[ १५१ ]
श्री. शके १६६२ फाल्गुन शुद्ध १२.
पु॥ राजश्री महादेवभट हिंगणे गोसावी यांसिः-
सु॥ इहिदे अर्बैन मया अलफ. तुह्मांस येथून निरोप दिल्हियानंतर बहुता दिवशीं जाऊन पोहचलेस. दिवसगत बहुत लागली. बरें ! जाहलें तें जालें. सवाईनीं तुह्मांस मल्हारबाकडे रवाना केलें असेल. नसलें केलें तर उत्तम जाहालें. मल्हारबास लिहिणें तैसें लिहून पाठविलें आहे. ते उपद्रव करणार नाहींत. तुह्मी उत्तम प्रकारें सवाईजीशीं बोलून सल्वर कार्य होये ऐसें करणें. दिवस गेले, ढालढकलीवर घालून च्यार दिवस गेले ह्मणजे अगोट समीप आली. लांबणीवर गोष्ट पडते. आह्मास तो सर्वप्रकारें सवाईजींचा भरंवसा. कर्जावेगळें आह्मांस त्यांनी करावें, पातशाहापासोन जे साधेल तें साधून आह्मांस घ्यावें, आपणांपासून उत्तमप्रकारें रयात करावी, हें त्याचे वडीलपणास येसमई विहित आहे. विस्तार काय लिहिणें ? सत्वर उत्तरें घेऊन पाठवणें, बहुमानावरच मजकूर असला तर तसेंच लिहून पाठवणें. जाणिजे. छ. १० जिल्हेज, बहुत काय लिहिणें !
लेखन
सीमा.