श्री.
लेखांक १८४.
१६९८ आश्विन शुद्ध ११.
पु॥ राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि:-
सु॥ सबा सैबन मया व अलफ. कारनेल आपटण यांणीं फितुरियांसी तह करून तहनामा मुंबईस पाठविला. त्याची नक्कल बाडमानीं हुजूर पाठविलीं आहे. व सरकारांत पत्र लिहिलें आहे. त्यास यादीची नक्कल व बाडमाच्या पत्राची नक्कल तुह्मांस पहावयास पाठविली आहे. याजवरून कळेल. याच पत्राची रवानगी पहिली केली, ते दमणास गेली. याजकरितां दुसरी रवानगी केली असे. त्यास जनराल हर्नबी याची व सरकारची दोस्ती, त्या अर्थी उचित मार्ग असेल तेच सलाह देतील. परंतु, जाहिराणा तरी यादी-प्रमाणेंच कबूल करावें, ह्मणतील. त्यास, अंतर्गती कोणती कसी सलाह देतात, हा त्याचा खुलासा काढून लेहून पाठवणें. बाडम यास पत्राचा जाब मोघम लिहिलें आहे कीं, हें जे बारीक मोठें बोलणें आहे तें लिहितां नये, यास्तव पेस्तर शाहाचें येणें झाल्यास फार उत्तम आहे, नाहीं तरी बापू कामती अगर दुसरा कोणी इतबारी पाठवावा. ह्मणोन लिहिलें असे. तुह्मास कळावें. जाणिजे. छ ९ रमजान. बहुत काय लिहिणें ? बाबूराव काणे आले ते, रेवातीरीं मर्जींचे स्थलीं राहून रूपी संख्या लक्ष घ्यावे, म्हणतात. अवतारपावेतों भाव आहे. प्रमाणेंही लाऊन देणार. परंतु येकदां करार जाहाल्यास मग फिरावयाचें संकट. यास्तव कोशल करून लिहिणें. निदानीं काय बोलावें? भाऊचें सूत्र तरी पक्केंच आहे. नरसिंहाचार्य येथें येऊन गेले. मोरोबाचेही निरोप बाबूरावा-बराबर आहेत. जीव कलतच आहे. बनोज येईल तेव्हां खरें. हजरदां बोललें आणि कांहीं जाहलों नाहीं. तेव्हां पुढें कोणता भरवसा ? जाणिजे. छ मजकूर. कलकत्त्यास व श्रीस पत्रें लिहिलीं आहेत. कोणी गलबत जाईल तेव्हां रवाना करणें.
(लेखनावधि:)
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57