[ १५२ ]
श्री.
शके १६६३ ज्येष्ठ.
राजश्री महादेवभट गोसावी यासी.
विनंति उपरि आजि कूच करून इंडोलीवर राहिलों. येथून राणाजीचें लश्कर दोनेक कोस आहे. भेटीस आजि मुहूर्त नाहीं ; उदईक सोमवारी विसा घटका भेटी व्हावी लागते. यास्तव, पाहाटेस त्रिवर्गांस घेऊन ह्या व्याहारीदास या अलीकडे कोसीमवरी येणें. येथून हेही चालतील. सहजेंच दोन प्रहर होतील. मग तेथें जातील. कळलें पाहिजे. येथें राजश्री मल्हारबा याचा आग्रह कीं, आपले हातीं कोणतें देऊन जाणें ! ऐसियासी, आह्मांस पूर्ण भरोसा आहे. भाईजी आमचे असतां फिकीर नाहीं. परंतु, यांची समजाविसी जरूर करणें लागते. रा॥ राजामलजी व हेमराज या उभयतांचे पुत्र त्यांह्यां घेऊन येणें, ह्मणजे, दोघे पुत्र व ताम्राकडील भला माणूस येईल त्यासी, ऐसे तिघे मल्हारबाजवळीं ठेऊन समजाविसी करून येऊं. मुखे मुख्य ) गोष्टी, सवाईजी यांणीं जें राजकारण केलें, तें सिधीस न्यावें. उभय पक्षीं स्नेह करून द्यावा. तुह्मास कळावें ह्मणवून लिहिणें आहे. हे विनंति.