[ ३१२ ]
श्री शके १६७६ आश्विन वद्य १३.
श्री शाहूराज-
पदांभोजभ्रमरायित
चैतसः । बिंबात्मजस्य मुद्रैषा
राघवस्य विराजते.
राजश्री दामोधर माहादेव गोसांवी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य. स्नो।
रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लिहिलें वर्तमान विदित जालें. याचप्रकारें निरंतर पत्रीं आपणाकडील साकल्यार्थ लेहून पाठवीत जाणें. यानंतर राजश्री सदाशिव हरी आले यांणी कितक आपले ममतेचा अर्थ निवेदन केला. ऐशियास प्रसंगोपात आह्माकडलि कार्यभागास तुह्मापासून अंतराय होणार नाहीं हा भरोसा आहे. प्रस्तुत राजश्री मल्हारजी होळकर यांस आह्मी आपले स्वकार्याविसींी लिहिंले आहे. तो अर्थ चित्तांत आणून कार्यभागांत चित्त पुरवून कार्यसिधी होये ते गोष्टी करणें. वरकड राजश्री सदाशिव हरी लिहितां कळो येईल. रा। छ. ११ माहे जिल्हेज. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
मोर्तब
सुद.
पौ। छ. ९ रबिलाखर.