ह
हकाटा [ हक्कार: । ( धातुकोश-हकार १ पहा)
हकारा [ हक्कारः } ( धातुकोश-हकार १ पहा)
हकारुनि [ आकार्य्य = हक्कारिअ = हकारुनिया ] (भा. इ. १८३२)
हगणें १ [ हद, (हग ) पुरीषोत्सर्गे ] ( ग्रंथमाला )
-२ [ अघ् १, ११ निंदायाम्. अघ् पाप करणें, चुकणें. अघनं = हगणें ] उ०- येथें आपण हगलांत म्ह० चुकलांत. ( धा. सा. श. )
हगरड [ हदिरवाटिका = हगिरवाडी = हगरड ] हगरड म्हणजे गुवामुताचा उकिरडा.
हंजा [ हृद्या (प्रिया) = हज्जा = हंजा ] नाटकांतील नायिका आपल्या सहचरीला प्राकृतांत हंजे म्हणजे प्रिये, my dear, म्हणत. संस्कृतांत हृद्ये, प्रिये, हे शब्द असत. टीकाकारांना हंजा हा शब्द हृद्या शब्दापासून निघतो, हें माहीत नव्हतें. ते हा शब्द देश्य समजत !!! देश्य म्हणजे अनिर्वचनीयअव्युत्पाद्य.
हजार [ सहस्त्र = हहझर = हजर = हजार ] हजार हा शब्द फारसींतून मराठींत आलेला नाहीं. उघड उघड सहस्त्र या संस्कृत शब्दापासून निघालेला आहे. स चा हा प्राकृतांत होतो. सें, शें, शेंभर, शंभर, लक्ष, लाख, कोटि. क्रोडि, क्रोडं वगैरे सर्व संख्यावाचक शब्द संस्कृतांतून आलेले आहेत. त्यांच्याप्रमाणें च हजर, हजार, हज्जार हा हि शब्द संस्कृतोत्पन्न आहे. (भा. इ. १८३३)
हजारी [ सहस्री = हहजरी = हजारी ] हजारी कारंजें.
हट् [ अट् = हट् (संबोधने, निपात ). अट् ( अव्ययप्रकरणम्, संबोधने ] (भा. इ. १८३३)
हटकन्, हटदिनि [ चटकर पहा]