[ १५० ] श्री.
˜ श्री °
श्रीमत्कान्होजीसंभूत-
शंभो. शत्रूज्जिगीषतःll
वर्धिष्णूराजरेखेव मुद्रा
भद्रा विराजते ll
राजश्री नारो पंडित गोसावी यांसीः -सकलगुणांलकरण अखडितलक्ष्मी अलंकृत राजामान्य स्ने ।। संभाजी आंगरे सरसुभेदार आरमार रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. आमची स्वारी रामदुर्गी होणार आहे ते समयीं श्रीची व आपली भेटी होईल. वरकड आपणाजवळ दक्षिणावर्ती शंख आहे ह्मणोन आइकतों. ऐशास, आपले आशीर्वादाची एक वस्त आह्माजवळ असावी, त्याजकरितां हें पत्र आपणास लेहून माहादो बाबाजी पाठविला आहे.तरी स्वामीनी सदय होऊन आशीर्वादक शंख अगत्यरूप पाठविला पाहिजे. आपण तपस्वी, थोर. आपले हातींची वस्त आह्मांजवळ असावी तेणेंकरून सदासर्वकाळ स्वामीचें स्मरण राहील याजकरिता प्रसादात्मक पाठवावी. सदासर्वकाळ पूजा करून नमस्कार करू, तेव्हां आपलें स्मरण दिन प्रतिदिन होईल ते केलें पाहिजे सुज्ञाप्रति विशेष काय ल्याहावें. कृपा वर्धमान करावी. हे विनंति.
मोर्तबसूद.