श्री.
आहसनुदौला व राजे कृपावंत यांनीं आपले मोहरेनसीं वसुलाची याद पाठविली व रसिदीच्या नकला पाठविल्या. त्यांत १६८९५|| याची रसीद नाहीं. हे मजुरा द्या ऐसें मध्यस्ताचें ह्मणणें. याजवर आमचें बोलणें, रसीद नाहीं. तेव्हां मजुरा देत नाहीं. तेव्हां मध्यस्तांनीं फारसी पत्र आहसनुदौलास दिल्हें. त्याचा तरजुमा मुबलग १६८९५॥॥। सोळा हजार आठसें पंच्याणव रुपये सव्वाचौदा आणे, येक लाख ऐकावन हजार दोनशें रुपये सवा तेरा आणे. पै॥ तनखाचे ऐवज पै। बाकीबाबत चौथ व बाबती व सावोत्रा वगैरे राव पंत प्रधान बाबत माहलांत सुभे महमदाबाद तालुके जफरुदौलात रुपये दिल्हे नसल्यास सदरहू रु। जलद निशा करून रसीद घ्यावी.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)