Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १५२ ]
श्री.
शके १६६३ ज्येष्ठ.
राजश्री महादेवभट गोसावी यासी.
विनंति उपरि आजि कूच करून इंडोलीवर राहिलों. येथून राणाजीचें लश्कर दोनेक कोस आहे. भेटीस आजि मुहूर्त नाहीं ; उदईक सोमवारी विसा घटका भेटी व्हावी लागते. यास्तव, पाहाटेस त्रिवर्गांस घेऊन ह्या व्याहारीदास या अलीकडे कोसीमवरी येणें. येथून हेही चालतील. सहजेंच दोन प्रहर होतील. मग तेथें जातील. कळलें पाहिजे. येथें राजश्री मल्हारबा याचा आग्रह कीं, आपले हातीं कोणतें देऊन जाणें ! ऐसियासी, आह्मांस पूर्ण भरोसा आहे. भाईजी आमचे असतां फिकीर नाहीं. परंतु, यांची समजाविसी जरूर करणें लागते. रा॥ राजामलजी व हेमराज या उभयतांचे पुत्र त्यांह्यां घेऊन येणें, ह्मणजे, दोघे पुत्र व ताम्राकडील भला माणूस येईल त्यासी, ऐसे तिघे मल्हारबाजवळीं ठेऊन समजाविसी करून येऊं. मुखे मुख्य ) गोष्टी, सवाईजी यांणीं जें राजकारण केलें, तें सिधीस न्यावें. उभय पक्षीं स्नेह करून द्यावा. तुह्मास कळावें ह्मणवून लिहिणें आहे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १५१ ]
श्री. शके १६६२ फाल्गुन शुद्ध १२.
पु॥ राजश्री महादेवभट हिंगणे गोसावी यांसिः-
सु॥ इहिदे अर्बैन मया अलफ. तुह्मांस येथून निरोप दिल्हियानंतर बहुता दिवशीं जाऊन पोहचलेस. दिवसगत बहुत लागली. बरें ! जाहलें तें जालें. सवाईनीं तुह्मांस मल्हारबाकडे रवाना केलें असेल. नसलें केलें तर उत्तम जाहालें. मल्हारबास लिहिणें तैसें लिहून पाठविलें आहे. ते उपद्रव करणार नाहींत. तुह्मी उत्तम प्रकारें सवाईजीशीं बोलून सल्वर कार्य होये ऐसें करणें. दिवस गेले, ढालढकलीवर घालून च्यार दिवस गेले ह्मणजे अगोट समीप आली. लांबणीवर गोष्ट पडते. आह्मास तो सर्वप्रकारें सवाईजींचा भरंवसा. कर्जावेगळें आह्मांस त्यांनी करावें, पातशाहापासोन जे साधेल तें साधून आह्मांस घ्यावें, आपणांपासून उत्तमप्रकारें रयात करावी, हें त्याचे वडीलपणास येसमई विहित आहे. विस्तार काय लिहिणें ? सत्वर उत्तरें घेऊन पाठवणें, बहुमानावरच मजकूर असला तर तसेंच लिहून पाठवणें. जाणिजे. छ. १० जिल्हेज, बहुत काय लिहिणें !
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२५
श्री १६७३ आश्विन वद्य ११
सदानंद तालिक
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब याणीं मौकदमानीं मौजे गोवे पा। वाई सुहूरसन इसने खमसैन मया अलफ कृष्णगिरी गोसावी मठ का। निंब याचे इनाम मौजे मजकुरी आहे त्यात बोरी व बाभळा वगैरे झाडे आहेत त्यापैकी झाडे वाळली आहेत तो विकीत आहे त्यास तुह्मी अडथळा न करणे वगैरे झाडास काडीमात्र अडथळा न करणे जाणिजे छ २४ जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १५० ]
श्री. शके १६६२ माघ वद्य ७.
पु॥ राजश्री महादेवभट्ट हिंगणे गोसावी यांसि :-
सु॥ इहिदे आर्बैन मया व अलफ. रा। वेंकाजी रामचंद्र यांचे पत्र पौष वद्य चतुर्थीचें आलें. त्यांत मजकूर लिहिला आहे कीं, राजश्री राजराजेंद्र यांणी फौजेच्या खर्चासाठी आपल्या सरकारांतून रुपये एक कक्ष, व राजश्री रावराजा यांजकडील रुपये पंचवीस हजार, व रामपुरियाच्या ऐवजीं पातशाहानजरेचा मोहरा १५२ एकशेबावन, एकून रुपये दोनहजार, व रवाना हुंडी पुणें ३१७००, येकून रामपुरियाचे रुपये ३३,७०० तेतीसहजार सातसें, ऐसा सारा ऐवज पोहोचलाच असेल. त्यास, रामपुरियाबाबत रुपये तेतीसहजार सातसे राजश्री मल्हारजी होळकर मजरा देत नाहीं, ऐवजाचा तगादा करितात. तरी राजश्री मल्हारबा यास लिहून ते तगादा न करीत ते करावे. ह्मणून राजश्री सवाईजीनें ल्याहावयास सांगितलें, त्यावरून लिहिलें असे. ह्मणून लिहिलें. ऐसियास, लक्ष रुपये कोणते ? तुह्मासमागमें हुंडी आली ते किंवा आणखी. व पंचवीस हजार रावराजियांबाबत कधी आले, व रामपुरियाबा। ऐवज कोणता आला, त्यास तुह्मी वाकीफ आहाच. कोण्हेवेळेचा कोणता ऐवज आला, रामपुरियाबाबत रुपये तीर्थरूप कैलासवासी आपा यांणी राजश्री मल्हारजी होळकर यास दिल्हे कीं न दिल्हे, हें वर्तमान तुह्मी तपसीलवार लिहून पाठवणें. x पुढें कसा विचार करतात तें लिहून पाठवणें. जाणिजे. छा २० जिलकाद.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १४९ ]
श्री. शके १६६२ पौष.
राजमान्य राजश्री रघोजी भोसले सेनाखासखेल यासी. आज्ञा केली ऐसी जेः- तुह्मी विनंति पत्र पाठविलें, तें प्रविष्ट जाहालें. कर्नाटकप्रांतीं व हिंदुस्थानांत शत्रूनें खरखशा आरंभिला, येविशींचा बंदोबस्त करावा लागतो. त्यास हिंदुस्थानांत शिंदे, होळकर, विठ्ठल शिवदेव, उमदतुलमुलुक बहादर, व नारो शंकर राजेबाहादर, अंताजी-माणकेश्वर, गोविंद बल्लाळ बुंदेले वगैरे कमाविसदार यांस, राजश्री पंतप्रधान यांणीं लेहून, बंदोबस्त करविलाच; बगालियांतील फौजेस आज्ञेप्रमाणें लेहून, झांशीप्रांती ठेवून, प्रधानपंत यांचे फौजेस सामिल होण्याविषयी लिहिलेंच आहे. कर्नाटकांत फौजे जाणार. तुह्मी बराबर मातबर फौज घेऊन येऊन सामिल व्हावें ह्मणून लिहिलें होतें. त्याचें उत्तर आपल्या प्रांतांतील बंदोबस्तास गुंतल्या आहेत, ह्मणून तपशीलें लिहिलें तें कळलें. ऐशास, तुह्मी मातबर सरदार, राज्यभाराचा बंदोबस्त राखावा, या अर्थे लिहिलें असतां तपशिलें लावून लिहिता. काय ह्मणावें ? स्वामीचे हातपाय तुह्मी. आजपर्यंत तुह्मीच राज्य रक्षिलें ; व पुढेंहि भिस्त तुह्मावरीच आहे. उचित ह्मणाल तसें कराल. जाणिजे. बहुत लिहिणें तरी तुह्मी सुज्ञ असा
पंडित मशारानिले निघोन गेले. त्यांचेंहि लिहिलें याच भावें आले. चिरंजीवांनीं तरी जाऊनं लडाईस शुरुवात केली. तुह्मी मातबर सरदार लोक.* *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२४
श्री १६७२ ज्येष्ठ वद्य १
तपोनिधी राजश्री समस्त गोसावी मठ वास्तव्य निंब यासी श्रीमत महाराज मातुश्री आईसाहेब दडवत उपरी तुह्मी पत्र पाठविले ते पाऊन लिहिले वर्तमान विदित जाहले ज्येष्ठ शुध दशमीस तपोनिधी भवानगिरी गोसावी समाधिस्त जाले ह्मणोन लिहिलें त्यास हा मृत्युलोकच आहे तुह्मी सपूर्ण शिष्यसमुदाय सनिध असता ते समाधिस्त जाले येणेकरून त्याचे सार्थकच जाले भडार्याकरिता हाली सुरजगिरी व हैबतगीर याजबराबर रुपये २५ पचवीस पाठविले असेल हे घेणे जाणिजे रा। छ १५ माहे रजब बहुत काय लिहिणे
रुजु बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १४८ ]
श्री. शके १६६२ कार्तिक वद्य १०.
राजश्रियाविराजित राजमान्य लक्ष्मण शंकर यांसिः-
प्रति महादेवभट्ट हिंगणे अशावाद उपर. राजश्री गंगाजी गोपाळ यांणीं तुमचे ऐवजी आह्मांपासीं रुपये ५३३५॥ पांच हजार तीनसें साडेपसतीस, मा। भगवंत एसाजी, पावले. हें पत्र तुह्मी चिरंजीवाचे स्वाधीन करणें. ह्मणजे तुह्मांकडून आमचा ऐवज देविला आहे त्यांत चिरंजीव मजरा देतील. मिति कार्तिक वद्य १०, शके १६६२, रौद्री संवत्सरे. हा आशीर्वाद. मु. * पुणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२३
श्री १६७१ ज्येष्ठ वद्य २
श्रीमत महाराज मातुश्री आइसाहेब याणी मोकदमानी मौजे गोवे सा। निंब प्रां। यासी आज्ञा केली ऐसी जे तपोनिधी आनदगीर गोसावी मठ सदानंद यास पाटाचे पाणी पूर्वीपासून चालत आहे येविशी तुह्मी आपला महजर करून दिल्हा आहे त्याप्रो। गोसावीमजकूर याचा पाट याचा याजकडे चालो देणे कोण्ही हिक हरकत एकदर न करणे जाणिजे छ १ जमादिलाखर सुहूरसन खमसैन मया अलफ
रुजू
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १४७ ]
श्री. शके १६६२ भाद्रपद.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री माहादेवभट्ट हिंगणे स्वामी गोसावी यांसिः--
पोप्य वासुदेव जोसी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन केलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन समाधान जाहालें. ऐसेंच निरंतर पत्र पाठवून समाधान पाववीत जाणें. वरकड सविस्तर श्रीमंतांनी लिहिलें आहे, त्यावरून कळल. तिकडील वर्तमान वरचेवरी लेहून पाठवीत जाणें. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे, हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२२
श्री १६७१ चैत्र वद्य ६
सहस्त्रायु चिरंजीव कृष्णगिरी यास प्रती तपोनिधी भवानगिरी बावा महत मठ श्री सदानद वास्तव्य का। निंब आशीर्वाद उपरी तुह्मी नरसिह भारथी याबराबरी रुपये पाठविले ते पावले रा। बाळकृष्ण भट यास रुपये ५९ एकूणसाठी देऊन कतबा फाडून टाकिला तुह्मास कळावें ह्मणोन लिहिले असे बहुत काय लिहिणें छ २० रबिलाखर चैत्र वद्य शष्टी मंगळवार हे आशीर्वाद