श्री
पैाष वा ६ बुधवार शके १७१५ ता. २२ जानेवारी १७९४.
श्रीमंत रावसाहेव यांस मामुली हवाल्याचें पत्र,
श्री
पौष ६ बुधवार शके १७१५ ता. २२ जानेवारी १७९४.
विनंती विज्ञापना. नवाब कमठाण्याहून कुच करून पांपाड व बारोंचीस जाण्याचा बेत ठरला होता. याची ता। विनंती पेशजी लिहिली. त्यास पांपाड बारोंचीकडे जाण्याचें तुर्त मवकुफ होऊन छ १९ तारखेस नवाब कमठायाहून कुच करून किले बेदरास येण्याचें ठरलें. च्यार पांच दिवस बेदरांत राहून मग जनवाडा येथून तीन कोसांवर नैरुत्येकडे कारेमुंगी परगण्याचा गांव, येथें जाऊन राहण्याचा बेत जाला आहे. दौला जनवाड्यास जाऊन जागा पाहून आले. तेथील नक्षा करुन नवाबास आणून दाखविला. जनड्यांत लोकांची घरें होतीं, तीं तमाम खालीं करविलीं. गांवांत जाऊन नवाब राहणार. वाडा कमठाण्यास होता तो उठऊन जनवाड्याकडे नेउन बसविला आहे. पेषखाना डेरे वगैरे सरंजाम जनवाड्याकडे गेला. राज्याजीस ताकीद जाली कीं तुह्मीं जनवाडयास जाऊन तेथील राहण्याचा बंदोबस्त मिसलबंदी सुद्धा करणे. त्यावरून राज्याजी दोन दिवसांपासोन नेहमीं तेथें आहेत. जनवाड्याचे गांवाबाहेर पेठेची वस्ती आलाहिदा होती, तेथीलही घरें झाडून रिकामीं करविलीं. नवाब बेदरास येऊन च्यार पांच दिवसांनंतर जनवाडयास जाऊन राहाणार. तेथें किती मुकाम होतात व पुढें तेथून कोणीकडे शिकार करीत जाणार हें निदर्शनास येईल त्याप्रा। विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल, कारेमुंगी तालुका सरबुलंदजंग पागावाले यांजकडे आहे. त्यांनीं दोन तीनसें लोक सिंवाराचे रखवालीकरितां ठेविला आहे. तथापि कहीकवाडाचा उपसर्ग लोकांचा होतच आहे.. छ १८ जाखरीं कमाठणें येथें बागड जाली. छ. १९ अगर २० या दोन तारखेंतून येके तारखेस कुच करुन नवाब बेदरचे हवेलींत येणार. हवेलीचा झाडा जाला. रा। छ. १९ माहे जाखर हे विज्ञापना.