Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

चिमटावल - चिंतामणि (गणपती) - चिंतामणिपल्लं. खा म

चिमठाणें - चिंतामणिस्थानं. खा म

चिमणपुरी - चिंतामणि (गणपती) - चिंतामणिपुरी. खा म

चिमणापुरी - चिंतामणि (गणपती) - चिंचामणिपुरी. खा म

चिरखाण - चिल्ल (घार) चिरि (पोपट) - चिल्लखनि. २ खा इ

चिरडें - चिल्ल (घार ) चिरि ( पोपट). खा इ

चिरणें - चिल्ल (घार) चिरि (पोपट) - चिल्लवनं. खा इ

चिरमठी - चिल्ल (घार ) चिरि ( पोपट ). चिल्लमठिका. खा इ

चिराई - चिल्ल (घार) चिरि (पोपट ) - चिल्लावती. २ खा इ

चिलगांव - चिल्ल ( घार) चिरि ( पोपट ). खा इ

चिलाणें - चिल्ल (घार) चिरि ( पोपट) - चिल्लवनं. खा इ

चिलारखेडें - शिलाहार ( आडनांव ) - शिलाहारखेटं खा म

चिल्लरघाट - चिल्लतरघाटः खा प

चीप - चिप्पिका (पक्षिविशेष ). खा इ

चुंचाळे - चुंचु (वैदेहीब्राह्मणसंतति) चुंचु+आलयं. ३ खा म

चुडाणें - चूडा (पांढरी गुंज) - चूडावनं. खा व

चुडेल - चूडा (पांढरी गुंज) - चूडावेर. २ खा व

चुनवाडें - चूर्णक (चुना) - चूर्णकवाटं. खा नि

चुलवड - चोल (लोकनाम )- चोलवाटं. खा म

चुळक्याची बारी - चौलुक्यद्वारिका. खा प

चूडवेल - चूडावेर. खा व

चूल - चोल (लोकनाम) - चोलकं. खा म

चोंदवाडा - चुंद (बुद्धाच्या शिष्याचें नांव)- चुंदवाटः २ खा म

चोपडाई - चतुर् (चार) - चतुः पट्टावती. खा नि

चोपडें - चतुर् (चार) - चतुः पट्टं. खा नि

चोरकुर्‍हें - चकोरकुहरं. खा इ

चोरगांव - चकोरग्रामं. खा इ

चोरटांकी - चकोरटंकिका. खा इ

मोरशेंडा [ मयूरशिखंडः = मोरशेंडा ]

मोरांबा [ मूर्ताम्लः ] (मोरावळा पहा)

मोरावळा [ मूर्ताम्लः = मुर्रआवळा = मोरावळा. मूर्ताम्ल: = मुर्रआम्ब = मोरांबा, मुरांबा ] मोरांबा किंवा मोरावळा या शब्दांतील आंबा, आंवळा ह्या शब्दांचा आंबा किंवा आमलक ह्या शब्दांशीं कांहीं एक संबंध नाहीं. मोरांबा किंवा मोरावळा जसा आंब्याचा किंवा आंवळ्याचा करितात, तसा सफरचंदाचा, खारकेचा किंवा इतर अनेक फळांचा करतात व त्या त्या फळांच्या साखरेंत मुरविलेल्या त्या त्या आम्लास त्या त्या फळाचा मोरावळा किंवा मुरांबा ही संज्ञा देतात. (भा. इ. १८३४)

मोरी [ मूर्छ १ मोहसमुच्छ्राययोः. मूर् = मोरी. मूर्छतीति मूः ।] पाणी मुरतें जेथें ती मोरी. मूर्छनं = मुरणें. (धा. सा. श.)

मोरूं [ मयूरतर ] (रूं पहा)

मोहर [ बुद्धिबळाच्या डावांत १६ मोहरे व १६ पायिक असतात त्यांना सध्यां १६ मोहरीं व १६ प्यादीं हीं नांवें आहेत. मुख्य महत्त्वाचे जे ठोकळे त्यांना मोहरे म्हणत. मोहर हा शब्द मुख = मुखर = मुहर = मोहर अशा परंपरेनें मराठींत आला आहे. ह्या मोहर शब्दाचा फारशी मोहरें हा शब्द अपभ्रंश आहे. ज्ञानेश्वरांच्या कालीं बुद्धिबळांचा डाव प्रचारांत होता, असें ज्ञानेश्वरीवरून दिसतें. मुसलमानांनीं हा डाव नवीन निर्माण केला ही समजूत निराधार आहे ] (सरस्वतीमंदिर-आश्विन शके १८२६)

मोहरें [ मुखाग्रं ] (ज्ञा. अ. ९ पृ. १४८)

मोहाचा नारळ [ मधुनारिकेलं = मोहाचा नारळ. मधु = महु = मोह ( honey sweet ) ]

मोहोरका [ मुखरकः = मुहरका = मोहोरका ]

मोहोरबंध बांधणें [ मयूरिकाबंधं बध्नाति = मोरबंध - मोहारबंध बांधतो ] पिशव्या बांधण्याची मयूरिकाबंध नांवाची गांठ असे. मोहोरबंद हा फारसी शब्द निराळा.

मोहोळ [ मध्वालयं = मोहळ (मधाचें घर), मोहोळ ]

मोळा १ [ मुकुलः = मउळ = मोळा ] दांतांचे मोळे = दंतमुकुला:
मोळे तोडूं नको = न उमललेलीं फुलें तोडूं नको.

-२ [ मौलः ( आचारः ) = मोळा ] मोळा म्हणजे मूल आचार.

मोळी १ [ मौली - मोळी. मौले गता मौली ] डोक्यावर असलेली ती मोळी, डोक्यावरील ओझें. (भा. इ. १८३४)

मोकाड-ट [ मुक्ताटं = मोकाट-ड ( गुरूं) ] मुक्त आहे अटा म्हणजे फिरणें ज्याचें तें गुरूं. ( धा. सा. श.)

मोख १ [ मुष्युकः = मोख (नारळाचा वगैरे) ]

-२ [ मयूख ( शंकु) = मऊख = मोख ] लतांचीं अग्रें.

मोखा [ मोक्षकः = मोखा (वृक्ष ) ]

मोगर [ मुद्गर = मोग्गर = मोगर (रा-री-रें ) ] (भा. इ. १८३२)

मोगा [ मुद्गः = मोगा ] पात्रविशेष.

मोघम् [ मीघं=मोघम् (अव्यय) ] मेघं म्हणजे निष्फल, अनिश्चित. संस्कृतांत्तून मराठींत जसे चें तसें आलें आहे.

मोघा-मोगा [मुद्गः = मोगा, मोघा ]

मोजणें [ मुष् = मुस = मुझ = मोझ = मोजणें ( सहन करणें ) ] मी त्याला मोजीत नाहीं = अहं तं न मृष्ये. गणनार्थक मोजणें, मेजणें हे शब्द निराळे. (भा. इ. १८३४)

मोट [ मुट् क्षेपणे ] विहिरींत टाकावयाचें चामड्याचें भांडें. (ग्रंथमाला)

मोटकें [ मूतकं ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ३६ )

मोटाड [महदाढ्यः = मोटाड ]

मोठमोठ ( ठा-ठी-ठें) [ येनाल्पेन यत्नेन महतो महत: शब्दौघान्प्रतिपद्येरन् । ( पतंजलि महाभाष्य Vol. I. P. S. Kielhorn ) महत् = मोठ. महत् + महत् = मोठमोठ {ठा-ठी-ठें). द्विरुक्तीची चाल संस्कृतांतून घेतली. ] (भा. इ. १८३३)

मोठी आई [ मातामही ह्या शब्हाचें भाषान्तर मोठी आई ] ( भा. इ. १८३३)

मोठें [ महत्तर = मोट्टअ = मोठें ] (ग्रंथमाला)

मोडणें १ [ मुद् १० संसर्गे. मोद = मोड. मोदनं = मोडणें ] मोदयति सक्तून् घृतेन= तुपानें सातू मोडतो. पाण्यानें दहीं मोडते = मोदयते दधि, पयसा. ( धा. सा. श. )

-२ [ मुडि खंडने ] ( ग्रंथमाला)

मोतीहार [ मौक्तिकहारः = मोतीहार ]

मोप [ अनुपम ] ( अमूप पहा)

मोरकुंचा [ मयूरकूर्चिका = मोरकुंचा ]

मोरचूद [ मयूरकतुत्थं = मोरथूत = मोरचूत = मोरचूद ] मयूरकं तुत्थांजनं इति अमरः

मोरचेल [ मयूरचेली = मोरचेल ]

मोरवेल [ मूर्वावल्लिः = मोरवेल ( वनस्पति ) ] (भा. इ. १८३७)

चिंचणेर - (सं.) चिंचिणी (चिंच) + गृह = चिचणी
+ घर = चिंचण + अर = चिंचणर = चिंचणेर. (ग्रंथमाला)

चिंचपुरें - चिंचापुरकं. ३ खा व

चिंचलें - चिंचापल्लं. खा व

चिंचव - चिंचावहं. खा व

चिंचवाट - चिंचा. खा व

चिंचवार - चिंचावारकं. खा व

चिंचविहीर - चिंचाविवरं. खा व

चिंचवें - चिंचावहं. खा व

चिंचा - चिंचा. खा व

चिंचाटी - चिंचाट्टिका. ३ खा व

चिंचावड -चिंचावटं. खा व

चिंचोदा - चिंचापद्रक. खा व

चिंचोदें - चिंचपद्रं. खा व

चिंचोली - सं. प्रा. चिंचवल्य. पुणें, ठाणें, सोलापूर. (शि. ता. )

चिंचोली - चिंचपल्ली. ४ खा व

चिंचोलें - सं. प्रा. चिंचवल्य. नाशिक, खानदेश. ( शि. ता.)

चिटखेड़ें - चेटखेटं. खा म

चिटगुप्पी - चित्रगुप्ति = चिटगुप्पी.
नाना प्रकारचा संरक्षणक्षम असा कोट ज्या गांवाला आहे तें चित्रगुप्ति नामक गांव.

चिणोद - चीन (देशनाम, लोकनाम) - चीनपद्रं. खा म

चितवी - चित्रक (चित्ता ) - चित्रकवहा. खा इ

चितागंग - सप्तगंगः = चत्तगंग = चितागांग.
चित्रगंगः देशः = चितागंग. अन्यपदार्थे च संज्ञायां २-१-२१

चितादर - चित्रक (चित्ता ) चित्रकदरी. खा इ

चितार - चित्रक (चित्ता ) - चित्रकाहारः खा इ

चितावल - चित्रक (चित्ता )- चित्रकावलि. खा इ

चितेगांव - चित्रक (चित्ता ) - चित्रकग्रामं. खा इ

चितोड़ें - चित्रक (चित्ता ) - चित्रकवाटं खा इ

चिनावल - चीन (देशनाम, लोकनाम) - चीनकपल्लं. खा म

चिपल - चिपिटकं (तृणाविशेष) - चिपिटकपल्लं. खा व

मेढ्या [ महर्द्धिकः = महिढ्ढिआ = मेढिआ =मेढ्या ] मेढ्या म्हणजे समृद्ध, श्रेष्ठ, पुढारी.

मेण [ मिह् १ सेचने. मेहनं = मेण ] (धा. सा. श.) 

मेतकूट १ [ मैत्रीकूटम् = मेत्तकूडम् = मेतकूट ] firm friendship.

-२ [ मेथ्यांचें कूट तें मेथकूट = मेतकूट ] (भा. इ. १८३३)

-३ [मिथ: कूट = मितकूट =मेतकूट ] मेतकूट म्हणजे परस्पर, अन्योन्य गूढ़ स्नेह. (भा. इ. १८३३).

मेथोडा [ मेथिकावटकः = मेथोडा ] बाळंतिणीचें औषध.

मेंदा [ मिद्. चंदामेंदा (छिद् + मिद्) cut and turned into grease ]

मेर [ मीरः ( मर्यादा ) = मेर ( स्त्री ) ] (भा. इ. १८३३)

मेर मेरी [ मर्या = मेरा =मेर-मेरी ] मर्या म्हणजे मर्याद. (भा. इ. १८३३)

मेला १ [ मेट्, मेड्, म्लेट्, म्लेड् to be mad = मेला ] तो मेला गेला. मेल्याला कांहीं समजत नाहीं, येथें मेला म्हणजे वेडा. वेडा = मेटः, मेड: . मेला = म्लेटः, म्लेडः वेडा मेला हे शब्द बायकांच्या बोलण्यांत हमेष येतात.

-२ [ म्रेटः , म्लेटः mad = मेला ] mad. तो मेला आंगावर आला the mad man assaulted me. मेला हा शब्द महाराष्ट्रांत बायकांच्या तोंडीं फार आहे.

मेलेलें [ मृतमृतं ] ( ओलेलें पहा)

मेहुडें [ मेघ = मेघु = मेहु = मेहुडें (अल्पत्वदर्शक) ] लहान अभ्र. (ग्रंथमाला)

मेहुण [ मिथुन = मिहुण = मेहुण ] जेडपें. (स. मं.)

मेहुणा-णी-णें [मिथुनक = मिहुणआ = मेहुणा-णी-णें ] जोडप्यापैकीं एक. (स. मं.)

मेळा [ मेलक = मेळा ] (भा. इ. १८३७)

मैत्र [ मैत्र्यम् = मैत्र ] friendship.

मैंद [ महेंद्र = महिंद = मइंद = मैंद ] इंद्रासारखा सुखावलेला, आळशी, मंद. (भा. इ. १८३२ )

मोकळा [ भूकलः = म्हूकला = मूकळा = मोकळा ( घोडा ) ]

मोकाट [ मुक्ताटक = मोकाट ] lose and vagrant beast.

मोकाटणें [मुक्ताटनं = मोकाटणें ] (भा. इ. १८३६)

चारोळ }
चारोळा } सं. प्रा. स्थावरपल्लिका. बडोदें. (शि. ता.)

चारोळी - ,, पुणें. (शि. ता. )

चांवरदें - चमर ( मृग ) - चमरपद्रं. खा इ

चावळखेडें - चामर (चवरी) - चामरखेटं. खा नि

चावळदें - चामर (चवरी ) - चामरपद्रं. खा नि

चाहार्डी - चर्मकारवाटिका. २ खा म

चाळीसगांव - चारु (बृहस्पति ) - चार्वीशग्रामं - बृहस्पतीचें गांव. खा म

चिकटी - चिक्क (चिचुंद्री ) - चिक्कवाटिका. खा इ

चिकटें - चिक्क (चिचुंद्री ). खा इ

चिकसें - चिक्क (चिचुंद्री ) - चिक्ककर्ष. खा इ

चिखलकराड -चेकिन्न ( चिकिल्ल = चिखल्ल = चिखल ) ( क्लिद् ओलें होणें ) - चिखल्लकरभवाटिका. खा नि

चिखलठाण - चेकिन्न ( चिकिल्ल = चिखल्ल = चिखल ) ( क्लिद् ओलें होणें ) - चिखलस्थानं. खा नि

चिखल वेहडा - चेकिन्न (चिकिल्ल = चिखल्ल = चिखल) (क्लिद् ओलें होणें ) - चिखल्लविभीतकं. खा नि

चिखलवाहाळ - चेकिन्न (चिकिल्ल = चिखल्ल = चिखल) ( क्लिद् ओलें होणें ) - चिखल्लवाहालि. खा नि

चिखलसें - चिक्खलशयं ( चिक्खल = चिक्लिद. हा चिक्खल शब्द स्वतः अपभ्रंश आहे. अर्थात् ग्रामनाम अपभ्रंश सुरू झाल्यावर पडलें, हें स्पष्ट आहे. प्राकृत वैय्याकरण चिक्खल शब्द अव्युत्पाद्य सबब देशी समजतात. परंतु हा शब्द क्लिद् थातूत्पन्न आहे.)

चिखली - चेकिन्न (चिकिल्ल = चिखल्ल = चिखल ) (क्लिद् ओलें होणें ) - चिखल्लिका. ११ खा नि

चिखली महुडी - चेकिन्न (चिकिल्ल= चिखल्ल = चिखल )

(क्लिद् ओलें होणें ) - चिखल्लिका मधूकवाटिका. खा नि

चिखलोड - चेकिन्न (चिकिल्ल = चिखल्ल = चिखल )

( क्लिद् ओलें होणें ) - चिखल्लवाटं. २ खा नि

चिंचखेडें - चिंचाखेटं. १५ खा व

चिंचखेड़ें वांकड़े - चिंचखेडें वंकटं. खा व

चिंचगव्हाणा - चिंचागवादनी (चिंचेचें कुरण ). २ खा व

चिचणगांव - चिंचिडग्रामं. खा व

मुळी [ मूलिका = मुळी ]

मुळूमुळू १ [ मुहुर्मुहुर् = मुउळमुउळ = मुळूमुळू ( हळूहळू किंवा वारंवार) ]मुहुर्मुहुरविललाप = मुळूमुळू रडली.

-२ [ मुहुर्मुहुस् = मुळूमुळू ] मुहुर्मुहुरश्रूणि मुंचन् ( पंचतंत्र १ आषाढभूतीची कथा ) ( धातुकोश-मुलक पहा) मूग [ मौग्घ्यं = मुग्गं = मूग ] तो मूग गिळून बसला म्हणजे मौग्घ्य गिळून बसला. किंवा
[ मौक्यं (मूकभावः = मूग ] तो मूग गिळून बसला.

मूठ १ [ मुष्टि = मूठ ] (स. मं.)

-२ [ मुस्तुः = मूठ ]

मूड [ मूताः ] (ज्ञा. अ. ९ पृ. ४० )

मुदा १ [ मुद्रा = मुद्दा = मूद (भाताची, अलंकाविशेष) मुद्रा प्रत्ययकारिणी (भट्टोजी, उणादि १७८ ) ] (भा. इ. १८३३)

-२ [ मुद्रिका ] (मुदी पहा)

मूप [ अनुपम ] ( अमूप पहा)

मूर [ मूर्वा = मूर, मोर (वेल ) ] एक वनस्पति.

मूस [ मूषा = मूस ]

मूळ [ मूलं (पिढीजात दास) = मूळ (नपुंसक) ] मूळ येणें म्हणजे माहेरचें किंवा सासरचें बोलावणें येणें. हें बोलावणें मूल म्हणजे दास घेऊन येई. (भा. इ. १८३३)

मूळवा [ मूलवापः (sowing roots for planting) = मूळवा. क्षुद्रवाप: = खुडवा ]

मेंग [ मृतांग = मिअंग = मेंग (सापाची) ] साप मेंग टाकतो म्हणजे साप मेलेली कातडी टाकतो. (भा. इ. १८३२)

मेंग्या [ मितंगमः हस्ती (मितनखे च ३-२-३४ ) = मिअंगआ = मेंग्या] मेंग्या म्ह० सुस्त.

मेट [मेथिः = मेढी = मेढ. मेट = मेथकं ] कोंकणांत व मावळांत शिपायांची चौकी.

मेडशिंग [मेढ्रशृंगी = मेडशिंग (स्त्री ) ] (भा. इ. १८३६)

मेडशिंगी [ मेढ्रश्रृंगी = मेढशिंगी ( अजाश्रृंगी ), मेडशिंगी ]

मेढ १ [ मेथिः, मेधिः (ना.) मेठि: (ना.) = मेढ ]

-२ [ मेथि (post) = मेढी, मेढ ]

मेढशिंगी [ मेढ्रशृंगी = मेढशिंगी ( वनस्पति) ] अजाश्युंगी, मेषशृंगी अशीं हि संस्कृत नांवें हीस आहेत. (भा. इ. १८३७)

मुरदाडशेंग [ मृद्दारशृंगकं = मुरदाडशिंग = मुरदाडशेंग ]

मुरम [ मुरगंड ] (मुरुम पहा )

मुरांबा [ मूर्ताम्ल: ] (मोरावळा पहा)

मुरुम [ मुरगंड pistules on the face = मुरुम, मुरम ] मुरमाची पुटकळी.

मुरूम [ मुरमंड (मुरगंड) eruption on the face = मुरूम ] eruption on the face. मुरुमाची पुटकुळी a boil of मुरुम.

मुर्गी [ मृगी ] (मिर्गी पहा)

मुर्दुंग्या [मुदंगिक = मुर्दुंगिअ = मुर्दुंग्या ] (भा. इ. १८३२)

मुर्मुरे [ मुर्मुर = तुसांवर किंवा पानांच्या पाचोळ्यावर किंवा भुसावर भाजलेलें भात. मुर्मुरक = मुर्मुरा ] (भा. इ. १८३२)

मुर्वत [ मुर्व् बन्धने. मुर्वतिः tie = मुर्वत ] त्याला मुर्वत नाहीं म्हणजे माणुसकीचें वगैरे बंधन नाहीं.

मुलगा [ मूलक ] (पोरगा पहा )

मुलगा-गी-गें [ मूल् (मोलयति, बीं पेरतो ) + अ = मल, मुलगा-गी-गें ( बीजारोपणाचें फल ) ] (स. मं. )

मुलूख (मूर्ख ) [ मूर्ख याचा सौरसेनींत अपभ्रंश विकल्पानें मुरुख्ख होतो. महाराष्ट्रीची मराठी बनतांना मुरुख्ख याचा अपभ्रंश मुलूख.]
उ० - तो साच्या मुलखाच्चा शहाणा आहे. येथें मुलखाचा म्हणजे मूर्खाणाम्. मुलूख म्हणजे प्रांत असा अर्थ नाहीं. मुलूख म्हणजे प्रांत हा अरबी शब्द आहे.
तो सार्‍या मुलखाचा शहाणा याचें शब्दशः संस्कृत भाषांतर ' स सर्वेषां मूर्खाणां विचक्षणः अस्ति ' असे आहे. (राधामाधव विलासचंपू पृ. १६३)

मुसमुशित [ मृत्स्नमृत्स्नित = मुसमुशित ] (भा. इ. १८३४)

मुसकी [ मुष्क: (अंडकोशः ) मुसक. स्त्रीलिंग (मराठी) मुसकी ] गवादी मांजराची मुसकी वैदू लोक विकतात. मुसकी म्हणजे अंडकोश. (भा. इ. १८३४)

मुसळ्या [ मुसल्य: = मुसळ्या ] इतर सूक्ष्म यंत्रानें काम न करतां ओबडधोबड यंत्रानें काम करतो तो मुसळ्या.
मुसळानें मारण्यास योग्य असा मुसल्य शब्दाचा संस्कृतांत अर्थ आहे. परंतु मराठींत तो अर्थ नाहीं.

मुळमुळित [ मृदुलमृदुलित = मुळमुळित ] softish.

मुळा [ मुलक = मुळा ] (भा. इ. १८३४)

मुंगूस १ [ अंगूष = ओंगूस = ओंगुस = मोंगुस = मुंगूस ] (महाराष्ट्राचा वसाहतकाल पृ. १०३)

-२ [ मदगुशः ] ( मुंगुस पहा)

मुंगूसवेल [अंगूषवल्लि = मुंगूसवेल ]

मुगदळ [ मुद्गदलं = मुग्गदळ = मूगदळ = मुग्दळ ] ( भा. इ. १८३४)

मुंजा [मुंजक = मुंजा ] (स. मं.)

मुटकें [ मोटकं (गोळी ) = मुटकें ] पिठाचा गोळा. मुष्ठिकं = मुटकें ( मुठीनें वळलेलें )

मुडदा [ मृ ६ प्राणत्यागे. मृतः = मुरदा = मुडदा. मृतस्पृश = मुडदेफरस = मुडदेफरास ] मृताला शिवून त्याचें शव वाहणारा. ( धा. सा. श. )

मुडदार [ मूढदारक = मुडदार ] Mad son, mad lad.

मुडदेफरास [मृतस्पृश्] (मुडदा पहा)

मुडा [ मूतः . मूतक: मू बंधने मूतः मूड़ा = मुडा ] मूत म्हणजे बांधलेला गठ्ठा, पांटी. ( ज्ञा. अ. ९ पृ. ३० )

मुंडी १ [ मुंडिका = मुंडी ] डोकें.

-२ [ मूर्धन् = मुंढ. मूर्धनी = मुंडी ] मुंडी मुरगाळणें.

मुंढा [ मुष्टिक: = मुड्ढा = मुंढा ]
मुंढा हात म्हणजे मुष्टिना उपलक्षितः हस्त: ।

मुदल [ मूलदेयं = मूलदें = मूदलें ( विपर्यय) = मुदलें= मुदलँ ] (भा. इ. १८३३)

मुदलीं [ मुधा + ल ] ( मुधलीं १ पहा )

मुदी [ मुद्रिका = मुदी, सूद ]

मुधलात् [मुधा + ल ] (मुधलीं २ पहा)

मुधलीं १ [ मुधा (व्यर्थे निपातः) + ल ( स्वार्थे) = मुधाल = मुधली, मुदली, मुदलांत ] तो मुधली हें काम करीत नाहीं. मुधली म्हणजे व्यर्थ. (भा. इ. १८३४)

-२ [ मुधा + ल ( स्वार्थी ) = मुधाल = मुधल. सप्तमी मुधलीं; पंचमी मुधलात्. मुद्दल या फारसी शब्दाशीं येथें कांहींएक कर्तव्य नाहीं.] (भा. इ. १८३३)

मुधळ [ मृध् १ हिंसायाम् ] (धातुकोश-मोधळ २ पहा)

मुरदड [ मृदर ] ( मुरदाड पहा)

मुरदा [ मृ ६ प्राणत्यागे. मृतः = मुरदा ] (मुडदा पहा)

मुरदाड [ मृदर (खेळाडू, क्षणभंगुर)=मुरदड=मुरदाड] मुरदाड माणूस म्हणजे चंचल, निरुपयोगी माणूस.
मृदंग = मुरदुंग.

मिर्गी [ मृगी = मिर्गी, मुर्गी (कोंबडी ) ]

मिशमिशित [ मृष् (द्वि.) ] (मिसमिशित पहा)

मिशी [ स्मश्रु = मिशी, मिसरूं ] ( स. मं.)

मिषमिषित [ मृष् ( द्वि. ) ] (मिसमिशित पहा)

मिसमिशित १ [ मृष् to bear, suffer द्विरुक्त = मिसमिशित, मिषमिषित, मिशमिशित ] a forbearing man.

-२ [ मिद् स्नेहने ] ( मिचमिचित पहा )

-३ [ मृश to rub द्विरुक्त = मिसमिशित ] rubhed, soft.

मिसमिशीत [ मिषु ६ सेचने (द्विरुक्ति) मिषमिषत्= मिसमिषीत, मिसमिशीत ] मिसमिषीत म्ह० पाण्यानें ओलसर झालेला पदार्थ. ( धा. सा. श. )

मिसमिषीत [ मिषु ६ सेचने ] (मिसमिशीत पहा)

मिसरूं [ स्मश्रु ] (मिशी पहा)

मी [ अहं ] ( ज्ञा. अ. ९ )
मीं झवँ तुम्हाला व तुम्हीं झवँ मला. हें विनोदपर वाक्य सर्वांना माहीत आहे. यावत् = जावँ = जवँ = झवँ.
अहं यावत् युष्माकीनः
यूयं यावत् मामकीनाः ॥
या संस्कृत वाक्यांचें वरील वाक्यें भाषांतर आहेत.
यावत् ~- तावत्. (भा. इ. १८३२)

मीठी [ मिथितं ] (ज्ञा. अ. ९ पृ. ३६)

मुकटा [ मूतक: = सुटका = मुकटा ] (मू विणणें) मूत (निष्ठा) पासून मूतक म्हणजे विणलेलें वस्त्र. कोशाचें, रेशमाचें, तागाचें विणलेले जें वस्त्र तें मूतक, (भा. इ. १८६६)

मुख [ मुख = मुख ] (स. मं. )

मुखडा [ मुखाकार: appearance, look = मुखडा ] Mien, look, appearance of the face.
मुखडा-डें-मुख शब्दाचें - र्‍हस्व रूप. (स. मं.)

मुखवटा [ मुखपट्टः = मुखवट्ट: = मुखवटा ] (तुलना) चेहरेपट्टी.

मुंगशी [भुजंगाक्षी = मुंगशी. भ = म ] वनस्पतिविशेष.

मुंगुस । मद्गुशः (नकुल: ) हेमचंद्र-उणादिगणाविवृत्तिः = मुंगुस, मुंगूस ]

मुगुट [ मुकुट = मुगूट ]