Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

मापलगांव - महाभल्ल ( मोठें अस्वल) - महाभल्लग्रामं. खा इ

मामलदें - महाभल्ल (मोठें अस्वल) - महाभल्लपद्रं. खा इ

मामुराबाद - खा मु

मायणे - मातृकावनं. खा म

मारुळ - मरु - मरुपल्लं. खा नि

मारुळवारी - (गांवावरून). खा प

मारूळ घारी  -           ,,       ,,

मालकुवा - माल (माळ, मैदान). ,,

मालखेड - सं. प्रा. मान्यखेट. ( शोि. ता

मालखेड - मल्लक्षेत्र. ( खेड पहा )

मालखेडें - माल (माळ, मैदान) - मालखेटं. ६ खा नि

मालगव्हाण - माल (माळ, मैदान) - मालगवादनी. खा नि

मालटेंक - माल (माळ, मैदान ). ,,

मालदाभाडी - } माल (माळ, मैदान). खा नि
मालधं - }     ,,

मालाड - मालवाटं.

मालाड - मल्ल + तट = मालअड = मालाड. (ग्रंथमाला)

मालापुरघाट - (गांवावरून). खा प

मालेगांव - मलया (पर्वतदेशनाम) - मलयग्रामं. ३ खा म

मालेवाडी - मल्लीयवाटिका ( मल्ल नांवाच्या भ्रष्ट क्षत्रियांचें गांव), मा

मावळ - मामल ( संस्कृतांतून अपभ्रंश होऊन आलेला). मा

माहूर - मधुपुरं = महुउर = माहूर.
माहूर हें दक्षिणापथांतील प्रसिद्ध गांव आहे.

माळ - माल (माळ, मैदान ). ३ खा नि

माळपिंपरी - माल (माळ, मैदान). ,,

माळवाड - माल (माळ, मैदान) - मालवाटकं. ,,

माळविहीर - } माल (माळ, मैदान). ,,
माळशेवगें - }
माळीवाडें - मालिन् (माळी) - मालिवाटकं. खा म

माळीव - मल्लिकावहं. खा व

माळेगांव ( खुर्द ) - मल्लियग्राम (मल्लक्षत्रियांवरुन). मा

मळवली - मल्लपल्ली (मल्लक्षत्रियांचें गांव). मा

मळवाण - मल्ल (लोकनाम) मल्लवाहनं. खा म

मळसर - मल्ल (लोकनाम) - मल्लसरस्. ,,

माऊं - मार्जारग्रामं ( पशूवरून ). मा

माकडकुंड - मर्कटकुंडं. खा इ

माखेडें - मखखेटं. खा नि

मागराणी - मकरवनी. खा इ

मांगी - मातंग (लोकनाम) मातंगिका. खा म

माजगांव - मायाग्रामं.

मांजणी - मंजावनी. खा व

मांजरडी - मार्जारवाटिका. खा इ

मांजरी - मार्जारिका. ,,

मांजरें - मार्जारकं. ,,

मांजरोद - मार्जारिकोदं. ,,

मांजलें - मंजु ( हंस ) - मंजुपल्लं. ,,

माझगांव - मध्येग्रामः

मांडकी - मंडूक - मंडूकिका. ३ खा इ

मांडवी - मंटप - मंटपिका. ३ खा नि

मांडवें - मंटप - मंटपकं. २ ,,

मांडवेल - मंटप - मंटपवेरं. ,,

मांडवेलपुर - मंटप - मंटपवेरपुरं. ,,

माडळ - माडि: (राजवाडा) - माडिपल्लं. ,,

मांडळ - मंडल (सर्पविशेष) - मंडलकं. ४ खा इ

माणक - मंडूकं. ,,

माणकपूर - मंडूकपुरं. ,,

माणकोली - माणिक्यपल्ली (रत्नावरून). मा

माणिकपुंज - माणिक्यपुंजं. खा नि

मातकोट - मृत्तिकाकोट्टं. खा नि

मांदणी - मंद (लोकनाम) - मंदवनी. खा म

मांदु्र्णे - मंदुरावनं. खा इ

मानखेड - मान्यक्षेत्र. ( खेड पहा )

मानमोडी - मानमुकुट = मानमुकुड (जुना शिलालेख नं. १४ ) = मानमोड = मानमोडी = जुन्नराजवळील एक डोंगराचें नांव. (ग्रंथमाला)

मानूर - सं. प्रा. मानपुर. विजापूर, नाशिक, हैदराबाद, खानदेश. (शि. ता.)

मानूर - मन्य (लोकनाम) - मन्यपुरं. २ खा म

मानेगांव - मन्य (लोकनाम) - मन्यग्रामं ,,

मलाजन - मल्ल ( लोकनाम ) - मल्लकजनं. खा म

मलाणें - मल्ल (लोकनाम ) - मल्लवनं. ,,

मलोणी - मल्ल (लोकनाम) - मल्लवनी. ,,

मल्याडदेश - मलयाद्रिदेशः = मल्याडिदेश = मल्याडदेश = मल्याळदेश.

मल्याणें - मलय (पर्वत देशनाम ) - मलयवन. खा म

मवला - मयु ( किन्नर) - मयुपल्लः. खा व

मसकावद - माशक - मशकावर्त. ३ खा इ

महंकाळें - मयंक ( चंद्र) - मयंकतलं. खा म

महड - महत् - महाहाटं. खा नि

महमदपुर - २ खा मु

महलकडू - मधूलिका - मधूलकद्रु. खा व

महलखेडी - मधूलिका. खा व

महागण - महा (गाय) - महांगण. खा इ

महागांव - महाग्राम ( महा म्हणजे गाय). मा

महाड - मह + आड = महाड = मोठ्या बाजाराचें गांव. (ग्रंथमाला)

महाबळेश्वर - सह्याद्रीच्या ज्या खोर्‍यांना सध्यां आपण मावळें म्हणतों त्यांना हजारबाराशें वर्षांपूर्वी मामल ही संज्ञा असे. ह्या मामलदेशांतील जी मुख्य देवता ही मामलेश्वर अथवा मामलेसर. महाबळेश्वराच्या भोंवतालील खेड्यांतील लोक महाबळेश्वराला मामलेसरच म्हणतात. मामलेसराला महाबळेश्वर हें नांव शास्त्रीपंडितांनीं आपल्या संस्कृत वाणीला साजेल असें दिलें आहे. (महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)

महालक्ष्मी - महालक्ष्मि. खा म

महिंदळे - महीन्द्र (देव) - महीन्द्रपल्लं. २ ,,

महीर - मिहिर (सूर्य) - मिहिरकं. ,,

महुखेडें - मधु, मधुद्रुम, मधूक. खा व

महुडें - सं. प्रा. महाकूट, पुणें, रत्नागिरी. ( शि. ता. )

महुडोल - मधुद्रुपल्लं. खा व

महुनी - मधुधुनी. खा न

महुपुर - मधूकपुरं. खा व

महुमाडल - मधु, मधुद्रुम, मधूक-माडल ? खा व

महुरवाडी - मधुकर वाटिका. खा इ

मळखेडें - मल्ल (लोकनाम) - मल्लखेटं. खा म

मळगांव - मल्ल (लोकनाम) - मल्लग्रामं. ,,

मळवली - मल्लपल्ली (माळावरील गांव). मा

मंगरूळ - सं. प्रा. मंगलपुर. नाशिक, पुणें, ठाणें, साताण, सोलापूर, कुलाबा, नगर, विजापूर, हैदराबाद. ( शि. ता.)

मंगरूळवारी - (गांवावरून). खा प

मंगळणें - मंगलवनं. खा नि

मंगळवाडी - मंगलवाटिका. खा नि

मंगळूर - सं. प्रा. मंगलपुर. ( शि. ता.)

मचमाल - मंजु ( हंस ) - मंजुमालः खा इ

मंचर - महत्सरः = मच्चर = मंचर. हें जुन्नराजवळील एका गांवाचें नांव आहे. ही व्युत्पति जर खरी असेल तर पुरातन काळीं येथें मोठें सरोवर असावें. ( भा. इ. १८३४)

मंजरथ - मंजु ( हंस ) - मंजुरथ्या. खा इ

मजवाण - मंजु (हंस ) - मंजुवाइनं. ,,

मटखडकें - मट्टक. खा व

मटगव्हाण - मट्टकगवादनी. खा व

मटाण - मट्टक. ,,

मटामद - मट्टक - मट्टाम्रपद्रं ,,

मडवाणी - मठवाहनी. खा नि

मंडवी - मंटप - मंटपिका. ,,

मंडाणें - मंद (लोकनाम ) - मंदवनं. खा म

मंडोसर - मंडूकसरः = मंडोसर, मंदोसर (एक शहर).

मताणें - मत्त ( कोकिल ) - मत्तवनं. खा इ

मंत्राळें - मंत्रालयं. खा नि

मथवाड - मंथवाटं. खा नि

मंदाणें - मंद (लोकनाक) - मंदवनं. २ खा म

मंदोसर - मंडूकसरः. (मंडोसर पहा)

मनखडी - मणिखलिका. २ खा नि

मनवेल - मणिवेलं. ,,

मनापुरी - मनाका (हत्तीण) - मनाकापुरी. खा इ

मनूर - मणिपुरं. २ खा नि

मन्यारखेडें - मणिकार (जातिनाम ) - मणिकारखेटं. खा म

ममाणें - मन्मध = मम्महवनं = ममाणें. खा म

मरढें - महाराष्ट्रं = मरढँ = मरढें. सातारा प्रांतांत लिंबगोव्याजवळ मरढें गांव आहे. देवराष्ट्रें गांव मरढ्यापासून ३० मैलांवर आहे. (भा. इ. १८३२)

मर्‍हाड - महरट्ट. (वर्‍हाड पहा)

मलई - मलय (पर्वत देशनाम) - मलायिका. खा म

मलठण - मल्लस्थान (पैठण पहा )

भोकरगांव - वृकारिग्रामं ( वृकारि = कुत्रा). खा इ

भोंकरवारी - भोकर ( बहुफला ). खा व

भोकरी - वृकपुरी. ५ खा इ

भोकरें - वृकपुरं. खा इ

भोकरेवाडी - बहुकीट. (पा. ना.)

भेगवाडा - भोगिन् (सर्प ) - भोगिवाटकः २ खा इ

भेगावती - भोगावती. खा न

भोगी - भोगिन् (सर्प ). खा इ

भोज - भुज्यु (तुग्रपुत्र) - भौज्यं. खा म

भोजगांव - भुज्यु ( तुग्रपुत्र ) - भुज्युग्रामं ,,

भोडगांव - भोट (लोकनाम) - भोटग्रामं. खा म

भोडणी - भोट (लोकनाम) - भोटवनी. ,,

भोणें - भूर्णि ( निर्जल प्रदेश ) - भूर्णिकं. खा नि

भोद - भोट ( लोकनाम ) - भोटकं. २ खा म

भोयरें - भूतिपुरं. मा

भोपार - भूप - भूपागारं. खा म

भोरटेक - भौर (भूरि ऋषीचा पुत्र) - भौरचित्रं. ६ खा म

भोरखेड़ें - भौर ( भूरि ऋषीचा पुत्र ) - भोरखेटं. खा म

भोरस - भौर (भूरि ऋषीचा पुत्र) - भौरकर्ष. २ खा म

भोलाणें - भोलि ( उंट ) - भोलिवनं. २ खा इ

भोसुगांव - } वुससं. (पा. ना.)
भोसें - }

भौडी - भोट (लोकनाम) - भोटिका. खा म

 

मकरंदपुर - मकरंद. खा नि

मकरदरा - मर्करा + दरी = मक्कदरी = मकरदरी = (पुं.) मकरदरा. मर्करा म्हणजे दरी किंवा गुहा. द्विरुक्ति आहे.
मखपाट = मखपट्टं. खा नि

मगरवारें - मकरद्वारं. खा इ

मंगरूळ - मंगलपुरं (मंगळूर = मंगरुळ). मा

मंगरुळ - मंगलपल्लं. ५ खा नि

है [ है (हैहेप्रयोगे हैहयोः ८-२-८५ ) = है ] देवदत है, अशी पाणिनिकालीं हाक मारीत. कोर्टांतून शिपाई कृष्णाजी रघुनाथ है अशी अद्यापहि वकिलांना व साक्षीदारांना हाक मारतात, तेथें है हें अव्यय समजावें, आहे चा अपभ्रंश समजूं नये. परंतु हजर हाय येथें हाय आहे. चा अपभ्रंश समजावा.

हैंचा १ [ ह्यस्त्यः = हैंचा, हाँयचा (कालचा ) ]

-२ [ इहत्यः ] (हाँयचा पहा)

हैचें [ इहत्यं = हैचँ = हैच (चा-ची-चें) ] हैचें म्हणजे एथचें. हा शब्द कोंकण्या लोकांत फार.

हो १ [ भोः ] ( ज्ञा. अ. ९, पृ. ५७ )

-२ [ ओमित्यंगीकारार्थः ॥ तथास्तु ॥ २-१३, Weler, माध्यंदिनीयवाजसनेयसंहिता महीधरकृत वेददीप.
ओं या निपाताचा अर्थ वैदिक भाषेंत होकारार्थी, अनुमत्यर्थी आहे. ओं = हों = होँ किंवा हो ] होँ उच्चार कोंकणांत, हो उच्चार देशावर; हो ! येतो म्हणजे बरें आहे, तथास्तु, तुझ्या म्हणण्याप्रमाणें येतो. (भा. इ. १८३३)

होईल जा, होऊं या, होऊं ये [ करूं ये पहा ]

होकार [ साधुकारः = हाहुकार = होकार ] तेन साधुकारः दत्त: = त्यानें होकार दिला. (भा. इ. १८३४)

हो जा [ करूं ये पहा ]

होच्चा [ आहोस्वित् = होच्चिअ = होच्चा ! आहोस्वित् भोः = होच्च हो ! ]

होट [ ओष्ठ = ओट्ट = वेठ, अधरोष्ठ = अहरुठ्ठ = हउठ्ठ = होट ] होट व वोठ हे दोन भिन्न शब्द आहेत. खालचा ओठ तो होट. (भा. इ. १८३२)

होंड १ [ हुंडः (व्याघ्रः) = होंड (वाघासारखा क्रूर मुलगा ) ] पाणिनि Gwss ३-३-१०३.

-२ [ हुंड: (मूर्ख ) = होंड ]

होडगें [ होडः ] (होडी पहा)

होडी [ होड: ( boat ) होडिका = होडी, होडें, होडगें होड् to go ] होडी = small boat.

होतील जा [करूं ये पहा]

हो ! ना ! [ अहो नु = हो ना ! ]

होपण [अहोबत = होपत = होपण = (निपात) ] (भा. इ. १८३४)

होय ! [ अथकिं = अहइं = होइ = होय ] आलास ?
होय ! आलों = आगतोऽसि ? अथ किं ! आगतोस्मि ।

होय बा, हो बा [ हो वत = होबअ = होबा, होय बा ! (भा. इ. १८३४)

होरणें [ रुह् १ प्रादुर्भावे. अवरोहणं = ओरोहणें = होरोणें = होरणें ] जमीन होरली म्हणजे तिच्यांतील माती खालीं निघून गेली. अपहरणं = ओहरणें = होरणें. (धा. सा. श.)

होरी [ होडा (तरुण मुलगी ) = होरी ]

होल (ला-ली-लें ) [ निष्टा भूत + ल = हील (ला- ली-लें ) ( झाला ) ]

होळी [ होलाका = होळी ] हुल म्हणजे लिंगानें घट्टन करण्याचा व्यापार. नीचीकृत्य जघनं उपरिष्टादघट्ट्येत् इति हुलः (वात्स्यायन कामसूत्र पृ. १६२, निर्णयसागरप्रत).

हौद [ ह्रद = हौद (pond) ]

हौस [ अवस् (वैदिक तृप्ति ) = हवस = हौस ] मनिची हौस म्हणजे मनाची तृप्ति. (भा. इ. १८३४)

ह्मात्रा [ महत्तरक = ह्यात्तरअ = ह्यातरा = ह्यात्रा. महत्तर = ग्रामजन ] (ग्रंथमाला)

ह्यावर [ इत: परं = इआवर = या-, ह्या-वर ]

ह्यावरीं (अव्यय) [अथापरं = अहावरे = हावरीं, ह्यावरीं. ह्यावर ] ह्यावर, त्यावर (तघापरं), हीं मराठींत अव्ययें संस्कृतांतून आलेलीं आहेत. ह्या आणि वर असे दोन शब्द निराळे नाहींत.

हें १ [ इति = इइ = ई= ही = हें ] अहं गच्छामि इति उक्त्वा = मी जातीं हे म्हणून; वयंगच्छामः इति उक्त्वा = आम्ही जातीं हें म्हणून; येथें इति व हें अव्ययें आहेत. (भा. इ.१८३४ )

-२ [ एतद्, इदम् व अदस् पासून तीन ह निघतात. पहिले दोन ह सन्निकृष्ट अर्थ दाखवितात व तिसरा ह विप्रकृष्ट अर्थ दाखवितो. प्रकृतस्थलीं सन्निकृष्टार्थक ह आहे. तेव्हां तो एतद् किंवा इदम् पासून निघालेला समजावा. हा, ही, हें.]  (ज्ञा. अ. ९ पृ. १)

हेकट [ इतिकथ (दुष्ट) = हेकट ]

हेंका, हेंकांडणे [ इदं-किमितिका = हेंका ] हेंका म्हणजे हें असें कां असा हट्ट धरणें. ( धा. सा. श. )

हें कां करणें [ इदं किमितिका ] to ask reason there of.

हेंगाडा १ [ इंगतानभिज्ञः = एंगाडा = हेंगाडा ]

-२ [ एककांड: ] (धातुकोश-हेंगाड २ पहा)

-३ [ इतिकथ deviating from the rules of his caste, lawless = हेंगाडा ] हेंगडी भाषा, कृति, जाति.

हेटकर [ हेतिकर = हेटिकर = हेटकर ] हेति म्हणजे कुर्‍हाड, परशु. (भा. इ. १८३४)

हेटकरी [ हेतिकराः = हेटकरी ] हेति म्हणजे फेकण्या हत्यार.

हेटाळणें [ हेडन = हेटाळणें.
यद्देवा देवहेडनं देवासश्चकृमा वयं।
(शुक्लयजुर्वेदसंहिता-अध्याय २०-कडिका १४) हेड असा मूळ धातु. त्याला आळ प्रत्यय लागून मराठी हेटाळ. ड् = ट् ] हेडनं म्हणजे अपराध. हेटाळणें म्हणजे अपराध करणें, उपमर्द करणें. (भा. इ. १८३७)

हेडा, हेड्या [ हिंडकः = हिडा = हेडा, हेड्या. हिंड् गतौ हिंडक = हिंडगा. ] गुरांचे कळप घेऊन हिंडणारे.

हेंदारें [ हिंडीर: a man, a male ] सैरावैरा चालणारा गचाळ मनुष्य. (ज्ञा. अ. ९ पृ. १४३)

हेदू [ हेमदुग्ध = हेदू ] वृक्षनाम.

हेर [ निशाचरो गूढनरो हेरिकः प्रणिधि श्च सः ॥ १६८ ॥
धनंजयकोश. हेरः एव हेरिकः ॥ ] (भा. इ. १८३३)

हेल, हेलकरी [ हेलः = हेल ] हेल म्हणजे लग्न समारंभाच्या वेळीं पाणी वगैरे घालून मजा, करमणूक करणे. हेलकरी म्हणजे अशी करमणूक करणारी माणसें. त्यावरून दुसरा अर्थ ओझेवाला.

भिलखेडें -  भिल्लखेटं. २                              खा म

भिलगांव - भिल्ल ( लोकनाम ) - भिल्लग्रामं.       ,,

भिलजांबोळी - भिल्ल (लोकनाम).                   ,,

भिलदर -                 ,,                                  ,,

भिलभवाळी -          ,,                                  ,,  

भिलवणबारी - भिल्लवनद्वार्. खा प

भिलवाडी - भिल्ल (लोकनाम). खा म

भिलवाडें - भिल्ल (लोकनाम ). खा म

भिलाणें - भिल्लवनं. २ ,,

भिलाळी - भिल्लपल्ली. २ ,,

भिवंडी - भीमवाटी = भिमवडी = भिंवडी. भीमराजानें वसवलेली वाडी अथवा गांव. (ग्रंथमाला)

भिसेगांव } बिसिन्. (पा. ना.)
भिसेवाडी }

भीत - भिदा (कोथिंबीर ). २ खा व

भीमखेत - भीमक्षेत्रं. खा म

भींवरी - सं. प्रा. भीमरथी (भीमरही ) नदीनाम. ( शि. ता.)

भुईगव्हाण - भूति (रोहिसगवत) - भूतिगवादनी. खा व

भुकणी - वृकवनी. खा इ

भुगांव - भूग्राम. (भा. इ. १८३३)

भुताणे - भूतवनं. खा म

भुयाणें - भूति (रोहिसगवत ) - भूतिवनं. खा वा

भुशी - बुसशयी (भाताचें भूस पुष्कळ असणारें गांव). मा

भुसणी } बुसं. खा व
भुसें }

भूदरगड - भूदारगड: भूदार म्हणजे डुक्कर.
डुकरें ज्या डोंगरांत विपुल आहेत तो भूदरगड.

भूमनई - भूमानदी. खा न

भेंड - भिंड (शिरस). खा व

भेंडगव्हाण - भिंड (शिरस) - भिंडगवादनी. ,,

भेलसई - } बिलस. (पा. ना.)
भेलसें - }

भोकणगांव - वृकवनग्रामं. खा इ

भोकणी - वृकवनी. ,,

भोकर - बहुकीट. ( पा. ना. )

भोकर - बहुकरा. खा न

भोंकर - भोकर (बहुफला ). खा व

हुडुत् तुझा बा झवँ - हुडुत् तव पिता तावत् किंवा यावत् = बैल तुझा बाप तर ह्याहून या वाक्यांत जास्त गर्ह्य भाग नाहीं. हुड़त्, झवं वगैरे शब्दांचे अर्थ न कळल्यामुळें हीं असलीं वाक्यें गालिप्रचुर भासतात. महाराष्ट्रांत असलीं वाक्यें रागांत, थट्टेंत लहानथोरांच्या बोलण्यांत हमेशा येतात. त्यांचा खरा अर्थ न कळल्यामुळे महाराष्ट्रांतील सरसगट सर्व लोक अभद्र भाषण करणारे असतात, असा कित्येक परदेशीयांचा अभिप्राय पडला. तो अर्थात् अज्ञानजन्य होता, हें उघड आहे. (भा. इ. १८३४)

हुडुत [ हिरुत् वर्जने अव्ययं । ( अकच्) हिरकुत् = हिडउत् = हिडुत् = हुडुत् ] हुडुत् निघ येथून; हुडुत् तुझा हल्या मारी; वगैरे वाक्यांत हें वर्जनार्थक अव्यय मराठींत योजतात. (भा. इ. १८३६)

हुनका [ सुवर्णकः = हुनका ( होन in सुवर्ण = होन ) ]

हुर, हुर [ उर् गतौ ( सौत्रधातू) Imp. २nd sing. उर उर go on, go on हुर हुर ] a cry when driving sheep.

हुश् हुश् [ उत्+ श्वस् = हुश् हुश्, हुस् हुस् ] to breath out heavily.

हुष् ! हुश् ! [ उष् दाहे. उष् उष् = हुष हुष् ] हुष हुष करणें म्हणजे दाह झाल्याचा दर्शक शब्द करणें.
अति उकाडा किंवा दाह झाला असतां मराठींत हा उद्गार निघतो. ( धा. सा. श. )

हुसहुस् [ उत्+ श्वस् ] (हुश् हुश् पहा)

हुळा [ होलक = हुलअ = हुळा (हरभर्‍याचा) ] (भा. इ. १८३४)

हूँ [ ऊम् = हूँ (क्रोधनिंदामत्सरदर्शक अव्यय ) ]

हूड [ हूड् गतौ ] हूड मुलगा = भटकणारा मुलगा. (ग्रंथमाला)

हूद [ उद्र ( पानमांजर) = ऊद = हूद ] पानमांजर. (भा. इ. १८३६ )

हूल [हवरि: = हूरि = हूलि = हूल. हवृ कौटिल्ये] false news, report. हूल म्हणजे कुटिल, खोटी बातमी.

हे [ एतद्, अदस्, इदम् ह्या तीन सर्वनामांपासून स्त्रीलिंगी रूप, प्रथमा एकवचन. ही हें रूप अर्वाचीन आहे.] ( ज्ञा. अ. ९ पृ. ३ )

भामटें - भंभ (माशी ) - भंभवाटं. खा इ

भामरखेडें - भ्रमर - भ्रामरखेटं ,,

भामरें - भ्रमर - भ्रामरकं. २ खा इ

भामर्डी - भ्रमर - भ्रामरवाटिका. खा इ

भामलवाडी - भ्रमर - भ्रामरवाटिका. ,,

भामसाळ - भंभ (माशी ) - भंभशाला. ,,

भामेर - भंभ ( माशी ) - भंभवेरं. खा इ

भायगांव - भ्रातृ - भ्रातृग्रामं. खा म

भारड - भारंड ( पक्षिविशेष) - भारुंडद्रु. खा इ

भारडी - भारंड (पक्षिविशेष) - भारुंडिका. खा इ

भारडें - भारंड ( पक्षिविशेष) - भारंडकं. खा इ

भारवट - विहार ( बौद्धविहार ) - बिहार = विहार = भ्यार = भार. खा म

भारुर्डखेडें - भारंड (पक्षिविशेष) - भारुंडखेटं. खा इ

भालगांव - भल्लग्रामं - भल्ल { बिब्बा ( वृक्ष ) किंवा
{ अस्वल (प्राणी). २ खा व

भालसींव - भल्ल { बिब्बा (वृक्ष) किंवा } भल्लसीमन्.
{ अस्वल ( प्राणी ) } खा व

भालेर - भल्ल { बिब्बा (वृक्ष) किंवा } भल्लगिरि,
{ अस्वल (प्राणी) भल्लवेरं. खा व

भालोद - भल्ल { बिब्बा (वृक्ष) किंवा } भल्लपद्रं.
{ अस्वल (प्राणी) } खा व

भावघर }
भावडी } बाहुक. (पा. ना.)
भावडें }

भावरी - भ्रमर - भ्रामरिका. खा इ

भावलें - बाहुक. (पा.ना. )

भावेर - भर्व ( शिव ) - भर्ववेरं. खा म

भिंगूळ - भृंगपल्लं. खा इ

भिजा - भिद्या (नदी) - भिद्या. खा नि

भिरडाई - भारीटिका (शिरदोडी ) - भिरीटिकावती. खा व

भिर्डाणें - भारीटिका (शिरदोडी ) - भिरीटिकावनं खा व

भिलकोट - भिल्ल ( लोकनाम ). खा म