श्री.
लेखांक १८६.
१६९८ आश्विन वद्य ९
राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि:-
सुहुरसन सबा सबैन मया व अलफ. किल्ले डबाईस र॥ फत्तेसिंग गाईकवाड याणीं वेढा घातला आहे. गाईकवाड याजकडून अमीनखान व अनाजी व बाळाजी रघुनाथ व आणिखी गैरपतकें येऊन मोर्चेबंदी केली आहे. त्यास, गुदस्तां बडोद्याचें मुक्कामीं खासा स्वारी असतां, त्याजविशीं कारनेल किंटण याणीं, रदबदली करून त्याजवर सरकारांतून कृपा होत गेली. सांप्रत मशारनिलेची वर्तणूक बदराहा होऊन याप्रमाणें केलें. हें वर्तमान कारनरास सांगोन ते गाईकवाडास लेहून वेढा उठवीत असल्यास बरेंच आहे. कारनेलीचे पत्रानें काम होईलसें नाहीं; तथापि जनरालाचें व कारनेलीचें पत्र गेल्यास कांहीं उपयोग पडेल. गंभीर भडोचेस आहे. त्याणें दबाविलें तरी काम होईल. परंतु अश्या काळीं कोण साहित्य करितो ? फुकट दबावन्यास काय जातें ? परंतु दबावतीलसे दिसत नाहीं. असो! प्रयत्न जाहाल्यास जनरलाचें पत्र, कारनेलीचें व गंभीराचें जाई तें करावें. नाहीं तरी, लढाईनें तरी डबई राखीतच आहों. गारा व दारूचा आंत तोटा आहे. वरकड बाहेरील वेढा डबाईकराचे खातरेंत नाहीं. दारू व गारा रणगडास पोहचल्या तरी कांहींच फिकीर नाहीं. दोन महिन्यांनीं बडोद्याची खबर घेतली जाईल. फत्तेसिंगाचे सामान व हिंमत सर्व नजरेत आहे. जाणिजे. छ २१ रमजान.
(लेखनावधि:)
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57