पत्रांक २७६
श्री. १७०५ माघ शुद्ध १३
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेय याजी स्वामीचे सेवेशीः--
विद्यार्थी बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें, विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें.
लिहिला मजकूर सर्व कळला. मकरसंक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाटविलें ते पावले. स्वीकारले. फडतरे याजकडील ऐवजाविशींचा मजकूर लिहिला तो कळला. त्यांस, येविशीं फडतरे यास ताकीद करून ऐवज देविला जाईल. रा। छ १२ रौवल. लोभ असों द्यावा. हे विनंति.
पौ। फाल्गुन शु।। ६ शके १७०५