श्री.
लेखांक २४९.
१६८९ कार्तिक शुद्ध ७.
राजश्री------------------------
------------------------------- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ तुकोजी होळकर दंडवत. मु॥ समान सितैन मया व अलफ राजश्री माहादाजी गोविंद यांची बोली सरकारांत सालमजकुरी करून त्यांच्या पथकाच्या सरंजामांत प॥ मजकूर ऐवजीं जागा रुपये १४२४८॥ चौदा हजार दोनशें साडे अठेतालिस रुपयाची करार करून हें पत्र सादर केलें असें. तर तुह्मीं प॥ मजकूर पै॥ सदरहू चौदा हजार दोनशें साडे अठ्ठेचाळिस रुपयाचे तनखियाचे गांव मशारनिलेस नेून देऊन चालविणें. जाणिजे. छ० ५ जमादिलाखर. बहुत काय लिहिणे ?
बार