Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
महिकावती (माहीम)ची बखर
॥ वोवी ॥
अज्ञानतिमिर दवडिलें ।। ज्ञान स्फूर्तीतें पावलें ॥
वाग्विलासी स्फूरलें ।। वाग्दवता आनंदे ॥ १ ॥
जैसे च्यारि मैघ वर्शती ॥ उल्हासें दाटलि क्षिती ।।
हर्षित चळचरें पावती ।। आनंदें सुखावती स्थावर इत्यादी ।। २ ।।
घोरशब्दें सिंधू उन्मळ ।। लहरि शब्द उमाळे ॥
तैसि वाग्देवता आपुलिया बळें ॥ उत्पत्तिप्रळये बोलतसे ॥ ३ ॥
मुख्यत्वि व्यास वक्ता ।। पूर्वपरंपरा साकल्यता ।।
बोलिला जो भगवान् दत्तचित्ता ।। आईका म्हणे ।। ४ ।।
रुषिवाक्य उत्तम जाण ॥ जें आइकतां निवति श्रवण ॥
भविष्योत्तरपुराणि कथन ।। वंशउत्पत्ती संपुर्ण सांगितलि जेथें ।। ५ ।।
ते हे कथा पवित्र ॥ शैयाद्रिखंडिचा तर्क ।।
प्राकृतव्याख्यान समग्र ।। बोलिजे हे ॥ ६ ॥
ब्रह्मोत्तरखंडिची कथा ।। ये ग्रंथि आणिली समंता ।।
नारदोक्ति ते हि साकल्यता ।। सांगितली जेथें ॥ ७ ॥
दशावतारकथा सुरस ।। ऐकता हरति महादोष ।।
सायुज्यमुक्तिपद तयास ॥ जे श्रवण जालिया ॥ ८ ॥
दशावतार उत्पन्नता ॥ समुळ सांगतों आंता ।।
जेणें आनंद सर्वाचिया चित्ता ॥ ऋषिवदोक्ती ॥ ९ ॥
॥ श्लोक ॥
मत्छा पासुनि च्यारि ते नरहरी पर्यंत जाले कृती ।।
त्रैती वामन परशराम तिसरा श्रीराम शीतापती ॥
ऐसे हे अवतार सात मग तो द्वापारिचा आठवा ।।
श्रीकृष्ण कलि बोध्य वर्तत असे कल्कि पुढे दाहावा ॥ १ ॥
महिकावती (माहीम)ची बखर
॥ श्रीगणेशाय नमः ।।
॥ श्रीसरस्वत्यै नमः ।।
॥ श्रीगुरुभ्यो नमः ।।
॥ श्रीकुळदेवताय नमः ।।
अथ पूर्वपरंपरा-वंशउत्पत्ती-वर्णावर्ण-व्याख्या ।।
।। श्लोक ॥
उमायां गजकणवक्त्रं गणेशं । भुजाकंकणं शोभितं ज्ञानरूपं ।।
गळा हारमुक्ताफळं शोभिवंतं । नमो ज्ञानरूपं गणेशं नमस्ते ।। १ ।।
गणेशैकदतं शुभं सर्वकार्ये । स्मरे सन्मुखं ज्ञानदं सर्वसिद्धि ।।
मनं चिंतितं कार्यसिद्धिं भवंति । नमो बुद्धिकांतं गणेशं नमस्ते ॥ २ ॥
।। वोवी ॥
ऐसा नमिला गणेश ।। जो नाना श्रृंगारें शोभला विघ्नेश ।।
अळंकार भूषणें चतुर्दश ।। नमिला भावें ॥ ३ ।।
जयाचें अगम्य मद्दिमान ॥ चतुर्दश विद्या जया पासोन ।।
सर्व सिद्धि जयासि शरण ।। तो गजवदन वंदला म्या ।। ४ ।।
चाळकस्थिती जयाची ॥ सर्वस्वें सत्ता तयाची ।।
ते मूर्ति हळापूर्ण आमची ।। अमृतकळा ।। ५ ।।
ते हे शारदा निधान ।। जियेचा पिता चतुरानन ॥
ते वेदमाया आद्य करोन ॥ तयेसि शरण अनन्यभावें ।। ६ ।।
श्रीगुरु वोळला कृपापाणी ।। ज्याण्हे सर्वज्ञ सत्ता आंदणी ॥
तयासि शरणांगत अन्योन्नी ।। लोळेन चरणि श्रीगुरुचे ।। ७ ।।
।। श्लोक ।।
गुरु र्ब्रह्मा गुरो र्विष्णु गुरु देवमहेश्वरः ॥
गुरुरेकपरब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १ ॥
अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया ।।
चक्षु र्उन्मिलितं येन रास्मै श्रीगुरवे नमः ।। २ ।।
महिकावती (माहीम)ची बखर
४९. एवंस्वरूप महाराष्ट्रधर्माचें निरूपण नायकोराव ह्या क्षत्रियानें केशवाचार्य या ब्राह्मणाच्या मुखें म्हालजापुरी जमलेल्या चार हजार ब्राह्मणक्षत्रियादि अठरापगड जातींना निरूपविलें. तें निरूपण ऐकून क्षात्रतेज व राज्याचिकीर्षुत्व कितपत उज्ज्वलित झालें तें शक १३७० नंतरच्या इतिहासा वरून दिसतें च आहे. सुग्रास अन्न खाण्यास चटावलेल्या राज्यपराङमुख लोकांच्या मनावर त्या निरूपणाचा कांहीं एक परिणाम झाला नाहीं. तत्रापि, १३७० नंतर दोन शें वर्षांनी म्हणजे शक १५७० च्या सुमारास शिवाजी नामें करून एका महान् वीर पुरुषाच्या नेतृत्वा खालीं बुभुक्षित अश्या पांच चार शें वरघाटी परस्थ ब्राह्मणमराठ्यांनीं उत्तरकोंकणांत कल्याणप्रांतीं स्वत:चें सरकार ऊर्फ स्वराज्य स्थापिलें. त्या स्थापनेंत उत्तरकोंकणांतील खास रहिवाश्यांचा कितपत हात होता तें सांगणारीं कागदपत्रें अद्याप उजेडांत यावयाचीं आहेत. बखरींतील तिस-या, पांचव्या व सहाव्या प्रकरणां वरून एवढें मात्र म्हणतां येतें कीं उत्तरकोंकणांतील अन्नसंपन्न देसाई, पाटेल, म्हातरे, चौधरी, सोमवंशी, सूर्यवंशी व शेषवंशी मानापमानाच्या चुरशींत चूर होऊन जाऊन राज्यचिकीर्षेच्या विवंचनेशीं पूर्ण फारकत करून बसले होते, इतकें च नव्हे तर आचाराला, धर्माला व गुरूला सोडचिट्टी देऊन बहुतेक मोकळे झाले होते. शक १२७० त तुर्काण झाल्या पासून शक १३७० पर्यंतच्या शंभर वर्षांत ह्यांची जी ही राजकीय व धार्मिक ऊर्फ सामाजिक अवनति झाली तिचा पत्ता हि ह्यांना नव्हता. ह्यांना न दिसणा-या ह्यांच्या दैन्यावस्थेची परीक्षा केशवाचार्य व नायकोराव ह्या दोघा उद्धारकांना मात्र झाली. केशवाचार्य व नायकोराव ह्या उद्धारकांच्या मनांत असें आलें कीं, तिरस्कारबुद्धीनें ह्या लोकांचा नाद अजीबात सोडून दिल्यास हे स्वराज्ययंत्राला जसे पारखे झाले तसे हिंदुत्वाला हि मुकून जातील आणि राज्यनाशा प्रमाणें कुलनाशाला हि गांठतील. करतां, कारुणिकबुद्धीनें केशवाचार्य व नायकोराव ह्यांनीं स्वतःच्या खर्चानें ह्या उदासीनांना एकत्र करून, जेवावयाला घालून व चुचकारून महाराष्ट्रधर्माची ओळख करून दिली. आपण अडीच शें वर्षे स्वराज्य कसें केलें, आपले पूर्वज धाडशी कसे होते व आपले आचार किती उच्च आहेत, आपली पूर्वपीठिका किती उज्ज्वल आहे व आपली सद्यःस्थिति किती शोचनीय झाली आहे, ह्या बाबी एका कैफियतींत ऊर्फ वंशावळींत ऊर्फ कुळकटांत लिहून काढून व त्याच्या शेंकडों नकला करून त्या नकला ह्या दोघा उद्धारकांनीं तेथें जमलेल्या लोकांना फुकट वाटल्या. उद्धारकांनीं काकळुतीनें गळ्यांत बांधिलेल्या नकला उशाशीं गुंडाळून ठेवून हे ऐदी, उदासीन व सुखावलेले लोक जे झोपी गेले ते मुसुलमानाचें राज्य जाऊन पोर्तुगीज लोकांचें राज्य चिमाजी अप्पानें शक १६६१ त वसईंतून भिरकाटून दिलें तव्हां तीन शें वर्षांनीं किंचित् जागे होतात न होतात (अणजूरकरांची पत्रें वगैरे) तों पुन: गाढ निद्रेनें अद्ययावत् पछाडले गेले आणि अन्नसंपन्नतेनें व अन्नसौलभ्यानें पृथ्वीच्या पाठी वरील कोणी हि अल्पसंतोषी लोक मुक्तद्वारी, उदासीन, संन्यस्त व्यक्त्येकनिष्ट राज्यपराङमुख बनतात ह्या सिद्धान्ताचें त्रिकालाबाधित्व प्रस्थापित करते झाले. तुम्हीं क्षत्रिय, स्वतः राज्य करण्याचा तुमचा अधिकार, तुम्हीं परकीय राज्यकर्त्यांची सेवा करणें ऊर्फ सहकार करणें सर्वधा अनुचित, इत्यादि प्रछन्न उपदेश केशवाचार्यानें व नायकोरावानें ह्या कोंगाड्यांस गोड शब्दांनीं केला. परंतु त्या उपदेशा प्रमाणें कां वागावें हें च मुळीं त्या अहृदयांना कळे ना. आपलें कांहीं एक गेलें नसतां व आपली चंगळ चालूं असतां, परकीय राज्यकर्त्यांशीं सशस्त्र किंवा अशस्त्र असा कोणता हि प्रतिकार करण्याचें सबळ कारण ह्या लोकांना दिसे ना. उलट, राज्यकर्त्यांना परकीय म्हणणा-या केशवाचर्याच्या व नायकोरावाच्या खुळचट मूर्खपणाची मात्र त्या शहाण्यांना कींव आली.
महिकावती (माहीम)ची बखर
माहाराष्ट्र ह्या शब्दाचा अपभ्रंश माराष्ट्र (पृष्ट ६०). महाराष्टे भवा: माहाराष्ट्रा: । माराष्ट्र म्हणजे मराठा. मराठा ह्या शब्दाचे दोन अर्थ, भोसले, चव्हाण, जाधव इत्यादि जे क्षत्रिय ह्यांना महाराष्ट्रिक अशी प्राचीन संज्ञा होती. त्यांना प्रथमारंभीं मराठा हें उपपद अन्यव्यावृत्यर्थ लावीत. महाराष्ट्रिकांनीं वसविलेला जो देश त्याला महाराष्ट्र असें नांव पडलें. नंतर त्या देशांत ब्राह्मणा पासून अंत्यजा पर्यंत जेवढ्या म्हणून हिंदू जाती होत्या त्यांना माराष्ट्र ऊर्फ मराठा ही व्यापक संज्ञा लावण्याचा प्रघात चालू झाला. ह्या व्यापकसंज्ञेनें विशिष्ट जे सर्व लोक त्यांचा जो धर्म तो महाराष्ट्रधर्म म्हणावा. भिन्न वर्ण, भिन्न गोत, भिन्न कर्म, भिन्न आचार, भिन्न पहिराव, भिन्न भूषणें, भिन्न भाषा, भिन्न कुळ्या, इत्यादि नाना उपभेद ह्या मराठ्यांत यद्यपि असले तत्रापि कांहीं धर्म ह्या लोकांत सामान्य आहेत. धर्म चार; (१) देशाचार, (२) कुळाचार, (३) वंशाचार व (४) देवशास्त्राचार, आचारप्रधानो धर्मः । करतां आचाराला केशवाचार्य धर्म म्हणतो. (१) देशधर्म, (२) कुळधर्म,(३) वंशधर्म व (४) देवधर्म. याज्ञवल्क्यादि ऋषींनीं प्रचलित केला जो आचारव्यवहारप्रायश्चित्तादि त्रिविध धर्म तो देशधर्म. कुळांत म्हणजे गोतांत ज्या कुळमान्य चालीरीती त्या कुळधर्म, वंशांत जे प्रचलित धर्म ते वंशधर्म. आणि देवसंबंधक जीं कर्तव्यें तीं देवधर्म. देशधर्म, कुळधर्म, वंशधर्म व देवधर्म ह्या चार धर्मांच्या अनुज्ञे प्रमाणें आपापल्या धर्मी सर्वांनीं वर्तावें. त्यांत महाराष्ट्रधर्माची पहिली खूण म्हणजे, सर्वांत ब्राह्मण श्रेष्ठ, हें मत मान्य असणें, तो सर्वांचा गुरु, देव गुरूरूपें सर्वांस रक्षिता, सुख देता, मुक्तिदेता. हा धर्म सर्व धर्माचा जीव,म्हणून केशवाचार्य सांगतो. ही महाराष्ट्रधर्माची दुसरी खूण. प्रत्यहीं स्नान करणें ही, केशवाचार्याच्या मतें, महाराष्ट्रधर्माची तिसरी खूण. मूळ महाराष्ट्रधर्म म्हणजे (१) स्नान, (२) गुरूपदेश, (३) मंत्रजप प्रत्यहीं करावा, असें केशवाचार्यांचें वाक्य आहे (पृष्ठ ६१, ओळ १/२). स्नान म्हणजे शुचिर्भूतपणा, गुरूपदेश म्हणजे सर्व जातींत श्रेष्ठ जो ब्राह्मण त्यानें उपदिष्ट जो आचारव्यवहारप्रायश्चितादि धर्मसमूह तो. आणि मंत्रजप म्हणजे गुरूपदेशानुरूप श्रद्धायुक्त आचरण. तीर्थगुरु तीर्थाचा, स्थळगुरु स्थळाचा, श्रीगुरु कुळाचा व जगद्गुरु जगताचा म्हणजे सर्व देशाचा. जगद्गुरु तो च शंकराचार्य. शंकराचार्यांनीं धर्मस्थापना केली. दक्षिणेस सेतुबंधरामेश्वर, उत्तरेस काशी, पश्चिमेस द्वारका व पूर्वेस तुळजापुर, यांच्या मधील जो पुण्यदेश तो महाराष्ट्रधर्माचें स्थान. जो जो म्हणून स्वतःस माराष्ट्र म्हणवितो त्यानें हा लक्षणत्रयांकित माराष्ट्रधर्म आचरिला पाहिजे. पैकीं मराठा क्षत्रिय जो आहे त्यानें कुक्कुटशब्दा पासोन उठावें, शौचस्नान संपादावें, देवपूजन नित्यकर्म आचार्ययुक्त करावें, शास्त्रवचनाधारें न्याय निवडावा, पुराणेतिहास प्रत्यहीं आयकावा, व शस्त्र कमरेस बांधून भोजन सारावें, कदापि गाफील न रहावें, असें शास्त्रोक्त धर्मचोदित आचरण जो करील तो क्षत्रिय गर्भादान, पुंसवन, चौल, व्रतबंध, विवाह, महोत्सव, विद्यारंभ, इत्यादि कर्मे वेदोक्त करण्यास सर्वथा योग्य होय. ह्या धर्मा पासून पतित असे बहुत राजे शंकराचार्ये शुद्ध केले (पृष्ट ५८, ओळ १३). कांहीं तसेच अशुद्ध राहिले त्यांस निराळी पद्धती नेमून दिली. विप्रांस वैदिक मंत्र, अशुद्ध क्षत्रियांस पौराणिक मंत्र व शूद्रांस तांत्रिक पद्धत शंकराचार्यांनीं घालून दिली. हें अश्या स्वरूपाचें केशवाचार्यानें महाराष्ट्रधर्माचें विवरण केलें आहे. विवरणा वरून स्पष्ट च होतें कीं महाराष्ट्रधर्म म्हणजे केवळ religion of महाराष्ट्र नव्हे. महाराष्ट्रधर्म म्हणजे देशधर्म + जाति धर्म + कुलधर्म + वंशधर्म + देवधर्म होय. महाराष्ट्रांतील देशधर्म म्हणजे याज्ञवक्ल्यस्मृती वर विज्ञानेश्वरानें केलेल्या टीकेंत सांगितलेले सर्व धर्म. जातिधर्म म्हणजे प्रत्येक जातीचे विशिष्ट धर्म. कुलधर्म म्हणजे प्रत्येक कुलाचे विशिष्ट धर्म, वंशधर्म म्हणजे उपकुलांचे ऊर्फ वंशांचें धर्म. व देवधर्म म्हणजे देशांत, जातींत, कुलांत, वंशांत मान्य असलेल्या देवा संबंधानें व स्वत: व्यक्तिमात्राला इष्ट असलेल्या देवते संबंधानें कर्तव्यें, हे सर्व धर्म मिळून महाराष्ट्रधर्म ऊर्फ माराष्ट्रधर्म होतो. महाराष्ट्रधर्माची मुख्य व एक च एक खूण म्हटली म्हणजे गुरुत्वाच्या नात्यानें सर्व धर्मसंबंधक कर्मांचें ब्राह्मणाच्या म्हणजे तीर्थगुरूच्या किंवा स्थलगुरूच्या किंवा कुलगुरूच्या किंवा जगद्गुरूच्या हस्तें संपादन. ब्राह्मणाच्या हस्तें जो कोणी कोणचें हि धर्मकर्म संपादूं इच्छीत नाहीं तो महाराष्ट्रधर्मी नव्हे. अश्या ब्राह्मणद्वेष्ट्याला त्या कालीं पाखंडी म्हणत व धर्मबाह्य म्हणजे कायद्याच्या व रूढीच्या बाहेरचा पतित समजत.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
अखाडा १ [ अक्षवाट: (जुगाराचें ठिकाण) = अखाडा, आखाडा ]
-२ [ अक्षपाट: (जुगार खेळण्याची जागा) = अखाडा ]
अखुडणें [ अव + खुड् खुडति । खंडने । खंड पाडणें ] त्यानें दोरी अखुडली म्हणजे ह्रस्व केली.
अखें [ अक्षयं = अक्खअ = आखें-खा-खी ] आखें म्हणजे सबंध, सबंद, सर्व.
अखेर [ अक्षरी (पावसाळा ) अखेर, अखेरी, अखरी (पावसाळा). (क्षर १ संचलने) ] वर्षाक्षरी = वर्षअखेर म्हणजे पावसाळा. अखेरीचे दिवस जवळ आले, असें वाक्य कोंकणांत मृगाच्या सुमारास हमेष योजतात.
अख्ख ( खें-खा-खी ) [ अस्कन्न = अक्खण्ण = अख्ख (खा-खी-खें )] अस्कन्न = न फुटलेलें, न फाटलेलें, पूर्ण. ( भा. इ. १८३७ )
अख्खें १ [ अक्षय = अक्खअ = अख्ख (खा-खी-खें ) (पोतें, पेटी वगैरेंचें विशेषण ] (भा. इ. १८३६)
-२ [ अक्ष्णं = अख्खं = आख (खा-खी ) आखें. अक्ष्णं अखंडं (उणादि ३०४) ] (भा. इ. १८३३)
-३ [ आक्षितं ( सबंद ) ]
अग [ अ (निपात ) = ( अकच्क) = अक = अग ] (भा. इ. १८३४)
अगई ! [ अगतिकं ! = अगई ! गम् १ गतौ ] अगई ! काय करूं ? = अगतिक: अहं किं करवाणि ? आईशीं कांहीं एक संबंध नाहीं.
अगग [ अंगक (अकच्क अंग) = अगग ] (भा. इ. १८३४)
अगडबगड [ अगितंव्यगितं. अग् कुटिलायां गतौ. वि + अग = व्यग ] अडवेंतिडवें, वेडेंवांकडें. ( धा. सा. शब्द)
अगडबंब १ [ अगदः च असौ बंबः च = अगदबंबः = अगडबंब ) निरोगी व लट्ठ. (भा. इ. १८३४)
-२ [ अगद्य (नीरोगत्वे) + बंह: (वृद्धि:) ] निरोगी व लठ्ठ.
अगळ [ अर्गला ]
अगा १ [ आ (स्मरणे) = ( अकच्क) अका = अगा ! (स्मरणे) ] (भा. इ. १८३४)
-२ [ (आः) अकाः = अगा ! ]
अंगारा [ अंगरागः अंगारा ] holy powder to rub on the forehead.
अगे-[ ए ( निपात ) = ( अकच्क) अके = अगे ]
(भा. इ. १८३४)
महिकावती (माहीम)ची बखर
४८. ह्याच्या उलट उपदेश भारतवर्षांतील व उत्तरकोंकणांतील तत्कालीन उपद्व्यापी व प्रवृत्त अश्या लघुतम लोकांचा इतिहास करतो. अल्पसंख्याक प्रवृत्तांचा इतिहास आपल्या मूठ भर अनुयायांच्या कानांत कंठरवानें ओरडतो कीं,एकसमाज करून व एकराष्ट्र बनवून स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा इत्यादींची स्थापना करा व यथेच्छ अन्नसंपत्ति मिळवा. प्रस्तुत बखरीचा एक कर्ता जो केशवाचार्य व त्याचा पुरस्कर्ता जो नायकोराव ते दोघे हि ह्या प्रवृत्तिधर्माचे प्रवर्तक होते. त्यांनीं ५२१ ब्राह्मण व ३६५६ सैनिक ऊर्फ क्षत्रिय उत्तरकोंकणांतून म्हाळसापुरीं जमविले म्हणजे एकंदर ४१७७ माणसें म्हणजे सुमार चार हजार माणसें प्रवृत्तिमार्गाचीं मिळविलीं. सा-या उत्तरकोंकणांत शक १३७०त ह्या हून कमीत कमी निदान दसपट तरी लोकसंख्या असावी. म्हणजे दहा माणसें निवृत्तिमार्गी धरिल्यास त्यांत एक माणूस प्रवृत्तिधर्माचें त्या कालीं आढळे असें झालें. ह्या अल्पसंख्याक लोकां पैकीं खरे जातिवंत राजचिकीर्षु फक्त दोन च माणसें होती, पहिला केशवाचार्य व दुसरा नायकोराव. बाकी सर्व सैनिक ऊर्फ क्षत्रिय व ब्राह्मण पोटा करितां यवनाचे सेवक झाले. केशवाचार्यं लिहितो, " खल्लक सैनिक ईनामक सर्व रईत अजम शेख अल्लावदिनाची जालिं." सर्व सैनिक, इनामदार व रयत यवनाच्या बाजूचे झाले. केशवाचार्य पुढे शोक करितो कीं, क्षत्रियांनीं राज्याभिमान सांडिला, शस्त्रें सोडिली, कृषि धरिली, सोमवंशियांनीं कारकोणी व गांवखोती पतकरिली,शिंदे वतनें संभाळून यवनाची सेवा करूं लागले,आचारहीन जाले, गोत्र प्रवर कुळस्वामीण कुळगुरू यास विसरले (पृष्ट ५३). सुग्रास अन्न सोडून राज्यें मिळविण्यांत व नवीन सरकारें स्थापिण्यांत होणारे हाल व उपासमार कोण सोसतो? केशवाचार्य व नायकोराव यांनीं बोलाविलेल्या सभेस भोजना वर यथेच्छ ताव मारण्यास व आचरिला जाण्यास कठीण अश्या महाराष्ट्रधर्माच्या शपथा घेण्यास सर्व भोजनभाऊ जमा झाले. ह्या अन्नलंपटांना केशवाचार्यानें प्रवृत्तिप्रधान महाराष्ट्रधर्म सांगितला. ह्या च महाराष्ट्रधर्माचा पुनरुच्चार दोन शें वर्षांनी पुढें म्हणजे झक १५७० च्या सुमारास श्रीमत्समर्थ रामदासस्वामी यानीं शिवप्रभृति मराठ्यांच्या हितार्थ सह्याद्रिकुहरांत केला. तदनंतर दोन शें वर्षांनीं महादेव गोविंद रानडे व राजारामशास्त्री भागवत ह्यांनीं पंचवीस वर्षां मागें महाराष्ट्रधर्म म्हणजे काय ह्या बाबी संबंधानें लेखांतून व भाषणांतून खल मांडिला. महाराष्ट्रधर्म या शब्दाचा अर्थ महाराष्ट्रांतील देवधर्म म्हणजे religion of महाराष्ट्र असा रानडे व भागवत यांनीं केला. महाराष्ट्रधर्म हा देवधर्मवाचक शब्द नसून कर्तव्यवाचक शब्द आहे, असें प्रत्युत्तर त्या वेळीं प्रस्तुत लेखकानें दिलें. त्या प्रत्युत्तराला पोषक असा पुरावा केशवाचार्याच्या लेखांत सांपडतो. केशवाचार्यानें महाराष्ट्रधर्माचें निरूपण बखरीच्या ५३ पासून ६१ पृष्टा पर्यंतच्या आठ पृष्टांत केलें आहे. महाराष्ट्रधर्मा वर एवढें विस्तृत लिखाण आजपर्यंच्या कोणत्या हि जुन्या ग्रंथांत आलेलें नाहीं. आज पर्यंत समर्थांच्या त्रोटक उल्लेखां वरून महाराष्ट्रधर्माची अल्पस्वल्प कल्पना करतां येत असे. ती अडचण आतां राहिली नाहीं. महाराष्ट्रधर्म या सामासिकशब्दाचा अर्थ केशवाचार्य महाराष्ट्रदेशाचा धर्म असा करीत नाहीं, तर महाराष्ट्रिक लोकांचा ऊर्फ मराठा लोकांचा धर्म असा करतो. नंतर, महाराष्ट्रधर्माचें वर्णन करण्या पूर्वी मराठा कोणाला म्हणावें तें सांगतो. उत्तरकोंकणांत केळव्या पासून साष्टी पर्यंत तुव्हेरी, भोसले, चव्हाण, जाधव, घोरपडे, दाहाबाडे, कावरे, बुधले, कबाड, इत्यादिक शहाण्णव कुळींचे पाटील, देशमुख, वतनदार, ठिकाणदार होते ते सर्व केशवाचार्य महाराष्ट्रांत गणतो. देसाय, पाटेल, चौधरी, वतनदार, इजारदार, महालदार, कुळावी, कुळुंबी, म्हातरे, चवघले, साहाणे, इत्यादींनीं यद्यपि कृषिकर्म पतकरिलें तत्रापि हे हि सर्व माहराष्ट्र. राऊत, शिंदे, कडू, चोरघे, म्हातरे, पाटेल, चौधरी, ठाकूर, परभू ह्या नऊ कुळ्यांनीं जरा उदीम धरिला तरी हे सर्व माहाराष्ट्रांत मोडतात. कौळी, सवे, सावे, चुरी, चौधरी, राऊत, वर्तक, म्हातरे, देशमुख, नायक, भोईर, माळी या कृषिकर्म करणा-या बारा कुळ्या माहाराष्ट्रांत पडतात. कोळाय, शिळाय कुळींचे लोक महाराष्ट्र. पुरो,राणे, दरणे, प्रभू यांनीं कारकूनवृत्ति धरिली ते हि माहाराष्ट्र . देशले, म्हातरे, नायक, रुत, राऊत, चौधरी, पाटेल, वर्तक, पुरो, ठाकूर, साण्हे, कौळी, माळी, सुतार, दरणे, ह्या सर्व कुळ्या माहाराष्ट्रांच्या. शेतकरी, कांसार, तांबट, पोगार, लोहार, गाडबडे, बाहारे, मासी, वैती, कोळी, सोनकोळी, ढोरकोळी, आगरी, खारू, डोखळे आणि नट, भाट, बुरूड, चर्मक इत्यादि वर्णावर्ण अत्यंज, हे सर्व माहाराष्ट्र.
महिकावती (माहीम)ची बखर
४७. अपरंपार अशी अन्नसंपत्ति, साही ऋतूंत अत्यल्प कपडालत्या वर शीतोष्णनिवारण होईल अशी हवा, कित्येक शतकें पुरून उरेल अशी जागा, वगैरे साधनांची सुलभ अनुकूलता असल्या मुळें, ह्या देशांत जे जे लोक स्थायिक रहिवाशी होतात ते ते बाहुल्यानें मुक्तद्वारी, संन्यस्त, व्यक्तिनिष्ठ, समाजपराङमुख व राष्ट्रपराङमुख बनतात, ही कहाणी गेल्या दहा रकान्यांत सांगितली. अन्ना करितां दाही दिशा हिंडणा-या व चो-यामा-या, खून, कत्तली, जबरदस्ती, दंगे व लढाया ह्यांत चूर झालेल्या गेल्या तीन हजार वर्षांतील मध्यआशियांतल्या मोंगलादि बिनसुधारलेल्या उनाड लोकां कडे तिरस्कारानें दुर्लक्ष करून, अलीकडील चार शें वर्षांतील सुसंस्कृत म्हणविणा-या युरोपीयन लोकांना हे मुक्तद्वारी, संन्यस्त, व्यक्तिनिष्ठ व राष्ट्रपराङमुख लोक असा प्रश्न करीत कीं, सरकारें बनवून कर उकळीत न बसतां, सालसपणें, निमुटपणें, व शांततेनें ह्या देशांत इतरां प्रमाणें अन्न खात राहिलात तर काय बिघडेल ! एकसमाज करून, राज्ययंत्रें बनवून, राष्ट्रें निर्मून, शास्त्रें रचून, शस्त्रास्त्रे घडवून, एक जूट होऊन, स्वदेशांतील लक्षावधि मोल मजुरांची व भिकार भणंगांची उपासमार करून व परदेशांतील अन्न लुटून शेवटीं पोटाची खळी भरण्या पलीकडे कोणतें शतकृत्य साधता ? आमच्या देशांत आम्हांला ज्या प्रमाणें सरकार ही संस्था जरूरीची भासत नाहीं त्या प्रमाणें तुमच्या कडील शेंकडा नव्वद लोकांना हि समाजाच्या अंतर्बाह्य जिकडेतिकडे घुसणारी सरकार ही संस्था मना पासून नको आहे. तेव्हां, कांहीं उपद्वयापी अल्पसंख्याक लोकांनीं स्वतःची चैन भागविण्या करितां स्थापिलेल्या व सर्व पृथ्वीला पीडा करणा-या सरकार ह्या कृत्रिम व अनवश्यक संस्थेला तुम्हीं आम्हीं. सर्व मिळून मातींत गाडून टाकूं या. सर्व पृथ्वी भर फर्लांगा फर्लांगा वर एकेका कुटुंबाला कोकणांतल्याप्रमाणें एकेक घरवाडा देऊन जुलुमाचीं व पापाचीं जन्मस्थानें जीं शहरें त्यांचा प्रथम नायनाट करूं. ज्याला ज्या देशांत रहावेंसें वाटेल त्यानें त्या देशांत जाऊन जागा असेल तेथें बिनहरकत रहावें. भय काय तें चोराचिलटांचे, पृथ्वीच्या पाठी वरील अर्ध रानटी उनाड लोकांचें किंवा बडे जमीनदार,जंगी पेढीवाले व धंदेवाईक मुत्सद्दी यांचें. पैकीं चौराचिलटांचा मागमूस फर्लांगा फर्लांगा वर घरें झाल्यानें मुदलांत च रहात नाहीं, असा दक्षिण कोकणांतील अनुभव आहे. तो च अनुभव सर्व पृथ्वी भर येईल व चोराचिलटांच्या निवारणार्थ महार व कुत्रीं ह्यांचें देखील सरकार निर्मिण्याची अवश्यकता रहाणार नाहीं. अर्धरानटी लोकांचा एक मोठा जमाव आफ्रिकेच्या मध्य भागांत आहे. आणि दुसरा मोठा जमाव मध्य आशियांत आहे. ह्या दोन्हीं अर्धरानटी जमावांना पाठी मागून रेटून पुढें हुसकून देण्यास त्यांच्या हून रानटी व भुकेबंगाल लोक आतां राहिले नाहींत. करतां, हे हि समाज आपापल्या मूळभूमींत स्थिर होण्याचा संभव आहे. तेव्हां त्यांचा प्रतिकार करण्या साठीं सरहद्दी वरून सैन्य ठेवणा-या सरकारांची आतां अवश्यकता राहिली नाहीं. सबब, दंडधारी सरकारांना येथून पुढें कायमची रजा देणें युक्त नव्हे काय ? बडे जमीनदार, जंगी पेढीवाले आणि धंदेवाईक मुत्सद्दी यांनी सर्व पृथ्वी भर मोंगलादि अर्धरानटी लोकां प्रमाणें धुमाकूळ घालण्या करितां व आपली अनिवार द्रव्यतृष्णा भागविण्या करितां जुलमीं व घातकीं सरकारें चालविलीं आहेत. त्यांचा हा परोपघातक स्वार्थी धंदा बंद पाडण्याची वेळ होऊन गेलीं नाहीं काय ? भारतवर्षांतील व उत्तरकोंकणातील उदासीन व निवृत्त अश्या बहुतम लोकांचा शकाच्या सोळाव्या व सतराव्या शतकांताल इतिहास जर कांहीं विचारीत व शिकवीत असला तर हे प्रश्न विचारीत व शिकवीत आहे.
महिकावती (माहीम)ची बखर
४६. येथ पर्यंत केलेल्या विवेंचनाचा इत्यर्थ असा कीं भारतवर्षांत फार पुरातन काला पासून दोन स्वभावाचे लोंक वावरत आलेले आहेत. राज्ययंत्र चालवून पोट भरणारे बहिस्थ भुकेबंगाल लोक व अन्नसंपत्ति निर्माण करून सालसपणें कालक्रमणा करणारे अंतस्थ अन्नसंतृप्त लोक. जेव्हां केव्हां पासूनचा भारतवर्षाच्या इतिहास आपणास माहीत आहे, तेव्हां पासून हे दोन वर्ग दृष्टिपथांत येतात. दुस-या वर्गास बहि:स्थ वैदिक लोक विश् ह्या संज्ञेनें ओळखीत. विश् म्हणजे बैठे लोक म्हणजे बिछायत पसरून शेतकी व व्यायाम करणारे लोक. विश् लोक संपत्ति कमाविण्यास लागणा-या करामतीनें मारामा-या करण्यांत पटाईत अशा क्षत्रिय लोकां हून जास्त सुधारलेले असत. विश् लोकांत राजा, राज्य, राष्ट्र, इत्यादि राजकीय अर्थांचा हव्यास अत्यन्त अल्प प्रमाणाचा असे. कदाचित् राजन् ही पदवी विश् लोकांना क्षत्रियांची गांठ पडे तों पर्यंत माहीत हि नसावी. क्षत्रियांना व ब्राह्मणांना मात्र राजा, राज्य, राष्ट्र व प्रजा हे चार अर्थ फार प्राचीन काला पासून माहीत होते. कारण ते पृथ्वीच्या ज्या प्रदेशांत रहात असत त्या प्रदेशांत अन्नाची टंचाई पराकाष्ठेची असे. अन्न दे, प्रजा दे, राजा दे, गाई दे, मेंढ्या दे, अशा मायन्याच्या प्रार्थनांनी चार हि वेद भरलेले आहेत. (Give us our daily bread, ही जशी यूरोपीयन लोकांची निकडीची प्रार्थना त्याच मासल्याची ब्राह्मणक्षत्रियांची भुकेबंगाली प्रार्थना असे. राजा व प्रजा ही संस्था ब्राह्मण क्षत्रियांनीं भारतवर्षांत आणिली. प्रत्येक बाप आपल्या प्रजेचा म्हणजे संततीचा राजा असे. राजा म्हणजे रक्षण करणारा. मूळ राज् या धातूचा किंवा खरें म्हटलें म्हणजे शब्दाचा अर्थ रक्षण करणें असा होता. संतीताचें रक्षण, पाळण व पोषण करणारा जो तो राजा. राजा ह्या शब्दा सारखा च पितृ हा शब्द आहे. पितृ म्हणजे पाळण, रक्षण, पोषण करणारा. राजा व त्याच्या पोटची प्रजा मिळून राष्ट्र होई. पोटच्या संततीस च तेवडी प्रजा हि संज्ञा असे. प्रजेला व्यक्तिदृष्ट्या राष्ट्रीय म्हणत. राज् रक्षण करणें ह्या धातूला ऐश्वर्यवान् होणें, अधिकार चालविणें, इत्यादि अर्थ लक्षणेनें नंतर आले. मूळचा राजन् हा शब्द पितृ ह्या शब्दाचा समानार्थक होता. प्रजा हा शब्द केवळ पोटची संतति ह्या अर्थाचा वाचक होता. Subject म्हणजे खालीं दडपिलेला ह्या अर्थी प्रजा हा शब्द त्या प्राचीन कालीं योजिला जात नसे. विश् जेव्हां भेटले तेव्हां subject ह्या अर्थी दास हा शब्द अस्तित्वांत आला. तों पर्यंत राजा व प्रजा ह्या संस्थेंत दास नव्हते. मूळचें आर्य लोकांचें राष्ट्र म्हणजे राजा व पोटची प्रजा. ह्या आर्यांना अर्य भेटले. अरेः इदं अर्यं. अर्य म्हणजे शत्रू जे विशू लोक त्यांना आर्यांनीं दास हें टोपण नांव दिलें. दास म्हणजे देणारे. दाला सिप् किंवा सन् होऊन दास हा शब्द झाला आहे. दास म्हणजे कर देणारा. विश् जो दास तो राजाला कर देई. संतती जी प्रजा ती कर देत नसे. प्रजा वयांत आली म्हणजे ती राजा ह्या पदवीला पोहोचे. दास जे विश् ते राजा ह्या पदवीला किंवा प्रजा ह्या पदवीला पोहोचत नसत. ते केवळ कर देणारे जित लोक असत. प्रत्येक पितृ राजन् असल्यामुळें अनेक पितृ मिळून जो गण होई त्या गणांतील सर्व पितृ आपणास व्यक्तिशः राजन् म्हणवीत. टोळींतील असे अनेक राजे मिळून गणराज्य होई. गणाचा जो पुढारी त्याला गणराज्, गणपति किंवा गणनायक ही संज्ञा असे. गणराजा जेव्हां आपल्या हातीं सर्व सत्ता बळकावी तेव्हां त्याला एकराज् म्हणत किंवा संक्षेपानें राज् म्हणत. राज् व गणनायक हे दोन शब्द प्राचीन इतिहासदृष्ट्या अत्यन्त महत्वाचे आहेत. रोमन् राजार्थक rex शब्द राज् ह्या धातूला सिप् किंवा सन् होऊन बनला आहे. राज् + स् = राक्स् = रेक्स् . गणनायक = कोणआअग = Konig= King अश्या अपभ्रंशानें किंग, कोनिग हा राजार्थक इंग्लिश व जर्मन शब्द बनला आहे. Konig, King ह्या शब्दाचा मूळ अर्थ heap of the horde, leader of the horde, असा आहे. ह्या व्युत्पत्यां पासून असें निगमन प्राप्त होतें कीं राज् हा शब्द ज्या काळीं वैदिक आर्यांत अधिपति, ईश्वर ह्या अर्थाचा वाचक झाला त्या कालीं वैदिक आर्य व रोमन लोकांचे पूर्वज एकमेकांच्या शेजाराला होते; तसेच, गणराज् , गणनायक, हे शब्द ज्या कालीं गणराज्यसंस्थेच्या अनुषंगानें वैदिक आर्यांत प्रचलित झाले त्या कालीं जर्मनादि लोकांचे पूर्वज वैदिक आर्यांच्या शेजाराला होते. रोमन व नर्मन लोक वैदिक आर्यांच्या शेजाराला होते व आर्यभाषा बोलत होते म्हणून ते आर्यवंशी होते, असें मात्र समजण्यांत अर्थ नाहीं. जर्मन, साक्सन्, रोमन, वगैरे लोक वंशानें आर्य नव्हते. राक्षस् , दानव, यातु, वगैरे अनार्यवंशांतले हे आर्यभाष लोक होते. अशी ही प्राचीन गणराज्यसंस्था घेऊन भारतवर्ष हें नांव ज्या देशास पुढें कालान्तरानें पडलें त्या देशांत आर्यांची धाड शिरली व त्या धाडीनें एकराज्य, वैराज्य, साम्राज्य, माहाराज्य इत्यादि राजकारणाचे नाना प्रयोग केले, आणि प्रयोग करून थकल्या वर व अन्नसंतृप्त झाल्या वर मुक्तद्वारी, तुटक, संन्यस्त, वेदान्ती, समाजपराङमुख व राष्ट्रपराङमुख होऊन बसले. सुदासादि ऋग्वैदिक राजां पासून तो तहत बाजीरावादि चित्पावन राजां पर्यंत हा क्रम थोड्या फार फरकानें ह्या खंडांत चालू आहे. अन्नसंतृप्त, संन्यासप्रवण व व्यक्तिस्वतंत्र लोकांचे थरावर थर ह्या देशांत गेल्या पांच हजार वर्षे क्रमानुक्रमानें बसत आले आहेत. त्यांच्या करवीं राजकीय, देवधार्मिक, वैयापारिक, भाषिक, राज्यमारक किंवा राज्यसाधक असें कोणतें हि सामुदायिक कार्य स्वयंस्फूर्तीनें किंवा परस्फूर्तीनें आजपर्यंत कधी च झालेलें नाही. हीं सर्व कार्ये पोटा करितां राज्ययंत्र पटकविण्याची हांव धरणा-या बहि:स्थ किंवा अंतःस्थ असंतुष्ट अल्प- संख्याक लोकांच्या हातून वेळोवेळ पार पडलेलीं आहेत.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
व्द्यपरदशन् = बिअअरअह = बारह = बारा
त्र्यपरदशन् = तिअअरअह =तेरह = तेरा
पंचापरदशन् = पंञाअरअह = पंण्णाराह = पंण्णरा = पन्हरा = पंधरा
षडपरदशन् = सळअळअह = सोळाह = सोळा
सप्तापरदशन् = सत्ताअरअह = सत्तरह = सतरा
अष्टापरदशन् = अट्ठाअरअह = अठ्ठारह = अठारा = अठरा
येणेंप्रमाणें अकरा, बारा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा ह्या शब्दांतील र चा उगम पूर्ववैदिक भाषेंत व त्या पूर्ववैदिक भाषेच्या अपभ्रंशांत आहे.
दोन शब्दांचा समास होतांना कोठें कोठें प्रथम शब्दाच्या अन्त्यस्वराला वैदिक भाषेंत दीर्घत्व येतें. जसें, मित्रः + वरुणः = मित्रावरुणौ. येथें पाणिनि एवढेंच सांगेल कीं समास होतांना कित्येक सामासिक शब्दांत असा दीर्घत्वाचा चमत्कार होतो. हा चमत्कार कां होतो, तें पाणिनि सांगणार नाहीं व तें सांगण्याचें त्याचें काम हि नव्हतें. तो कांहीं व्याकरणाचा इतिहास लिहीत नव्हता.
मित्र + अ + वरुण = मित्रावरुणौ
या समासांतील अ चा अर्थ काय ? माझ्या मतें ह्या द्वंद्व समासांतील अ चा अर्थ आधिक्य Addition असा आहे. आ हैं अक्षर पूर्ववैदिक अपर ह्या शब्दाचा अपभ्रंश किंवा संक्षेप आहे. द्वंद्व-समास म्हणजे दोन अथवा अधिक शब्दांची मिळवणी.
मित्रेण अपरः नाम अधिकः वरुणः = मित्रावरुणौ = वरुण Together with मित्र = वरुण and मित्र.
(भा. इ. १८३५)
अकाळी [आकालिक: ] (आकाळी पहा)
अंकुश [ अंगकुश = अंकुश (अंगाला टोंचणारें शस्र) कुश् टीचणें ]
अक्कड [ आकृति = आकडी, अक्कड ] शरिराची आकडी = शरीरस्य आकृतिः.
अक्षि [ अक्षयं = अक्षि ( अव्यय, ग्राम्य ) ]
उ०- तो अक्षि मेला म्हणजे तो पूर्ण मेला, सदा मेला, कायमचा मेला. (भा. इ. १८३६).
अक्षी १ [ अक्षं ( प्रत्यक्ष ) = अक्षी ] प्रत्यक्ष.
- २ [ अक्ष्णया (उपनिषद्) = अक्षी ] a little (adverb)
अखरी [ अक्षरी ] ( अखेर पहा) .
महिकावती (माहीम)ची बखर
येक गर्धव जाण ।। स्त्रिये वरि ॥ २४ ॥
ऐसा केला बंदोबस्त ।। रायें रक्षक ठेविले तेथें ॥
आपण आले महिमास ॥ खेडा वरि ॥ २५ ॥
तेथे माहाल उत्कर्ष केले ॥ तिन कुंडें बांधिली ।।
त्यांसि कुलुपें केलिं ॥ तये स्थानिं ॥ २६ ॥
त्यांत भरिला सर्व खजिना ।। नाना तरेचें नाणें जाणा ।।
आणि हिरे परि पाचु जाणा ॥ ठेविले असति ।। २७ ।।
ऐसा केला बंदोबस्त ।। राजा राहिला निवात ।।
राज्य चालत असे स्वस्त ।। बिंबदेवाचें ॥ २८ ॥
या खेरीज जाण ॥ जागो जागा निधान ॥
रायें ठेविलें पुरोन ॥ बिंबदेवें ॥ २९ ॥
॥ सांखळि ॥ १ ॥
ह्या एकोण तीस ओव्यांची शाई ओली असतांना, लेखकानें सर्व लिखाणा वर उलटा ठसा घेण्या करितां कागद दाबिला. त्या मुळें बरींच अक्षरें पुसून चिताड झालीं. तत्रापि बहुतेक अक्षरें वाचतां येण्या सारखीं आहेत. दहा वीस अक्षरें अगदींच पुसटून गेलीं होतीं तेवढ्यांच्या को-या जागीं फुल्या छापिल्या आहेत. ओव्यांत उल्लेखिलेल्या स्थळीं द्रव्यलब्धीचा जरी फारसा संभव नसला तत्रापि बिंबदेवकालीन प्राचीन अवशेष सांपडण्याचा संभव आहे.