श्री.
फाल्गुन शु. ६ शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४.
विनंती विज्ञापना. नवाबाचे सरकारांतुन सवाई नाईक पुण्यास पेशज। पुण्यास गेला होता. तो तिकडुन येथे छ. ३० रजबी आला. राजश्री कल्याणराव व बाबाराव गोविंद यांची पत्रे समागमें घेऊन आला ती दौलास देऊन दौलाचे व सवाई नाइकाचे बोलणे च्यार साहा घटका जालें. त्याजवर दलांनी नवाबास अर्जी पाठविली त्याजवरुन सवाई नाइकास घेऊन येणे ऐसा हुकुम जाल्या बमोजीव दौला नाइकास आपले बराबर घेऊन नवाबाकडे गेले. नवाबांनी सवाइ नाइकास वर्तमान विच्यारिलें. याने अर्ज केला. कल्याण राव व बाबाराव यांची पत्रे दौलांनी दाखविली. त्याजवर दोन घटका दौलास खिलवत जालें, सवाई नाइक नासिक प्रांताकडे गेला होता ह्मणोन ऐकण्यांत. राा छ, ४ घाबान हे विज्ञापना,