[ १४७ ]
श्री. शके १६६२ भाद्रपद.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री माहादेवभट्ट हिंगणे स्वामी गोसावी यांसिः--
पोप्य वासुदेव जोसी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन केलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन समाधान जाहालें. ऐसेंच निरंतर पत्र पाठवून समाधान पाववीत जाणें. वरकड सविस्तर श्रीमंतांनी लिहिलें आहे, त्यावरून कळल. तिकडील वर्तमान वरचेवरी लेहून पाठवीत जाणें. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे, हे विनंति.