जाहाल्यास पेंच पडेल. यास्तव आगारी घेतली आहे. याजमुळें बारभाई आमचे पाय धरीलसें दिसते. कलम १.

हे कितेक समक्ष बोलणें जनराल याचे व्हावें हें मानस आहे. त्यांस, आम्ही कोणत्या मुकामी यावें ? साटीच्या रोखें यावें किंवा मुंबईसच यावें, हें जनराल याची सलाह कमी आहे, तो त्याचा खुलासा काढणें. कलम १.

येकूण कलमें साहा लिहिलीं आहेत. त्यांत भाऊसीं कसें बोलावें, बारभाईसीं कसें बोलावें, भेटीचा सलाह कसा देतात, तें पुसावें. जाणिजे. छ १२. कारनेल किटिंग व होम, इष्टोल, वारलिस वगैरे जे जे इष्ट असतील त्यांस सलाह पुसावी. खबर घ्यावी. मित्रता वाढवावी. उपयोगी आहेत.

(लेखनावधि:)

कान्हु कुटा व उदेभान दोघे पाठविले आहेत. जबानीवरून कळेल. हाच मजकूर जबानीं आहे; परंतु प्रगट न करणें. मसलत येकच ठहरली नाहीं.

श्रीसांब: सपुत्रो ४.

लेखांक १७९.


१६९८ भाद्रपद शुद्ध ३ सोमवार.

राजश्री लक्ष्मण अपाजी यासि:-
सु॥ सबा सबैन. तोतियाच्या कांहीं खुणा अर्ध्या अर्ध्या ल्याहाव्या ह्मणोन लि॥. तरी सेवेटील स्वारीस तीर्थरूप भाऊसाहेब हिंदुस्थानांत गेले तेव्हां मजपासीं अगोधर काय बोलिले ? तेव्हां हिंदुस्थानांत जाण्याचा निश्चय केला. तीर्थरूप कैलासवासी नानासाहेबांचीं व त्यांची व आमचीं भाषणें कशीं कशीं जाहालीं, ते सविस्तर सांगावें. त्यावेळेस विठ्ठल शिवदेव व फडणीस व दादू फौजदार वगैरे कोणते कोणते मागून घेतले कोण दिल्हें, तें समईं तीर्थरूप उभयतांचीं व माझीं भाषणें कशीं जाहलीं तें सविस्तर सांगावें. दोनच जाबसालावर कळेल. असो. येव्हां त्यास खुणा पुसाव्या, तेव्हां परीक्षा करावी. ऐसियासी हा प्रसंग परीक्षा करावयाचा नव्हे. परीक्षा आह्मांस पुर्ती कळलीच आहे. संशय नाहीं . तुह्मीं नवे, म्हणोन तुम्हांस संशय. पत्रावरून तरी पूर्तीच परीक्षा कळलीं. पवमान दीड अध्याय येतो, ह्मणोन तुमचे लिहिण्यांत. तरी न कळे अलीकडे शिकण्याचा प्रकार तरी ध्यानांतच आहे. तुह्मांस कळावें. अबदूल गनी वृद्ध गेले, परीक्षा करून आले, ह्मणोन लिहिलें. तरी प्राय:वृद्ध व वृद्ध स्त्रिया व भट आश्रित मंडळी यांस खरा वाटतच आहे. गंगाधरभट कर्वेदेखील संशयाची गोष्ट सांगत होते. अश्याच्या बुद्धि किती, ध्यानांतच असेल. त्याजपासीं कांहीं जादू असेल, असेंही तर्कांत येतें. परंतु ते जादू किरकोळांवर पडते. मोठयांवर पडत नाहीं, ऐसेंहि दिसते. अबदूल गनीवर जादू असेल अथवा कांहीं द्रव्य मिळालें तरी हेही मोठी जादूच ! असो ! इतकें तपशिलाचें तूर्त कांहीं प्रयोजनच नाहीं. त्यास खरा अथवा खोटा ह्मणावें, ऐसा समय नाहीं. त्याचे परीक्षेचे दिवस नव्हते. तुह्मांस मात्र कळावें, ह्मणोन तपसील लिहिले असे. खरा कळल्यावरी मजपासून अणुमात्र अमर्यादा होणार नाहीं, हे खातरजमा ठेवणें. वरकड तुमचीं पत्रें दहा वीस बंद आले. सर्वहि वाचले. उत्तरें कामाचे मजकुराचीं मात्र लिहिलीं प्रयोजन नाहीं. त्यांचीं उत्तरें कशास ल्याहावी ? तुह्मीं आंगरेजाची मर्जी दुरुस्त राहे तें करणें. हें काम बहुत मोठें, लहान नाहीं; तेथें काम नाहीं असेंच दृष्टीस पडेल, तेव्हां हजूर येणें. तेथें दुसऱ्यास पाठऊं. जोंपर्यंत कामांत जीव दिसतो तोंपर्यंत जलदी करणें उचित नाहीं. छ २ साबान.

(लेखनावधि:)

श्रीसांब: सपुत्रो ४.

लेखांक १७८.


१६९८ अधिक भाद्रपद वद्य ९.

राजश्री लक्ष्मण आपाजी गो।। यांसि :-

सु॥ सबा सबैन मया व अलफ. दमणेनजीक आल्यानंतर अर्जुनगड-इंद्रगड हस्तगत जाले. त्यास दमणकर फिरंगियाचें सूत्र सरकारांत हे दोन्हीं किल्ले द्यावे ह्मणजे दोनशें गोरा व तीनशें पागडीवाला व आठ दहा तोफा लढाईचा सरंजाम देतों ह्मणून आलें. त्यास इतका सरंजाम तूर्त खासा स्वारीसमागमें आल्यानें मोठीच इभ्रत पडोन सरकारचीही जमीयत मिळेल. ती व हा सरंजाम इतक्यानसीं दहा हजार फौजेसी लढाई द्यावयास उपयागे पडेल अशी अनुकूलता घडत आहे. परंतु आगरेजाचा आह्मांस पक्का भरोसा, क्षेपनिक्षेप कुमक करितील असा असतां मग फिरंग्याकडे काय स॥ गुंतावें ! ह्मणून किल्ले न दिल्हे व त्याचा सरंजाम कुमकेस न घेतला. तूर्त आपलेच बळावर आहों. डाहाणू-तारापूरकर तेहि लौकरच येतील. श्रीकृपेनें चिंता तरी नाहीं. कदाचित फितुरियांकडील पेंच अनावरसा दिसों लागल्यास असरा आंगरेजाचेच स्थलाचा आहे. हा भावही जनरालासी सविस्तर बोलावयाचे अन्वयानें प्रसंग समजोन स्थलें संरक्षण करणें. सुरतेहून निघालों त्याचें संकट जनरालास किती घालावें ? ते आमचे दोस्त. त्यांचें नुकसान सरकारांत प्रशस्त नसे. दुसरें सुरतेस बसोन मसलतही दबलीसी दिसती, सबब बाहेर मुलकांत आलों. आतां फिरंगी वगैरे सर्वांशीं राजकारणें करणेंच प्राप्त. होतां होतील खरी. परंतु मुख्य भरोसाव पेंच दिसो लागला तरी आसरा आंग्रेजाचाच असे. कंपनीचें स्थल फार दूर टाकून जात नसों. हे प्रकार तपसीले- करून बोलावे. र॥ छ २२ रजब. गोव्यास पत्रें रवाना करण्याकरितां तुह्मांकडे मागेच पाठविलीं आहेत. तीं गोव्यास पावती करणें. जिवाजी विश्राम यांचे विद्यमानें गोवेवाल्यास पोहतच तें करणें. छ मार.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १७७.


१६९८ अधिक भाद्रपद वद्य ९.

राजश्री लक्ष्मण आपाजी गो।। यांसि :-

सु॥ सबा सबैन मया व अलफ. दमणेनजीक आल्यानंतर अर्जुनगड-इंद्रगड हस्तगत जाले. त्यास दमणकर फिरंगियाचें सूत्र सरकारांत हे दोन्हीं किल्ले द्यावे ह्मणजे दोनशें गोरा व तीनशें पागडीवाला व आठ दहा तोफा लढाईचा सरंजाम देतों ह्मणून आलें. त्यास इतका सरंजाम तूर्त खासा स्वारीसमागमें आल्यानें मोठीच इभ्रत पडोन सरकारचीही जमीयत मिळेल. ती व हा सरंजाम इतक्यानसीं दहा हजार फौजेसी लढाई द्यावयास उपयागे पडेल अशी अनुकूलता घडत आहे. परंतु आगरेजाचा आह्मांस पक्का भरोसा, क्षेपनिक्षेप कुमक करितील असा असतां मग फिरंग्याकडे काय स॥ गुंतावें ! ह्मणून किल्ले न दिल्हे व त्याचा सरंजाम कुमकेस न घेतला. तूर्त आपलेच बळावर आहों. डाहाणू-तारापूरकर तेहि लौकरच येतील. श्रीकृपेनें चिंता तरी नाहीं. कदाचित फितुरियांकडील पेंच अनावरसा दिसों लागल्यास असरा आंगरेजाचेच स्थलाचा आहे. हा भावही जनरालासी सविस्तर बोलावयाचे अन्वयानें प्रसंग समजोन स्थलें संरक्षण करणें. सुरतेहून निघालों त्याचें संकट जनरालास किती घालावें ? ते आमचे दोस्त. त्यांचें नुकसान सरकारांत प्रशस्त नसे. दुसरें सुरतेस बसोन मसलतही दबलीसी दिसती, सबब बाहेर मुलकांत आलों. आतां फिरंगी वगैरे सर्वांशीं राजकारणें करणेंच प्राप्त. होतां होतील खरी. परंतु मुख्य भरोसाव पेंच दिसो लागला तरी आसरा आंग्रेजाचाच असे. कंपनीचें स्थल फार दूर टाकून जात नसों. हे प्रकार तपसीले- करून बोलावे. र॥ छ २२ रजब. गोव्यास पत्रें रवाना करण्याकरितां तुह्मांकडे मागेच पाठविलीं आहेत. तीं गोव्यास पावती करणें. जिवाजी विश्राम यांचे विद्यमानें गोवेवाल्यास पोहतच तें करणें. छ मार.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १७७.


१६९८ अधिक भाद्रपद वद्य ७.

राजश्री लक्ष्मण आपाजी सो॥ यांसि :-
सु॥ सबा सबैन मया व अलफ. तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट झालें. जवाहिराविशीं जनरल याशीं बोलणें जाहलें. निकड केल्यास जवाहीर देतील. त्यास, जनराल कोषल याच्या नावें आठाआठ दिवसांच्या तफावतीनें पत्रें पाठवावीं, ह्मणोन लि।। तें कळलें. ऐशास दवणेकडे आलों. फिरंगा यांसि सीलसीला लाविला. याचें कारण मी सुरतेत राहिल्यानें पुढें बारभाईच्या फौजा येऊन उभ्या राहतील, मग मसलतीस बळ पडणार नाही. याचकरितां जलदी करून इकडे आलों. परंतु अंगरेजाचा भरवसा पक्का. थोर तरांडे. पल्यासहि याच तराड्यांत पाहोंचवावयाचें. हें समजोनच त्यास तोडावयाचे नाहींत. इकडे येऊन लहानमोठीं राजकारणें करून पाहतों. दोस्त जे कोणीं आहेत त्यांच्या गळ्यांत हात घालतों. मेळऊन घेतों. परंतु थोर जो भरवसा आहे तो एक अंगरेजाचा. तेव्हां जवाहिराविसीं निकड केल्यानें अगदींच तोडलेसें त्याच्या चित्तांत येईल. आधीं सुरतेंहून निघालों, इकडे आलों, तेसमयीं त्यास न विचारले. हें एक त्याचे चित्तांत काय आलें असेल तें न कळे. आणि जवाहीरही निकडीनें मागितल्यास त्यास परिछिन्न भासेल की, उठून गेले. आणि आह्मांस त्याचा दरकार. याजकरितां त्याजवळ झटून मागवूं नये. जवाहीर त्याजवळ असल्यानें त्यांसही हेंच समजले कीं, मसलत आह्मांवरच आहे. चार दिवस खर्चाच्या वोढीमुळें व बारभाईच्या पेंचामुळें बाहेर पडेल, पोट भरलें, परंतु अंगरेजाखेरीज दुसरा विचार नाहीं. याप्रों।। तुह्मीहि त्याची खातरदास्त करावी. संतोषानें त्याच्या चित्तांत दुसरा विचार न येतां, जवाहीर दिल्यास घेणें. परंतु जनरालाच्या समाधानानें जे गोष्ट होईल ते करणें. लिहिल्यावरून जनराल कोशल यास खलिते पाठविलें. परंतु लिहिला अन्वय सविस्तर ध्यानांत आणोन, याचे कोशल करून मनसब्यास युक्त असल्यास खलिते देणें. नाहीं तर न देणें, जाणिजे. छ २० माहे रजब.

(लेखनावधि:)