लेखांक ३९२
१ १५४४ मार्गशीर्ष शुध्द १
२
आज रखतखाने राजश्री संभाजी राजे साहेबू दामदौलतहू वजानेबू कारकुनानी हाल३ अस्तकबाल व देसमुखानी देहाये परगणे पाडियापेडगौव तरफ करडे बिदानद सु॥ सलास इसरीन अलफू बो। मुदगलभट व कृस्णभट बिन बाबदेऊभट सो। पुणे-चाकण यास बदल धर्मादाऊ इनाम अजरामर्हामती बदल दान४ सूर्यग्रहण५ जमीन काळा कीर्दी चावर एक १ गज सराइनी दर सवाद मौजे बेलवडी ता। मजकूर देखील नखतयाती व चालूक ठाणे व तालूक देहाये व बाजे बाबा पायपोसी व खर्चपटी व वेठबिगारी व बाजेपटी कुल बाब कुल कानू दिधले असे बादा महसुलेसी दुमाले कीजे सदर्हू जमीन मेजून हद्दमहदूद घालुनु प्रज नेमून देउनु हुजूर खबर लिहिणे अवलाद अफलाद चालवीत जाइजे दर हर साल ताज्ये खुर्द खता उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असेली फिराउनु दीजे मोर्तब सूद
तेरीख २९ माहे मोहरमू
मोहरमू