[ ९५ ]
श्री. शके १६५६ आषाढ शुद्ध ११.
राजश्री माहादेवभट्ट हिंगणे गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। राणोजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. हाली प्रा। कार्यभाग जाहाला ह्मणवून लिहिलें, तें कळलें. ऐसियासि, येथील वर्तमानः-- उज्जन्न प्रांतें आलियावरी तिकडून रा। बाजी भिंवराव यांची फौजही आली. कट फार जमा जाहाले. खर्चाचा मोठा गवगवा जाहाला. तुह्मांकडून तो कांहीं येऊन न पोहोंचलें. पुढें आठ पंधरा दिवसा पांच लाख रुपये येणार. ते आले तरी काय होणार ? यास्तव राजश्री राउसाहेब अवघे लष्करसुद्धां देशास गेले. येथें तुह्मांसी बोली केली होती की, माळवियांत छावणी करितों. त्याकारणें आह्मी व राजश्री मल्हारबा व पंवार त्रिवर्ग याप्रमाणें फौज हजारपंधरापर्यंत राहिलों. याउपरि खर्चाची पोख्ती बेगमी करून जलदीनें पाठविणें, व पंचविसांच्या सनदा बालीप्रमाणें पाठवणें, व सुभियाची सनद घेणें. ते ह्मणतील कीं, मुख्य भेटतील तेव्हां देऊं; तरी ते व आह्मी कांहीं दुसरे नाहीं. तुह्मी ढील कराल तरी पुढें हे कटकटच राहेल. सुभा दिलियानें गोष्टी बंदोबस्त करून, त्यांची तुमची भेटी उत्तम रीतीनें करून, ह्मणून सांगोन कुलीं कार्यभाग करणें. आमचें राहाणे मनसुब्याकरितां जाहालें, तरी अवघा कार्यभाग करणें. कोणे गोष्टीची बाकी न ठेवणें. ते ठेवतील, तरी त्यासी भारी पडेल. यांत त्यांच्या चित्तास येईल तें करूत. आह्मास सुचला अर्थ लिहिला आहे. जाणिजे. छ० ९ सफर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सूद.
* वरकड वर्तमान राजश्री पंताच्या पत्रावरून कळेल. थैल्या ४ नवाब, सवाई, यादगारखान, कृपाराम, यांसि पाठविलीं आहेत. ज्यांची त्यांसी देणें. ह विनंति.
मोर्तब मोर्तब पो। छ. २७ सफर.
सुद. सुद. पहिली जोडी.
श्री
जोतीस्वरूपचरणीं
तत्पर जनकोजीमुत
राणोजीशींदे नीरंतर.