[ १४७ ] श्री.
˜ श्री °
श्रीमत्कान्होजीसंभूत
शंभो. शत्रूज्जिगीषत. ।
वर्धिष्णू राजरेखेव मुद्रा
भद्रा विराजते ।।
राजश्री नारो पंडित गोसावी यांसीः - सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी राजामन्य स्ने।। संभाजी आंगरे सरसुभेदार आरमार रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष. रा। भास्करराऊ याजबराबरी पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थश्रवणें समाधान जाहालें. सारांश वर्षासनपत्राविशीं लेख केला तरी पत्र तें अगोदरच लिहून ठेविलें होतें. आपणाकडेस पाठवावें तों भास्करराऊ कागद घेऊन आले. याजवळ हल्लीं पत्र पाठविलें असे. केल्या वचनास अंतर सर्वथैव होणार नाहीं. वरकड श्रीस मंदिल व देवीस सोंवळ्याविशीं लि।। तरी प्रस्तुत तें अनुकूल न पडें. पुढें अनुकूल करणार श्री समर्थ असे बराबरील समुदायास वस्त्राविशीं लि।। तरी पांच श्रीवेष्टेनें व साडीचोळी पाठविली असे. श्रीच्या देवळास फणसाचीं झाडें देविलीं असेत. धान्याविशीं लि।। तरी प्रस्तुत धान्याची चणचण बहुतच असे. मासपक्षानें अनुकूलता खामखा करून पाठविली जाईल. कळलें पाहिजे रा। छ ७ माहे सफर. हे विनंती.
मोर्तबसूद.