Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
हिरमोड [ मुट् १० संचूर्णने. हृन्मोटनं, हृन्मोट: = हिरमोड. हृदयमोट: = हिरमोड ] हिरमोड म्हणजे हृदय, हिय्या मोडणें. ( धा. सा. श. )
हिरवें चार [ हरित् शारं = हिरवें चार, शार म्हणजे चित्रवर्ण ] हिरवें चार म्हणजे हरिद्वर्ण व चित्रवर्ण. शार म्हणजे green coloured. (भा. इ. १८३६)
हिरसांड [स्यद् १ प्रस्रवणे. हृत्स्यंदः = हिरसांड ] ( धा. सा. श. )
हिरीरी [ ईर् गतौ, कंपने. (द्विरुक्ति ) ईरि + ईरि: - ईरीरीः = हिरीरी ] हिंवानें अंशांत हिरीरी भरली म्हणजे अतिशय कंप सुटला ( धा. सा. श. )
हिरवट् [ ईर्म + टः = हिर्वट, हिरवट्] ईर्म म्हणजे क्षुब्ध. तो माणूस हिरवट आहे म्हणजे क्षुब्ध, क्रोधिष्ट आहे.
हिंव्या [ हिम्यः = हिंव्या ] हींव ज्याला येतें तो. ( भा. इ. १८३४)
हिश्श [ धिष् ( शब्दे ) = हिश्श ]
हिसकणें [हिष्कनं (हिंसा ) = हिसकणें, हिसका इ० ] ( भा. इ. १८३७)
ही [ अपि ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ७ )
हुकी [ उत् + कै ] ( धातुकोश-हुकाव ४ पहा)
हुचकणें [ उत्खननं ] ( उचकणें पहा)
हुचकून [ उच्चक् पहाणें ] (उचकून पहा)
हुच्चा १ [ हुर्च्छकः = हुच्चा. हुर्च्छ् कौटिल्ये ] कुटिल, लुच्चा.
-२ [ हुर्छा (कौटिल्ये ) हुर्छे: सनो लुक् छलोप श्च (उणादि २५७) हुर्छ = हुच्च (चा-ची-चें) ] (भा. इ. १८३३)
हुडकी [ अच् १ गतौ. उदंचिका, उदंकिका = उडकी, हुडकी ] (उडकी पहा)
हुडा १ [ हुडः (a bulwark a tuwer) = हुडा ] बुरूज.
-२ [ उत् + हा to raise up उद्धः tower = हुडा ] बुरूज, tower.
हुंडा, हुंडी [ हुडि स्वीकारे. हुंडति. ] हुंडा = वराकडील लोकांनीं स्वीकारलेलें द्रव्य. ( ग्रंथमाला )
हुडुत् ! १ [ हुडुत् a noite (sound) of threat]
-२ [ (सं.) हुडुत् म्हणजे बैल. अन्+ हुडत् = अन्+ उडुत् = अनुडुत् (किंचित् न्यून ऊन असा हुडुत्) ] ( भा. इ. १८३४)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
हालहाल [ हलहला ! हालहाल ] दुःखातिशय.
हावँ ! [ हवा ! (खरोखर) = हावँ ] ती हावँ सोदी आहे, येथें हावँ हें अव्यय खरोखर या अर्थ योजिलेलें आहे.
हावभरी [ आत्मंभरिता ] (धातुकोश-हावर २ पहा)
हावभाव [ हावभाव = हावभाव ] ( स. मं. )
हावरा १ [ आत्मंभर: ] ( धातुकोश-हावर २ पहा)
-२ [ हवृ १ कौटिल्ये. हवर = हावरा. हवरि = हूरि = हूलि = हूल ( खोटी बातमी ) ] ( धा. सा. श. )
हांवरा [ हावभरित } भावभरित } = हांवभरा = हांवरा.
हावहाव [ हू ३ अदने. हावहाव (द्विरुक्तीनें ) हावहाव] पोरें हावहाव करितात म्ह० खाण्याची इच्छा करितात. ( धा. सा. श. )
हांसळी [ हंसक (पायांतला अलंकार) हंसक + ली (स्वार्थक) = हांसळी ] गळ्यांतली, पायांतली हांसळी.
हां हां ( म्हणतां ) [ अम् quickly द्वित्व = हां हां] very quickly
हां हां म्हणतां गेला went away very quickly.
हि - ते हि जातात ह्या वाक्यांतील हि चार्थक आहे. ते च गच्छन्ति ह्या संस्कृत वाक्याचें वैदिक भाषेंत ते ईं गछन्ति असें होतें. इमित्यव्ययं चार्थे ( मा. वा. सं. महीधर, वेददीप २५-३५ ). ईं + महाप्राण = हीं. महाप्राणन करण्याचा मराठीचा स्वभाव आहे. तात्पर्य हा हि, हीं वैदिक ईमपासून निघालेलीं समजणें युक्त आहे. अपि पासून भि, बि, वी निघाला आहे. (भा. इ. १८३३)
हिंग [इंगुः (रोग) = हिंग ] हिंग हगतो आहे. म्हणजे रोग हगतो आहे.
हिंडगा [ हिंडक: = हिंडगा ]
हिणावतो [ हृणीययते = हिणावतो ] लज्जायुक्त करितो. (भा. इ. १८३२)
हितगुज [ गुह्य = गुज्झ = गुज्ज = गुज ] (ग्रंथमाला)
हिरमुसणें १ [ मूर्च्छ् १ मोहसमुछ्राययोः ह्रीमूर्च्छनं = हिरमुसणें ] लज्जेनें व्यास होऊन जाणें. (धा. सा. श.)
-२ [ हृ (२nd conj. ) to be ashamed + मुष् = हिरमुसणें ) to be cast down through shame.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
हातुल्यो [ हत्थुल्लो (हस्त, हात ) ] कित्येक खेळांत अटींतून सुटावयाचें असलें, म्हणजे पोरी किंवा पोरें हा शब्द उच्चारतात. हा शब्द प्राकृत आहे. थुल्ल्यो, असें हि रूप आढळतें. (भा इ. १८३२ )
हातोटा, हातोटी [हातोडा पहा ]
हातोडा [ हस्त ११. हस्तपट्ट = हातवडा = हातोडा. हस्तपट्ट = हातवटा = हातोटा. हस्तवृत्तिः = हातवटी = हातोटी ] ( धा. सा. श. )
हात् तिच्या वहिन ! [ (सं.) हा धिग् हा धिग् च भगिनि ! ( प्रा.) हध्धी हध्धी च बहिणि ! = (म.) हात्तिच
बहिन ! = हात् तिच्या बहिन ! ] वस्तुतः ह्या अपभ्रंशांत अपशब्दाचा लेशहि नाहीं. (ग्रंथमाला)
हादरणें [ ह्राद् १ अव्यक्ते शब्दे ] जमीन हादरली. ( धा. सा. श. )
हांदोळ [आंदोल्]
हापटणें [ आपाटनं = हापटणें, आपटणें ] (भा. इ. १८३६)
हामरी तुमरी वर ये [ अहं रे त्वं रे ] (हमरीतुमरी पहा)
हामीहामी [ अहमहमिका = हामीहामी ] तो हामीहामी करीत आला. मयूरव्यंसकदिगणांत हा शब्द आहे.
हाय १ [ हय् १ गतौ. हाय = हाय ] क्षीण होणें, थकणें एतदर्थक अव्यय. (धा. सा. श.)
-२ [ आक्रायः ( अग्नि ) = हाय ] अग्नि. मुलांना विस्तव दाखवितांना हा शब्द योजतात.
-३ [ हर्य् १ गतिकान्योः. हर्या = हाय ] हाय घेणें, खाणें, धमकीनें भयभीत होणें. ( धा. सा. श. )
हायचा (चा-ची-चें) [ इहत्य = हैच्च = हायच (चा-ची-चें)] हा शब्द गांवढे सध्यां योजतात. हायचा म्हणजे इथचा. (भा. इ. १८३४)
हाँयचा १ [ इहत्यः = हैंचा, हाँयचा ] एथचा.
-२ [ ह्यस्त्यः ] (हैंचा पहा)
हार १ [ हरिः = हार (स्त्री). हृ १ हरणे ] द्यूतांत पराजय.
-२ [( आहार) आहृति = हरि, हार (स्त्रीलिंगी) ओळ, रांगा. (भा. इ. १८३६)
-३ [ हारिः (प्रवाशांचा तांडा, ओळ) = हार (स्त्री.)]
हारा [ हार: (हमालाची पांटी) = हारा]
स्थलनामव्युत्पत्तिकोश
भवाळी - भर्व (शिव ) - भर्वपल्ली. २ खा म
भाकरदें - भाःकर (सूर्य) - भा:करपद्रं. ,,
भांकुरडें - भाःकर (सूर्य) - भाःकरवाटं. ,,
भागडें - } भागा (नदीनाम). V) ,,
भागदर }
भागदर - भागादरः. खा नि
भागपुर - भागा (नदीनाम) - भागापुर. ,,
भागपुर - } ( भागा नदीनाम). खा म
भागरें }
भागासरी - भागा (नदीनाम) - भागासरी. खा म
भागसी - भागा (नदीनाम ) - भागकर्षा. खा म
भागापुर - भागा (नदीनाम) ,,
भाजगांव - मृत्यग्रामं. ,,
भाजें - मृत्य (ग्रामं ). मा
भाटखेडें - भट्ट (भाट) - २ खा म
भाटवी - भट्ट (भाट). ,,
भाटोडें - भट्टपद्रं = भाटोडें.
भाटोड्यास राहणारे भाटोडेकर. (भा. इ. १८३६)
भाडणें - भड, भंड (जातिनाम ) - भडवनं. खा म
भांडणें - भड, भंड (जातिनाम) - भडवनं. २ खा म
भांडणें - बंधुकी. (पा. ना.)
भाडपुरी - भट्ट (भाट). खा म
भांडवली - }
भांडुगणी - } बंधुकी. (पा. ना.)
भांडूप - }
भाणें - भाजनं. खा नि
भाणें - भानु - भानवं. २ खा म
भातखेडें - भातु (सूर्य) - भानुखेटं. ,,
भातघोट - भातु (सूर्य) - भातुघुप्ट्रं (सूर्यरथ). २ खा म
भादली - भद्र, भद्रा. ४ खा व
भादवड - भद्र, भद्रा. २ खा व
भादवण - भद्रावनं. ,,
भादें - भद्र, भद्रा. ,,
भानवली - भानु - भानुपल्ली. खा म
भांवडें - भंभ (माशी ) - भंभवाटं. खा इ
भाववडी - बाहुवर्त. (पा. ना.)
भांबुर्डे - बंभरवाट = भंवरवाड = भांबरवाड = भांबरट = भांबुरड = भांबुर्डे. (ग्रंथमाला)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
हाडोरा [ अस्थिहरः = हाडोरा ] गुरांचीं हाडें नेण्याचा हक्क.
हाड् हाड् [ हा धिक् हा धिक् = हद्धी हद्धी = हाडि हाडि = हाड हाड ]
हाणमार [ हानिः मारिः = हणमार ]
हात १ [ हस्त = हात ] (स. मं. )
-२ [ हात्रं (वेतन, मजुरी) = हात ] हात राखून खर्च करणें म्हणजे मजुरीच्या पैशांतून बचत करून खर्च करणें. हात ह्या अवयवाशीं कांहीं एक संबंध नाहीं.
हातघाई १ [ हस्तग्राहिका (हात पकडणें) = हातघाई] तो हातघाई वर आला म्हणजे हात धरण्यापर्यंत आला.
-२ [ हस्तघातिः = हातघाई. हन् to strike ] हातघाईला येऊं नको = हातानें मारामारी वर येऊं नको.
-३ [ हस्तघातिः = हातघाई ] हातघाईची लढाई म्हणजे हातानें मारण्याची लढाई.
हातघाईं [ हस्तग्राहं = हातघाय (हातघायीं सप्तमी ) ]
हातचें [ हस्त्यं = हातचें ] हस्तेन कार्यं हस्त्यं.
एतन्मद्धस्त्यं = हें माझ्या हातचें.
हातधरणे [ हस्तधारणं = हात धरणें ]
हस्तधारणं वधोद्यतनिवारणस्य । अमरः ॥
त्याचा हात कोण धरील = तस्य हस्तधारणं कः कुर्यात् ।
हातपाय [ हस्तपादं = हातपाय ] हातापायाला तूप लाव, या वाक्यांत हातपाय हा समाहारद्वंद्व असून एकवचनी आहे. द्वंद्वैकत्वम् (लिंगानुशासन).
हाँतर ! [ अंतर् (अनुमत्यर्थक अव्यय) = हाँतर ! ( अव्यय ) ] (भा. इ. १८३६)
हातलग [ हस्तलग्न = हातलग ] हस्तलग्नानि बदरीफलानि = हातलग बोरें.
हातवटा [ हस्तपट्टः = हातवटा, हातोटा. हस्तवृत्तिः = हातवटी, हातोटी ]
हातवटी [ हस्तपाटवं, हस्तपटुता ] (ज्ञा. अ. ९ पृ. २५.)
हाताइत [ हस्तायत्त = हाताइत ] placed in the hands.
उ०-अनादि जे मुक्तता । आपुली जे पांडुसुता ।
तो मोक्षु हाताइता । होये जेणें ॥ ज्ञा. १४-४८
हाताडणें, हाताळणें [ हस्त ११. हस्तादान = हत्थाडान = हाताडणें, हाताळणें ] ( धा. सा. श. )
हातिरूं [ हस्तितर ] ( रूं पहा)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
हला ! [ हा निपात प्राकृतांत स्त्रियाम् आहे. वैदिक निपात भल (आकार, आव्हान) = भल = हल (पु.), हला (स्त्री.)] (भा. इ. १८३२ )
हल्या [ हालिक = हालिअ = हल्या ] गांवढळ मनुष्य. (ग्रंथमाला)
हव्यास [शी २ स्वप्रे. भव्याशय = हव्यासअ = हव्यास ] भव्य म्हणजे शुभ व आशय म्हणजे वासना. हव्यास म्हणजे शुभ मिळविण्याची उत्कट आशा.
हसतो बिसतो [ हसति विहसति म्हणजे हसतो व थट्टा करतो ] ( भा. इ. १८३४)
हसर ( रा-री-रें) [ हस्त्र = हसर (रा-री-रें) ]
हसें [ हस् १ हसने. हसितं = हसें ]
हह करणें [ घघ्र हसने. घग = हह ] (ग्रंथमाला)
हळद्या (रंग) [ हरिद्राभः = हळद्या]
हळवें ( भात) [ लघीयस् = हळवें ] तयार होण्याला थोडा काळ लागणारें भात. (भा. इ. १८३४)
हळहळ, हळाळ [ हल् १ विलेखने. हलहलिका हळहळ, हळाळ ] ( धा. सा. श. )
हळू [ लघु = हलु = हळू ] ( भा. इ. १८३२)
हळुवार [ लघुतर = हलुअर = हळुवर = हळुवार ] (भा. इ. १८३२ )
हाँ [ ह ( वैदिक ) = ( अकच्क) = हक = हअ = हा = हाँ ( अव्यय ) ]
तो आला हाँ = स आयातः ह.
त्वं ह तत्र गच्छ = तूं हाँ तेथें जा.
त्र्व तत्र ह गच्छ = तूं तेथें हाँ जा.
त्वं तत्र गच्छ ह = तूं तेथें जा हॉ. (भा. इ. १८३४)
हांक १ [ ( वैदिक ) आ + कै कायति to implore नाम आका = हांक ] imploration, prayer.
देव माझ्या हांकेस धावला.
देवानें माझी हांक ऐकिली.
-२ [ आका ] (हांक १ पहा)
हाकाटा [ अहा ! कटा ! = हाकाटा ] ओरड, भयाची आरोळी ठोकणें. हाकाटणें. ( धा. सा. श.)
हाड १ [ अस्थि = हड्डि = हाड ] ( स. मं. )
-२ [ हार्द love, affection = हाड ) love, affection, kindliness. त्याच्या जिभेला हाड नाहीं his toungue has no kindness.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
भटाणें - भट्ट (भाट). खा म
भडगांव - भट्ट (भाट). ,,
भडणें - भट्ट (भाट). ५ ,,
भडणें - भट्ट (भाट). ,,
भडवली - भटपल्ली (शूर योध्द्यांवरून). मा
भडाणें - भट्ट (भाट). खा म
भंडारकवठें - सं. प्रा. भंडारगविट्टगे (भांडागारकपित्थकं). (शि. ता.)
भंडारी - भांडागार - भांडागारिका. २ खा नि
भडोच - भरुकच्छ, कच्छ हे शब्द अष्टाध्यायींत येतात.
कच्छाग्निदक्त्र वर्त्तोत्तर पदात् ( ४-२-१२६). कच्छादिभ्यश्च (४-२-१३३). कच्छ म्हणजे कांठचा प्रदेश; आणि भरु म्हणजे पाणथळ प्रदेश, दलदल, समुद्र तेव्हां
( १) भरुकच्छ = समुद्रकांठचा प्रदेश.
भरुकच्छ,= भडुअछ्छ = भडुच्च = भडूच = भडोच = भरूच.
सिंधुकच्छ, नदीकच्छ, पर्वतकच्छ वगैरे शब्द पहा.
(२) पद्र म्हणजे खेडें, गांव. भरुपद्र = समुद्रकांठचा, दलदलींतला गांव. भरुपद्र = भडुअद्र = भडूद्र = बडूद्र = बडोद्र + ( क + अ ) = बडोद्रा (गुजराथी ) = बडोदें (मराठी ), बडोदा.
वटोदर ही व्युत्पति निराधार आहे.
( ३) पद्रक = पद्रा = पाद्रा.
(४) कच्छमंडपिका = कच्छमांडबी. (भा.इ. १८३२)
भडोली - भट्ट (भाट). खा म
भदाणें - भद्र, भद्रा. खा व
भरड - भारंड (पक्षिविशेष) - भारंडकं. खा इ
भरडुच - भारंड (पक्षिविशेष) भारंडीयं. ,,
भरडू - भारंड (पक्षिविशेष) - भारंडद्रु. ,,
भराडी - भारंड (पक्षिविशेष) - भारंडिका. ,,
भराडी - भारंड (पक्षिविशेष) - भारुंडवाडी. ,,
भर्वस - भर्व (शिव) - भर्वकर्ष. खा म
भर्वाडें - भर्व (शिव) - भर्ववाटं. ,,
भंवर - भ्रमरकं. ३ खा इ
भंवरखेडें - भ्रमरखेटं. ,,
भंवरटेंक - भ्रमरत्रिकं. ,,
भंवरदर - भ्रमरदर:. ,,
भंवरें - भ्रमरकं. ,,
भवाडें - भर्य (शिव) - भर्ववाटं. खा म
भवाळ - भर्व (शिव) - भर्वपल्लं. ,,
स्थलनामव्युत्पत्तिकोश
बोरमळी - बदरमलय: खा व
बोरली - बदररपल्ली. २ ,,
बोरवली - बदरपल्ली (झाडावरून). मा
बोरवाडी - बदर खा व
बोरवाण - बदरवाहनं. ,,
बोरविहीर - बदरविवरं. २ ,,
बोरसुलें - बदरशूलं. ,,
बोरावल - बदरावलि. खा व
बोराळें - बदर. ३ ,,
बोरी - बदर - बदरिका. ,,
बोरी - बदरिका. खा न
बोरीकुवा - बदरीकुंब:. २ खा व
बोरीचिंची - बदरिकाचिचकाध् ,,
बोरीस - बदरिकाकर्ष. ,,
बोर्हाटें - बदरवाटं. खा व
बोबापुर - भगवत् - भगवत्पुरं. खा म
बोळठाण - बोलकस्थानं. खा म
बोळें - बोलकं. खा व
बौर - भगुर = बउर = बौर. (भा. इ. १८३७)
ब्राह्मणगांव - ब्रह्मी. खा व
ब्राह्मणगांव - ब्राह्मणक: (यत्र ब्राह्मणा: आयुधजीविन:) (पा. ना.)
ब्राह्मणपुर - ब्रह्मी. खा व
ब्राह्मणपुरी - } ब्राह्मणक: (यत्र ब्राह्मणा: आयुधजीविन).
ब्राह्मणवाडें - } (पा. ना.)
ब्राह्मणवेल - } ब्रह्मी. खा व
ब्राह्मणशेवगें - }
ब्राह्मणें - ब्रह्मीवनं. ३ खा व
भ
भऊर - भग - भगपुरं. खा म
भगुर्डी - भग - भगपुरवाटिका. खा म
भगूर - भगपुर = भगउर = भगूर. (भा. इ. १८३३)
भगूर - भगपुर name of a city मुलतान = भगूर a village near नासिक.
भगोती - भगवती. खा म
स्थलनामव्युत्पत्तिकोश
बेहडें - बिभितकं. खा व
बेळकी } - बिल्वकीय. ( पा. ना. )
बेळकें }
बेळणें - बैल्ववनक. (पा. ना. )
बेळवळ - बैल्वलक. ( पा ना. )
बेळवळमट्टी - बैल्वलक. पा. ना.
बेळवी - बैल्वक. . ,,
बोकळझर - भूकल (तुफान घोडा) - भूकलक्षर: खा इ
बोकेपूर - } वृकगर्त. धारवाड. (पा. ना.)
बोक्यापूर - }
बोडकी - वोढ्र (अजगर) - वोढ्रकी. खा इ
बोढ - वोढ़्र ( अजगर ) - वोढ्रकं. ,,
बोंढरें - वोढ्र ( अजगर) - वोढ्रपुरं. २ ,,
बोढें - वोढ्र (अजगर) - वोढ्रकं = ओढें. ,,
बोदडलें - भूधर (डोंगर) - भूधरपल्लं. खा नि
बोदरडें - भूधर (डोंगर) - भूधरवाटं. २ ,,
बोधवड - बुद्ध - बौद्धवाटं. खा म
बोधें - } बोध. (पा. ना. )
बोधेगांव - }
बोधेवाडी - }
बोपगांव - वप्तृ ( बप्प = बोप ) - बप्पग्रामं = वप्तृग्रामं. खा म
बोपर्डी - बप्परवाट = बोपरवाड = बोपरडी = बोपर्डी. (ग्रंथमाला )
बोयगांव - भूमि (युयुधानपुत्र) - भूमिग्रामं = भुइगांव = बोयगांव. खा म
बोरई - बदरावती. खा न
बोरकुंड - बदरकुंड. खा व
बोरखेडें - बदरखेटं. ७ खा व
बोरगांव - बदरग्रामं. ६ खा व
बोरचक - बदरचक्रं. खा व
बोरज - बदरपद्रं ( = बोरद = बोरज ). मा
बोरझरबारी - बदरझरद्वारिका. खा प
बोरटें - बदर. खा व
बोरद - दें - बदरपद्रं. ,,
बोरदैवत - बदरदैवत. २ ,,
बोरनार - बदरनालं. २ ,,
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
हटकारणें, झिटकारणें [ हट् निंदायां. हट = झिट ] (ग्रंथमाला)
हटणें १ [ अट्टे १ अतिक्रमे. अट्ट ( अट्टते ) = हटे (diminish, lessen). अट्ट ( अट्ट्यते ) = हटवतो (dim, lessen). अट्ट - आट. अट्ट्य = हटव ] ( धा. सा. श. )
-२ [ हट् बलात्कारे = हटणें, हट्ट] (ग्रंथमाला)
हट्ट [ हट् बलात्कारे ] ( हटणें २ पहा)
हंडी [ हंडिका = हंडी ]
हड्डी [ अस्थि = हड़ी ] ( स. मं. )
हणतो विणतो [ हन्ति विहन्ति = हणतो बिणतो. विहन = बिअण = बिण. विहनन = बिअणण = बिणणें ] विष्णतो हा कांहीं तरी जोड शब्द नाहीं. हाणतोबिणतो म्हणजे हाणतो जोरानें हाणतो. (भा. इ. १८३४)
हणमा [ हनुमान् = हणुमा (माहाराष्ट्री ) = हणमा ]
हंतरी [ आस्तरण = अथ्थरण = आँथरुण = हांतरूण, हंतरूण, हंतरी (आस्तरी ) ] (भा. इ. १८३२ )
हंतरूण [ आस्तरण ] (हंतरी पहा)
हनवटी [ हनुपाटी = हनवाटी = हनवटी ] (स. मं.)
हमरीतुमरी वर येणें [ अहं रे त्वं रे = हमरी तुमरी, हामरी तुमरी ]
हपापा [ हा ३ त्यागे. हापय + आप = हपापा ] ( धा. सा. श. )
हंबारणें [ करीषश्छगणो हंभा रेभणं च गवां ध्वनौ (त्रि. शे.) (ग्रंथमाला)
हंबारा [ रु २ शब्दे. हंबारवः = हंबारा ] गाईचा शब्द. ( धा. सा. श. )
हंभारणें [ अभि शब्दे. अंभ + रवः = हंबारा ] गाईच्या शब्दाला अंभ शब्द लावीत. ( धा. सा. श. )
हरकाम्या [ सर्वकर्मीणः पुरुषः = हरकाम्या. स = ह] doing all work as need be.
हरभरा [ चणको हरिमंथकः ॥ १८ ॥ अमर-द्वितीयकांडवैश्य वर्ग ) हरिभरक = हरभरा. हरिभृत्, हरिभरक असा दुसरा एक शब्द हरभर्याला संस्कृतांत असावा ] घोड्यानें फोडण्याचें धान्य, घोडा खातो तें धान्य. (भा. इ. १८३३)
हरास [ ह्रस् १ शब्दे. ह्रास = हरास ] (धा. सा.श.)
हलवा [ ह्वल: = हलवा. ह्वल् १ चलने, हलवणें ] ( धा. सा. श. )