Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
महिकावती (माहीम)ची बखर
आतां कनक प्रभा ॥ प्रशुत जालि कां लगबगा ।।
साठि संवत्सर नारदा ।। प्रशवलि ते हे ।। ५९ ।।
आतां असुरदळणी ।। प्रशवलि अमित्यवस्तु निदानी ।।
मुक्ताफळें हिरेमाणिकें पुक्षराजपाषाण मेदिनी ।। तिये पासोनि जाली।।६०।।
ऐसि हे उत्पति समुळ ॥ सांगितली निर्मळ ।।
निवाडा केला केवळ ।। निपुणत्वें ।। ६१ ।।
हे कथा महापवित्र ॥ जेथें सांगितलें उत्पत्तिचरित्र ।।
लाघवि साक्षांत परमेश्वर ।। यका पासोनि अनेक ।। ६२ ।।
रचना समुळ सांगितली ।। ते प्राकृति बोलिली ।।
अर्थ सर्वांसि साकलीं ।। प्रस्फुट आहे ॥ ६३ ।।
शैयाद्रिखंडिचें मत्त ।। व्याख्यान केलें प्राकृत ।।
तरि हे परउपकारार्थ ।। बोलिलों जे हे ।। ६४ ।।
ब्रह्मोत्तरखंडि निवाडा केला ।। तो हि साक्षसि बोलिला ।।
हा ग्रंथ विख्यात रचिला ।। युग युगी राहावा ।। ६५ ॥
पंढरि युगे अठाविस ।। पुराणि समंत तयेस ।।
तैसें शास्त्र हें सुरस ।। युगा युगा ठाइं राहिलें ।। ६६ ।।
जेथें निवाडा सर्व केला ।। उत्पती सर्व बोलिला ।।
ऐका श्रोते चित्तयुक्ता ।। युक्तार्थ सत्यमेव ।। ६७ ।।
ऐकतां निवती श्रवण ।। हरति दोष महादारुण ।।
पुराणिचें निरोपण ।। भविष्यार्थ कथिला ।। ६८ ॥
वक्ता भगवान् दत्त ।। संमत बोलिले व्याशोक्त ।।
कथा महापवित्र ॥ उत्पती सर्वाची ॥ ६९ ।।
॥ इति श्रीब्रह्मोत्तरखंडे भविष्योत्तरपुराणे
भगवान्दत्तसंवादे उत्पतिअवतारनिवेदन
नाम प्रथमोध्यायः ॥ १ ॥
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
अणकुला [ अणुक + ल = अणकुल ( ला-ली-लें )] अणकुला म्हणजे अति लहान
अंतर [अंतराय = अंतरा=अंतर] सासू सुनेला अंतर करीत नाहीं= श्वश्रूः स्नुषायै अंतरायं न करोति. अंतर म्हणजे प्रतिबंध, अडथळा, इजा. सा तव जीवितान्तरायं करिष्यति = ती तुझ्या जीवाला अंतर करील. (कारंडव्यूह अश्वराजवर्णनम्). ] (भा. इ. १८३४)
अंतरा (सतारीचा) १ [ अंतरालः = अंतरा (ल लोप)] ( भा. इ. १८३६ )
-२ (वाद्य-गान परिभाषेत) [अंतरायः interposition= अंतरा ]
अंतरा अंतरावर [ अंतरान्तरोपरि ]
अंतराळीं [ अंतराले ]
अतिवीख [ अतिविषा ]
अत्ता [ (वैदिक) अस्था at once, without delay ( अ + स्था) = without delay, at once.
अतः = आतां now ह्याहून अत्ता हें अव्यय निराळें.
अत्या [ अंतिका = आंतिआ = आंत्या = अत्या ] अंतिका म्हणजे वडील बहीण. अत्या हा शब्द वडील बहिणीला मराठींत लावतात. (भा. इ. १८३४)
अथतथ [ अत्रतत्र ] अथतथ करतो = अत्रतत्र इति करेति.
अथाक [ अस्थाग = अथाक, अथांग ] अति खोल. ( भा. इ. १८३७)
अथांग १ [ अस्ताघ्य = अत्थाग्घ = अथांग ] bottomless, deep.
-२ [ अस्ताघ, अस्थाग = अथांग ( फार खोल )] अथांग पाणी.
-३ [ अस्ताघ (फार खोल ) = अथाग = अथांग ]
अदमणी [ अर्धमाणिका ]
अदमुरें १ [ अर्धमूर्च्छितं = अदसुरें] अर्धवट विरजलेलें दूध.
-२ [मूर्च्छ् १ मोहसमुच्छ्राययोः. अर्धमूर्, अर्धमूर्च्छितं = अधमुरे = अदमुरें ]
अदलाबदल [ अतिराव्यतिरा ]( धातुकोश-अदल् पहा)
अदळणें [ अद् (खाणें) + ल (स्थार्थक) = अदळ ] खाणें. भाकर्या अदळ म्हणजे भाकर्या खा (कुत्सितार्थक ). (भा. इ. १८३४)
अन्दु, अंदू [ अन्द् १ वन्धने. अंदुक: = अंदू (हत्तीच्या पायांतील श्रृंखळा) श्रृंखलो निगडोंदुक: (हर्षकीतिकृत लघुनानन ।ला)
हत्तीच्या पायांत अन्दु (सांखळदंड) बांधला. (धा. सा. श.)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
अडण [उधस्] (अढें पहा)
अडाखा [ अत्याखा] ( धातुकोश-अडख पहा)
अडाण [उधस्] ( अढें पहा)
अडाणी - प्राकृतांत अडअणा म्हणून एक शब्द आहे. त्याचा अर्थ असति, लबाड, कुंटण स्त्री असा आहे. ह्या अडअणा शब्दाचा मराठी अपभ्रंश अडाणा, अडाणी असा होत असे. पैकीं अडाणी हें रूप मात्र मराठींत राहिलें आहे. अडाणी शब्दाचा लबाड, लुच्ची हा मूळ अर्थ जाऊन, अज्ञानी असा अर्थ सध्यां होतो. हा अडाणी शब्द मराठींत तिन्ही लिंगीं वापरला जातो. (स. मं. शके १८२६)
अडीच [ सार्धद्वि = साडइड = साडीच = अडीच. स चा लेप ] (ग्रंथमाला)
अंडील [ आंण्डीर = अंडील ] उ०- अंडील वैल.
अंडू [ अंतर्भ (te be in) = अंडू] हा त्याचा अंडू आहे म्हणजे त्याच्यांत समावणारा आहे; अंडू म्हणजे आंडगडी खेळांतला. (भा. इ. १८३६)
अडून १ [ अंतरित्वा = आंडून, अडून (अव्यय) ]
-२ [अंतर्धाय (आकर्णनं ) = अडून ऐकणें. ]
-३ [ अंतर्धाय = अडून. धा ३ धारणपोषणयोः ] ( धा. सा. श. )
अडेलतट्टू [अड्ड् - अड्डिल + तस्थु Stationary = अडेलतट्टू] ताठ व आडणारा माणूस, घोडा इ.
अड्डा (बाजारांतील व्यापार्यांची सभा), आडत [ आड् उद्यमे ] आडबाजार ह्यांत आड ह्या मराठी शब्दाला बाजार हा फारशी शब्द दिला आहे. (ग्रंथमाला)
अड्डा (मल्ल वगैरेंचा) [ अड्ड अभियोगे ] मल्लांचें युद्धस्थान, आखाडा, तालीमखाना. (ग्रंथमाला)
अड्यालपड्याल - नदीच्या अलीकडील तीराला अड्याल व पलीकडील तीराला पड्याल म्हणतात. संस्कृत तट ह्या शब्दाला प्राकृत शब्द अड आहे. तल ह्या शब्दाचें प्राकृतरूप अल होतें. तेव्हां तटतल = अडअल = अडाल = अड्याल. प्रतितल = पडअल = पडाल = पड्याल. अडाल व पडाल हीं रूपें अडालगंगा, पडालगंगा ह्या उखाण्यांत कित्येक गांवढ्यांच्या तोंडांतून अद्यापही येतात. प्रस्तुत कालीं अड्याल व पड्याल हीं रुपें सार्वत्रिक आहेत. (स. मं. शके १८३६)
अढण [उधस्] (अढें पहा)
अढें [ उधस् = उढें = अढें, अढण, अडाण, अडण ]
महिकावती (माहीम)ची बखर
ऐसिया राणिया त्रयोदश ।। आदिती पासोनि उत्पती देवांस ।।
तेतिस कोटि गणता तयांस ।। जालि प्रत्यक्ष ।। ४७ ।।
द्दीति पासोनि दानव जाले ।। ते बलाढ्य बोलिले ।।
दैत्यवंशी प्रवर्तले ।। श्रुष्टिमाजि ॥ ४८ ॥
कद्रुचें नागकुळ ॥ शेषवंश प्रबळ ।।
कद्रुपासोनि सकळ ॥ उत्पत्ति तयांसी ॥ ४९ ॥
वैनते उदरि उत्पन्न ।। अरुण गरुड दोघे जण ॥
पक्षिकुळिचे भूषण ।। दोघे बलाढ्य पैं ॥ ५० ॥
आतां सुतळिका ।। प्रसुत जालि अष्टलोका ॥
उत्पत्ति तियेचि आईका ।। प्रत्यक्ष बोलिली ।। ५१ ॥
सोमप्रभेचे नव प्रह ।। दिशाचक्रि जयांचा ठाव ॥
श्रुष्टिक्रम चालविती प्रत्यक्ष ।। जें सांगितले ।। ५२ ॥
रुपप्रभा प्रशवली ॥ तेथोन वंशउत्पती जालीं ।।
सूर्यसोमवंशावळी ।। तिये पासोन म्हणती पै ।। ५३ ॥
आणि ब्रह्मदंडा प्रशवली ।। वल्लीवृक्षउत्पति जाली ।।
अठरा भार गणती आली ।। ताडमाडआद्यकरोनी ।। ५४ ॥
आतां कुंडळणी जाणा ।। प्रशवली साटि सहस्त्र गणा ।।
अठ्यासि सहस्त्र ऋषिआद्यकरोन ।। उत्पन्नता जाली ॥ ५५ ॥
आणि ते कंजनी ।। प्रशवली मेघां ततक्षणी ॥
घनद्रोणपवनपागुळा लागोनी ।। जन्म जाले ॥ ५६ ।।
च्यारि मेघ तये उदरी ।। जन्मले चराचरी ।।
श्रुष्टिपाळक अवघारी ।। च्यारि मेघ ।। ५७ ।।
प्रळयि च्यारि वरुषती ॥ मग रसातळा जाईल क्षिती ।।
भविष्य बोलिलें पुणती ॥ शास्त्रि अनेक ।। ५८ ।।
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
अटाट १ [ धातोरेकाचो हलादे: क्रियासमभिहारे यङ् ( ३-१-२२ ). पौनः पुन्यं भृशार्थो वा क्रियासमभिहारः . अट - अटाट्यते (.'. अटाट ] अति हिंडणें, जिवापाड मेहनत करणें. (भा. इ. १८३२ )
-२ [अटाट्या = अटाट (स्त्रीलिंगी) ]
अटी [ अत् १ सातत्यगमने अतिः = अटी ] बाबा अटीस । पेटूं नकोस = मा भवात् अतीत्. अटी म्हणजे अतिमर्यादेला जाणें. ( धा. सा. श.)
अटोका [ आ + तुज्] (आटोका १ पहा)
अट्टल १ [ अट्ट अतिक्रमणे अट्टल exceeding] अटटल सोदा exceedingly mischievious.
-२[अटल (स्थिर, पक्का) = अट्टल ] (भl. इ. १८३६)
अट्टल चोर [ हट्टचौरक = अट्टचोर= (स्वार्थक ल लागून)] अट्टलचोर; हट्टचौरक म्हणजे बाजारांतला देखत चोरी करणारा. (भा. इ. १८३५)
अठरा [ अष्टापरदशन्] ( अकरा २ पहा)
अठरापगड [ अष्टादशप्रकृतय: = अठरापगड. प्रकृति = पगडी ]
अठरापगड (जात) [ (अष्टादश) प्रकृति = पगडी. अष्टादशप्रकृतिः जातिः ]
अठरापगड जात [अष्टादशप्रकृतिका जातिः = अठरापगड जात. प्रकृति म्हणजे प्रजाजन. प्रकृति = पगडी ]
प्रत्येक जातींचें शिरोभूषण लक्षणार्थ निराळें असे. सबब शिरोभूषणालाच पगडी नांव पडलें.
अठळी [ अष्टीला = अठळी ]
अठी-अठळी [ अष्टि = अठ्ठि = अठी. अष्टिलिका = अठ्ठिलिआ = अठळी (गर्याची) ] (भा. इ. १८३४)
अंडगडी [ अंतर्गडी ] (भा. इ. १८३३)
अडघर [ अंतर्गृह = आँडघर = आडघर = अडघर ] (भा. इ. १८३३)
अडणी [ अटनी = अडणी (शंख ठेवावयाची ) ] (भा. इ. १८३६)
अंडपंचा [ अंतःपंचह्= अंडपंचा ] दहा हात लांब व पाउणे तीन हात रुंद जें धोतर तें पायघोळ धोतर, त्याच्या आंत नेसण्याचें जें लहान वस्त्र तें अंडपंचा. ( भा. इ. १८३३)
अडविणें [अंतरायनं = अँडअवणें - अडावणें = अडविणें] अडावणें असा हि उच्चार फार ऐकूं येतो. अंतरि म्हणजे मध्यें येणें, प्रतिबंध करणें. (भा. इ. १८३५)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
अजाण, अजाणता [ अजानत् = अजाणताः; अज्ञान = अजाण ]
अजी [ अजे पहा ]
अजून १ [ अद्य + पुनः = अज्ज + उण = अजून ( नी, नियां ) ] (भा. इ. १८३३)
- २ [ अद्य = आज; अद्यतनं = अजून; अद्यापि = अझूनि, अजुनि, अझूइँ ]
अजे [ आर्य्ये = अज्जे = अजे = अजी ]
मराठींत म्हातार्या स्त्रीस संबोधतांना विशेष सलगी असल्यास अजे अशी हाका मारतात, व बहुमानानें अजी अशी हाका मारतात. ही हाक मराठीनें सहजच संस्कृतांतून वंशपरंपरेनें घेतली आहे. बाण हर्षचरितांत अष्टमोवछासांत स्त्रियांना संबोधण्याचे दहापांच प्रकार अर्थासुद्धां देतो. त्यांत खालील वाक्य आहे :-
कथं इव महानुभावानां एनां आमंत्रये । वत्से इति अतिप्रणयः । इ. इ. इ. । आर्ये जरारोपणम् ।
जरारोपण असतां बाणाच्या कालीं वृद्ध स्त्रियांस आर्ये अशी हाक मारीत. आर्य्येचा अपभ्रंश अज्जे. अज्जेचा मराठी अपभ्रंश अजे. कुणबी व शूद्र घरांतल्या म्हातारीला अद्याप अजे अशी हाक मारितात. शिष्ट ब्राह्मण अजी अशी हाक मारितात. अजेचें अजी रूप शिष्टांनीं कसें साधलें तें उमगत नाहीं.
वत्से = बच्चे
पुत्रि = पोरी
मूलिके = मुली
भवति = बाई
मातर् = माई
भगिनि = बहिणि, बहिण्ये, बहिनी.
बाले = बाळे
वगैरे हाका मराठीनें आपली अजी जी संस्कृत तिजपासून घेतल्या आहेत. ह्याला बाण साक्ष आहे (निर्णयसागर प्रत, पृष्ठ २४४). ( भा. वा. इ. १८३५)
अटकळ १ [अंतर्कप् लृ - अंतर्कल्पः = अटकळ. अंतर्कल्पना = अटकळि = अटकळ] अटकळीनें समजणें = अंतर्कल्पेन सम्बोधनं.
- २ [ क्लप् १० व्यक्तायांवाचि. अंतर्कल्प = अटकळ ( धा. सा. श.)
- ३ [ क्लप् १० व्यक्तायां वाचि. कल्प = कप्पा, काप. अन्तल्पप्ति = अटकळ ]. ( धा. सा. श.)
- ४ [ अन्तर् + क्लृप् तर्क करणें =अटकळणें (तर्क करणें) ]
महिकावती (माहीम)ची बखर
बोध्यरुपि नारायण ।। स्वयें अवतरला आपण ॥
जो साक्षांत परब्रह्म ॥ युगप्रमाण विंदाण केलें ॥ ३७ ॥
ऐसे हे अवतार जाले ।। ते समुळ सांगितले ।।
सविस्तरि बोलिले ॥ अनवयुक्त ।। ३८ ॥
पुढे कल्की दाहावा ।। अवतार घेणे लागले देवा ।।
तयाचा जन्म बरवा ॥ त्याणे निवाडा करावा पापपुण्याचा ॥ ३९ ॥
ते कथा अद्यपि विलंब ।। भविष्यें कथिले व्यासें प्रतिबिंब ।।
ते सांगतां ग्रंथि पाल्हाळ प्रसिद्ध ।। अनेक संमति बोलिले आहेत ॥४०॥
नाना शास्त्रें वेवादती ॥ पुराणसंमति वित्पती ।।
व्यास वक्ता पुण्यमूर्ती ॥ ग्रंथरचना केली असे ॥ ४१ ।।
प्रथमऋषि पार्वतिमुनी ॥ तेथोनि उत्पति ऋषिलागुनी ।।
तया पासोन ईशानजयो महाज्ञानी ।। जन्मला जाणा ।। ४२ ॥
ईशानजयोचा महाऋषी ।। उत्पती जाली तयासी ।।
तया पासाव अंबऋषी ।। जो शृष्टि माजी समर्थ ॥ ४३ ॥
अंबऋषिपासोनि ।। जन्मला कश्यप महामुनी ।।
जो सर्वज्ञ अपरोक्षज्ञानी ।। रचना मेदनी जयाची ।। ४४ ॥
त्या पासोन जन्म सर्वांसी ।। पुराणि प्रसिद्ध बोलिले रुषी ।।
तेरा राणियां जयासी ॥ तयां पासोन उत्पन्नता जाली ॥ ४५ ॥
त्या राणिया कवणकवण ।। श्रोतें ऐका चित्त देऊन ॥
भविष्योत्तरिचें निरोपण ।। उत्पती समुळ सांगितली ।। ४६ ॥
१ अदिती २ द्दिती ३ कद्रु
४ वैनता ५ सुतळिका ६ सोमप्रभा
७ रूपप्रभा ८ कुंडळिका ९ ब्रह्मदंडा
१० कंजनी ११ पद्मावती १२ कनकप्रभा
१३ दळणिका
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
अगो १ [ ओ (निपात ) = ( अकच्क) अको = अगो] (भा. इ. १८३४)
-२ [ अद्योः ! = अगो ! ] ( हें अव्यय कोंकणांत फार प्रचलित आहे.)
अगोठ १ [ अग्रवृष्टिः ] पावसाळ्याचा आरंभ.
-२ [ अग्रवर्षा = अगउठ्ठा = अगोठ्ठा = अगोठ ] पावसाळ्याचा आरंभ. ( स. मं. )
अगोतली [ अग्रपत्रिका + ल (स्वार्थक) ] केळीच्या पानाचा पुढला वाटोळा भाग.
अगोधर [ अदौकरं = आदोगार = अगोदर ] अगोदर म्हणजे प्रारंभीं. (वर्णविपर्यय) (भा. इ. १८३३ )
अग्यारी १ [ अंगारी = अग्यारी (शेगडी ) ] (पारशांची) (भा. इ. १८३६)
-२ [ अंगार्या (निखार्यांची रास) ] पारश्यांचें पवित्र निखार्यांचें स्थान.
अग्यावेताळ [ अग्निवेताल] अवंतीराज्यं शून्यं एकेन अग्निवतालनाम्ना देवेन अधिष्ठितं । सिंहासनद्वात्रिंशतिका.
अघाडा [ अघामार्गवः ] अधामार्गवः असा अमरकोशांत पाठ आहे; परंतु मराठींत अघाडा असा अपभ्रंश अघामार्गव शब्दापासून होईल, अधामार्गव शब्दापासून होणार नाहीं, व्हावयाला फार आढेवेढे घ्यावे लागतील. ध चा घ प्रायः मराठींत होत नाहीं. तेव्हां अघामार्गव असा पाठ मूळचा असावा.
अघोर [ घुर् भीमार्थशब्दयोः ] (घोरणें पहा)
अंघ्रि [ अंगग्रहि = अंघ्रि (अंग तोलून धरणारा अवयव ) ]
अचकटविचकट [उपस्कृतं व्युपस्कृतं = ओचकटवुचकट= अचकटविचकट. उपस्कृतं व्रूते = वाक्याध्याहारेण वृते । ] तुटक ताळतंत नाहीं असें बोलणें.
अचरट [ अत्यरिष्टं = अच्चरिट्ट = अचरट ]
अचाट [ अत्यर्थ = अच्चट्ट = आचाट = अचाट] फार, अतिशय.
अचाट पाणी पितो = अत्यर्थं पयः पिबति.
अत्यर्थं कर्म कृत्वा = अचाट काम करून. ( भा. इ. १८३४)
अचावचा [ उच्चावच (प्रलापाः ) ] उच्चावच म्हणजे उच्चनीच.
अचुक [ आशकु (आशुचें अकच्) = आचुक =अचुक ]
अजगर [ अलगर्द = अलगर = अजगर ] सर्पविशेष. ( भा. इ. १८३६)
महिकावती (माहीम)ची बखर
माता अदिति सुंदरी ।। पिता कश्यपऋषि अवधारी ।।
वामने बळी घातला पाताळी ॥ मही रक्षिली ।। २३ ।।
ऐसा हा वामनप्रवतार ॥ साक्षांत ब्रह्म साकार ॥
ब्रह्मचर्य वेदाक्षर ।। निपुण सर्वस्वीं ।। २४ ।।
वैशाखशुद्धतृतिया ।। परशराम जन्मला क्षत्रिय निर्दाळावया ॥
माता रेणुका गुणालया ॥ पिता जमदग्नि ।। २५ ॥
सावा अवतार परशराम ॥ जो साक्षांत परब्रह्म ।।
अवतरला नारायण ॥ धर्म रक्षावया ।। २६ ।।
सातवा अवतार श्रीराम ॥ माता कौशल्या निधान ।।
तया उदरी ब्रह्मपूर्ण ॥ स्वयें आपण अवतरले ।। २७ ।।
दशरथा आनंद जाला ।। श्रीराम पाहे वेळोवेळा ॥
लावण्यरूप सांवळा ॥ अनुपम्य साजिरा ।। २८ ।।
चैत्रशुद्धनवमी ।। अलक्ष रूप जयाचें अवतरलें मेदिनी ।।
देखोन संतोष सर्वांचिया मनी ॥ श्रीराम परमानिधान ॥ २९ ।।
लावण्यरुपाचि मुस ।। कळे बाणला राजस ।।
उपमा न ये देतां तयास ।। श्रीराम दृदयां सदृढ धरावा ॥ ३० ॥
आठवा अवतार श्रीकृष्ण ।। देवकी उदरी जन्मला जाण ॥
श्रावणवद्यअष्टमी बुधदिन ॥ अवतार आठवा जाला ।। ३१ ।।
वसुदेव पिता देवाचा ।। एक म्हणति देव नंदाचा ॥
ठाव नाहि मायबापाचा ॥ अकुळी साचा श्रीकृष्ण ॥ ३२ ॥
तयासि कुळ ना गोत्र ॥ शाखा ना प्रवर ।।
स्वयें साक्षांत ब्रह्माकार ॥ देवादिदेव ।। ३३ ॥
तयाचें विंदान सांगतां ।। विस्तारें जाईल कथा ॥
म्हणोन तयाचे चरणी माथां ।। ठेविला भावें ॥ ३४ ॥
जो साक्षांत ब्रह्म सदोदित ।। आठवा अवतार श्रीकृष्णनाथ ॥
तयाचे चरणाचि मज आर्त ।। हृदई स्फुर्ती हरिनामें ।। ३५ ॥
नवम अवतार बोध्यरूप ।। माघशुद्धनवमी जन्मतिथ ।।
माता लिळावति आद्यवंत ।। पिता व्यासऋषी ॥ ३६ ॥
महिकावती (माहीम)ची बखर
॥ वोवी ।।
हे दहा अवतार ।। अवतरलें ब्रह्म तेजाकार ॥
उत्पत्ति पाळक संहार ।। स्वयें साकार आकारले ॥ १० ॥
जें निर्गुण गुणासि आलें ।। स्वयें ब्रह्म चि प्रकाशलें ।।
विश्व व्यापुनि निराळें ।। स्वयें खेळे स्वस्वरूप ॥ ११ ॥
जें अगम्य अगोचर ।। कवण जाणे तयाचा पार ।।
म्हणोनि साष्टांग नमस्कार ।। करितो देवादिदेवा ॥ १२ ॥
आतां प्रथम अवतार संखावतीं उदरीं ॥ मत्छे जन्मला अवधारी ।।
चैत्रशुद्धगुरुवारी ।। जन्म जाला ॥ १३ ॥
पिता पुक्षराज ॥ हर्षित जाला सहज ।।
धन्य अवतार सोहंबीज ।। प्रकाशलें आह्मा उदरी ॥ १४ ।।
पूर्वपुण्यसामर्थता।। आणिक पाळक अवस्था ।।
म्हणोन येणे जालें भगवंता ।। शंखासुर वधावया ॥ १५ ॥
त्या उपर द्वीतिय अवतार ।। माता कर्णावती सुंदर ॥
पिता काश्यपऋषि थोर ॥ तपस्विसूर्यसहस्र ।। १६ ॥
ज्येष्टशुक्लद्वीतिया भृगुवासर ।। तद्दिनी जन्मला कुर्मावतार ॥
दैत्य निर्दाळिला महाथोर ॥ पाळकेस्थिति अपरांपर देवाची ।। १७ ॥
देवें अवतरावें पशुशरिरी ।। पद्मावतीचिया उदरी ।।
भक्ता कारणें श्रीहरी ।। तृतीये अवतार ॥ १८ ॥
वराहरूपें भगवंत ।। अवतरला श्रीहरि साक्षांत ।।
वैशाखशुद्धतृतिया तिथ ।। जन्मकाळ वराहरूपीं ॥ १९ ॥
चतुर्थ अवतार नृसिंह ।। अवतरला चतुर्दशि श्रुद्ध वैशाखमास प्रसिद्ध ।।
माता चंद्रायणि शुद्ध ।। या परि नृसिंह जन्मला ।। २० ।।
भक्त प्रल्हाद रक्षिला ।। दैत्य हिरण्याक्ष निर्दाळिला ।।
+ + + + + + + + ।। सायुज्या कारणें ॥ २१ ॥
पांचवा अवतार वामन ।। साक्षांत अवतरला नारायण ।।
शुद्धद्वादशि श्रावण ॥ तद्दिनि अवतरले ॥ २२ ॥