Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक २०५.


१७०० पौष शुद्ध २.

(श्रीसांब : सुपत्रो विजयते राजा शाहु नरपति हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. बद्दल देणें. त॥ विसाजी जयराम व गोविंद पुतळाजी व माहादाजी विश्वनाथ यांजकडे खरेदी जिनसाबद्दल रुपये २९३७॥ दोन हजार नवसे साडेसदतीस रुपये तुह्मांकडे तालुके बेलापूर नि॥ शंकर भिकाजी कामत कमाविसदार याजकडून दाहा हजार रुपयांचा भरणा करविला आहे. त्यापैकीं सदरहू रुपये देविले असते. पावते करून कबजा घेणे. त्रिवर्ग जिन्नस तुमचे गुजारतीनें खरेदी करितील. तरी निरखाची चवकशी करून, जिन्नस खरेदी करून, सत्वर रवाना करणें. जाणिजे. छ ३० जिलकाद. आज्ञा प्रमाण.

(लेखनावधि:)

पो।। छ ५ जिल्हेज.
पौष शुद्ध ७.
बार.

श्री.

लेखांक २०४.


१७०० मार्गशीर्ष वद्य १३.

(श्रीसांब : सुपत्रो विजयते राजा शाहु नरपति हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव व त्रिंबक पांडुरंग व भास्कर भिमाजी यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. कल्याणांतील जफ्तीपैकी आरसे व भांडीं तांब्याचीं वगैरे जिन्नस यादीब॥ आहे तो मुंबईस नेऊन फरोख्त करावयाविसीं लक्ष्मण बापूजी कारकून कल्याणास ठेविला आहे व हालीं संताजी कोंड्या खिजमतगार हुजूरून पाठविला आहे त्यास हे जिन्नस कल्याणांतून घेऊन मुंबईस येतील. त्यास, तुह्मीं व हे मिळोन जिन्नस फरोख्त करणे जर किमतीस फारच अजमासें तोटा येऊं लागल्यास दास्तान करून ठेवणें. जाणिजे. छ २६ जिलकाद. आज्ञा प्रमाण.

(लेखनावधि:)

पो।। छ ४ जिल्हेज पौष शु॥ ५.

श्री.

लेखांक २०३.


१७०० मार्गशीर्ष वद्य १२.

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान नमस्कार. सुहुरसन तिसा सबैन मया व अलफ. तो। बेलापूरपैकी ऐवज तुह्मांकडे जमा आहे. त्यापैकी त॥ विसाजी जयराम व गोविंद पुतळाजी यांजकडे खरेदी जिनसाबद्दल रुपये ५०० पांचसें तुह्माकडोन देविले असते तरी सदरहू रुपये मशारनिलेचे पदरी घालून कबज घेणें. जाणिजे. छ २५ जिलकाद आज्ञा प्रमाण.

(लेखनावधि:)

पो। छ ३० जिलकाद सन तिसा सायंकाल पौष शु॥ २.
बार.

श्री.

लेखांक २०२.


१७०० मार्गशीर्ष वद्य १०.

(श्रीसांब : सुपत्रो विजयते राजा शाहु नरपति हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान नमस्कार. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तुह्मांस मुंबईत अनुष्ठानाचे ब्राह्मण आहेत, सबब बंदोबस्तास प्यादे आसामी दाहाची नेमणूक करून दिल्ही ते पुरत नाहीं ह्मणोन विनंतिपत्र पाठविलें. त्यास, त्याशिवाय ज्याजती प्यादे असामी चार करार करून दिल्हे असत. तर पेशजी प्यादे यांची नेमणूक रोजमऱ्याची करून दिल्ही आहे त्याप्रों। यांसही रोजमरा करून कामकाज घेऊन रोजमरा देत जाणें. जाणिजे. छ २३. जिलकाद. आज्ञा प्रमाण.

(लेखनावधि:)

पो। छ २५ जिलकाद.

संध्याकाळ.
बार.

श्री.

लेखांक २०१.


१७०० मार्गशीर्ष वद्य १०.

(श्रीसांब : सुपत्रो विजयते राजा शाहु नरपति हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)

राजश्री सदासिव धोंडदेव यांसि :-
सु॥ तिसा सबैन मया व अलफ. सरकारांत तावदानें पाठविणें त्याचा बेत येणेंप्रमाणें.

      ५ पहिलीं पांच त्यांची उंची दीड हात चार बोटें व रुंदी एक हात बारा बोटें. याप्रमाणे.
-----


       २ सेवटचीं दोन. त्यांची उंची दीड हात च्यार बोटें व रुंदी येक हात बारा बोटें. याप्रमाणें.
----


      ५ मधलीं पांच. त्यांची उंची पावणे दोन हात रुंदी येक हात अडीच बोटें. याप्रमाणें.

----

-----
१२

एकूण बारा तावदानें सदरहू लिहिल्याप्रमाणें चौकशीनें चांगली किफायतवार अशीं पाहून, खरेदी करून, लौकर हजूर पाठवून देणें. जाणिजे. छ २३ जिलकाद. तावदानें चांगली साफ, ज्यांत मंद दिसत असेल ती न घेणें, साफ असतील तीं घेणें. छ मजकूर.

(लेखनावधि:)

पो। छ २४ जिलकाद.

श्री.

लेखांक २००.


१७०० मार्गशीर्ष वद्य १०.

(श्रीसांब : सुपत्रो विजयते राजा शाहु नरपति हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)

राजमान्य राजश्री सदासिव धोंडदेव यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान नमस्कार. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें.

फकिराचा मजकूर लिहिला. त्यास, खासा स्वारी तेथे असतां त्यांस खर्चासही दिल्हेंच आहे. हालीं ते दूध मागत असल्यास देत जाणें. कलम १.

दाहा कामाठ्यांची नेमणूक होती, त्यापैकी पांच तेथें आहेत ह्मणून लि॥. त्यास, महादाजी मोरेश्वर, कामाठयांकडील कारकून, यास ताकीद केली त्याजवरून त्यांणी अर्ज केला कीं, कल्याणाहून दुसरे पांच कामाठी र॥ केले आहेत. ते पावले न पावले तें लिहिणें.

दाहापैकी कमी असल्यास भरती करून ठेवणें. कलम १.

घोड्याचा पोरगा होता तो पळून गेला, त्यास दुसरा पाठवावा, ह्मणोन लिहिलें. त्याजवरून हुजुरून माहार पोरगा पाठविला असे.

माहादेवभट ठेविला होता तो घरीं गेला, ह्मणून लिहिलें ते कळलें. त्यास, त्याचे ऐवजीं दुसरा ब्राह्मण तुह्मी ठेवणें. कलम १.

कल्याणास आरसे वगैरे जिनस आहे, तो यादीब॥ मुंबई नेऊन फरोख्त करावयाविसीं लक्ष्मण बापूजी कारकून ठेविला आहे. तो मुंबईस जिन्नस घेऊन येईल. त्यास, तुह्मीं व त्रिंबक पांडुरंग व भास्कर भिमाजी व कारकून मिळोन यादीप्रमाणें जिन्नस फरोख्त करणें.

त्रिंबक पांडुरंग व भास्कर भिमाजी व तुह्मीं तेथें आहां. त्यास, खासा स्वारी इकडें आल्यावर जनराल इकडील काय मजकूर बोलत असतात व विलायतेकडील व बंगाला व मदराज सुरत येथील नवल विशेष वर्तमान आढळेल तें लिहून तुह्मी त्रिवर्ग पाठवीत जाणे.

येकूण कलमें साहा. छ २३ जिलकाद.

आज्ञा प्रमाण.

(लेखनावधि:)

पो। छ २५ जिलकाद,
संध्याकाल.

श्री.

लेखांक १९९.


१७०० मार्गशीर्ष शुद्ध ९.

(श्रीसांब सपुत्रो विजयते राजा शाहु नरपति हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान)

राजमान्य राजेश्री सदासिव धोंडदेव यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान नमस्कार. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तालुके बेलापूर खेरीज कळवें व परसिक येथील अलम खेरीज कमाविस हुजुरून शंकर भिकाजी कामथ यास सांगितली असे. त्यास सरकारांतून दाहा हजार रसद ठराविली आहे याकरितां नामू जासूद याजबराबर सनदा देऊन तुह्माकडे पाठविल्या आहेत. तरी कामथ याजवळोन पांच हजार रुपये रोख घेणें. बाकी पांच हजार राहिले, त्याची साहुकारी निशा त्रिंबक पांडुरंग याचे मुजारतीनें घेणें आणि सनदाही कमाविसदारास देणें. त्या त्रिंबक पांडुरंग याचे दाखल्यानें देणें. जाणिजे. छ २२ जिलकाद. आज्ञा प्रमाण.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १९८.


१७०० मार्गशीर्ष वद्य ९.

(श्रीसांब- सपुत्रो विजयते राजा शाहु नरपति हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान सु॥ तिसा सबैन मया व अलफ. सरकारांत पालखीस लावावयाकरितां तावदानाचें प्रयोजन असे. तरी तावदानाचे बेताची यादी अलाहिदा काठविली आहे. त्याबरहुकूम आकरा तावदानें खरेदी करून लौकर हुजूर पाठवून देणें. जाणिजे. छ २२ जिलकाद. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पो छ २४ जिलकाद.
सन तिसा.

श्री.

लेखांक १९७.


१७०० मार्गशीर्ष वद्य ९.

राजश्री सदासिव धोंडदेव यांसि :-
सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तेथें अनुष्ठानाचे ब्राह्मण आहेत, त्यांपैकीं येका ब्राह्मणाचें हलकें अनुष्ठान पाहोन, संक्रांत अमावस्या-पौर्णिमा तीन पर्वे आमच्यावरचें समुद्रस्नान व दहा नमस्कार याप्रमाणें सांगावें. आणि त्याची तीन अधेल्या दरमाहा निराळीच द्यावी. तेथील ब्राह्मणांपैकी काही गेले अथवा दुखण्यास पडिले, तरी त्यांच्या मोबदला दसरे चांगले मिळाले तरी लावावें. नाही तरी, येथे लिहोन पाठवावें. जाणिजे. छ २२ जिलकाद. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पौ छ २५ जिलकाद, सन तिसा.

दोन प्रहरीं. बार.

श्री.

लेखांक १९६.


१७०० मार्गशीर्ष वद्य १.

राजमान्य राजश्री सदासिव धोंडदेव यांसि :- रघुनाथ बाजीराव प्रधान नमस्कार. सु॥ सन तिसा सबैन मया व अलफ. नारोराम कमळाकर याचे आईस व बायकोस रोजमरा येकमाही रुपये १२॥ प्रमाणें दरमाहा तुह्मांकडून देविले असते. तरी ८ छ जिल्हेजापासून दरमाहाचा दरमाहा तेथें आहेत तोपर्यंत देत जाणें. तुह्मांकडील तसलमातीचे ऐवजचीं मजुरा पडतील. जाणिजे. छ १५ जिलकाद. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पो छ ४ जिल्हेज.
पौष शु॥ ६.

बार.