[ ८९ ]
श्री. शके १६५५ कार्तिक वद्य १०.
पुरवणीः राजश्री पिलाजी जाधवराउ गोसावी यांसिः--
सु॥ अर्बा सलासैन मया व अलफ. हुजरातच्या लोकांमध्यें कितेक लबाड असाम्या आहेत, त्या निघाल्या पाहिजेत, यास्तव चिरंजीव नाना यांस प्रस्थानीं स्वार करावे, ह्मणजे लोक त्वरेनें निघतील. हा विचार पहिला तुह्मास लिहून पाठविला आहे. व चिरजिवांस राजश्री बाबुनाईक यांचे घरी प्रस्थानी जाणें, ह्मणून लिहिलें होतें. त्यावरून ते प्रस्थानीं निघाले असतील. परंतु चिरंजिवांनीं निघावेंच ऐसा अर्थ नाही. लोकांस दटावून सांगितलियावरी कोणाच्यानें राहवत नाहीं. औघेच स्वार होऊन येतील. जो कोण्ही न जाई त्यास दटावून पाठविले जातील. ते गोष्ट राहूं द्यावी. जाणिजे. छ. २२ जमादिलाखर. नानास गंगेपावेतों न्यावें ऐसें आह्मी लिहिलें होतें. परंतु ते गोष्टीचें प्रयोजन नाहीं.
लेखन
सीमा.