[ १४९ ]
श्री. शके १६६२ पौष.
राजमान्य राजश्री रघोजी भोसले सेनाखासखेल यासी. आज्ञा केली ऐसी जेः- तुह्मी विनंति पत्र पाठविलें, तें प्रविष्ट जाहालें. कर्नाटकप्रांतीं व हिंदुस्थानांत शत्रूनें खरखशा आरंभिला, येविशींचा बंदोबस्त करावा लागतो. त्यास हिंदुस्थानांत शिंदे, होळकर, विठ्ठल शिवदेव, उमदतुलमुलुक बहादर, व नारो शंकर राजेबाहादर, अंताजी-माणकेश्वर, गोविंद बल्लाळ बुंदेले वगैरे कमाविसदार यांस, राजश्री पंतप्रधान यांणीं लेहून, बंदोबस्त करविलाच; बगालियांतील फौजेस आज्ञेप्रमाणें लेहून, झांशीप्रांती ठेवून, प्रधानपंत यांचे फौजेस सामिल होण्याविषयी लिहिलेंच आहे. कर्नाटकांत फौजे जाणार. तुह्मी बराबर मातबर फौज घेऊन येऊन सामिल व्हावें ह्मणून लिहिलें होतें. त्याचें उत्तर आपल्या प्रांतांतील बंदोबस्तास गुंतल्या आहेत, ह्मणून तपशीलें लिहिलें तें कळलें. ऐशास, तुह्मी मातबर सरदार, राज्यभाराचा बंदोबस्त राखावा, या अर्थे लिहिलें असतां तपशिलें लावून लिहिता. काय ह्मणावें ? स्वामीचे हातपाय तुह्मी. आजपर्यंत तुह्मीच राज्य रक्षिलें ; व पुढेंहि भिस्त तुह्मावरीच आहे. उचित ह्मणाल तसें कराल. जाणिजे. बहुत लिहिणें तरी तुह्मी सुज्ञ असा
पंडित मशारानिले निघोन गेले. त्यांचेंहि लिहिलें याच भावें आले. चिरंजीवांनीं तरी जाऊनं लडाईस शुरुवात केली. तुह्मी मातबर सरदार लोक.* *