पत्रांक ७१
श्री ( नकल.)
१६९२ आश्विन शुद्ध १३.
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे गोसावी यासीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुा इहिदे सबैन मया व अल्लफ, धरमहट्टीस बाबूराव अनंद राहून भवासगरी करितो, सेठाणें वगैरे ठाणीं त्यांणीं बळाविलीं तीं घेतलीं पाहिजेत, ह्मणोन राजश्री नारो बाबाजी याणी हुजूर लिहिलें. ऐसियास, मनोळीचें काम मातबर. तें घ्यावयाची 'आज्ञा तुह्मांकडे आहे. मनोळीस जातां सहजांत धरमहट्टी वगैरे ठाणीं जातां जातां सुटतील तर सोडवून जरीं दोन च्यार दिवस गुंता पडेसा असेल तरी आधीं मनोळीस जाऊन मनोळी घेऊन उपरान्त येतां धरमहट्टी वगैरे नारो बाबाजी सांगतील त्याप्रमाणे ठाणीं घेणे. जाणिजे, छ १२ जमादिलाखरे बहुत काय लिहिणें? लेखन सीमां.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)