Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
इ
इखीविखी [ ईक्ष् १ दर्शने. ईक्षावीक्षा = इखीविखी ] हा शब्द जुन्या मराठी ग्रंथांत येतो. ( धा. सा. श. )
इंगा [ इंग् १ गतौ. इंगः = इंगा ] इंग: म्हणजे अभिनयानें हेतू कळविणें. शनीचा इंगा म्ह० शनीच्या येण्याचा हेतू. ( धा. सा. श. )
इचणें [एज् १ कम्पने = इचणें ] असा इचूं नको म्ह. कांपूं नको. (धा. सा. श. )
इछित [ ईप्सित = इछित; इष्ट = इष्ट] इष्ट आाणि इछित असे दोन्ही शब्द मराठींत आहेत व त्यांचे उगम भिन्नभिन्न आहत. ईप्सितं अभीप्सितं = इच्छिलेंबिछिलें (अ लोप व स्वार्थे ल) ( धा. सा. श. )
इच्छित [ ईप्सितं = इच्छित (प्राकृत)=इच्छित (मराठी) चंडस्य प्राकृतव्याकरणं P. १४ text, Hoerule
इजर १ [ इज्जर = इज्जर = इजर ] एका प्रकारचा वेत. (भा. इ. १८३६)
-२ [ हिज्जल: = इजर]
इजा [ ईज् कुत्सने. ईजा = इजा = विजा ] इजा म्ह० निंदा, शब्दानें दुखवणें, ( नंतर ) शरीरदु:ख. ( धा. सा. श.)
इतकुलीमितकुली [इतुक (ल स्वार्थे)= इतुकल (ला- ली-लें) इतुकल = इतकुल. मित ( क स्वार्थे व ल स्वार्थ ) = मितकल (ला-ली-लें) (इतुकलच्या अनुकरणानें) = मितुकल] मित म्ह० मोजकें, अल्प. इतुक म्ह० एवढ. इतकुलीमितकुली गोष्ट = एवढी लहान गोष्ट. पोरांच्या बालकथांत हे शब्द येतात. (भा. इ. १८३३)
इटीदांडू [ यष्टिदंड = इट्टिदंडु = इटदाँडू ] (भा. इ. १८३२)
इटेकरी [ यप्टिकर = इष्टिकर = इट्टिकर = इटीकर = इटेकर-री. ] (भा. इ. १८३२)
इतक ( का-की-कें ) [ इयत्तक ( वैदिक) = इतक ( का-की-कें) ] (भा. इ. १८३६)
इतिश्री [ विश्र (मृत्यु ) = इश्री = इतिश्री ] इतिश्री (म्हणजे समाप्ति) या शब्दाच्या धर्तीवर ति मध्यें घुसडली. ' विश्रे ? ' पासून निघालेली इतिश्री म्हणजे मृत्यू. इति + श्री म्हणजे समाप्ति. (भा. इ. १८३४)
इत्सा [ आदित्सा ( घेण्याची इछा ) = आइत्सा = इत्सा ] वस्तूची इत्सा = वस्तु मिळविण्याची इच्छा. इत्सा आणि इछा हे मराठींत दोन भिन्न शब्द आहेत. ( भा. इ. १८३४ )
इथंतथं [ आयथातथ्यं = इथंतथं ]
इथंतथं करूं नको म्ह० खोटें करूं नको.
महिकावती (माहीम)ची बखर
आपला शक चालता केला ॥ आपण समुद्रिं राहिला ।।
मग भोजराजा जाला । शोमवंशी ॥ १७५ ॥
त्याची परंपरा उज्जनिनगरी ।। यका पासाव येक अवधारी ॥
ते सांगतों सविस्तरी ॥ आईका आता ॥ १७६ ।।
भोज १ | प्रतिभोज २ | शांतनादित्य ३ |
काशेश्वर ४ | विक्रमादित्य ५ | श्रीबिंब ६ |
महाबींब ७ | सुसुपाळ ८ | केशवादित्य ९ |
वज्रनाभ १० | विरुपाक्ष ११ | धूम्रकेत १२ |
पद्मनाभ १३ | अजानबाहु १४ | वृषकेत १५ |
वृद्धवाहन १६ | बवृ १७ | पन्नगेश्वर १८ |
वैरोचन १९ | प्रेमनाभ २० | अयुताचन २१ |
अयुताचन राजा दानसुर ॥ उज्जनिनगरिचा नृपवर ॥
नांदतां महापवित्र ।। कथा वर्तलि ते आईका ।। १७७ ॥
शामकर्ण राजा शोमवंशी । नांदता पैठणदेशीं ॥
पुत्र नाहि वंशीं ॥ म्हणोनि वैराग्य घेतलें ॥ १७८ ।।
अयुताचन गेला पारधिसी ॥ अरण्यी देखिलें तयासी ॥
पृछा आदरिली तापसिसी ।। राये प्रती ॥ १७९ ॥
तूं कवण देशिचा नृपती ।। राया सांगे मजप्रती ॥
कवण देशिं नांदती ।। पुत्रकळत्र ॥ १८० ॥
येरु बोलिला वचन ॥ आम्हि सोमवंशि जाण ॥
आम्हा छत्र सिंहासन ।। जाण सत्य ।। १८१ ॥
नामाभिधान आमुचें ।। अयुताचन साचें ॥
पुत्र पांच आमचे ।। मंदिरी आहेती ॥ १८२ ॥
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
आस्थावाईक [ आस्थापातिक ]
आस्थावाईक, आस्थेवाइक [ पत् १० गतौ. आस्थापातिक = आस्थावाईक. आस्थाप्रायिक = आस्थावाइक = आस्थेवायिक ] (वाईक पहा) ( धा. सा. श. )
आस्रा (घराचा) [अश्रि (घराचा कोपरा ) = आस्त्री = आस्रा ] घराच्या आस्र्याला म्ह० घराच्या कोपर्याला. (भा. इ. १८३४)
आस्राप [ आश्राव: = आस्राप. आश्राप: म्ह० विनयशील. स्रु १ गतौ ] मुलगी आस्राप आहे म्ह० विनयशील आहे. ( धा. सा. श. )
आस्वल १ [ अच्छभल्ल = अस्सव्हल = आसवल=आस्वल (ऋक्षाच्छभल्लभालूकाः । अमर) ] (भा. इ. १८३४)
-२ [ अच्छभल्ल = आसहल = आसअल = आसवल, आस्वल] आंहां ! [ अहं ( अव्यय) = आंहां ! ]
आहाच (ज्ञानेश्वरी) [ आहत्य (कदाचित्) = आहच्च = आहाच (जैनमहाराष्ट्री) ] (भा. इ. १८३६)
आहाण [ आघातन Slaughter-house = आहाण ] Slaughter-house.
उ० - यर्हविं यागादिकीं क्रिया । आहाण ते चि धनंजया ।
परि विपलांति आचरौनियां । नाटकी जैसे ॥ ज्ञा. १६-३७४
आहूत [ आहुति ] ( आउति पहा)
आहे [अस्ति ] ( ज्ञा. अ. ९ )
आहेर [ आभर (ण) = आहर = आहेर ] मंगलकार्यसमयीं दिलेले वस्त्रालंकार. (भा. इ. १८३२)
आहो [ आ + अक् अवाप्तौं = आवणें to be accomplished. आवः ( अवाप्तिः ) = आवो = आहो ] accomplishment.
उ०-ह्मणोनि हा काव्यां रावो । ग्रंथ गरुवतीचा ठावो ।
एथौनि रसां जाला आवो । रसाळपणाचा ॥
माडगांवकर ज्ञानदेवी १-३३
आळ [अलीक = अलीअ = अळी = आळी = आळ] (भा. इ. १८३२)
आळ (प्रत्यय) - हेळणं, हेडनं = हेळणें = हेटाळणें,
पिटनं = पिटणें = पिटाळणें, कंठनं = कंठणें = कंटाळणें,
स्फिटनं = फेडणें = फेटाळणें, वेष्टनं = वेट्टणँ = वेटाळणें,
मोटनं = मोडणें = मोटाळणें (भा. इ. १८३७)
आळण [ आलेहन = आळण ] चाटतां येण्यासारखे पातळ पिठलें.
आळवणें १ [ आलपनं = आळवणं (णें) ] (भा. इ. १८३२)
-२ [ आलप् = आळव ] बोलून तृप्त करणें. (भा. इ. १८३३)
आळसबिळस [ आळसविळस = आळसबिळस ] (भा. इ. १८३४)
आळा १ [अलं = आळा, अलकम् (साकच्) = आळा ] आळा म्हणजे पुरे, मर्यादा. (भा. इ. १८३४)
-२ [अलं (enough, पुरे) = आळा (पुल्लिंग) ] आळा घालणें = पुरें म्हणून थांबवणें. (भा. इ. १८३४)
आळाण [ आ + ली - आलयन ] घट्ट पिठलें सोलापूरकडील.
आळिवणें [ आलेप् = आळिव. ] घोटून रबडी करणें. (भा. इ. १८३३)
आळी [ ली ९ श्लेषणे. आली ( आवलि) = आळी ] घरांची ओळ. ( धा. सा. श. )
आळुमाळु [अलंअलं = अलमल= आलुमालु = आळुमाळु = आलमाल ] (भा. इ. १८३२)
आळू (वृक्ष) [आरुकं=आळू]
आळें (किड्यांचे) [ आलं = आळें] आलं म्ह० कृमी व कीटक यांच्या अंड्यांचा समुदाय. ( भा. इ. १८३४)
आळोकापिळोका [ आपुलक:पुलक: = आळोकापिळोका ] अलकपुलक = केसांचें थरारणें.
महिकावती (माहीम)ची बखर
मग बोलावोन द्विजोत्तम ।। फळ दाखविले उत्तम ।।
तें देखोन आश्चिर्य जाण ।। करि वेदमूर्ती ॥ १६५ ॥
ब्राह्मण विनवि अमृतवचनी ।। राया तू सत्यवादी कृपापर्णी ॥
हें फळ स्वता भक्षिलें नाहि कीं ।। हे सांगिजे नृपवरा ।। १६६ ॥
तेषवां राव खोंचला मनी ।। म्हणे विपरित जालि हे करणी ॥
बोलाविली कामिनी ।। सभेमाजी ॥ १६७ ॥
सत्य सांगे पतिव्रते ।। तुज म्या फळ दिधलें होतें ॥
तें, काये केलें कांते ।। तें सांगिजे मजे ॥ १६८ ॥
वचन ऐकुनि, सकळी ॥ जैसी चंडवातें उन्मळे कर्दळी ॥
कीं जळाविण मासोळी ॥ तैसि कोमली लज्जित ।। १६९ ॥
राया मनि खेद जाला । तयातें वैराग्य आठवला ॥
शरिरि कांटाळा भरला ॥ उतरला सिंहासना खालुता ॥ १७० ।।
॥ श्लोक ॥
या चिंतयामि शततं महि षा विरक्ता ।।
शाप्यनमिच्छति जन स्व जनोन्यशक्ता ।।
अस्मिन्कृत च परितुस्यति काचिदन्या ।।
धिग् तां च तां च मदनं च ईमां च मां च ॥ १ ॥
मग विक्रमादित्य बोलाविला ।। राज्याभिषेक तयासि केला ।।
आपण वानप्रस्त जाला ॥ योगअभ्यासी ।। १७१ ॥
मग मृतहर गेला वनासी ॥ विक्रमादित्य बैसला सिंहासनासी ॥
राज्य चालविलें यथानितिसी ।। विक्रमादित्य ।। १७२ ॥
युद्धीष्ठिर शक सारिला ।। आपला शक चालता केला ॥
मग शाळिवाहन जन्मला ॥ पैठण नगरी ।। १७३ ॥
ब्राह्मणकन्येचे पोटी स्पष्ट ।। शाळिवाहन जन्मला शुभट ।।
तो शकाधिकारी बळकट ।। त्याणें विक्रमातें मारिलें ॥ १७४॥
महिकावती (माहीम)ची बखर
दीनमुर्ति राजा गंधर्वसेन ॥ नांदतां उज्जनिनगरि जाण ॥
कथा वर्तलि गहन ॥ ते आईका आतां ॥ १५१ ॥
कोणे येके दिवसी ।। राजा गेला पारधिसी ।।
वनि हिंडतां तयासी ।। अपुर्व वर्तले अवधारा ।।१५२ ॥
अपसरा खेळति जलक्रिडा सरोवरी ।। वस्त्र ठेवोन वृक्षावरी ॥
गंधर्वसेन ते अवसरी ॥ पावला तेथें ॥ १५३ ॥
तंव त्या देखिल्या नग्न ।। रायासि बाणला कामबाण ॥
उभा राहिला वस्त्र घेवोन ।। सरोवरतिरी ॥ १५४ ॥
तें देखोनि अप्सरा ।। क्रोधें खवळल्या अवधारा ।।
शाप वदल्या दुर्धरा ।। गर्भव होसि म्हणोनी ॥ १५५ ॥
तें ऐकुनि शापवचन ।। हृदईं खोचला गंधर्वशेन ॥
ऊशाप मागों आदरिलें त्यो लागुन ।। विनती करोनियां ॥१५६॥
मग दीधला ऊशाप ॥ रात्रि पुरुष होसि साटोप ।।
दिवसा गर्धवशरिर प्राप्त ।। होसि निरुतें ॥ १५७ ॥
ऐसा ऊशाप ऐकोन ।। राजा गर्धवशरिर झाला जाण ॥
सेवक विस्मय करिती मनी ॥ अपुर्व जाण ॥ १५८ ॥
दिवस तेथें क्रमला ।। निसी होताच पुरुष जाला ।।
मग ग्रहासि आला ।। राजा गंधर्वसेन ॥ १५९ ॥
अपुर्व सर्वासि जालें ।। राया शापवचन घडले ॥
नाव गंर्धवसेन पावले ॥ राजेंद्रासी ।। १६० ॥
मग राज्य भृतहरासि दिधलें ।। तयास सिंहासनि बैसविलें ॥
त्याणे उज्जनिचें राज्य केलें ।। संवत्सर ९० ॥ १६१ ।।
मग तेथे अपुर्व वर्तले ।। रायासिं ब्राह्मणे अमरफळ आणुनि दीधलें ।।
तें फळ रायें राणिये प्रति अर्पिलें ॥ मनोभावें ॥ १६२ ।।
मग ते अंगनसेना ।। परद्वारि प्रवर्ते जाणा ।।
तें फळ तिण्हे अश्वदासा ।। प्रति अर्पिले ।। १६३ ॥
त्याण्हे तें फळ सेणपुरिसि दीधलें ।। तिणें तें घेवोन बीजें केलें ।।
तें भृर्तहरिने दृष्टि देखिलें ।। मग आणिलें मंदिरी ॥ १६४ ।।
महिकावती (माहीम)ची बखर
शांतनादित्यें पण बांधिला ।। वज्रविहु असे उभारिला ।।
जो तिहि शरि भंगिल तयाला ॥ कंन्या आणि राज्य ॥ १४१ ।।
ऐसा पण दुर्घट ॥ राव पाहाति सकळिक ।।
येकमेकां विचार देख ॥ मांडला तेथें ।। १४२ ।।
ऐसें असतां तया स्थानी ।। राव इंद्रशेन बोले वचनी ।।
नीर्विर्य होता आम्हा लागुनी ।। अपेश असे ॥ १४३ ॥
शोमवंशि आम्हासि उत्पती ।। ज्याची युगांतरि किर्ती ।।
ते आम्ही धर्ममूर्तीं ।। काये आम्ही प्रति सांगताहे ॥ १४४ ॥
क्षण न लगतां वज्रविहु भंगु ।। कीं भुगोळ पालथा घालुं ।।
आज्ञा घेउनि कल्होळु ।। गेला तेथे ।। १४५ ॥
प्रथम बाणि विहु भंगिला ।। दुसरा बाण कोठे टाकु पुसता जाला ।।
तें देखोनि संतोषला ।। शांतनादित्य ।। १४६ ॥
हस्तिणि धावोन आली ।। माळ कंठि घातली ॥
देविं पुष्पवृष्टि केली ।। स्वर्गी होउनिया ॥ १४७ ॥
ॐ पुण्या वेदमंत्रे जालें ।। नाना वाद्यें वाजो लागलें ।।
राज्य सर्व अर्पिलें ।। राया चंद्रसेनासी ।। १४८ ॥
सोहळा संपादिला आनंदें ।। दाने वांटिली अगाधें ॥
राज्य करिती स्वानंदे ॥ शांतनादिव्य आणि इंद्रसेन ॥ १४९ ।।
तेथे इंद्रशेनाची परंपरा ।। उज्जनिनगरि अवधारा ॥
ते सांगतो सविस्तरा ।। आईका श्रोते ।। १५० ॥
इंद्रसेन १ चंद्रशेन २ रामसेन ३
महिंद्र ४ पुरंद्र ५ प्रतापसेन ६
नीळसेन ७ गंधर्वसेन ८ सोभद्र ९
पुरंदर १० इंद्रसेन ११ गंधर्वसेन १२
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
आवळ १ [ आकुलम] ( धातुकोश-आवळ १ पहा)
-२ [वल् १ वेष्टने, संवरणे आवलनं ] ( घा. सा. श.)
आवा १ [ आहावः ( पाणिनि ) a trough for watering cattle etc. = आवा-कुंभाराचा पाण्याचा ]
-२ [ आतापकः = आआवआ = आवा (भट्टी ) ] आवा (कुंभाराचा ).
-३ [ तप् १ सन्तापे. आतापक = आआवआ = आवा (कुंभाराचा ) तप्त्वाशूलाकृत्य = तावूनसुलाकून. तपकः = तवा. निस्ताप = निताव ] (धा. सा. श. )
आवाइ, आवाई १ [ ह्वे १ शब्दे. आह्वायिका = आवाई (बातमी, वार्ता ). आह्वायक म्ह० जासूद, बातमीदार ] (धा. सा. श.)
२- [ आह्वयः = आवाई ] आह्वयः म्ह० वार्ता, बात, लोकवार्ता.
आवांका १ [ वंक् १ कौटिल्ये. आवंक: = आवांका, आंवाकणें ] ( धा. सा. श. )
-२ [ आ + वक्ष् १ रोषे ] (धातुकोश-आवांक १ पहा) आविक [ आमिक्षा ]
आविकलेलें १ [ आमिक्षा ( curd दहीं ) आमिक्षित = आविकलेलें, आविखलेलें, आमिकलेलें ( दहीं ) ]
-२ [ आमिक्षा ११. आमिक्ष्य = आविक. आमिक्षितं = आविकलेलें. क्षीरे दधियोगत: या विकृति: सा आमिक्षा ] आविकलेलें दहीं म्ह० बिघडलेलें, फुटलेलें दहीं. (धा. सा. श.)
आविखलेलें [ आमिक्षित ] ( आविकलेलें १ पहा )
आवुत्त [ आर्यपुत्र = अज्जउत्त = आउत्त = आवुत्त ]
आंव्या [ आमयावी = आंव्या ] आंव ज्याला झाली आहे तो आंव्या.
आशावणें [ आशाय ११ इच्छायाम्. आशाय = आशाव ( णें ). ] ( धा. सा. शा. )
आंस [ अक्ष = आंस ]
आसगंध [ अश्वगंधा = आसगंध ]
आसणा ( वनस्पतिविशेप)[ असनः = आसणा ]
आसपास [आचोपच towards and away from. (वैदिक) आच towards, उपच away from ] ( घरास = गृहं आच. स हा प्रत्यय आच ह्या पूर्वेवैदिक विरळ अव्ययापासून निघालेला समजणें युक्त.)
आसलग [ आशालग्न=आसलग (आशाळभूत, ज्ञानेश्वरी) ]
आंसूं [ अश्रु = आंसूं] ( स. मं. )
महिकावती (माहीम)ची बखर
काळकोट १ | कृतांतकाळ २ | देवदत्त ३ |
अयाती ४ | कपिलाक्ष ५ | लक्षमण ६ |
वीरभद्र ७ | द्वारकभीम ८ | केदार ९ |
कपिलाक्ष १० | विरुपाक्ष ११ | सोमदत्त १२ |
भद्राक्ष १३ | चंद्रसेन १४ | हेमवंत १५ |
बळिभद्र १६ | अर्जुन १७ | अंकुश १८ |
ताम्रध्वज १९ | नीळध्वज २० | उग्रसेन २१ |
विश्वपाळ २२ | देवगिरी २३ | चंद्रसेन २४ |
इतुके राजे नांदले नवकोटि पर्वतीं ।। त्याचि परंपरा चालिलि तेथें ।।
पुढें कथा वर्तलि सत्य ।। ते आईका ।। १३५ ॥
इंद्रशेन राजा तेथिचा ।। प्रतापि धनुर्धर साचा ।।
धार्मिष्ट बोलणें सत्य वाचा ॥ सदावृती ॥ १३६ ॥
नांदतां नवकोटि पर्वती ।। कथा वर्तलि पुणती ॥
ते ऐकावि श्रोतीं ।। ऋषिवाक्ये ॥ १३७ ॥
उज्जनि नगरिचा नृपवर ।। शांतनादित्य धनुर्धर ॥
धार्मिष्ट महाथोर ।। दानसूर प्रतापि तो ॥ १३८ ॥
नांदतां उज्जनिनगरी ।। कंन्या असे तयाचि उपवरी ।।
नांवें पद्मावति सुंदरी ।। नागरा ते ॥ १३९ ।।
स्वयंवर मांडिलें तियेचें ॥ राजे मिळाले देशोदेशिचे ।।
इंद्रशेन स्वयंवरातें ॥ गेला तेथें ॥ १४० ॥
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
आरोगणें [ आरोचनं ] to be agreeable रुचूं लागणें. (ज्ञा. अ. ९ पृ. १४५)
आरोळी [ रु २ शब्दे. आरावालिः = आरौळी = आरोळी] लांब हाक. ( धा. सा. श. )
आर्ये ! [ शाकटायनस्तु आर्य इति प्रतिबंधे (अष्टाध्यायीतत्त्वबोधिनी-अव्ययप्रकरणम्) ] आर्ये, अर्ये हे निपात मराठींत प्रतिबंधार्थक आहेत. अर्ये ! अथवा अरे ! गप्प बैस. किंवा नुसतें अरे ! आर्ये ! (भा. इ. १८३४)
आलमाल [ आळुमाळु पहा]
आलाडपालाड [ आरात्तातपरात्तात् - आलाडपालाड, अल्याडपल्याड ] जवळून आणि दुरून. (भा. इ. १८३४) आवई [ आहवय (currency, news) = आवई ] आवई उठली म्ह० लोकप्रवाद उठला.
आवकजावक [ आयक + व्ययक = आवकजावक credit and debit. य = व; व्य = ज. आय income, व्यय expenditure ] आवक जावक म्ह. income व expenditure.
आळणी [ अव् १ वृद्धौ. अवनिः = आवणी = धान्यवृद्धि ] ( धा. सा. शब्द )
आवंतणें [आमंत्रणं = आवंतणें] (भा. इ. १८३४)
आवति, आवती [ आहुति ] (आउति पहा)
आवत्या [ आहूतय: = आवत्या. हु अदने ] आवत्या म्ह० लहान घास.
आवत्याजिवत्या [आहूतयः=आवल्या] आवत्याजिवत्यांची महाराष्ट्रांत चातुर्मासांत पूजा करतात.
आंवदा [ आइंदह् (फा.) ] ( यंदा पहा)
आवरण [ आपारणम् ] (धातुकोश-आवर १ पहा)
आवर्जून [ वृज् १० वर्जने. आवर्जिताः = संमानिताः एते जामातरः परमगौरवेण आवर्जिताः स्वानि गृहाणि न गच्छंति ॥ पंचतंत्र-चतुर्थतंत्र-कथा ६ ] आवर्जून सांगणें म्ह० सन्मान करून सांगणें, मुद्दाम आग्रह करून सांगणें इ. इ. इ. ( धा. सा. श. )
आवल [ आमूलम्] (आवलात पहा)
आवलात [ आमूलम् = आवल, आव्वल. आमूलात् = आवलात. आमूले = आवलीं ] हें आवल, आवलात, आवलीं खोटें आहे म्हणजे मूळांत खोटें आहे.
आवलीं [ आमूले ] ( आवलात पहा)
आवशीं [ आवसति: night = आवशीं, औशीं at night ]
महिकावती (माहीम)ची बखर
मज पाहे ऐसा कवणया त्रिभुवनी ॥ शापें शोषिन मेदिनी ।।
तेथे बापुडें तुं काये क्षत्रि मज लागुनी ।। वरो शकसी ॥ ११९ ।।
ऐसे वचन बोलिली तिक्ष्ण ।। ऐकोन कोपला शामकर्ण ।।
जैसा धृत्तें सिंपिला अग्न ॥ हात घालोन धरली केशी ॥१२०॥
गजबजिली ते सुंदरा ।। हा हा शब्द वदली अवधारा ।।
तापसि महागंभिरा ।। शाप वदलि दारुण ॥१२१॥
तुं होसिल अंधककुब्ज ।। निर्वेश जाईल सहज ।।
पुरुषत्व नाहि तुज ।। अमंगळ पापरासी ॥१२२ ॥
ऐसे शापवचन जाले । तें ततक्षणि फळलें ।।
ऊशाप मागों आदरिलें ।। शाम कर्णे तये वेळीं ॥१२३ ॥
कोटि ब्रह्मकंन्या उद्यापन ।। द्रव्यद्वारि कंन्यादान ॥
चतुर्विश वरुषे या पर्वति स्थापन ।। वास करिसी ॥१२४।।
मग निसी क्रमिली ।। सूर्यप्रभा फाकली ॥
राया सेवकासि साद घाली ।। तें आले ततक्षणी ॥ १२५ ।।
मग राजा तेथोन उचलिला ।। मुखासनि बैसविला ।।
हस्तनापुरासि आणिला ।। अंधकुब्ज ।। १२६ ।।
आश्चर्य केलें सकळीं ।। काये जालें वनस्थळी ।।
वृत्तांत सांगितला सकळी ।। प्रधानर्वगासी ॥ १२७ ॥
आईकेनि वृत्तांत ॥ द्विजकुळासि केला आमंत ।।
ऊशाप सांगितली सर्वा प्रत ।। ऋषिकंन्येचा ।। १२८ ॥
जेथें कंन्या असे उपवरी ।। त्याणे द्रव्य न्यावें मंदिरी ।।
पुण्य मज लागि अवधारी ।। दिधलें पाहिजे ।। १२९ ॥
या परि कोटि उद्यापनें केलीं ।। रायासिं दृष्ट आली ।।
मग प्रयाणा उतावळि ।। केली राये ॥ १३० ॥
प्रयाण केलें कोटिपर्वती ।। प्रधाना समवेत विप्रमूर्ती ।।
जावोन राहिले पर्वतीं ॥ चतुर्विश वरुषें ॥१३१ ॥
तेथे देवालय बांधिलें । कोटि यज्ञ केले ।।
रायाचें शरिर दृढ जाले ॥ दिव्यरुप ।। १३२ ॥
मग ऊशाप जाला ।। कुळि पुत्र उपजला ।।
नाव काळकोट ठेविता जाला ।। रायें तयाचें ॥ १३३ ॥
त्या काळकोटा पासुन ।। वंश वृद्धी पावला जाण ॥
ते समुळ सांगेन ।। आईका आतां ॥ १३४ ॥