श्री.
लेखांक १९९.
१७०० मार्गशीर्ष शुद्ध ९.
(श्रीसांब सपुत्रो विजयते राजा शाहु नरपति हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान)
राजमान्य राजेश्री सदासिव धोंडदेव यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान नमस्कार. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तालुके बेलापूर खेरीज कळवें व परसिक येथील अलम खेरीज कमाविस हुजुरून शंकर भिकाजी कामथ यास सांगितली असे. त्यास सरकारांतून दाहा हजार रसद ठराविली आहे याकरितां नामू जासूद याजबराबर सनदा देऊन तुह्माकडे पाठविल्या आहेत. तरी कामथ याजवळोन पांच हजार रुपये रोख घेणें. बाकी पांच हजार राहिले, त्याची साहुकारी निशा त्रिंबक पांडुरंग याचे मुजारतीनें घेणें आणि सनदाही कमाविसदारास देणें. त्या त्रिंबक पांडुरंग याचे दाखल्यानें देणें. जाणिजे. छ २२ जिलकाद. आज्ञा प्रमाण.
(लेखनावधि:)
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57