[ १५० ]
श्री. शके १६६२ माघ वद्य ७.
पु॥ राजश्री महादेवभट्ट हिंगणे गोसावी यांसि :-
सु॥ इहिदे आर्बैन मया व अलफ. रा। वेंकाजी रामचंद्र यांचे पत्र पौष वद्य चतुर्थीचें आलें. त्यांत मजकूर लिहिला आहे कीं, राजश्री राजराजेंद्र यांणी फौजेच्या खर्चासाठी आपल्या सरकारांतून रुपये एक कक्ष, व राजश्री रावराजा यांजकडील रुपये पंचवीस हजार, व रामपुरियाच्या ऐवजीं पातशाहानजरेचा मोहरा १५२ एकशेबावन, एकून रुपये दोनहजार, व रवाना हुंडी पुणें ३१७००, येकून रामपुरियाचे रुपये ३३,७०० तेतीसहजार सातसें, ऐसा सारा ऐवज पोहोचलाच असेल. त्यास, रामपुरियाबाबत रुपये तेतीसहजार सातसे राजश्री मल्हारजी होळकर मजरा देत नाहीं, ऐवजाचा तगादा करितात. तरी राजश्री मल्हारबा यास लिहून ते तगादा न करीत ते करावे. ह्मणून राजश्री सवाईजीनें ल्याहावयास सांगितलें, त्यावरून लिहिलें असे. ह्मणून लिहिलें. ऐसियास, लक्ष रुपये कोणते ? तुह्मासमागमें हुंडी आली ते किंवा आणखी. व पंचवीस हजार रावराजियांबाबत कधी आले, व रामपुरियाबा। ऐवज कोणता आला, त्यास तुह्मी वाकीफ आहाच. कोण्हेवेळेचा कोणता ऐवज आला, रामपुरियाबाबत रुपये तीर्थरूप कैलासवासी आपा यांणी राजश्री मल्हारजी होळकर यास दिल्हे कीं न दिल्हे, हें वर्तमान तुह्मी तपसीलवार लिहून पाठवणें. x पुढें कसा विचार करतात तें लिहून पाठवणें. जाणिजे. छा २० जिलकाद.
लेखन
सीमा.