श्री.
लेखांक २१५.
१७०० माघ वद्य ७.
(श्रीसांब : सपुत्रो विजयते राजा शाहू नरपति हर्षनीधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)
राजमान्य राजश्री बाबुराव मोरेश्वर यासि:-
रघुनाथ बाजीराव प्रधान. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तुह्मी मुंबईस गेला. त्यास, तेथें चिमणाजी गोपाल व सदाशिव धोंडदेव व त्रिंबक पांडुरंग व भास्कर भिकाजी तेथ आहेत. त्यास कळवें- परसीकचा हिसेब समजावणें. म्हणजे चौकशीनें पाहातील मग तो हिसेब घेऊन हुजूर येणें. जाणिजे. छ १९ मोहरम.
(लेखनावधि:)