कोरपावली - कोरक. खा व
कोराळी - कोरकपल्ली. खा व
कोल्हाटी - क्रोष्टुवाटिका. खा इ
कोल्हापुर - कोल ( लोकनाम) - कोलकपुरं. खा म
कोल्हापूर - सह्याद्रीच्या कांहीं भागांतील पूर्वेकडे उघडणार्या खोर्यांना ज्याप्रमाणें मावळें म्हणतात, त्याप्रमाणेंच ह्या पर्वताच्या कांहीं भागांतील खोर्यांना कोल म्हणण्याची पुरातन कागदपत्रांत वहिवाट आहे. कोल्हापुराच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या खोर्यांना कोल म्हणत. ह्या कोलांतून देशांत येतांना वस्तीचा जो मोठा गांव त्याला पुरातन कालीं कोलापूर म्हणत व अर्वाचीन कालीं कोल्हापूर अथवा कोल्हापूर१ म्हणत. कोल्हा ह्या जनावराच्या नांवाशीं ह्या शहराच्या नांवाचा कांहींएक संबंध नाहीं. कोल्हापूरच्या पश्चिमेकडील खोर्यांत फार पुरातन काळीं कोल ऊर्फ कोळ लोक राहात होते, त्यावरून त्यांच्या प्रांतालाही कोळ म्हणत असत. सह्याद्री पर्वतांतील कातकरी, भिल्ल, कोळी, कातवडी वगैरे मूळच्या लोकांपैकींच हे कोल ऊर्फ कोळ होत. कोल्हापुराचें करवीर हें संस्कृत नांव सापेक्ष दृष्टीनें अलीकडील आहे असें दिसतें,
(महाराष्ट्र इतिहास मासिक, श्रावण शके १८२६)
(१ येथें कांहींतरी निराळा शब्द असावा पण मासिक छापतांना दोन्ही शब्द एकसारखेच पडले आहेत.)
कोल्हार - सं. प्रा. कोलाहलपुर. विजापूर, नगर. ( शि. ता.)
कोल्हारवाडी = सं. प्रा. कोलाहलपुर. पुणें. (शि. ता. )
कोल्हारें - सं. प्रा. कोलाहलपुर, ठाणें. ( शि. ता.)
कोल्ही - क्रोष्टु (कोल्हा) - क्रौष्टिका. खा इ
कोल्हें - क्रोष्टु (कोल्हा) - क्रौष्टुकं. २ खा इ
कोसगांव - कोश (जायफळ). खा व
कोसवण - कोश (जायफळ ). खा व
कोसुर्डें - कोश (जायफळ) - कोशपुरपद्रं. खा व
कोळगांव - कोल (लोकनाम ). खा म
कोळडी - कोल ( लोकनाम) - कोलवाटिका. खा म
काळदें - कोल (लोकनाम) - कोलपद्रं. ३ खा म
कोळपिंपरी - कोल ( लोकनाम ). खा म
कोळंबें - कोल (लोकनाम) - कोलांबिकं. खा म
कोळवद - कोल (लोकनाम). खा म कोळवन - (खांडववन पहा).
कोळोदं - कोल (कोलनाम). खा म
कौशांबी - ( पलदी पहा).