श्री.
पौष व. २ शनिवार शके १७१५ ता. १८ जानेवारी १७९४.
मामुली अखबार छ. ५ माहे जाखर बुधवार ते छ. १४ रोज शुक्रवार.... छ.७ रोज शुक्रवारीं........आवसे परगण्यांतील येक गांवचे पाटलानें पुत्राकरितां नवाबास मानत केली होती. त्यास पुत्र जाला. सबब त्यास पाटलानें आणोन नवाबाचें पायावर घातलें. मानत केली. पाटलास शंभर रुा। नगदी व वस्त्रें मुलास नवाबांनीं इनायत केली................र।। छ. १५ जाखर हे विज्ञापनो.
छ. १७ जाखरीं रामचंद्र भिरघ्या समागमें.
श्री.
पौष व. ४ सोमवार शके १७१५ ता. २० जानेवारी १७९४.
श्रीमंत राजश्री---------------- रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं--------------------
विनंती सेवक गोविंद राव कृष्ण कृतानेक सा नमस्कार. विनंती विज्ञापना, ता। छ. १७ माहे जाखर पर्यंत मु।। बेदर येथें स्वामीचें कृपावलोकने करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असें विशेष. स्वामीचे सेवेसीं येथुन पक्षियर त्याची जोडी दोन पिंजरे समवेत पा आहे. हे जोडी नानाप्रकारचे पांखराच्या बोल्या त-हेत-हेनें बोलत आहेत. व येकास येक लढाईही चमत्कारानें करीत असतात. हे पाखराची जोडी सरकारचे शिकारखान्यांत असण्या योग्य जाणुन रवाना केली आहे. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसीं प्रविष्टं करितील. उत्तर खाना व्हावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
र।। छ १९ जाखरीं डांकेवर.