Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
स्थलनामव्युत्पत्तिकोश
सरूळ - शर (तृण) - शरपल्लं. खा व
सर्पिणी - सर्पिणी. खा न
सर्वर - शर्वपुरं. खा म
सर्वाळें - शर्वपल्लें.
सवगव्हाण - श्यामाक (सांवा) - श्यामाकगवादनी. २ खा व
संवदगांव - सुंद (दैत्यनाम) - सौंदग्रामं. खा म
संवदनाई - ” - सौंदवनावती. ,,
संवदाणें - ,, - सौंदवनं. ,,
सवरें - शबर (लोकनाम)- शबरकं. ,,
संवरें - श्याम (तमाल) - श्यामपुरं. खा व
ससदर - शशदरः ,,
ससदें - शशपद्रं. ,,
ससलें - शशपल्लं. ,,
ससाणें - शशवनं. ,,
ससें - शश-शशकं. ,,
सहस्त्रवलिंग - सहस्त्र. खा नि
सहस्त्रलिंग - सहस्त्रलिंग. खा म
सह्याद्रि - सह्याद्रि. खा प
साई - सातिः मा
साकडें - शाकवाटं. खा व
साकरदें - शर्करा (लहान दगड) - शर्करापद्रं. खा नि
साकरी - शाक (साग ). खा व
साकरें - शाक (साग) - शाकपुरं. ,,
साकवद - शाक (साग) - शाकावर्त. ,,
साकळी - शाक (साग) - शाकपल्ली. ,,
साकारें - साकागारं. ,,
साकुरी - शाक ( साग). ,,
साकेगांव - शाक्य (बौद्ध)- शाक्यग्रामं. खा म
साकेगांव - साकीय. खा व
साकेरी - शक, पुणें. (पा.ना.)
साकोज - साकोदं. खा व
साकोडें - शाक (साग) - शाकवाटं. ,,
साकोर - शाक (साग) - शाकपुरं. २ ,,
सांगवडें - संगमवाटं (संगमावरून). मा
सांगवी - संगम-संगमिका. १० खा नि
स्थलनामव्युत्पत्तिकोश
स
सकेवाडी - शक. सातारा. (पा. ना.)
सक्कर - शर्करः ( वालुकायुक्त देश ) = सक्कर.
सिंध प्रांतांतील एक जिल्हा व शहर.
संगमेश्वर - संगमेश्वर. २ खा म
सजमाणें - सर्जमानं. खा व
सटवाड - सटिवाटकं. ,,
सटाणें - स्वधिष्ठानं - सटाणें (ग्रामनाम).
सटाणें - सटिकावनं. खा व
सडगांव - सटि ( आंबेहळद ) - सटिग्रामं. ,,
सडवली - सटापल्ली (झाडाचीं झुंबटें ज्या गांवांत वैशिष्ट्यानें आहेत तें गांव ) मा
सडावन - सटिकावनं. खा व
सणकुवा = शणकुंबः ,,
सणपुलें - शणपुल्लं. ,,
सतखेडें - सात्वत - सतिअ (लोकनाम) - सतिअखेटं. खा म
सतगव्हाण - ,, - सतिअगवादनी. खा म
सताणें - ,, - सतिअवनं. खा म
सतारें - ,, - सतिअपुरं. खा म
सताळें - ,, - सति अपल्लं. खा प
सतीबारी - सतीद्वार. खा प
सत्ती - शक्तिमत्. अथणी. (पा. ना.)
संदाणें - सुंद (दैत्यनाम) - सौंदवनं. खा म
सदापूर - श्रद्धापुरं (बौद्धधर्मावरील श्रद्धेवरून). मा
सपाई - सर्प - सर्पावती. खा इ
समशेरपुर - खा मु
समी - शमीमत्. पालणपूर. (पा.ना.)
सरपाडा - शर ( तृण ) - शरपाटकः खा व
सरवट - } ,, - शरवाटकं. ,,
सराड - }
सरी उमठी - सरीउन्मथिका. खा नि
स्थलनामव्युत्पत्तिकोश
शेजवें - शयु ( अजगर ) - शयुवहं. खा इ
शेणपुर - श्येन (ससाणा) - श्येनपुरं. ,,
शेणवड - श्येन ( ससाणा) - श्येनपुरं. ,,
शेंदुर्णी - सिंधुवारवनी. खा व
शेंद्राघाट - (गांवावरून). खा प
शेंबुडें - शिंबिवाटं. खा व
शेरी - सैरीय (कोर्हांटी). ४ ,,
शेलवारीघाट - शैलद्वारिकाघाटः खा प
शेलारवाडी - शेलारपाटी. (ग्रंथमाला)
शेवगें - शिग्रुकं = शेगवें (शेगवा हा खरा उच्चार). ७ खा व
शेवती - सीमंतिका. मा
शेमळी - शाल्मालिका. खा व
शेलटी - छगल (बोकड) - छगलवाटिका. खा इ
शेलवड - छगल (बोकड ) ,,
शेलवारी - ,, - छगलकद्वरिका. ,,
शेलवाई - ,, - छगलावती. ,,
शेलुडें - छगलवाटं. ,,
शेलू - ,, - छगलकं. ,,
शेवरी - शाल्मलिका. खा व
शेवरें - शर्वरी - शर्वरीकं ३. ,,
शवाडें - शिवाटिका. ,,
शेवाळ - शैवालं. ,,
शेवाळी - शैवाल. २ खा व
शेही - सैंहिक (राहू) - सैंहिका. खा म
शेळगांव - छगल ( बोकड) - छगलग्रामं. २ खा इ
शेळगांव - शैलग्राम = शेळगांव. (भा. इ. १८३३)
शेळावी - छगल (बोकड ) - छगलावहा. २. खा इ
शेळावें - ,, - छगलवहं. ,,
श्याळें - शृगालकं. ,,
श्रावणी - श्रावण (व्यक्तिनाम) - श्रावणिका. खा म
श्रिंगेरी - शृंगगिरि. (शृंगेरी पहा )
श्रीखेड - श्री ( लक्ष्मी ) - श्रीखेटं. खा म
श्रीपुरपाडें - ,, - श्रीपुरपाटकं. ,,
श्रीभुवन - ,, ,,
स्थलनामव्युत्पत्तिकोश
शिरोड - श्रीपद्र = शिरोड, शिरोळ. (भा. इ. १८३६)
शिरोळें - श्रीपद्र. (शिरोड पहा )
शिरोळें - सं. प्रा. श्रीनिलय. भिमथडी, कोल्हापूर, बेळगांव, ठाणें. (शि. ता.)
शिवगंगा - ( शिवगड पहा).
शिवगड - पुण्याच्या दक्षिणेस दहा बारा मैलांवर सिंहगड नांवाचा प्रसिद्ध किल्ला आहे. त्या किल्ल्याचें सिंहगड हें नांव शिवाजीनें तानाजी मालुसर्याच्या स्मरणार्थ ठेविलें; व मराठ्यांच्या इतिहासांत त्याच नांवानें तो किल्ला प्रसिद्ध आहे. शिवाजीच्या पूर्वी मुसलमानांच्या अमदानींत ह्या किल्ल्याला कोंडाणा म्हणत असत. हें नांव मुसलमानांनीं फारशी भाषेंतून ठेवलेलें नाहीं. गडाच्या पूर्वेस कोंडणपूर म्हणून एक गांव आहे, त्यावरून सान्निध्यामुळे कोंडणा असें गडाला मुसलमानांच्या पूर्वीच नांव पडलेलें आहे. “ अस्ति दक्षिणपथे कुंडिनपुरं नामनगरं” हें पंचतंत्रांतील वाक्य सर्वश्रुत आहे. तेंच हें कुंडिनपुर ऊर्फ अपभ्रंशानें कोंडणपुर असावें. परंतु हेंहि ह्या किल्ल्याचे सानिध्यानें नांव पडलेलें आहे; खरें नांव नव्हे. ह्या किल्ल्याचें खरें नांव शिवगड. गडाच्या माचीवरील कोळी आणि कल्याण वगैरे आसपासच्या खेड्यांतील गांवढे ह्या गडाला शिवगड म्हणतात. ह्या गडापासून जी नदी कोंडणपुरावरून पूर्वेकडे शिवापुरास जाऊन वनेश्वरावरून नीरेला मिळते, तिला शिवगंगा म्हणतात. तिच्या कांठीं असलेलें मोठं गांव शिवपूर होय. हें गांव शिवाजीच्या वेळेस अगदीं मोडकळीस आलें होतें. तेथें शिवाजीच्या मनांत एके वेळीं आपली राजधानी करावी असें येऊन, त्या गांवाची चांगली उस्तवारी झाली व त्यास शिवापूर असें नांव पडलें.
(महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)
शिवपूर - (शिवगड पहा).
शिवली - शिवपल्ली (शिव म्हणजे देव किंवा चांगलें). मा
शिवा - शिवा. खा न
शिवापुर - शिवा ( भवानी ). खा म
शीळ - शिला ( ग्रामं ). मा
शुकी - शुका. खा न
शृंगेरी - शुंगगिरि = शृंगइरि किंवा श्रिंगइरि = शृंगेरी, श्रिंगेरी. (भा. इ. १८३३)
शेकसोंडा - शेषशुंडा. खा प
शेंगोळे - शिंबिपल्लं. खा व
शेजवाळ - शय्यापाल:
स्थलनामव्युत्पत्तिकोश
श
शंकरगांव - शंकरीय. सोलापूर. (पा. ना.)
शंकरवाडी - कोल्हापूर. ,,
शकापुरी - शक (लोकनाम) - शककपुरी. खा म
शमळें - शंभलं (कल्किनगर) - शंभलकं. ,,
शहादें-डे - शृंगाटकं = सिंघाडअँ = सिंहाडें-दें = शहादें-डें.
शहादें - सिंहपद्रं- २ खा इ
शहापुर - ४ खा मु
शाटवाड - शाट. यल्लपुर (पा. ना.)
शामखेडें - श्याम (। मैत्रायणि शाखांतर्गत उपशाखा = श्यामखेटं. खा म
शामराळे - शंबर (दैत्यनाम) - शंबरालयं. ,,
शामरोद - ,, - शंबरपद्रं. ,,
शालिबंडा - शालिबंधः = शालिबंडा (स्थलनाम).
शिंगपुरबारी - शृंगपुरद्वार्. खा प
शिंगरवाडी - शृंगारवाटिका. २ खा नि
शिंगारवाडी - ,,
शिंगाशी - सिंहकर्षा. खा इ
शिंदखेड - (सिंदखेड पहा).
शिरकी - सं. प्रा. सीहरख्खी (सिंहरक्षा). पेण. (शि. ता.)
शिरगांव - श्रीग्रामं. मा
शिरगांव - श्रीग्राम Name of place = शिरगांव.
श्रीपुर = शिरपुर.
श्रीवाटकं = शिरवडें, शिरोड, शिरूड.
शिरढोण - श्रीवर्धनं = शिरढोण (ग्रामनाम).
शिरपुर - श्रीपुर- (शिरगांव पहा)
शिरूड = श्री (लक्ष्मी) - श्रीवाटं. ४ खा म
शिवणें - शिववनं. मा
शिरवड - श्रीपथ = शिरवड -ळ. राजमार्गवरील ग्राम.
शिरवडें - श्रीवाटक. (शिरगांव पहा)
शिरवळ - श्रीपथ. (शिरवड पहा)
शिराळें - शिरःपल्ली = शिरोळी, शिराळी.
क्षुद्र पल्ली ला पल्लं म्हणत.
शिरःपल्लं = शिराळें.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
वेल्हवळी -वेल्लपल्ली (झाडावरून). मा
वेल्हाणें - वेल (बाग, कुंज). वेलवनं. ३ खा व
वेल्हें - वेलकं. खा व
वेश्म - वेश्माकं. वडोदें. (पा. ना.)
वेश्वी - वेश्मकं. अलीबाग, दांपोली, पनवेल. (पा. ना.)
वेसगांव - र्वश्यग्रामं- ३ खा म
वेहरगांव - विहार (बौद्धभिक्षूंचें वसतिस्थान. खा नि
वेहरदड - विहार (बौद्धभिक्षूंचें वसतिस्थान) - विहारदरः खा नि
वेहळगांव - विहार (बौद्धभिक्षूंचें वसतिस्थान)- विहारग्रामं. खा नि
वेहेरखेडें - विहार (बौद्धभिक्षूंचें वसतिस्थान) - विहादर: खा नि
वेहेरगांव - विहारग्रामं (बौद्धांच्या विहारांवरून). मा
वेळदें - वेल (बाग, कुंज) = वेलापद्रं. खा व
वेळाणें - बैलायन. (पा. ना.)
वेळावद-वेल (बाग, कुंज) - वेलावर्त. २ खा व
वेळी - वेल (बाग, कुंज) - वेलिका. खा व
वेळोदें - वेल (बाग, कुंज)- वेलपद्रं. ,,
वैजनाथ - वैद्यनाथकं. खा म
वैजापुरघाट - (गांवावरून् ). खा प
वैजाली = वैद्यनाथपल्ली, एकशेष. खा म
वोझर - उज्झर (वाहाता नाला). ४ खा नि
वोझरदें - उज्झर (वाहाता नाला) - उज्झरपद्रं. खा नि
वोडोरें - वोढ़्र ( अजगर)- वोढ्रपुरं. खा इ
वोढरी - ,, ,,
वोदगांव - उद्र (ऊद ) - उद्रग्रामं- २ ,,
वोरखेडें - वोर (कुळीथ). खा ब
वोरपाडा - वोर (कुळीथ). ,,
वोरली - वोरपल्ली. ३ ,,
वोर्हें - वोर (कुळीथ) - वोरकं. ,,
वोसरेल - उज्झर (वाहाता नाला) उज्झरोवरें. खा नि
वोहरडें - वधू (नवरी) - वधूवरवाटं. खा म
वोळेबोली - वोढृ (नवरा) - वोढृवोद्री - नवरानवरी. खा म
व्याऊर = व्याघपुरं. खा म
व्यावल - व्याप्य ( कुष्ट) = व्याप्यपल्लं. खा व
व्याहाळें - व्याधपल्लं. खा
स्थलनामव्युत्पत्तिकोश
वीरडी - व्रीहिमती. (पा. ना.)
वीरण - वीरणकं. मालवण. ,,
वीरणकोप - वीरणकं. बेळगांव. ,,
वीरणजें - ,, कारवार.
वीरदेल - वीरुधवेरं. खा व
वीरपुर - वीर, वीरा ( अनेक वनस्पति ). खा व
वीरवाडी - व्रीहिमती. ( पा. ना.)
वीरवाडें - वीर, वीरा (अनेक वनस्पति ). खा व
वीरसत - वीरछद. ,,
वीराई - व्रीहिमती. (पा. ना.)
वीरें - वीरेयं. ठाणें. (पा. ना.)
वुपकरी - यूपकागरिका. खा म
वेंकटापूर - विकंकटकं. वेंकट हा शब्द विकंटक या शब्दापासून निघालेला आहे. कोल्हापूर, धारवाड. (पा. ना.)
वेकरवाडी - वैकर्यं. नगर. ,,
वेग्रें - वैग्रहिः भोर. ,,
वेटवडें - वेटमत्. कोल्हापूर. ,,
वेटोशी - वेतसकीयं. रत्नागिरी. ,,
वेणगांव - वैणुकीयग्रामं. वेणु ज्यांत पुष्कळ आहेत तें. वैणुकीयं.
वेणुपुरी - वेणुकं. भोर. (पा. ना. )
वेदाणें - वैद्यनाथवनं, एकशेष. खा म
वेदं - वेदि. भोर. (पा. ना. )
वेरटिऊ - वैरत्यं. काठेवाड. ,,
वेरुळी - वेल (बाग, कुंज) - वेलपल्ली. २ खा व
वेरुळी - विहारालय. (वेरूळ पहा)
वेरुळी - वैदूर्यिका. (वेरूळ पहा)
वेरुळी - सं. प्रा. वेलापूर. (शि. ता. )
वेरुळें - ,, ,,
वेरूळ - ,, ,,
वेरूळ - वेल (बाग, कुंज) - वेलापल्लं. खा व
वेरूळ - दौलताबादेजवळ वेरूळचीं लेणीं प्रसिद्ध आहेत. वेरूळ शब्द विहारालय शब्दाचा प्राकृत अपभ्रंश आहे. लहान विहारालय म्हणजे वेरुळी. वांईच्या उत्तरेस अंबाड खिंडीजवळ डोंगरावर वेरुळी म्हणून गांव आहे. वेरुळीचा येरुळी हा अपभ्रंश आहे.
(महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)
वेरूळ - वैदूर्यकं, वैदूर्यिका = वेरुळ, वेरुळी. place name.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
विजापुर - विजापकपुरं. (पा. ना.)
विजोटें - विंध्या (पर्वत नाम) - विंध्यावाटं. खा म
विजोरी - विजापक. सोलापूर. (पा. ना. )
विटनेर - विट (उंदीर) - विटनीवरं. खा इ
विटवें - विट (उंदीर) विटवहं. ,,
विटाई - विट (उंदीर ) - विटावती. ,,
विटावें - विट (उंदीर ) - विटवहं. खा इ ,,
विटेवाडी - विट (उंदीर) - विटकवाटिका. २ ,,
विठ्ठलपुर - } विठ्ठल. खा म
विठ्ठलपुरी - }
विडगांव - विट (उंदीर) - विटग्रामं. खा इ
विढिधर - विदेहग्रहं. कुलाबा. (पा. ना.)
विढी - विट (उंदीर) विटी. खा इ
विढें - विदेह. ठाणें. (पा. ना.)
विदगांव - विद्धा (सातवीण ). खा व
विन्ध्य - विध् फोडणें - अर्थ विदारावयाचा, फोडावयाचा, शिरकाव करावयाचा. (संशोधक वर्षे २)
विराणें - वीर, वीरा ( अनेक वनस्पति ) - वीरवनं. खा व
विरापूर - व्रीहिमती. (पा. ना.)
विरावली - वीर, वीरा (अनेक वनस्पति). २ खा व
विरोदे - वर, वीरा (अनेक वनस्पति). खा व
विरोदें घाट - (गांवावरून ). खा प
विरोळें - वीर, वीरा ( अनेक वनस्पति) - वीरपल्लं. खा व
विवरें - विवरं - विवरकं. ३ खा नि
विशाली - विशालीय: बडोदें. (पा. ना. )
विशाळगड - ,, कोल्हापूर ,,
विश्वनाथ - विश्वनाथकं. खा म
विषनवाडी - विषमीयं. बेळगांव. (पा. ना. )
विसरवाडी - विश्राम - विश्रामवाटिका. खा नि
विसापुर - विश्वनाथपुरं (एकशेष ). ३ खा म
विसावाबारी - (गांवावरून). ख प
विसाळे - वैशालीयं. सूरत. (पा. ना.)
विहीरकुवें - विवरं-विवरिकाकूपं. खा नि
वीर - व्रहिमती. (पा. ना.)
वीरखोल - वीरखोलि. खा व
वीरगांव - वीर, वीरा ( अनेक वनस्पति). ,,
वीरचक - वीरचक्रं. ,,
स्थलनामव्युत्पत्तिकोश
वाल्हेरीबारी - वाल्मीकगिरिद्वार्. खा प
वावडधें - व्यावर्तक (टांकळा). खा व
वावडी - वायुदत्तेयं. सातारा. (पा. ना.)
वावडें - ,, खानदेश. ,,
वावाद - व्यावर्तक (टांकळा ). खा व
वावर - बर्बर-महाराष्ट्रीय बर्बर, वर्वर. (पा. ना. )
वाबरघाट - बर्वर (लोकनाम) - वर्वरघट्टः खा म
वावरलें - बर्बर - महाराष्ट्रीय → बर्बर, वर्वर. (पा. ना.)
वावरें - वर्वरं. खा व
वावी - वापी. २ खा नि
वावेळी - वातागरीय. नाशिक. (पा. ना.)
वाशळें - वासिलः ठाणें. ,,
वासखेडी - वाशा. खा व
वासगांव - वासवेयं. कुलाबा, ठाणें. (पा. ना.)
वासटें - वासिष्ठायनिः जव्हार. ,,
वासर - वत्सतरं ( वासरूं) - वत्सतर. खा इ
वासरडी - वत्सतरं ( वासरूं) - वत्सतरवाटिका. खा इ
वासरें - वत्सतरं (वासरूं ) - वत्सतरं. ,,
वासवें - वासवेयं. सूरत. (पा. ना.)
वांसोटा - वंशावती. सातारा. ,,
वाहरडी = वागुरावाटिका. खा नि
वाहागांव - वाहीक. पुणें, सातारा. (पा. ना.)
वाळकी - व्याल (वाळा, सर्प) - व्यालकी. खा इ
वाळकी - } वालिकायन. ( पा. ना. )
वाळवें - ब्यालवहं. (वाल्हवें षहा )
वाळवें - सं. प्रा. वळ्ळावी. सातारा. ( शि. ता.)
विकवेल - विक्क (तरुण हत्ती ) - विकवेलं. खा इ
विखरण - विक्षीर (रुई.)- विक्षीरवनं. खा व
विखुरलें - विक्क (तरुण हत्ती ) - विक्कतरपल्लं. खा इ
विघवली -विगर्हिन्. कुलाबा. (पा. ना.)
विघ्रवली - विगर्हिन्. रत्नागिरी. (पा. ना.)
विंचखेडें - वृश्चिकखेटं. ४ खा इ
विचूर - वृश्चिकपुरं. ,,
विंचूर - वृश्चिकपुरं. ,,
विंचोर - वृश्चिकपुर. २ ,,
विजखेडें - विंध्या (पर्वत नाम) - विंध्यखेटं. खा म
विजगांव - विंध्या (पर्वत नाम ) - विंध्यग्रामं. ,,
स्थलनामव्युत्पत्तिकोश
वाडिवळें - वृद्धपल्लं (बौद्ध वृद्धाचें गांव). मा
वाडी - वाटक - वाटिक. ७ खा नि
वाडें - वाटक-वाटकं. ,,
वाण - वर्णु (देशनाम व नदीनाम ) - वार्णवं. खा म
वाणशी - वनसं. भडोच. (पा. ना.)
वाणिवडें, वाणिवली - वाणिजकविधं. ,,
वाणेगांव - वणिज् - वाणिग्ग्रामं. खा म
वानरखड़े - वानरखेटं. खा इ
वानवडी - वनवाटी.
वाभळें - वर्वूर. खा व
वामखेडें - वाम (कामदेव) - वामखेटं. खा म
वामणोद - ब्रह्मी. खा व
वामूरी - ब्रह्मपुरी = बामउरी = बामुरी = वामूरी = वामोरी. (ग्रंथमाला)
वामोरी - ( वामूरी पहा ).
वायगांव - वायक (साळी) - वायकग्रामं खा म
वायपूर - वायक (साळी) - वायकपुरं. खा म
वार - वाराह ( डुकर) - वाराहं २ खा इ
वारणा - वरुण - वारुणं. नदी. (पा. ना.)
वरयाव - सं. प्रा. वरिआवी. ( शि. ता.)
वारशें - वाराह (ड़कर) - वाराहकर्ष. खा इ
वारसी - वाराह ( डुकर ) - वाराहकर्षा. ,,
वाराही - वाराहक: पालणपूर. (पा. ना.)
वारुंजी - वरुण - वारुणं. कर्हाड. (पा. ना. )
वारुण - वरुण - वारुणं. महाल. ,,
वार्जें - वर्ज्यं. पुणें. ,,
वार्जें - वृजि. ,, ,,
वार्णूल - वर्णु. कोल्हापूर. ,,
वालखेडें - व्याल (वाळा, सर्प) - व्यालखेटं. खा इ
वालगोड - वल्गु. होनावर. (पा. ना.)
वाल्हवें - व्याल (वाळा, सर्प) - व्यालवहं = वाल्हवें, वाळवें. खा इ
वाल्ही - बाल्हीक. (पा. ना)
वाल्ही - वलभी. ठाणें. ,,
वाल्हें - बाल्हीक. ,,
वाल्हें - वलभी. पुणें ,,
वाल्हेरी - बाल्हीक. ,,
वाल्हेरी - वलभी. ,,. धा. ४२