Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

अशीशी १ [ अशिश्वी childless woman = अशीशी ] ती अशीशीच आहे = a childless luckless barren woman.

-२ [ ईषदीषद्] ( अशी पहा)

असच [ असत्यं = असच्च = असच ]
तो असच बोलतो = सः असत्यं वल्हति येथें असच म्हणजे ईदृक् असा अर्थ करण्याचा मोह होऊं देणें योग्य नाहीं.

असन ( वृक्षविशेष ) [ असनकः = असन ]

असा [ ईषदीषद् ] (अशी पहा)

असाच [ अशीच १ पहा]

असासा [ ईषदीषद् (अशी पहा)

असूक [ असृक् = असूक Moenorrhagia ]

असो [ अस्तु = अस्सु = असो (निपात) ] ( भा. इ. १८३३)

अस्तमान (संध्याकाळ) [ अस्तमयन = अस्तमअन = अस्तमान ] ( भा. इ. १८३६ )

अस्ताव्यस्त [ अस्तव्यस्त = अस्ताव्यस्त. स्त च स्तः उच्चारसुखार्थ ] (भा. इ. १८३६)

अस्वल ( पशुविशेष ) [ ऋक्ष + ल ( स्वार्थक ) = अक्षल = अस्वल. क्ष = स्व. ऋ = अ ] (भा. इ. १८३४)

अस्सँ [ अंजसा = अँस्सा = अस्सँ (Really, in fact ) ] कोणी कांहीं विधान केलें असतां खरेंच कीं काय, या अर्थी अस्सँ हा निपात मराठींत योजतात. तो अंजसा या संस्कृत निपातापासून निघाला आहे. अस्सँ म्हणजे खरेंच कीं काय ? अस्साँ असा उच्चार अशिष्ट लोक करतात. (भा. इ. १८३३)

अहा ! [ अह ! पूजायां निपात: ) = अहा ! ] अहा ! हा निपात मराठींत पूजा दाखवितो. (भा. इ. १८३६)

आहेवपण [ अवैधव्य = अहेवपण ]
( सरस्वतीमंदिर-गोतवळा-आश्विन शके १८२७)

अळँ [अलम्; (निषेधाथें) = अळँ]

विद्येच्या नांवानें अळँ म्हणजे निषेध, नास्तित्व.

अळंकारणें [ अलंकृ = अलंकार (णें) ] (भा. इ. १८३६)

अळकुडी-डें [अलुककूटं = अळुअकूडं - अळकुडें-डी

अळवणी [ आलवण्यं = अळवणी ] बाया चातुर्मासाचें अळवणी म्हणजे मीठ न खाण्याचें व्रत धरितात

अळवणें [अलयति = अळवणें. अल् भूषणपर्याप्तिवारणेषु] अळवणें म्हणजे सांतवणें. ( धा. सा. श. )

अळणी [अलवण = अळण (णा-णी-णें ) ] मीठ नसलेला किंवा कमी पडलेला पदार्थ. (भा. इ. १८३२)

अळशी [ अतसी = अडशी = अळसी, अळशी ] (भा. इ. १८३२ )

आळा [ अल् to prevent निवारणे = अळा ] अळा घालणें to put an obstacle in the way.

अळुकी [ आर्तिका = आळिकी = आळुकी = अळुकी ]
आर्ति म्हणजे अत्युत्कट इच्छा, संकट. (ज्ञा, अ. ९ पृ. ९)

अवा [अवावा ( ब्राह्मणाची बायको) = अवा] अवावा ब्राह्मणी. (भा. इ. १८३४)

आवाच्या सवा १ [ अमात्यसमं = अवाच्यसवं = अवाच्यसवं. हें क्रियाविशेषण आहे ]

स क्षुद्रः अमात्यसमं व्रूते = तो क्षुद्र अवाच्या सवा बोलतो. अवाच्या सवा म्हणजे थोर प्रधानासारखें, आपल्या तोलाहून जास्त. स अमात्यसमं मूल्यं व्रूते = तो अवाच्या सवा किंमत सांगतो; जशी थोर अमात्य मोठी किंमत सांगेल तशी तो सांगतो. (भा. इ. १८३५)

- २ [ सपाद = सवाअ = सवा
अपाद = अवाअ = अवा
स्य: = त्य: = च्या

अपादः स्यः सपादः = अवा च्या सवा ] पाव नसलेला सवा = पावाखेरीज सवा = म्हणजे अशक्य; एकावर पाव असल्याखेराज सवा होत नाहीं. सबब, कोणी मनुष्य कांहीं अशक्य कोटींतील गोष्ट बोलूं लागला म्हणजे पावाखेरीज सवा करूं जाणार्‍याच्या कोटींत त्याची गणना करण्याचा प्रघात महाराष्ट्रांत आहे. (भा. इ. १८३४)

अवीट [ इष् ९ भृशार्थे, आभीक्ष्ये । इष्णाति. अवेष् = अवीट] अवीट म्हणजे अतिशयित, अतोनात. (धा. सा. श.)

अवो [ (प्रा. ) अव्वो = (म. ) अवो ] निमंत्रणार्थी अवो शब्द दासोपंताच्या पदांत फार येतो. (ग्रंथमाला)

अव्हेरणें [ अवधीरणं = अवहीरणँ = अव्हेरणें ] (भा. इ. १८३४)

अशी [ ईषदीषद्= ईसीसि = अशीशी, अशी, असासा, असा]
अशी इकडे वळ turn hither a little.

अशीच १ [ आशिश्वी (जीस मूलबाळ नाहीं ती बायको ) = अशीच ] अशिश्वी म्हणजे मूलबाळ नाहीं ती स्त्री हा पहिला अर्थ. नंतर बेफिकीर, बेजबाब, अस्तव्यस्त स्री असा दुसरा अर्थ.

ती बाई अशीच आहे, येथें अशीच म्हणजे अव्यवस्थ. अशीच या शब्दाचें पुल्लिंग असाच.
अस या सर्वनामाचा येथें कांहींएक संबंध नाहीं. ( भा. इ. १८३६)

-२ [ अशिश्वी = अशीस = अशीच]
ती बाई अशीच आहे म्हणजे तिला मुलेंबाळें नाहींत. मुलेंबाळे न होणें हा स्त्रियांत दोष गणतात.

अर्जुनी - पांढर्‍या गाईला विशेष नाम. अर्जुनी गवि (विश्वमेदिन्यौं ) उणादि ३४५ तत्त्वबोधिनी. (भा. इ. १८३३)

अर्बाचर्बा - अर्बताचर्बता = अर्बाचर्बा. अर्बचर्ब गतौ.
अर्वाचर्वा म्ह० जातां येतां. अर्बाचब खातो म्हणजे येतांजातां खातो.

अर्वाचर्वा १ [ चर्ब् १ अदने. चर्ब = चर्वा, चर्बा. अर्वाचर्वा ] ( धा. सा. श. )

-२ [अर्बताचर्बता] (अर्बाचर्बा पहा)

अलगज्, अलगत् [लग् १ गतौ. अलगत् = अलगत् = अलगज़ ] अलगत् म्ह० कोठेंही न लागतां. (धा. सा. श.)

अलला ! अलल ! [ अललाभवन्त् Sounding merrily = अलला (ऋग्वेद ४-१८) ]

अलुता, अलुतें [ अल् to adorn = अलितृ = अलुता Supernumerary village-servants. अलितं = अलुतें Perquisites of supernumarery village - servants.

अलुमालु ( ज्ञानेश्वरी ) [ अल्पंअल्पं = अलुमालु ]

अलोट [ लुट् बोलणें ह्या धातूपासून लोट = नकारार्थी अलोट ] = अनिर्वचनीय. अलोट शहाणपण = अनिर्वचनीय शहाणपण. (ग्रंथमाला)

अल्याडपल्याड [ आरांत्तात् परात्तातू ] ( आलाडपालाड पहा)

अल्लाद [आरात् (जवळ, संनिकृष्ट) = आलाद् = अल्लाद् ] त्यानें चेंडू अल्लाद् झेलला = तेन चिंधुकः आरात् सेलितः. (भा. इ. १८३४)

अवघड [अवघटं]

अवचित्-ता-ती [ आहोस्वित् = आवोचित्= अवचित्-ता-ती-तें ] (भा. इ. १८३३)

अवढणें [ ध्वन् १ शब्दे. अवघ्वनं = अवढणें (अरुची)]
ध्वनी म्ह० वास, गंध, रुचि.
ध्वन, ध्वन, ध्वन = ढण् ढण् ढण्. (धा. सा. श.)

अवदसा [ अपसदा = अवदसा, औदसा ] a contemptible, low woman.

अवर्जणें [ वृज् १० वर्जने, त्याग करणें. अवर्जनं = अवर्जणें] अवर्जून म्ह० त्याग न करतां, न वगळतां, मुद्दाम. ( धा. सा. श. व भा. इ. १८३३)

तयाचे अगणित महिमान ।। सर्व क्षेत्रि जयासिं शरण ।।
तेथे सूर्याचि आंगवण ।। पुरु सके ॥ २६ ॥
मंत्रविद्या संपूर्ण ।। युद्धी महादारुण ।।
पवाडे बंदिजन ।। म्हणति ज्याचे ।। २७ ॥
सूर्य जिंतिला क्षण न लगतां ॥ शरण म्हणोनि रक्षिलें आदित्या ।।
मग सुलक्षणा अर्पिली दुहिता ॥ श्रावणा लागी ।। २८ ॥
तेथोनि सोमवंश आधार ।। धरिला असे साचार ।।
परंपरा भविष्योत्तर ।। सांगतसे ॥ २९ ॥
           सोभद्र १        परीक्षिती २        भीम प्रदिप्त ३
               शांतन ४          विचित्रवीर्य ५          पंडु ६
                                  अर्जुन ७
पांडवकथा अनुपम्य ।। अनुपम्य वदला ऋषिवर्य ।।
शोमवंशि नृपवर्य ।। महाक्षेत्रि दारुण ।। ३० ।।
ज्यांसि कळिकाळ शरण ।। क्षेत्रधर्मि निपुण ।।
ज्यांसि साह्य नारायण ।। सर्वार्थि तीष्टत ॥ ३१ ॥
बळाढ्य भीमा सारिसा ।। कवण पुरे तयाचे आयासा ।।
मुशळ गदा अतुल्य बहुवसा ।। प्रचंड जी हे ।। ३२ ॥
तैसा च अर्जुन शुभट ।। जो क्षेत्रिया माजि मुगुट ॥
हनुमा ध्वजस्तंभि नीकट ।। पणि जिंतिला ।। ३३ ।।
जेण्हे अधोदृष्टि वींधिलें चित्र ।। श्रुभद्रा जिंतिली पवित्र ।। ३३ ।।
अभिमन्य तयाचा कुमर ।। त्याची परंपरा ।। ३४ ॥
जे नांदति हस्तनापुरी ।। त्याची परंपरा चालली अवधारी ।
ते कथा सांगितली कुसरी ।। भविष्योत्तर पुराणी ॥ ३५ ॥

अबोटी  [व्युढ married, व्युढता marriedness. अव्यूढता unmarriedness = अबोटी] unmarried state, Bachellorship.
जाततेन प्रसंगें । स्त्रीदेह सिवणें आंगें ।
तेथौनि देह आवघें । अबोटी कीजे ॥ ज्ञा. १७-२१०

अंबोली [अंबुपल्ली = अंबोली ]

अब्द [ आ + पद्]

अब्दणें [पद् ४ गतौ. आपद् पासून मराठी क्रियापद अब्दणें ] अब्दणें म्हणजे आपद्, संकट, कष्ट सोसणें. ( धा. सा. श. )

अब्दा [आपद्, आपदा ] (आबद पहा)

अंब्या [ अंबिआ पहा]

अभंग - अभंग म्हणजे पर्यायोक्ति, व्यंजना लक्षणा वगैरेंच्या द्वारा बोलण्याचा प्रकार. अभंग म्हणजे खडे बोल, वाच्यार्थानें स्पष्ट बोलण्याचा प्रकार. त्यांत पर्यायानें आढेवेढे घेऊन बोलणें नसतें. जें काय सांगावयाचें तें उघड उत्तान अर्थानें व शब्दांनीं सांगावयाचें. (भा. इ. १८३३)

अभ्रा [ अंबरकः = अंब्रा = अभ्रा, आभ्रा] अंगरख्याच्या आंत लावलेलें जोड कापड.

अंमळ [ अम्नर् ( अल्पार्थे निपातः ) = अम्मल = अंमळ] (भा. इ. १८३४)

अमुक [ अमुष्य = अमुक ] This one. अमुष्य हें नाम आहे. ष्य हा षष्ठीचा प्रत्यय सर्वनाम आहे.

अमूप [ अनुपम = अनुप अँ = अमूप, मूप, मोप, म्होप] - (भा. इ. १८३२)

अरबट [ अपभ्रष्ट = अरबट्ट = अरबट ]

अरर ! अररे ! (अव्यय, घाई दाखविणारें ) [ अररे = अररे, अरर ] (भा. इ. १८३६)

अरेहल्या [ आर्यहलं ( बलात्कारे निपातः) = अरेहल्या ] पाणिनीच्या वेळेपासून हा निपात बैलांना हाकतांना करीत आले आहेत. (भा. इ. १८३४)

अर्ज [ अर्जी पहा]

अर्जी [ अर्द् १ याचने, अर्दितं (याचितं) = अर्जी, अर्ज ] अर्जी, अर्ज म्ह. याचना.
अर्जीदन् या फारसी क्रियापदापासून हि अर्जी शब्द निघतो. परंतु फारसी अर्जीदन् च स्वतः संस्कृत अर्द धातूपासून निघालेलें आहे. ( धा. सा. शब्द)

ते दक्षाची कंन्या आदिती ।। उपवर जाली महासती ।।
भ्रतार ईछिला दिनमूर्ती ॥ तैसा त्रिभुवनी नसे दुजा ॥ २१ ॥
मग ते दक्षरायें ।। पाहोनि सुमुर्त बरवा ।।
बोलाविलें कश्यपदेवा । कंन्या अर्पिली तयासी ।। २२ ।।
ते आदिती आणि कश्यप ।। दोघें शोभलि वधूवर्य ।।
लग्न लागलें मोहोत्छायें ।। वेदमंत्री ।। २३ ।।
मग तेथोन सूर्यवंश ।। तो सांगतों सावकास ।।
ऋषिवचन सुरस ।। शास्त्रवाक्यें ॥ २४ ॥
आदिती पासाव सूर्याचा
मनु  १               ईलु  २
आहुति ३           नहु ४
अयाति ५           पुरु ६
जन्मेजय ७        महाभय ८
सयाति ९           हरीयाति १०
सार्वभौम ११       महाभोम १२
अयुताचन १३     अक्रोध १४
रुचि १५             मतिनार १६
सुनोजं १७          दुश्यंत १८
भरथ १९
माता
सकळि
तयाचा             अभिमन्यु २०
आहुति २१        अगस्ति २२
अजामळ २३     श्रावण २४
तो श्रावण पुंण्यसिळ ।। क्षेत्रधर्मि जो प्रबळ ।।
त्रिभुवनि कीर्ति अचळ ।। जो केवळ विष्णुभक्त ।। २५ ।।

मुख्यत्विं नामांकित ।। सांगितलें जे ऋषि प्रतापवंत ।।
जे चाळक श्रृष्टिमाजि समर्थ ।। वित्पन्न सर्वश्र्वी ॥ ९ ॥
जयांचा आधार सर्वांसि ।। धर्मस्थापना जयां पासी ।।
त्यांचिया उत्पन्नतेसी ॥ निंदी ऐसा कवण असे ॥ १० ॥
ज्यांची स्थापित कर्मे ।। तीं चालति शुद्ध नेमे ।।
तीं कवण ऐशीं भविष्योत्तरपुराणें ।। साकल्य आहेत ॥ ११ ॥
त्यातिल हा एक अध्याये ।। जेथें सांगितला सूर्यवंशशोमवंशसमुदाये ।।
क्षेत्र पवित्र ऋषि अनुभवपर्व ।। भविष्यार्थ बोलतों ।। १२ ।।
कृता त्रैता द्वापार कलि ॥ एकाकि एक चाललीं ।।
परि रुषिवाक्यें राहिली ॥ युगा युगा ठाईं ।। १३ ।।
प्रथमवर्ण ब्राह्मण ।। जो सर्वशास्त्रिं निपुण ।।
तयासि हा चि अवगुण ।। प्रतिग्रहकार यत् ॥ १४ ॥
ऋग् यजु साम अथर्वण ।। ऋग्वेदा अष्ट भेद जाण ।।
शाहासि भेद यजुर्वेदा लागोन ॥ वेदि निवाडा असे ॥ १५ ॥
त्या परता क्षेत्रिवर्ण ।। जो क्षेत्रधर्म दारुण ।।
मंत्रविद्या रुषि पासुन ।। शिष्यवर्ग म्हणोन पावले ॥ १६ ॥
ते क्षेत्रि कवण कवणा पासुन ॥ सूर्य सोम दोघे जण ।।
सोमवंशउत्पती येथुन ।। सांगतों आतां ॥ १७ ॥
ब्रह्मदेवा पासोन अत्रि जन्मला ।। तया पासोन सोम जाला ।।
तो वंश वृद्धि पावला ।। कवणे परी ॥ १८ ॥
चंद्रा पासाव बुध ॥ १ ॥ बुधा पासाव पुरुरवा ॥२॥ पुरुचा दक्ष ।।३।।
दक्ष पुस्करदिपी रहिवास ।। जो क्षेत्रि महाराजस ।।
अजिंत सर्वासि सुरस ।। नांदत असे ॥ १९ ॥
तयांसि कन्यारत्न जालें ।। आदिती नाम ठेविलें ॥
कोटिदिनकरतेज फांकलें ॥ महास्वरूपता ते ॥ २० ॥  

-२ ( पायाच्या घोट्याचा) [ अपस्कारः = अपकारा. ] पायाचा घोटा शरीराच्या ज्या भागावर उभा असतो तो भाग. (भा. इ. १८३६ )

अपखडी [ अपषदी, अपसदी a woman of the outcaste = अपखडी ) क्षत्रिय × वैश्या or शूद्री; वैश्य × शुद्री. निषादप्रमाणें स चा ष होऊन अपषद. children from the above two are called अपसद)

परि धर्मपत्नी कां धांगडि । पोसितां जरि एकि वोढि । तरि कां अपखडि । आणावी आंगां ॥ ज्ञा. १८-९३६.

अपंग [ अपांग ] अवयवहीन.

अपर [ अल्पतर = अप्पअर = आपर = अपर ( रा-री-रें)] (भा. इ. १८३२ )

अपरूप १ [ अभिरूपक ( श्रमणादिगण ) = अपरूप handsome, beautiful.

- २ [ अभिरूपकः = अपरूप ] सुंदर, शोभन.
आपरूप लावण्य म्ह० शोभन लावण्य.

- ३ [ अप्रतिरूप ( निरुपम ) = अपरूप ] Matchless.

अपकारा [ अप् + करक: = आपकरा, आपकारा, अपकरा, आपकारा. कमंडलौ च करकः ] आपकरा म्हणजे पाणी पिण्याचें लहान पात्र.
अल्पकरक: = आपकारा (लहान कमंडलू)

अप्पलपोट्या [ आत्मपुष्ट ]

अपाप [ अल्पाल्पं (adverb) = अपाप (हळूहळू) आत्मनैव = अपाप ( आपल्या आपण ) ]

अपेशी [ अपयशस् = अपेशी ] Unsuccessful, unenterprising.

अबब [ अंब अंब ! = अबब ! ]

अंबाडा १ [ आम्रातक = अंबाडअ = अंबाडा (डी-डें)] (भा. इ. १८३२ )

-२ [ अंबष्टा = अंबाडा ]

अंबिआ [अंबुवाह: ( पाण्यांतून नेणारा नावाडी ) = अंबिया, अंब्या ] नदीवरील होडीवाल्यांना अंबिये म्हणतात.

अंबिया [ अंबिआ पहा ]

अबू [ आत्मभू = आपबू = आबू, = अबू] अबू हें वडील माणसाचें लाडकें नांव आहे. आत्मभू म्हणजे ब्रह्मा, विष्णू इत्यादि.

अबोटि - [ अभ्युदवृत्ति ] उटणें माखणें. (धातुकोश-अबोट पहा)

आद्वातद्वा [अदस्वातद्वा = अद्वतद्वा ] अद्वातद्वा म्हणजे हें कां तें, अनन्वित.

अधकोर [ अष्टकृत्वा = अढकुर = अढकोर = अधकोर ] ( भा. इ. १८३३)

अधण [ उष् दाहे. अध्युष्ण = अधोण्ह = अधोण = अधण] ( धा. सा. श. )

अधांतरीं [ अर्धान्तरे ]

अधाशी [ अधो + अश्, अध्यश् = अधासणे. अध्यशिन् = अधाशी ] अति खाणारा. ( भा. इ. १८३६)

अंधी [अंध् १० दृष्ट्युपघाते. अधिका (नेत्ररोग) = अंधी] डोळ्याला काय अंधी आली आहे? ( धा. सा. श. )

अधीक [ आत्यायिकं = अधीक ]
कांहीं अधीक उणें झाल्यास मला स्मर = किमपि आत्ययिकं ऊनं भवेच्चेत् मां स्मर ! अधीक म्हणजे संकट.

अधीक बिधीक [ अधिकं अभ्यधिकं = अधीक बिधीक ]

अधेला [ अर्ध + ल = अर्धल = अधल = अधेला-अधली-अधेलें ] अधेला रुपया म्हणजे अर्धा रुपया. अधेली रुपी. अधेला साप. अधेलें (न० ) = क्षुल्लक साप. अधेला पैसा, अर्धी. (भा. इ. १८३२)

अधेली, अधेला [ आर्द्धिकी=अधेली. अर्द्धक:(गद्यानः)= अधेला. वार्तिक कंसाट्ठिठन् ५-१-२५ ]

अधोली [ अर्थपाय्या = अधो+ (स्वार्थे ली) = आघोली]

अनमानणें [मन् ४ ज्ञाने. अन्यमनायते ] अनमानणें म्हणजे दुसरा विचार करणें. ( धा. सा. श. )

अनवाणी १ [अनुपानहम्] without shoes

-२ [ अनुपानहक = अनुवाणअअ = अनवाणी ]

अनश-शा-शे [ अश् ९ भोजने. अनश्नत् ( not eating) = अनश-शा-शे. अनशापोटीं म्हणजे खाल्ल्यावांचून. ( धा. सा. श. )

अनान [ अन्यान्य = अनान ( ज्ञानेश्वरी ) ]

अनिवार [ वृ १० आवरणे. अनिर्वार्य = अनिवार ] ( धा. सा. श. )

अपकारा १ [ अपस्कारः = ( घुडघ्याची बैठक) = अपकारा, घुडघ्याचा अपकारा म्हणजे घुडघ्याच्या हाडाची बैठक. ( भा. इ. १८३६ )

                   ।। श्रीगणेशाय नमः ।।
ॐ नमो जी विनायका ।। सर्व सिद्धीच्या नायका ।।
झानबोधा विश्वव्यापका ॥ कविमयंका वेदमूर्ती ।। १ ॥
चाळकस्थिति अगम्य सर्वादी ।। स्वयें सर्वश्वी ऐक्य मांदी ।।
इछातित भक्तहृदीं ।। कळासिद्धी अर्पिसी ॥ २ ॥
धरोनि हा चि विश्वास ।। ग्रंथ आरंभितो सावकास ।।
जणे पावन सूर्यवंश ।। ते कथा सुरस वदवी देवा ॥ ३ ॥
ब्यासें कथिलें भारत ।। जें युगांतरि चाललें सत्य ।।
तैसें च वाल्मीककृत्य ।। कथा पवित्र बोलिला जो ॥ ४ ॥
अीराम सूर्यवंशी उत्पन्न ।। वाल्मीकरुषि वदला आपण ॥
तैसें हें भविष्योत्तरपुराण ।। ऋषिवाक्यें ।। ५ ।।
अठ्यासि सहस्त्र ऋषेश्वर ।। नानामतिं विस्तारले कल्पतरुवर ।।
जे सर्वउपमेचे सागर ॥ तयांसि मी थिल्लर काय वर्णूं ॥ ६ ॥
तयांची नावें सांगतां ।। विस्तारे जाईल कथा ।।
म्हणोनि तयांचे चरणी माथां ॥ ठेवोनि विनवितों ।। ७ ।।
रिघोनि तयांसि शरण ।। नमिले त्यांतिल चतुर्विस जण ।।
ते कवणकवण ।। मुख्यत्विं पूर्ण सांगतों ।। ८ ॥

१ प्र-हाद  ९ कपिल  १७ अगस्ति
२ अत्रि   १० शौनक १८ कौशिक
३ वशिष्ठ  ११ याज्ञवल्क  १९ वत्छ
४ शुक  १२ जमदग्नि  २० पौलस्ति
५ कण्व   १३ गौतम २१ मकण
६ पाराशर   १४ मुद्गल २२ दुर्वास
७ विश्वामित्र  १५ व्यास  २३ नारद
८ भारद्वाज  १६ लोमस  २४ कश्यप