Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

वांकी - वक, वंक - वंकिका. २ खा नि

वांकी - वक्रा - वंका. खा न

वांकें - वक्र, वंक - वंककं. २ खा नि

वांकेरें - वक्र, वंक - वंकवेरं. ,,

वाखारी - वर्षागरिका. २ ,,

वाखुरली - वागुरापल्ली. ,,

वांगदरी - वंगा. अहमदनगर. (पा. ना. )

वागदुखी - वल्गुल (वाघूळ) - वल्गुलिका. खा इ

वागळूद - वल्गुल (वाघूळ) - वल्गुलोदं. ५ खा इ

वांगी - वंगीयं - सोलापूर, सातारा, नगर. (पा. ना.)

वाघओहोळ - व्याघ्र. खा इ

वाघछेप - व्याघ्रक्षेप. ,,

वाघडू - व्याघ्रद्रु. ,,

वाघडें, वाघणें - } व्याघ्र. ,,

वाघमळा, वाघरी - व्याघ्र. खा इ

वाघरें - व्याघ्रगृहं. ,,

वाघर्डें - व्याघ्रतरवाटं. ,,

वाघळी - व्याघ्र. ,,

वाघळें - व्याघ्र. २ ,,

वाघाडी - व्याघ्र. ४ ,,

वाघारी, वाघाळें - व्याघ्र. ,,

वाघुळखेडें - वल्गुल (वाघूळ) - वल्गुलखेटं. ,,

वाघूळ - वल्गुलिका. खा न

वाघोडें - व्याघ्र. ख इ

वाघोदें - व्याघ्र. १० ,,

वाघोळ - व्याघ्रपल्लं. ,,

वाजगांव - वायक (साळी) - वायकग्रामं. खा म

वाजदरें - वाशा. खा व

वांजळे - वंजुल - वंजुलकं. ,,

वांजोळे - वंध्यापल्लं. खा म

वाट - वार्ष्ट्य. वाठार. (पा. ना.)

वाटवी - वाट (रस्ता ) - वाटवहा. खा नि

वाटार - वाट (रस्ता ) - वाटागारकं.

वाटेगांव, वाटेफळ - वट्यं. (पा. ना.)

वाटाडें - वाट (एक धान्य) - वाटवाटं. २ खा व

वाटोरा - सं. प्रा. वट्टूर. महीकांठा. (शि. ता.)

वाठार -(वठार पहा).

वल्हेगांव - वल (इंद्र) - वलकग्रामं. खा म

वसई - सं. वसति = प्रा. वसइ.
(महाराष्ट्र इतिहास मा. श्रा. श. १८२६)

वसतशेवोळ - } वासातिक. कल्याण. (पा. ना.)
वसतशेळवली - }

वसनार - वसर्हन् (अग्नि वैदिक शब्द)- वसईन् - खा म

वसमाणें - वसामाणिकं. खा नि

वसर - उज्झर (वाहाता नाला). ,,

वसलाई - वत्सला (देवी) - वत्सलावती. खा म

वहकळखेडें - बाष्कळ (ऋषिनाम) - बाष्कलखेटं. खा म

वहाणगांव - उपानद्ग्राम ( राजाच्या जोड्या संबंधानें विशेष गोष्ट घडली असावी त्यावरून). मा

वहीवाडा - वृत्ति + वाटः = वहीवाडा encloswes or railings or fences.

वह्याणें - वह्य (गाडी ) - वह्यवनं. खा नि

वळ - वल (इंद्र) - वलकं. खा म

वळई - सं. प्रा. वलभी. सातारा. (शि. ता.)

वळकाद - बालादक. (पा. ना.)

वळख - प्लक्ष (= पालख = वळख) (प्लक्ष वृक्षावरून प्लक्ष म्हणजे अंजिराचीं झाडें. प्लक्षवरून प्लक्षद्वीपाला
ऊर्फ Pelasgians च्या देशाला पुराणांत नांव आहे). मा

वळवडे - सं. प्रा. वळवाड. (शि. ता.)

वळवंडे - वालुवंटं.

वळवंती - वलावंती (वल झाडावरून ). मा

वळवाड - वल (इंद्र ). खा म

वळवाडी - वल (इंद्र) - वलवाटिका. ३ खा म

वळें - सं. प्रा. वलभी. कैरा, रेवाकांठा, काठेवाड. (शि. ता.)

वाई - वायक (साळी) - वायिका. खा म

वाईनगंगा - अर्वाचीनगंगा = (अलोप) वाईणगंगा = वाईनगंगा.

वाउंड - वातिपद्रं (फार वारा असणारें गांव ). मा

वांक - वक्र, वंक. वंक्रं. खा नि

वांकडी - वक्र, वंक - वंकवाटिका. ४ ,,

वांकट - वक्र, वंक - वंकपद्रं. ,,

वांकपारलें - वक्र, वंक - वंकंपारपल्लं. ,,

वाकसई - वंक्षावती. मा

त्या वेळीं जें रूप प्रचलित असेल तेंच लिहिलें असेल. अशोकाच्या शिलालेखांत रास्टिक म्हणून एक नांव येतें तें निराळेंच. येणेंप्रमाणें ( १ ) रास्टिक, ( २) महारथी, (३) महारट्ट, ( ४ ) महरट्ट व (५) महाराष्ट्र असे एकाच देशांतील लोकांच्या नांवाचे पांच प्रकार पाहाण्यांत येतात. ह्यांपैकीं खरें नांव कोणतें असल तें निश्चयानें सांगतां येत नाहीं. मराड, मरट्ट, मर्‍हाटा, मराठा अशीं हीं रूपें अलीकडील सातआठशें वर्षांत प्रचारांत आहेत. मराठा हा शब्द अलीकडील तीनशें वर्षातील लेखांत दृष्टीस पडतो. त्या पूर्वीच्या तीनशें वर्षांतल्या ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथांत मर्‍हाटा असें रूप आढळतें. प्राकृत पिंगलसूत्रांत मरट्ट, महरट्ट अशीं दोन रूपें सांपडतात. व एक दोन ताम्रपटांत मराड असें रूप येतें. सारांश, हा शब्द गेल्या दोन हजार वर्षात नऊदहा प्रकारांनीं लिहीत आले आहेत. पैकीं खरा शब्द व रूप महरट्ट असावें असें वाटतें. रट्ट हें ह्या देशांतील एका पुरातन कुळीचें नांव आहे; व महरट्ट हें त्या कुळींतील एका पोटभेदाचें नांव आहे. आतां, महरट्ट म्हणजे मोठे रट्ट असा जो कोणी कोणी विद्वान् अर्थ करतात, ह्या अर्थाहून निराळा एक अर्थ ह्या शब्दाचा करावा असें पुढील कारणाकरितां मला वाटतें. मराठींत वर्‍हाड व कर्‍हाड असे मर्‍हाड शब्दासारखेच दोन शब्द आहेत. हे दोन्ही शब्द एकाच निरनिराळ्या प्रांतांत राहणार्‍या लोकांचे वाचक आहेत. वर्‍हाड शब्द वहरट्ट व कर्‍हाड शब्द कहरट्ट शब्दाचा अपभ्रंश दिसतो. येणेंप्रमाणें महरट्ट, वहरट्ट व कहरट्ट असे तीन शब्द पुढे येतात. हे तिन्ही शब्द रट्टांच्या निरनिराळ्या पोटभेदांचे वाचक आहेत, हें उघड आहे. आतां, ताम्रपत्रांतून व ग्रंथांतून कर्‍हाड शब्द करहाटक, करहट्ट अशा रूपांनीं आढळतो, हें खरें आहे. परंतु मरहट्ट, मरहाटक ह्या शब्दांप्रमाणेच करहाटक, करहट्ट हीं भ्रष्ट रूपें आहेत असें मानणें रास्त आहे. वरहट्ट व वरहाटक हे शब्द ताम्रपटांत व ग्रंथांत कोठेंही आढळत नाहीत. पण महरट्ट व कहरट्ट ह्या शब्दांप्रमाणेंच हजार पंधराशें वर्षांपूर्वी वहरट्ट हा शब्द प्रचलित होता असें अनुमान होतें. कदाचित् वहरट्ट ही पोटकुळी राजकीय दृष्ट्या फारशी महत्त्वाची नसल्यामुळे तिचा नामनिर्देश ताम्रपटें व ग्रंथ ह्यांत नाहीं, इतकेच. तेव्हां वहरट्ट, महरट्ट व कहरट्ट असे तीन शब्द व्युत्पत्त्यर्थ आपल्यापुढें उभे राहातात. ह्या तीन शब्दांतील वह, मह व कह ह्या शकलांचे अर्थ बसवावयाचे आहेत. माझ्या मतें वह म्हणजे पलीकडील, मह म्हणजे मधील व कह म्हणजे अलीकडील असे अर्थ घ्यावे. रट्ट कुळीचे एकंदर तीन पोटभेद होते, पलीकडील रट्ट ते वहरट्ट, मधील रट्ट ते महरट्ट व अलीकडील रट्ट ते कहरट्ट.
सारांश, हजारबाराशें वर्षांपूर्वी एके काळीं महाराष्ट्राचे वर्‍हाड, मर्‍हाड व कर्‍हाड असे तीन भाग होते व त्यांतील लोकांस वर्‍हाडी, मर्‍हाडी व कर्‍हाडी किंवा वर्‍हाडी, मराठे व कर्‍हाडे अशीं नांवें पडलीं. ह्या तिन्ही प्रांतांतील तिन्ही पोटकुळ्या एकच भाषा बोलतात व एकाच कुळींतल्या आहेत. मधील पोटकुळींतील जे महरट्ट किंवा मराठे ते राजकीय चळवळी करणारे असल्यामुळे त्यांच्या नांवानें नागपुरापासून तुंगभद्रेपर्यंत व तैलंगाणपासून कोंकणापर्यंत जो विस्तीर्ण मुलूख आहे तो महशूर झाला आहे. भोज, पिटिनिक, अपरांतिक वगैरे पैठण, नगर, उत्तर कोंकण प्रांतांतील मराठी भाषेसारखीच भाषा बोलणारे लोक राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे नसल्यामुळे महरट्टांच्या म्हणजे मराठ्यांच्या तेजांखालीं लोपून गेले. नाशकापासून वांईपर्यंतचा जो टापू तो महरट्टांचा मूळ देश. वांईपासून कोल्हापुरापर्यंतचा जो प्रांत तो कहरट्टांचा मुलूख; व खानदेशापासून नागपूर प्रांतापर्यंतचा जो देश तो वहरट्टांचा प्रांत असा प्रकार होता. पहिल्यानदां एकटी महरट्ट कुळी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची झाली; तिनें पुढें वहरट्ट व कहरट्ट ह्या पोटकुळ्या आत्मसात् केल्या आणि नंतर वाढत वाढत नागपूर, खानदेश, पैठण, बालेघाट, गुलबर्गा, कोल्हापूर, बेळगांव, उत्तर कोंकण, दक्षिण कोंकण, गोवा, कारवार वगैरे प्रदेश आक्रमिले. हा प्रकार शहाजी व शिवाजी ह्यांच्या पर्यंतच्या पंधराशें वर्षात झाला. नंतर मराठशाहींत ओडिसा, ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा, गुत्ती, अर्काट, तंजावर येथपर्यंत मराठ्यांच्या छावण्या व वसाहती पसरल्या. असा हा मराठ्यांच्या कुळीच्या राजकीय प्रसाराचा वृत्तांत आहे. हा प्रसार होतांना पूर्वी अनेक अडथळे आलेले आहेत व सध्यां तर तो बहुतेक थांबल्यासारखाच आहे. परंतु ह्या कुळीच्या वाढीचा गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास पाहातां, सर्व आर्यावर्तावर व जवळच्या म्लेंच्छ देशावर ही कुळी पसरावी असा अंदाज बांधावा लागतो. ही पसरणी होतांना हजारों ठेंचा, लाखों अडचणी व शेंकडों वर्षें लागतील हें उघड आहे.
(महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६ )

वर्‍हाणें, वर्‍हाळे - बहिं. खा इ

वलभपुर - सं. प्रा. वलभी. पंचमहाल. (चिं. ता.)

वल्गेरी - वल्गु. धारवाड. (पा. ना. )

वल्हवण - वलवनं ( वल वनस्पतीवरून). मा

वल्हवण - वेलावनं = वेल्हवण = वल्हवण.

वल्हें - वल (इंद्र ) - वलकं. खा म

वरशी - वरक (वरी) - वरकर्षा. खा व

वरसांड - वरकसंधि. ,,

वरसूम - वरक ( वरी ) - वरकंसुह्यं. ,,

वरसूस - वर्षाकर्ष. खा नि

वरसोली - वर्षांपल्ली (पुष्कळ पाऊस पडणारें गांव).

वरळ - वरक (वरी ) - वरपल्लं. खा व

वराटी - वाराटकीयं. महाड. (पा. ना.)

वराड - वैदर्भ. पुणें, ठाणें, रत्नागिरी. (पा. ना.)

वराड - वरक ( वरी ) - वराट्टकं. ५ खा व

वराडें - वैदर्भ. सातारा. (पा. ना.)

वराह - वराहक:. धारवाड. ,,

वराळें - वरालयं (उत्तम स्थान ). मा

वरुटी - वारत्रक. भोर. (पा. ना.)

वरुळी - उरःपल्ली = उरुळी, वरुळी. (भा. इ. १८३६)

वरूळ - वरक (वरी ) - वरपल्लं. ४ खा व

वर्णोल - वर्णु. ठाणें. (पा. ना.)

वर्‍हाड - मराठा शब्द महाराष्ट्र शब्दाचा अपभ्रंश कित्येक समजतात. कित्येक महारट्ट शब्दाचा अपभ्रंश असावा असें म्हणतात आणि कित्येक महरट्ट असें या शब्दाचें मूळ स्वरूप असावें असें प्रतिपादितात. पैकीं दुसरी व्युत्पत्ति विद्वानांना मान्य आहे असें दिसतें. डॉ. भांडारकरांनीं आपल्या दक्खनच्या इतिहासांत हीच व्युत्पत्ति मनिली आहे. शकांच्या, शातवाहनांच्या व अशोकाच्या वेळीं दक्षिणेत रट्ट म्हणून एक लोक होते; त्यांचेच भाऊबंद रड्ड, रड्डी वगैरे उत्तर कर्नाटकांतील कांहीं जुने लोक होत; ह्या रट्टांपैकीं कित्येक कुळी महा पराक्रमी निघाल्या व त्यांनीं आपल्याला महारट्ट असें बहुमानार्थी नांव घेतलें; वगैरे अनुमानें काढलेलीं प्रसिद्ध आहेत. कार्ले येथील शिलालेखांत महारथी व महारथिनी असे शब्द आलेले आहेत. ते दोन ( हजार )+ वर्षांपूर्वीच्या मराठ्यांचे वाचक आहेत असें बहुतेक सर्व प्राचीन लेखशोधकांचें म्हणणें आहे; परंतु महारथी ह्या संस्कृत शब्दाचें महारट्ट असें प्राकृत रूप कसें झालें हें नीट उलगडून कोणींच दाखविलें नाहीं. रथ शब्दाचें रह व रथी शब्दाचें रही अशीं प्राकृत रूपें होतात; रट्ट व रट्टी अशीं होत नाहींत. महारथी उगाच मजेखातर रूप लिहिलें, असेंहि म्हणणें शोभत नाहीं. कारण हे शिलालेख कांहीं कोणाला फसविण्याकरितां लिहिलेले नाहींत.

वडोद्रा - सं. प्रा. वडपद्रक (वटपद्रक). महीकांठा, काठेवाड. ( शि. ता.)

वढरी - वध्र (लोकनाम) वध्रपुरी. २ खा म

वढोदें - वध्र (लोकनाम) - वध्रपद्रं. २ ,,

वणी - वन - वनी. ३ खा नि

वणें - वन्यं. ठाणें. (पा. ना.)

वदड - वधूटि - वधूटिका. खा म

वध्रीबारी - वध्रिकाद्वार. खा प

वनकुटें - बनकुटिकं. खा नि

वनकोटें - वन-वनकोट्टकं. ,,

वनपट - वनपट्टं. ,,

वनारशी - वराणसं. ठाणें. (पा. ना.)

वनावल - वनावलि. खा नि

वनेली - वनिल:. खानदेश. (पा. ना.)

वनोली - वनपल्ली. ३ - खा नि

वभळाज - वर्वूर - वर्वूरपद्रं = वर्बूलपजं = वभळाज. खा व

वभळाज - वर्वूर (लोकनाम) - वर्वरपद्रं. खा म

वरखडी - वरखलि. २ खा व

वरखेड - वरक (वरी). ,,

वरखेडी - वरकखेटिका. ५ ,,

वरखेडें - वरक ( वरी ) - वरकखेटं. ६ ,,

वरगव्हाण - वरक (वरी). ,,

वरझडी - वरकझटी. ,,

वराझिरी - झरी - वरक (वरी). २ ,,

वरठाण - वरक (वरी ) - वरस्थानं. ,,

वरठी - वारत्रक. रोहें. (पा. ना.)

वरढें - वरधं. खा व

वरण - वरकवनं. ,,

वरणगांव - वरणा. खानदेश (पा. ना. )

वरदडी - वरक (वरी ) - वरकदरी. खा व

वरधाणें - वरधानं. खा व

वरधें - वरधं. ,,

वपपडें - वपपाटकं. ,,

वरपाडा - वरक (वरी). ,,

वपवंदी - वरवृंदिका. २ ,,

वपवाडें - वरक ( वरी ) - वरवाटकं. २ ,,

वरवाळी - वपपालिका. ,,

वडणें - वट्वनं. खा व

वडद - वटोदं. ,,

वडधें - दें - वटधं. ,,

वडनगरी - वाटनगरी. ,,

वडनेर - वटनीवरं ,,

वडपाडा- वटपाटकः ,,

वडपेचरी - वटपेचुली. ,,

वडफळपा - वट. ,,

वडबुधें - वटबुध्रं. ,,

वडवत - वटावर्त. ,,

वडवली - वटपल्ली (वटवृक्षांवरून). मा

वडबा - वडवा. कच्छ, भूज, बडोदे. (पा. ना.)

वडवाई - वडवा (अश्विनी) - वडवावती. खा म

वडवाणी - वर्धमान (नगरनाम )- वर्धमानिका. खा म

वडवान - वर्धमान (नगरनाम) - वर्धमानं. २ ,,

वडवार - वटवारकं. खा व

वडवाहाळ = वट. ,,

वडविहिरें - वटविवरकं. ,,

वडवी - वडवा (अश्विनी) - वडविका. खा म

वडळी - वटपल्ली. ३ खा व

वडाखळ - वटकखलि. ,,

वडाखळ - वटखलि. ,,

वडार = वटगार. ,,

वडाळवाडी - वार्दालीमत्. सातारा (पा. ना.)

वडाळी - वार्दालीमत्. नगर, नाशिक, खानदेश. (पा. ना.)

वडाळी - वटपल्ली. ३ खा व

वडाळीघाट - (गांवावरून) खा प

वडाळें - वटपल्लं. ३ खा व

वडियें - वाटिकं.

वडियेंबुध - वट - वाटिकं बौद्धं. ,,

वडुलेश्वर - वतुलेश्वर. खा म

वडूथ - वटपद्र = वडुड्ढ = वाडूड = वडूथ. (भा. इ. १८३६ )

वडें - वटकं. २ खा व

वडेल - वटवेरं. ५ ,,

वडेश्वर - वटेश्वर किंवा वृद्धेश्वर. मा

वडोदें - वट. खा व

वडोदें - वटोदं किंवा वटपद्रं. ,,

लोहवाडी - लोहिवाटिका (लोखंड उत्पन्न ज्यांत होतें तें गांव ). मा

लोहेर - लेहितागिरि. (पा. ना.)

लोहोगांव - लोह. खा नि

लोहोटार - लोह - लोहोत्तारं. ,,

लोहोनेर, लोहारी - लोह. ,,

लौकी - रोक (खांच) - रौकी. ,,

ल्हराडें - लहर (लोकनाम, सध्यांचें लडक) - लहरवाटं. खा म

 

वगरा = वागुरा. खा नि

वगांव - वह ( रस्ता) - वहग्रामं. ,,

वंजारी - वाणिज्यहारी (जातिनाम ) - वाणिज्यहारिका. ३ खा म

वजीरखेड़ें - वज्र (कृष्णाचा नातू, इंद्राचें शस्त्र) - वज्रखेटं.२ खा म

वझर - उज्झर (वाहाता नाला) - उज्झरकं. खा नि

वझरटें - उज्झर (वाहाता नाला) - उज्झराट्टं. खा नि.

वझरें - वाज्रेयं. (पा. ना.)

वझिरी - वज्र (कृष्णाचा नातू, इंद्राचें शस्त्र) - वज्रिका. खा म

वझ्री, वझ्रोली - वाज्रेयं. (पा. ना.)

वाटकळंबी - वटकलंबिका. खा व

वटखुढें - वट. क्षोट - मेढ. ,,

वटजाखण - वटयक्षिणीकं. खा व

वटवट = वटमत्. सोलापूर. (पा. ना.)

वटाण - वटवनं. खा व

वटार = वटागर: खा व

वठार - वटगृह = वडघर = वठार, वाठार. (स. मं.)

वड (धानोरी ) - वटकं. खा व

वडगांव - वटग्राम. मा

वडगांव - वट. ३० खा व

वडछील - वटस्थली. ,,

वडजाई - वट - वटजावती. ,,

वडजी - उटज - उटजा. ,,

लामकानी - लंबकणीं. खा व

लामकानी - लोमकायनः खानदेश. (पा. ना.)

लासगांव - लसाग्रामं. खा व

लासनाविहीर- लक्ष्मणाविवरिका. ,,

लासूर - लसापुरं- २ ,,

लासेरें - लसापुरं. २ ,,

लिंगउतार - लिंगउत्तारकं. खा नि

लिंगाव - लिंगग्रामं. ,,

लिंबारवाडी - सं. प्रा. लिंबारामिका, पणें. ( शि. ता.)

लुमखेडें - लुंबिनी ( बौद्धग्रामं )- लुंबिनीखेटं. खा म

लुलें - लुलाय (गेंडा) - लुलायं. खा इ

लेकुरवाळी - ललकतरपालिका. खा म

लेडाणें - लेट (संकरजाति) - लेटवनं. ,,

लेहें - रैभ्य ( गोत्र ) - रेभ्यं. ,,

लोंढरी - लोध्रपुरी. खा व

लोंढरें - लोध्र. ३ ,,

लढवें - लोध्रवहं. ,,

लोंढें - लोध्रकं. ,,

लोण - लवणं किंवा नवनीतं. ९ खा नि

लोणकुटें }
लोणखांच } लवणं किंवा नवनीतं. ,,
लोणखेडी }

लोणखेडें - लवणं किंवा नवनीतं. ३ ,,

लोणजें - लवणं किंवा नवनीतं. ,,

लोणवाडी -      ,,         ३          ,,

लोणार - (गांवावरून). खा प

लोणारें - लवणं किंवा नवनीतं. खा नि

लोणावळें - नवनीतपल्लं (लोणी उत्पन्न पुष्कळ होतें तें गांव ). मा

लोणी - लवणं किंवा नवनीतं. ५ खा नि

लोनाड - लवनतट = लोनअड = लोनाड. (ग्रंथमाला)

लोनावळें - (खडकाळें पहा).

लोमठाण - रोमक. (पा. ना.)

लोय - लूतिका. खा इ

लोवरें, लोवळे - रोमक. (पा. ना.)

लोव्हारें, लोहगड - लोह. खा नि

लोहगांव - सं. प्रा. लोहग्राम, पुणें, विजापूर, नगर, ( शि. ता. )

रोहिणें - रोहिष (गवत) - रोहिषकं. खा व

रोहिलें - रोहिष (गवत) - रोहिषकं. खा व

रोहिलें - रोहि (रुई) - रोहिपल्लं. खा इ

रोहोर - रोहि (रुई) रोहिपुरं. खा इ

र्‍हटपाडा - रट्ट (लोकनाम राष्ट्रिक) - रट्टपालक:. खा म

 

लकडकोट - लकुटं. २ खा व

लखमीखेडें - लक्ष्मीखेटं. खा म

लखाणी - लाक्षा - लाक्षावनी. खा व

लखाळें - लाक्षा. ,,

लखुंडी - सं. प्रा. लोक्किगुंडी. (शि. ता.)

लंघाणें - रंग (कात) - रंगवनं. खा नि

लताळें - लक्त - लक्तालयं. खा व

लतिमपुर - खा मु

लबक - (देशविशेष) - लंपाक किं कंपसे. (प्रतापरुद्रीयम्) तिबेटाच्या बाजूला लबाक, लबक नांवाचा प्रांत आहे. ( भा. इ. १८३४)

लभाणी - लब - लबवनी. खा व

लमाज - लामज्जक (वाळा) - लामज्जकं. ,,

लमाजणें - लामज्जक (वाळा ) - लामज्जकं. ,,

लव - लोमन् - लौमनं. ठाणें. ( पा. ना.)

लवण - लब - व (लावा) - लववनं. खा इ

लवणी - लौमकीयं. जुन्नर. (पा. ना.)

लवळे - लकुल्यं. पुणें. (पा. ना. )

लवारडे - लवारली - लावेरणीयं. ,,

लव्हारी - लब - व (लावा) - लबागरिका. खा इ

ल‍ळिंग - लल (हलणारें) - लललिंग. खा नि

लाख - लाक्षा. खा व

लाखोली - लाक्षापल्ली. खा व

लांजई - सं. प्रा. लंजीश्वर. नाशिक. ( शि. ता.)

लांजूळ, लांजें - सं. प्रा. लंजीश्वर. रत्नागिरी. ,,

लाडगांव - लाट (लोकनाम)- लाटग्रामं. २ खा म

लाडली - लाट ( लोकनाम) - लाटपल्ली. ,,

लाडूद - लाट (लेकिनाम) - लाटपद्रं. ,,

लांबोळें - लंबा (कडूभोपळी) - लंबापल्लं. खा व

रुमा - रौमकं वसुकं (अमर-द्वितीय- वैश्यवर्ग - ४२) द्वे शांभरलवणस्य l शांभारि देशे रुमा नामको लवणाकर: तत्र भवं रौमकं l रुमा नांवाचें सांबर देशांत सरोवर आहे. हा रुम शब्द ऋग्वेदांत येतो. रुमा सरोवराजवळील जो देश तो रुम देश. (भा. इ. १८३३)

रुमालें - रुमा (खारट सरोवर) - रुमामालकं. खा नि

रुह्मणें - रुमा (खारट सरोवर) रुमावनं. खा नि

रुह्माण - रुमण्वान् (पर्वत). (पा. ना.)

रूसवाड - रुष्यमत्. ,,

रेटरें - अरिष्टपुरं = रिट्टउरं = रिटुरें = रेटरें. अरिष्टगौडपूर्वे च (६-२-१००)

रेडी - सं. प्रा. रेवती द्वीप. रत्नागिरी. (शि. ता.)

रेडें - सं. प्रा. रेवती द्वीप. पुणें. ,,

रेडेवाडी - सं. प्रा. रेवती द्वीप. सातारा, कोल्हापूर, नगर. (शि. ता.)

रेल - रिरी (पितळ) रैरं. खा नि

रेवडी - रैवतकं. (पा. ना.)

रेपाळखेडें - रैपाल (कुबेर) - रैपालखेटं. खा म

रेंभोटें - रैभ्य (गोत्र) रैभ्यवाटं. ,,

रेवती - रैवत (रुद्र) रैवतिका. ,,

रेवती - सं. प्रा. रेवती द्वीप - नाशिक, खानदेश. (शि. ता.)

रेवजी - रैवतकं. (पा. ना.)

रेवाडी - रेवा (नदीनाम) (पा. ना.)

रोकडें - रुक्म (सोनें) - रुक्मवाटं. खा नि

रोज - रुचक-रौचकं. खा व

रोझगांव, रोझवें - रुचक. खा व

रोझाण - रुचकवनं. खा व

रोझोदें - रुचक. खा व

रोटी - लुंटिका. खा व

रोण - रौण. धारवाड. (पा. ना.)

रोमसळा - रोमश (ऋषि-मंत्रद्रष्टा) - रोमशपल्ल:. खा म

रोवण - रोमण्यं. महाड. (पा. ना.)

रोसमाल - रोहिष (गवत) - रोहिषमाल:. खा व

रोहिणी - रोहि (रुई) - रोहिवनी. खा इ

रोहिणें - रोहि (रुई) - रोहिवनं. खा इ