Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

बेगवडें - वैकुट्यासीयं. कोल्हापूर. (पा. ना. )

बेंगी - सं. प्रा. बेंगी. शिरसी. ( शि. ता.)

बेगूर - वैप्रिपुरं कलघटगी. (पा. ना.)

बेगोडी - वैकुट्यासीयं. होनावर. (पा. ना.)

बेज - बीजिकं. (पा. ना.)

बेज - वैजग्धकः. नाशिक. (पा. ना.)

बेज - द्विजा (रेणुकबीज ) - द्विजा. २ खा व

बेजगांव } बीजिकं. (पा. ना.)
बेजें }

बेझें - वैजीयं. नाशिक (पा. ना.)

बेटवडें - वेटमत्. ठाणें. (पा. ना.)

बेटावत -द-वेष्टकावर्त:

बेटिऊं - वेत्रीय. कच्छ. (पा. ना.)

बेटावद - वेष्ठक (कोहळा) - वेष्टकावर्त. ३ खा व

बेडकी - बिभीतकिक. खा व

बेडशिल - वेदि - वेदिशिला. ठाणें. (पा. ना.)

बेडसें - विदिशं. मा

बेडसें - वैदिशं. ठाणें, नाशिक. (पा. ना.)

बेडिसगांव - वैदिशं. ठाणें. ( पा. ना. )

बेणवडी - वेणुकं. नगर. (पा. ना.)

बेणी - वेणुकं. रत्नागिरी. (पा. ना.)

बेबड -वोहोळ - विबद्धकं. पुणें. (पा. ना.)

बेर्डी - सं. प्रा. बध्रीरा. छिंदवाडा, श्रीगोंदें. ( शि. ता.)

बेलज - बिल्वपद्रं (बेलाच्या झाडावरून). मा

बेलदर - बिल्वदरी. खा व

बेलबारें - बिल्वद्वारकं. खा व

बेलवाहाळ - बिल्ववाहालि. खा व

बेलापुर - वेलापुरं.

बेलूर - वेलापुर. ( शि. ता.)

बेलूर } - बैल्वक. (पा. ना.)
बेलें }

बेवड बोहोळ - वीजपट ओघालि ( धान्याच्या बियाण्याची जेथें समृद्ध आहे तें गांव). मा

बेवली - वेमन्. होनावर. (पा. ना. )

बेवूर - वैमनं. बागलकोट. (पा. ना.)

बेहड - बिभितक. खा व

बेहडाणें - बिभीतकवनं. २ खा व

हकाटा [ हक्कार: । ( धातुकोश-हकार १ पहा)

हकारा [ हक्कारः } ( धातुकोश-हकार १ पहा)

हकारुनि [ आकार्य्य = हक्कारिअ = हकारुनिया ] (भा. इ. १८३२)

हगणें १ [ हद, (हग ) पुरीषोत्सर्गे ] ( ग्रंथमाला )

-२ [ अघ् १, ११ निंदायाम्. अघ् पाप करणें, चुकणें. अघनं = हगणें ] उ०- येथें आपण हगलांत म्ह० चुकलांत. ( धा. सा. श. )

हगरड [ हदिरवाटिका = हगिरवाडी = हगरड ] हगरड म्हणजे गुवामुताचा उकिरडा.

हंजा [ हृद्या (प्रिया) = हज्जा = हंजा ] नाटकांतील नायिका आपल्या सहचरीला प्राकृतांत हंजे म्हणजे प्रिये, my dear, म्हणत. संस्कृतांत हृद्ये, प्रिये, हे शब्द असत. टीकाकारांना हंजा हा शब्द हृद्या शब्दापासून निघतो, हें माहीत नव्हतें. ते हा शब्द देश्य समजत !!! देश्य म्हणजे अनिर्वचनीयअव्युत्पाद्य.

हजार [ सहस्त्र = हहझर = हजर = हजार ] हजार हा शब्द फारसींतून मराठींत आलेला नाहीं. उघड उघड सहस्त्र या संस्कृत शब्दापासून निघालेला आहे. स चा हा प्राकृतांत होतो. सें, शें, शेंभर, शंभर, लक्ष, लाख, कोटि. क्रोडि, क्रोडं वगैरे सर्व संख्यावाचक शब्द संस्कृतांतून आलेले आहेत. त्यांच्याप्रमाणें च हजर, हजार, हज्जार हा हि शब्द संस्कृतोत्पन्न आहे. (भा. इ. १८३३)

हजारी [ सहस्री = हहजरी = हजारी ] हजारी कारंजें.

हट् [ अट् = हट् (संबोधने, निपात ). अट् ( अव्ययप्रकरणम्, संबोधने ] (भा. इ. १८३३)

हटकन्, हटदिनि [ चटकर पहा]

बाहुंटें - बाहुक (माकड ) - बाहुकवंटं. खा इ

बाहें - वाहीक. सातारा. (पा. ना.)

बाहेबोरगांव - वाहीकबदरग्रामं.

बाळ अंबें - बाला. खा व

बाळद - बाला. खा व

बाळवाडी - बल्य. (पा. ना. )

बाळापुर - बाला (देवी). खा म

बाळापुरी - बाला. खा व

बाळूपूर - } बल्य. (पा. ना.)
बाळें - }
बिचुकलें - } बिसमत्. (पा. ना. )
बिचोली - }

बिजलवाडी - विज्नल (व्यक्तिनाम) - विज्जलवाटिका. खा म

बिजली - विज्जल ( व्यक्तिनाम ) - विज्जलिका. खा म

बिजोरसें - विज्जुलिकाकर्ष. खा व

बिल - भिल्लकं. २ खा म

बिलखेडें - भिल्ल ( लोकनाम ). ४ खा म

बिलधी - भिल्लधि. खा म

बिलपुर } भिल्ल ( लोकनाम ). खा म
बिलयाडी }

बिलाडी - भिल्लवाटिका. ५ खा म

बीड़ - विध = बीड.
विध शब्द व प्रत्यय देशवाचक आहे.

बीरवाडी - ब्रीहिमती. (पा. ना. )

बुकेवाडी } बुकी. (पा. ना. )
बुक्की }

बुडीगव्हाण - वृद्धिगवादनी. खा व

बुध - बुद्धकं. खा म

बुधखेडें - बुद्धखेटं. खा म

बुधगांव - बुद्धग्रामं. खा म

बुधवडी - बौद्धवाटिका (बौद्धांचें गांव). मा

बुंधाटें - बुध्र (शंकर) - बुध्रवाटं. खा म

बुधेलें - बौद्धपल्लं ( बौद्धांवरून ). मा

बुरझड - भूर्जझटी. खा व

बुराडी - भूर्जवाटिका. खा व

बुरुडकें - भृंटिका (गुंज). खा व

बेकरें - वैकर्य. ठाणें. (पा. ना. )
म. धा. ४०

सोस [ समुत्साहः = सोस ] great ardour.

सोसटणें [ सम् + उत् + सट्ट् ] ( सुसाटणें पहा)

सोसणें [ सह्] (सहणें पहा)

सोसबाडुली [ सोत्सुक = सोत्सुअ = सोस.
भावुक = भाउअ = बाहु
बाहु + ल = बाहुल. ( स्त्री ) बाहुली.
सोस + बाहुली = सोसबाहुली ( सोत्सुकभावुका ) ] कोणत्या हि पदार्थांविषयीं अत्यंत उत्सुक मुलीला हा शब्द लावितात. (भा. इ. १८३४)

सोसाटणें [ सम्+ उत् + सदृ्] ( सुसाटणें पहा)

सोस् (भावली) [ सुवस् one who wears a garment well = सोस् ] सोसभावली म्हणजे अलंकार घालून नटणारी मुलगी, स्त्री.

सोहाळ [ (नपुं.) सौहार्द= सोहाळा (पु.) सुखसोहाळा = सुखसौहार्द ] (भा. इ. १८३३)

सोहाळा [ ( संस्कृत) F. शोभालि: = सोहाळा masc (मराठी) ] ज्ञानेश्वराच्या पालखीचा सोहळा.

सोळभोक [सर्वभक्ष्यः = सोळभोक. अ = ओ ] ब्राह्मणः सर्वभक्ष्यः = सोळभोक ब्राह्मण.

सोळा १ [षडपरदशन्] (अकरा २ पहा)

-२ [श्लोक्यः = सोळा ] तूं मोठा सोळा आहेस, ठाऊक आहे, ह्या वाक्यांत सोळा म्हणजे श्लोक्यः, यशस्वी, लौकिकवान्.

सोळें [ शुक्ल = सुकल = सुअळ = सोळ (ळा-ळी-ळें), सोवळे ] सोळे वस्त्र म्हणजे शुछ वस्त्र. ( भा. इ. १८३४)

सौंदण [समुंदन = सौंदण. उन्द् to wet]

सौंदणी [ शुन्धनी (परटाचें धुण्याचें भांडें) = सौंधणी, सवंदणी. शुन्ध् to purify ]

सौंधणी [ शुन्धनी ] (सौंदणी पहा)

सौरसें [ स्वारस्येन ] ( ज्ञा. अ. ९ ट. ५८ )

सौरा [ शकुलः ] ( सउरा पहा )

Star [स्तृ (तारा) = star ] (भा. इ. १८३३)

स्तव [ स्तु आरंभणे. स्तव = आरंभ. त्यास्तव = तयास्तव = त्याला आरंभून = त्याच्या करितां. मायेस्तव = मायेला आरंभून =मायेकरतां ] (ग्रंथमाला)

स्त्रीघाण्या [ स्त्रीघ्नः ] ( घाण्या पहा)

स्मशान [ शी २ स्वप्ने. शवशयन = सवशान = स्मशान] ( धा. सा. श.)

स्वच्छउज्जळ [ स्वच्छं उज्ज्वलं = स्बच्छ उजळ ] (भा. इ. १८३४)

स्वार १ [ स्वारः ( बंधनं ) = स्वार ] चोराला स्वार करून आणिलें म्हणजे बंधन करून आणिलें. अमरे क्षीरस्वामी.

-२ [ अश्ववारः = असिवार = सिवार = स्वार ] असिवार शब्द जुन्या मराठींत आढळतो. ( स. मं.)

बाभुळदें - बर्बुर. २ खा व

बाभुळपाडें - बर्बर. खा व

बाभुळवाडी - बर्बरवाटिका. २ खा व

बाभुळवाडें - बर्बुर. खा व

बांभोरी - ब्रह्मीपुरी. २ खा व

बामडोद - ब्रह्म - ब्रह्महृदं- खा म

बामखेडें - ब्रह्मखेटं. २ खा म

बामणघर - ब्राह्मणकः ( यत्र ब्राह्मणाः आयुधजीविनः ) (पा. ना.)

बामण डोंगरी }
बामण देव } ब्राह्मणकः ( यत्र ब्राह्मणाः
बामणपुरी } आयुधजीविनः )
बामणवाडें } (पा. ना.)
बामणसई }

बामणोली - ब्राह्मणपल्ली.
माहोली, दापोली वगैरे लीकारान्त ग्रामनामें पूर्वी पल्लीआ. पल्ल्या (लहान खेडीं ) होत्या. (भा. इ. १८३२)

बारवाहाळ - द्वारवाहालि. खा नि

बारामती - वर्मती. पुणें. (पा. ना.)

बारी - द्वारिका. खा नि

बारूड - वारुवाटं. खा इ

बारेगांव - वाराहकः . शिरूर, निजाम. (पा ना.)

बार्डे - वारुवाटं. खा इ

बार्‍हें - वाराहक: . पेंठ, नाशिक. (पा. ना.)

बालधें - बाला. खा व

बालाद - बालादक. ( पा. ना. )

बालेगांव - बल्य. (पा. ना.)

बालेज - वालिकाज्यविधं. कांठेवाड. (पा. ना.)

बावडें - बाहुक (माकड) - बाहुकवाटं. खा इ

बावधन - हें गांव वांईजवळ आहे. बाव = वापी, विहर; आणि धन = धन्यः = धान्य.
विहिरीच्या पाण्यावर जेथें प्रायः धान्य पिकतें तें. (सरस्वतीमंदिर)

बावळें - बाहुक (माकड) बाहुकपल्लं. ३ खा इ

बासोळ - व्यास (व्यक्तिनाम) - व्यासपल्लं. खा म

बाहादरवाडी - भद्र (हत्ती) - भाद्रवाटिका. खा इ

बाहाळ - बाहुक (माकड) - बाहुकपल्लं. खा इ

बाहुटें - बाहुक (माकड ) - बाहुकवाटं. खा इ

सोयरा [ स्वयंवरः = सोयरा ]
बायकोचा सोयरा म्हणजे स्वयंवर:, जार.
सोदर पासून निघालेला सोयरा म्हणजे संबंधी.
नवरा छिनाल बायकोवर रागावून सोयरा पहा म्हणून म्हणतो, तेथें सोयरा या शब्दाचा अर्थ स्वयंवरः असा आहे.

सोयरा-री-रें [ सोदरक = सोअरअ = सोयरा-री-रें] (स. मं.)

सोयरीक [ स्वयंवरकता = सोयरीक ] सोयरीक म्हणजे नवरा किंवा नवरी पाहिलेलें स्थळ. ह्या सोयरीक शब्दाचा संबंध सोदर शब्दाशीं बिलकुल नाहीं.

सोयेर १ [ सूतिकागृहं = सोयेर ]

-२ [ सौदर्य = सोएर = सोयेर ] (स. मं. )

सोर, सोरू, सोरूं [ सूकर = सोर (डुकर) सूकरकं = सेरू, सोरूं ( लहान डुकर) ]

सोलणें [ लू ९ छेदने. सुलूः (सुष्ठु लुनाति) (सोलणारा) सुलवनं = सोलणें ] चांगलें कापणें. ( धा. सा. श. )

सोलाणा, सोलाणें [ सुलुधान्यम्] ( धातुकोश-सोल २ पहा)

सोलींव [ शल्किम = सोलींव ]

सोले [ सुलुः = सोले] (डोळ पहा)

सोंवळ [ सुमृदुल = सोंवळ ] tender, soft, delicate.

सोवळें १ [ क्षौम ( silken) + ल ( स्वार्थक) = सोंवळें) सोवळें is a cloth made of silk. सोवळें याचा अर्थ रेशमी वस्त्र. या पलीकडे कांहीं नाहीं.

-२ [ क्षौमदुकूलं = सोंवळे. औमदुकूलं = ओंवळें ] क्षौम (रेशमी) व औम (ताग, सण यांचें).

-३ [ प्राकृत ओलं शब्दाचें मराठी ओलें हें रूप आहे. संस्कृत शुष्क शब्दाचें प्राकृत सुअ होतें. सुअ + ओल्लं = सुओल्लं = सोअल्लं = सोवळें = शुष्कोल्लं. ओल्याचें वाळलेलें तें सोवळे. तसेंच अव + ओल्लं = अवोल्लं = ओवळें, ओलं नाहीं तें ओवळें. कोरडें वस्त्र ओलें करून वाळवलें म्हणजे सोवळे होतें आणि ओलें होण्याच्या अगोदर तें ओवळें असतें. ] ( सरस्वतीमंदिर श्रावण शके १८२६)

सोवेरी [ सुपर्वा (बांवू) ] (ज्ञा. अ. ९ पृ. ८५)

सोशीक १ [ चीक् १ सहने अभ्यास चेचीक ] (धातुकोश-सोस २ पहा)

-२ [ शीक् १ आमर्षणे यड्लुगन्त शिशीक् ] (धातुकोश-सोस ३ पहा)

सोन्या १ [ सूनु ] (सोनकुल्या पहा )

-२ [ सुजन = सोन्या ] माझ्या सोन्या my goodman -३ [ सृनुकः (dimunitive)= सोन्या ] माझ्या सोन्या असें करुं नको = my son, don't do so.

सोन्यासारखी वेळ [सवनं = सोनें ] सवन म्हणजे यज्ञ, यज्ञिय स्नान, सोन्यासारखी वेळ म्हणजे यज्ञिय स्नान करण्यासारखी शुभ वेला.

सोपा (पा-पी-पें ) [ (सु+ उपाय) सूपाय = सोपा (पा-पी-पें ). ( सु + आप्यं) स्वाप्यं = सोप (पा- पी-पें) ] सुलभ आहे उपाय ज्याला तें सूपाय किंवा सुखानें लभ्य तें स्वाप्य. ( भा. इ. १८३६)

सोपट १ [ शुल्ब + टं = सोपट ] सोपट म्हणजे केळीनारळीच्या पानाच्या देठाची चिरफळी.

-२ [ शुष्कपत्रं = सोअपट्ट = सोपट ] पोर अगदीं वाळून सोपष्ट झाला. केळीचें सोपट.
केळीच्या किंवा नारळीच्या सुकलेल्या पानाच्या देठाला सोपट म्हणतात.

सोंपणें [ समर्पणं = सोप्पणं = सोंपणें ] (भा. इ.१८३२)

सोपारें [ सूपायतरं] ( ज्ञा. अ. ९ पृ. ३७ )

सोबत १ [ सहभवत्] ( सोभत पहा )

-२ [ सहवर्ति = सोबती, सोबत ]

-३ ( सहवृत् = सोबत ] accompanying.

सोबती [वृत् १ वर्तने. सहवर्ति = सउवत्ति = सोबती ] ( धा. सा. श.)

सोभत [ सहभवत् = सोबत, सोभत ] one who accompany, free company.

सोमट [ सोप्मन् = सोह्य = सोम, सोष्मिष्ट = सोह्मिट्ट = सोमिट = सोमट ] सोमट म्हणजे बरेंच उष्ण, अति उष्ण नव्हे तें कवोष्ण = कोमट, म्हणजे थोडें उष्ण. (भा. इ. १८३३)

सोमळ [ सुकुमार = सुउमाल = सोमाल = सोमळ ] किंचित् उष्ण. (ग्रंथमाला)

सोय १ [ सुगति = सुअइ = सोई = सोय ] (ग्रंथमाला)

-२ [ समता, समिति likeness = सोई, सोय ] likeness.

-३ [ समय prosperity = सोय ] prosperity.
उ०- कुबेरु आथिला होए । परि तो नेणे चि माझी सोये ।
संपत्ति मासीं नोहे । श्रीनिवासु । ज्ञा. १६-३५५
परि तो नेणें चि माझी सोय he has no idea of my prosperity. माझ्या धनाढ्यतेची त्याला कल्पना नाही.

-४ [ समय engagement, contract = सोय ] आधी माझी सोय लावा first fulfil my engagement. म. धा. २७

बहिरवली - } बाधिरक. पा ना.
बहिराणें -

बहिराणें - भैरववनं. खा म

बहिरेवाडी - बाधिरक. पा. ना.

बहुरूपें - बहुरूप ( लोकना, जातिनाम ) - बहुरूहकं. खा म

बहुल - बहुल. पा. ना.

बहुला - बहुला. खा न

बहुली } बहुल. पा. ना.
बहुलें }

बळवड - बला. खा व

बळसाणें - बलस. पा. ना.

बळसें - बलक. पा. ना.

बागलाण - व्याघ्रारण्य = बागरारण = बागलालण = बागलाण. वाघ आहेत फार ज्या
अरण्यांत तें व्याघ्रारण्य ऊर्फ बागलाण. हा प्रदेश सध्यां हि रानमय आहे. (भा. इ. १८३६)

बाणपुर - बाण (व्यक्तिनाम ). खा म

बात्सर - वात्स्य (शूद्री ब्राह्मणसंतति, जातिनाम न्हावी) - वात्स्यपुर. खा म

बादरडें - बादरवाटं. खा व

बादर्के - बदरिका. खा व

बादामी - सं. प्रा. वातापी. विजापूर. (शि. ता. )

बादें - व्याध - व्याधकं. खा म

बापटी - वप्पीह ( चातक) - वप्पीहवाटिका. खा इ

बापखेडें - वप्पाह (चातक) - वप्पीह खेटं. खा इ

बाबरधाट - बर्बर - महाराष्ट्रीय बर्बर, वर्वर (पा. ना.)

बांबरडे - बंभरवाटं. खा इ

बाबरमाची - बर्बर - महाराष्ट्रीय बर्बर, वर्वर. (पा. ना.)

बांबरूड - बंभरवाटं. ४ खा इ

बाबर्डी - बर्बर - महाराष्ट्रीय बर्बर, वर्वर. (पा. ना.)

बाबुर्डी - बाभ्रव्यक. (पा. ना.)

बाबा कुवर - भगवान् कुमारः खा प

बाव्रें - बाभ्रव्यक. (पा. ना.)

बांभुर्लें - बंभरपल्लं. खा इ

बाभुळखेडें - } बर्बुर. खा व
बाभुळगाव }

सोडणें १ [ छोरणं ( त्यागणें ) = सोडणँ-णें. जसें छुरि = सुरि ] (भा. इ. १८३३)

-२ [ छोटनं = सोडणें. छोटनं मोचनं ]

सोडचिट्टी [ सहोड (मुद्देमालासह) = सोड ] सोडचिट्टी म्हणजे मुद्देमालासह दिलेलें पत्र.

सोडमुंज [ समूढमौंजी = सोडमुंज (मुंज that is brought to a successful finish, arrangement.

सोद १ [ शुध]

-२ [ स्वद (सुष्ठु अत्ति ) = सोद (दा-दी-दें) चांगलें खाणार ( रा-री-रें ). सोदी जीभ म्हणजे चांगलें मिष्टान्न खाण्याला सवकलेली जीभ. श्राद्धांत, स्वदितं? असा प्रश्न श्राद्ध देवांना, करतात. ( भा. इ. १८३४)

सोंद [ शुध् ]

सोदा १ [ चोद: = सोदा ] paramour.

-२ [ शोघ्यः (आरोपी ) = सोदा ] शोघ्या स्त्रीः = सोदी बायको (दुष्टारोप आलेली बायको )

-३ [ शूद्रक = सूदअ = सोदा ] अरे सोद्या, म्हणून लहान मुलांना म्हणतात. शूद्रक म्हणजे लुच्चा शूद्र. (भा. इ. १८३४)

सोध, सोंध [शुध्]

सोनकुला, सोनकुली, सोनकुल्या, सोनुकल्या [( vaidik ) सूनु son or daughter ]

सोनकुल्या [ सूनु = सोन + कुल्या = सोनकुल्या, सोनी ( मुलगी ), सोन्या ( मुलगा) ] (स. मं.)

सोनी १ [ सूनु] ( सोनकुल्या पहा )

-२ [ सुतन्वी ] ( सोनू पहा )

सोनुकल्या [सूनु ] ( सोनकुला पहा )

सोनू [ सुतनु = सोनू. सुतन्वी = सोनी ]

सोनें १ [ स्योन ( happiness, good ) = सोनें म्हणजे चांगलें ] स्योन हा शब्द वेदांत फार येतो. तिचें सोनें झालें.

-२ [ सवनं = सोनें. सू. १ ऐश्वर्ये ] तिचें सोनें झालें म्हणजे यज्ञीय आहुति झाली, मंगल परिणाम झाला.
सुवर्णाशीं कांहींएक संबंध नाहीं.

-३ [ शोभनं = सोण्हं = सोनें ] तिचें सोनें झालें = तस्या: शोभन भूतं.
तदा सोण्हं भवे (मालविकाग्निमित्रं, प्रथमोंक: ) सोनें या धातूशीं येथें कांहीं एक संबंध नाहीं.

सैरीण [ स्वैरिण = सैरिणी = सेरीण ] ह्या नांवाचीं गाणीं ज्ञानेश्वर-एकनाथादिकांचीं आहेत. (भा. इ. १८३३)

सैल [ चिल्ल् सैल होणें = सैल ] शिथिल पासून हि सैल शब्द निघतो. चिल्लपट्ट = शेळपट (अजागळ, चापून चोपून धोतरवस्त्रें न नेसणारा). ( धा. सा. श.)

सैंवर [ स्वयं = सयं. स्वयंवर = सयंवर = सैंवर ]

सोइ [ श्रुति = सुइ = सोइ ( श्रौति ) आधार ] सोई [ समता, समिति ] (सोय २ पहा)

सोईचें [ समयोचित suited to the occasion, timely = सोईचें ]

सोकटी [ सहकंठिका = सोकटी ] मानेची सोकटी म्हणजे कंठाचें पुढें येणारें शंक्वाकृति हाड.

सोकावणें [ सक्त=सक्क = सोक = (क्रियापद) सोकावणें ] सोकावणें म्हणजे सक्त होणें. (भा. इ. १८३६)

सोक्षमोक्ष [ संमोक्षः मोक्षः = complete emancipation or simple emancipation, संमोक्ष complete freedom ]

सोख [ शोष = सोख, शरीरशोष = शरीरसोख ] पाण्याचा सोख म्हणजे पाण्याचा शोष. (भा. इ. १८३४)

सोंग [ स्वंगा = सोंग ( लक्षणेनें कुरूप स्त्री ). शोभनं अंगं यस्याः सा स्वांगा ] (भा. इ. १८३४)

सोगभोग [ सौभाग्यभंग: = सोहागभंग = सोआगभग = सोगभोग. अ चा ओ ] (भा. इ. १८३६)

सोंगळ १ [सुमंगल = सुवंगळ = सुओंंगळ = सोंगळ ] (भा. इ. १८३७)

-२ [ स्वंगुलिः ( well-firgured ) = सोंगळ ]

सोजी [ सूद्या = सोजी ] एक प्रकारचा शिजवलेला भात. सूद् शिजविणें. (भा. इ. १८३७)

सोट १ [ शौट् १ गर्वे. शौटः = सोट ] सोट म्हणजे गर्विष्ट माणूस.

-२ [ शोठ = सोट (सोटभैरव), सोट्या ] सोट म्हणजे आळशी, लुच्चा माणूस. (भा. इ. १८३३)

सोटभैरव [ स्वस्ति भैरवाय = सोठ्ठिबहिरवाअ = सोटबहिरव = सोटभैरव)] सध्यां हा शब्द दुर्वचन झाला आहे. ( भा. इ. १८३२ )

सोट्या [शोठ] (सोट २ पहा )