Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
राजवाडे यांचा जीवन परिचय
कै. राजवाडे यांनी पदवी मिळवली तरी तिचा उपयोग करून उत्तम नोकरी मिळवावी, उच्चपदे भूषवावी ही आकांक्षा त्यांना मुळीच नव्हती. पण कार्यक्षेत्र निश्चित होईपर्यंतची २-३ वर्षे संभ्रमात गेली. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे त्यांचे लग्न १८८८ मध्ये विद्यार्थिदशेतच झाले होते. पदवीधर झाल्यानंतर प्रपंचासाठी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तात्पुरती नोकरी धरली होती; पण दोन अपत्यांच्या व पत्नीच्या अकाली मृत्यूमुळे राजवाडे यांचा प्रपंचाचा पाश तुटला व साहजिकच प्रपंचासाठी पत्करलेली नोकरी त्यांनी १८९३ मध्ये सोडून दिली पत्नीनिधनानंतर लग्नाचे वय असूनही पुन्हा लग्न करायचे नाही असा ठाम निर्धार करून राजवाडे यांनी कामास प्रारंभ केला. मराठी भाषा व स्वदेश याबद्दलच्या अभिमानाची व त्यांची स्थिती सुधारण्याची जी भावना राजवाडे यांच्या मनात मूळ धरून होती तीच वाढीस लागून आयुष्याचे ध्येय निश्चित झाले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे लेख, काव्येतिहासकार रा. व. काशीनाथपंत साने यांची ऐतिहासिक पत्रे व परशुरामपंत गोडबोले यांनी छापलेल्या काव्यांनी महाराष्ट्रसारस्वताचा मला अभिमान वाटू लागला असे खुद्द राजवाडे यांनीच नमूद करून ठेवले आहे.
जानेवारी १८९४ मध्ये 'भाषांतर' मासिकाचा पहिला अंक राजवाडे यांनी प्रसिद्ध केला राष्ट्राचा स्वाभिमान वाढीस लावण्यासाठी व जगातील निरनिराळे विचारप्रवाह देशर्वाधवांना सांगण्याच्या हेतूने उत्तमोत्तम विचारप्रवर्तक ग्रंथांची भाषांतरे लोकांना देणे आवश्यक होते. पश्चिमेकडे जे निरनिराळ्या शास्त्रातील अगाध ज्ञान निर्माण होत होते तशा त-हेचे स्वतंत्र ज्ञानभांडार निर्माण करण्याची कुवत तूर्त आपणात नाही म्हणून तेच आपण मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न करावा या हेतूने हे मासिक राजवाडे यांनी सुरू केले. ते ३७ महिने चालून त्यात १५ पूर्ण व ७ अपूर्ण अशा २१ ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध झाली. कॉलेजात असतानाच राजवाडे यांनी अनुवादित केलेल्या प्लेटोच्या 'रिपब्लिक' या ग्रंथाचा अनुवादही या मासिकातूनच प्रसिद्ध झाला. पुण्यातील प्लेगच्या संकटाने हे मासिक बंद पडले.
हे मासिक बंद पडले तरी त्यांचे ध्येयवादी मन त्यांना स्वस्थ बसू देईना. कॉलेजपासूनच इतिहास हा राजवाडे यांचा आवडता विषय ! ग्रँट डफ व इतर इंग्रज इतिहासकारांनी लिहिलेला भारताचा इतिहास हा जेत्यांनी जितांचा लिहिलेला इतिहास असल्याने त्यात सत्यापलाप फार व अवाजवी घटनांना महत्त्व दिलेले आहे असे राजवाडे यांचे मत होतेच. सत्य इतिहास उजेडात आणल्याशिवाय राष्ट्रांत स्वत्वाची चेतना निर्माण होणार नाही हाही एक विचार राजवाडे यांच्या मनात घर करून होता. अशा अस्वस्थ मनःस्थितीत असतानाच त्यांचे एक विद्यार्थी काकाराव पंडित यांना वाई येथे जुन्या कागदांचे एक पेटार सापडल्याचे व त्यांनी ते वाचून पाहिल्यावर एका पुस्तकाची सामग्री त्यांत असल्याची हकीगत त्यांच्या कानावर आली. "निरलस विसूभाऊ त्याच रात्री पुण्याहून वाईस आले. सकाळी माझ्याकडे आले व एकदम सर्व दप्तर पाहाण्यास सुरुवात केली '' असे खुद्द काकासाहेब पंडितांनी लिहिले आहे. याप्रमाणे २ महिने अविश्रांत श्रम करून 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' हा पहिला खंड १८९६ मध्ये छापून तयार झाला. पानिपतच्या युद्धासंबंधीची २०४ पत्रे या खंडात आहेत. (पुढील पानावर पहा )
राजवाडे यांचा जीवन परिचय
कै. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म २४ जून १८६३ रोजी वरसई येथे झाला! धाकटा विश्वनाथ ३ वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचा अंत झाला. म्हणून त्याची आई मोटा वैजनाथ व धाकटा विश्वनाथ यांना घेऊन वरसईस आपल्या वडिलांच्या घरी परत आली. या दोन्ही भावांचे शिक्षण मात्र पुण्यासच झाले विश्वनाथचे प्राथमिक शिक्षण शनिवार पेठेतील तीन नंबरच्या शाळेत झाले. दुय्यम शिक्षणासाठी त्यांनी बाबा गोखले यांच्या शाळेत प्रवेश घेतला. नंतर काही काळ वामनराव भावे व काशीनाथपंत नातू यांच्या शाळेत, त्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व काही काळ मिशन स्कूल असे करीत आपले दुय्यम शिक्षण संपवून श्री. राजवाडे १८८२ साली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले.
पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात नाव दाखल केले; पण घरच्या गरिबीने जेमतेम एक सहामाहीच ते कॉलेजमध्ये जाऊ शकले. त्यानंतर द्रव्यार्जनाचे साधन म्हणून त्यांनी पुण्यास पब्लिक सर्व्हिस सेकंडग्रेड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग सुरू केला. त्यात थोडी प्राप्ती झाल्यावर पुन्हा डेक्कन कॉलेजमध्ये नाव घातले. त्यांचे वडील बंधू वैजनाथ यांनाही तेथे फेलोशिप मिळाली होती, त्याचाही फायदा शिक्षण पुढे सुरू करण्यास मिळाला.
शालेय किंवा कॉलेजमधील अभ्यासक्रमातील नेमलेल्या पुस्तकांकडे त्यांनी कधीच फारसे लक्ष पुरवले नाही. शालेय शिक्षक, कॉलेजमधील प्राध्यापक त्यांच्या कुशाग्र व विशाल बुद्धीला पुरेसे खाद्य पुरवण्यास असमर्थ होते. मात्र डॉ. रा. गो. भांडारकर, न्यायकोशकतें म. म. झळकीकर यांच्यासारख्या काही विद्वान, भारतीय कीर्तीच्या प्राध्यापकांच्या शिकवणीचा लाभ त्यांना मिळाला. ग्रंथांनाच आपले गुरु समजून त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, समाजशास्त्र, वनस्पतिशास्त्र अशा विविध शास्त्रांतील अनेक ग्रंथांच्या अभ्यासानंतर १८९१ साली बी. ए. ची परीक्षा दिली व पदवी संपादन केली. "केवळ विद्यार्जन करण्याचा हेतू बाळगणारा मी, नोकर तयार करण्याच्या गिरणीत जाऊन पडलो '' अशा कडक शब्दात त्यांनी तत्कालीन शिक्षणसंस्थांसंबंधी आपली मते व्यक्त केलेली आहेत. प्राथमिक शिक्षणापासून ते कॉलेजमधील उच्च शिक्षणासंबंधीचे आपले अनुभव त्यांनी "कनिष्ठ, मध्यम व उच्च शाळांतील स्वानुभव" या निबंधाद्वारे ग्रंथमाला मासिकातून समाजापुढे ठेवले. या निबंधात श्री. राजवाडे लिहितात, “ मला एकही पंतोजी शास्त्रीयरीत्या शिक्षण देणारा भेटला नाही. येथून तेथून सर्व पंतोजी पोटभरू, इकडची पाटी तिकडे उचलून टाकणा-यांपैकी. माझ्या आयुष्यातील अडीच वर्षे नूतन ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने अगदी फुकट गेली. शिवाय नैतिक व धार्मिक दृष्ट्या माझा किती तोटा झाला तो तर सांगवतच नाही." त्याच निबंधात ते पुढे म्हणतात, "बारान् बारा वर्षे शिक्षण द्यायचे नोकरीचे व युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभाच्या वेळी परीक्षा पास झालेल्या सेवार्थी उमेदवारांना उपदेश करायचा स्वतंत्र धंदा करण्याचा किंवा सरस्वतीच्या एकान्त उपासनेचा. ह्या मानभावीपणाचाही मला बहुत तिटकारा आला. वाजवीच आहे की ह्या भाडोत्री शिक्षकांच्या गुलामगिरीच्या नोक-यांच्या कंटाळवाण्या परीक्षांच्यापासून मी पराङ्मुख झालो व पुस्तकालयातील ग्रंथाकडे एक दिलाने वळलो.'' अशा त-हेने विद्यार्थि दशेपासून सुरू झालेली ज्ञानसाधना आयुष्याच्या अंतापर्यंत चालूच राहिली. (पुढील पानावर पहा )
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
उछाह [ उत्साह = उछाह ] (भा. इ. १८३७) ।
उछ्छाद [ उत्साद = उछ्छाद ] उछ्छाद म्ह० दांडगाई. पोरांनीं उछ्छाद मांडला आहे. (भा. इ. १८३३)
उजदार [ऋजुद्वारं = उजदार ] पुढचें दार.
उजरी [strength, power, virility = उजरी ] virility.
उ०-वालभाचिया उजरिया । आपणेयां प्रति कुस्त्रिया।
जोडून तोखविति जैसिया । ऐहेवपणें ॥ ज्ञा. १६-३७५
उजवणें १ [उपयमनं = उअजवणँ = उजवणें ] आमच्या दोन मुली उजवल्या म्ह० दोन मुलींचीं लग्नें झालीं. (भा. इ. १८३६ )
-२ [उद्यापन = उज्जावण = उजावणें-उजवणें ] (भा. इ. १८३२)
उजवा १ [ऋज् १ गतौ. ऋजीयान् = उजवा] (उजु पहा)
-२ [ऋज्वञ्च् = उजवा ] moving straight forward.
-३ [ उद्यतः = उजवा. उद्यतहस्तः = उजवा हात] भांडण्याला त्याचा उजवा हात.
-४ [उद्यतः = उजवा. ] खेळण्याला उजवा पाय ready and raised foot.
उजवें [ऊर्जव्य (वैदिक) = उजवें ] त्या शेताहून हें शेत उजवें आहे म्हणजे पिकाला सरस आहे. ऊर्जव्य म्ह० अन्नादींनीं संपन्न. ऋजु पासूनचा उजवा निराळा.
उजळण [उज्ज्वलन = उज्जळण = उजळण ] (भा. इ. १८३२)
उजाड १ [झट् १ संघाते. उज्झटं = उजाड] परित्यक्त, उत्सृष्ट. (धा. सा. श. )
-२ [उद्यात्र = उज्जाड = उजाड] (भा. इ. १८३२)
उजावणें १ [उद्यापन] (उजवणें २ पहा)
-२ [ उज्जापनं = उजावणें = उजवणें ] सोंगटी उजवली म्ह० जय पावून गेली. (भा. इ. १८३७)
उजियड [ उद्यत् ( rising star) ] उद्यत् हें विशेषण आहे पण त्याचा अपभ्रंश मराठींत नाम झाला आहे. उद्योतपासून उजोड. (ज्ञा. अ. ९ पृ. ७२ )
उजु [ ऋज् १ गतौ. ऋजु = उजू (ऋजीयस ) ऋजीयान् = उजवा (तरभावदर्शक) ] ( धा. सा. श. )
उजेड [उदयित = उजइड = उजेड] (भा. इ. १८३२)
महिकावती (माहीम)ची बखर
नवरि आरूढलि हस्तिणी वरी ॥ रत्नमाळा घेवोन करीं ।।
प्रदक्षणा नृपांते करुन निर्घारी ।। भग उभी राहिली ।। २०३ ॥
अवलोकिले सकळ ॥ तेथे होता पूर्वेचा नृपाळ ॥
नांवे श्रीदत्त सिंधा केवळ ।। तयास माळ घातली ।। २०४॥
मग तयासि उचलोनि ॥ मंडपि नेला धाबोनी ॥
बैसविला सिंहासनी ।। सभे माजा ॥ २०५ ॥
सर्व सभा घनवटली ते वेळे ।। राजे थोर थोर बैसले ।।
प्रतापसेने कर जोडिले ।। मग विनविलें सकळांसी ॥ २०६ ॥
रायें कृपा करावी ।। आपुलीं गोत्रकुळें सांगावीं ।।
कोण कोणा पासुन उत्पत्ति अघवी ॥ सांगा मज आणि सकळिका ॥ २०७॥
सूर्यवंशिचे नृपवर ॥ सांगते जाले सविस्तर ॥
द्वादश गोत्रें आम्हासि पवित्र ।। सूर्यवंश आमचा ॥ २०८ ॥
तीं गोत्रें कवण कवण ।। सविस्तर ऐका चित्त देवोन ।।
कुळदेवता आद्य करोन ।। सांगतों आतां ।। २०९ ।।
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
हा निवाडा सूर्यवंशि राजे बोलिले ।। ऋषि साक्षसि आदरिले ।।
तें राया प्रतापसेना मानलें ।। ऋषिवाक्य सत्यमेव ॥ २१० ॥
म्हणे म्हणे धन्य धन्य सूर्यवंशी ।। ज्याचि गोत्रें कुळदैवतें साक्षसीं ॥
ते युगायुगि सर्वांसीं ॥ नांदति ऋषिभाषित ।। २११ ।।
ईतकें आईकोनि उत्तर ।। बोलता जाला सोमवंशि नृपवर ।।
प्रतापसेन महापवित्र ।। प्रत्त्योत्तर आदरिलें ।। २१२ ।।
सोमवंशाचिं गोत्रें ॥ सांगतां जाला पवित्रें ॥
श्रोते ऐका दत्तचित्ते ।। ऋषिवाक्यें ॥ २१३ ।।
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
उगांच [उकञ् + च = उगांच. उकञ् (अप्रयोजने निपातः ) ] (भा. इ. १८३४)
उगाणा [उद्ग्राहणिका (वादांत उत्तरपक्ष करणें) = उगाणा, उखाणा ]
उगारणी [उद्ग्राहणिका =उगारणी, उग्राणी gathering of monies due ]
उग्राणी १ [उद्ग्राहणिका ] (उगारणी पहा)
-२ [ अवक्रेणी ] (जवकिरा २ पहा)
-३ [ अवक्रयणी debts standing out = उग्राणी ) revenue to be collected.
उग्राणी बिग्राणी [ अवक्रेणी = उग्रेणी = उग्राणी buying. विक्रेणी = बिग्रेणी = बिग्राणी selling विक्रीः = विक्री ]
उघड १ [ उद्गाढ = उग्घाड = उघड. उद्गाढमूर्खः = उघडमूर्ख ] उद्गाढ म्हणजे अतिशय, उघडमूर्ख म्ह० अतिशय मुर्ख. (भा. इ. १८३६)
-२ [उद्घट = उग्घट=ऊघड=उघड ](ज्ञा. अ. ९ पृ.२)
उंच [उदञ्च् = उंच] turned upwards.
उचकट [उत्कट = उचकट]
उचकणें [ उत्खननं = उचखणें = उचकणें = हुचकणें ] हुचकून मारणें. (भा. इ. १८३४)
उचकावणें [ उत्सुकायते = उच्चुकाए = उचकावतो ] (भा. इ. १८३३)
उचकी १ [ कास् १ शब्दकुत्सायाम्. उत्+ कासिका = उत्कासिका = उचकी ] उत्कासिका म्ह० बेडका बाहेर टाकण्याची क्रिया. ( धा. सा. श. )
-२ [ उत् + हिक्क् उचकी येणें freq जिहिक्क् नाम उज्जिहिका = उचकी ] to be included in the verbs.
उचकून [उच्चक् पहाणें ] दुसरा शब्द-हुचकून.
उचंबा [ उत्स्मय: ] ( धातुकोश-उचंब १ पहा)
उचलणें [उच्छ्रयणं = उच्चलणं = उचलणें] (भा. इ. १८३४)
उचल्या [ग्लुचकः = उचल्या (ग्लुच् १ स्तेयकरणे)] ( धातुकोश-उचल २ पहा)·
उच्च [ उत् + च = उच्च. उत् + च् + अ + इ +स् = उच्चैः]
उच्छाद [ उत्सादः = उच्छाद ] उत्साद म्ह० नाश करणें. (भा. इ. १८३७)
उछाव [ उत्सव = उछाव ] उत्सव शब्दाचा उछाव असा उच्चार अशिष्ट करतात. (भा. इ. १८३७)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
उक्राविक्रा [ उत्क्रयविक्रय = उक्राविक्रा. विक्रय to sell and उत्क्रय to buy ]
उखळ [ (उद्) लिख् ]
उखळणें [ लिख् ६ अक्षरविन्यासे. उल्लिख = उखळणें
(वर्णविपर्यय) ] उल्लिखनं म्ह० उकरणें. ( धा. सा. श.)
उखाणा १ [उद्ग्राहणिका ] (उगाणा पहा)
-२ [ उत्खननः = उखाणा ] उत्खातं उक्खाणिदं ( उत्तररामचरितं-तृतीयांक: सीतावचनं.)
-३ [ उहाप्रश्नः = उघाणा = उखाणा. उहा filling up an ellipsis उहाप्रश्नः = question in ordar to supply an ellipsis ]
-४ [ ऊह् १ वितर्के. ऊहाप्रश्न = उखाणा. ऊहा ( तर्कवितर्क ) = ऊय, उवा ( अनेकवचन ) ] त्याच्या डोक्यांत उवा पिकल्याहेत म्हणजे तर्कवितर्क माजले आहेत. ( धा. सा. श.)
उखित [ वस् निष्टा उषित (प्रोषित traveller) = उखित (ता-ती-तें ) sojourner ] थोडा काल राहणारा.
उखिता [ उषितः rested, inhabited = उखिता (वसणारा, राहिलेला ) sojourning ] वस् (उषित ) ]
उग ( गा-गी-गें ) [ युगा, जुग् ]
उगंडु [ उद्गन्तु a way Out = उगंडु a way out ] उ०- पडलेयां तिये ठीइं। कल्पांतीं हीं उगंडु नाहिं ।
एसणें पतन कुलक्षयिं ॥ अर्जुनु म्हणे ॥ ज्ञा. १-२६०
उगमणें-उमगणें [ अवगमनं = उगमणें, उमगणें (वर्णविपर्यय ) ] (भा. इ. १८३४)
उगलणें [उदगृ (उत् + गृ दान करणें । गरति) = उगलणें ] दान करणें.
उगळणें, उगळी [उत् + गृ ६ निगरणे ] ( उगळी म्ह• ओकारी, अमृतानुभव ).
उ०- आवडीचेनि वेगें । एकएकातें गिळिती आंगें ।
कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाति ॥
ज्ञानेश्वर-अमृतानुभव ३. ( धातुकोश-उगळ ३ पहा)
उगा, उगी, उगें (उग) [ वुंग् १ वर्जने = उग्ग = उग्गा-गी-गें ] उगा ( आज्ञार्थ ) म्ह० रडणें सोड. ( धा. सा. श. )
उगा [ युगि, जुगि, वुगि वर्जने. वुगः = उगा. वुगित = उगला ] उगा म्ह० भयापासून वर्जित. उग (गा-गी-गें ), उगला. ( धा. सा. श. )
महिकावती (माहीम)ची बखर
वज्रनाम १ | चंद्रनाभ २ | सिंहनाम ३ |
रुक्मनाम ४ | परिक्षिती ५ | वैदर्भ ६ |
दक्ष ७ | केशवादिस ८ | हरीबिंब ९ |
बींबसेन १० | कृपाभान ११ | विक्रमादित्य १२ |
महीपाळ १३ | यक्षदंत १४ | श्रीधर १५ |
लक्ष्मीधर १६ | वंगुसागर १७ | वेणुनाभ १८ |
केशवादित्य १९ | शुक्रभान २० | विमळार्जुन २१ |
देवगिरी २२ |
हे राजे नांदले पैठणी ।। यांचि परंपरा चाललि तेथोनी ।।
पुढें बोलिळा मुनी ।। तें आईका श्रोते ॥ १९६ ॥
मणिपुर नाम नगर ॥ तेथें प्रतापसिंग नृपवर ॥
नांदत असे कृपासागर । प्रतापपुरी ।। १९७ ॥
महाक्षेत्रि दारुण ।। धनुर्धरविद्यासंपूर्ण ॥
नांदतां तेथें जाण ॥ कथा वर्तली ते अवधारा ॥ १९८।।
तया प्रतापसिंगासि कंन्या नागरी ।। गुणवति अवघारी ।।
जाली असे उपवरी ।। राजकंन्या ।। १९९ ॥
तिचें स्वयंवर मांडिलें ।। भाट देशोदेशि पाठविले ॥
पत्रें नृपवरासि लीहिलीं ॥ देशोदेशीं ॥ २०० ॥
पूर्व-दिसेचे नृपवर ।। सूर्यवंशि राजे पवित्र ॥
स्वयंवरा कारणे हंकारले समग्र ।। महाक्षेत्री ।। २०१ ॥
मंडप घातला हेममंडित ॥ सेना मिळालि अगणित ।।
पाहोनियां सुमुर्त ।। हस्तिणी श्रृंगारिली ॥ २०२ ॥
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ई
ईट घे, मार [ यष्टिग्राहं हंति इटघे, हणतो ] इटघे हें अव्यय आहे.
ईर - हा मराठींतला शब्द वेदकालीन आहे. ह्याचा संबंध कंड्वादिकांतील इरस् ( इरस्यति ) इर्ष्यायां ह्या धातूशीं येतो. इरेस पडला = इर्ष्येस पडला. प्यादा इरेंत पडला = प्यादा इर्ष्येंत पडला. ( भा. इ. १८३२ )
उ
उकडणें [उत्कथनं = उक्कढणँ = उकडणें ] (भा. इ. १८३७)
उकलणें [उत्कलनं = उकलणें ] (भा. इ. १८३७)
उकलीव, उकलींव [ कल् १० क्षेपे. उत्कलिम = उकलीव, उकलींव ( उकललेलें ) ] ( धा. सा. श.)
उकळणें [ अवक्षल् = ओखळ = उखळ = उकळणें ] अवक्षल् म्ह० बडवून धुणें. (भा. इ. १८३६)
उकळी [उत्कलिका = उक्कळिआ = उकळी ] उत्कलिका म्ह० उत्कंठा. (भा. इ. १८३७)
उकळींव १ [उत्कथिम = उकळींव = (उकळलेलें) ]
-२ [ क्कथ् १ निष्पाके. उत्कथिम = उकळींव (उकळलेलें)
क्कथ = कट (वरणाचा कट)
क्काथपानीयं = कटवणी
क्काथ:निक्काथ = काढानिकाढा ] ( धा. सा. श. )
उकिडव ( वा-वी-वें ) १ [ उत्कुटुक: = उक्कुड़आ = उकुडवा = उकिडवा ] उत्कुटुकासन नांवाचें एक आसन आहे ( जैनग्रंथ ). पादाभ्यां अवस्थितः उत्कुटुकः
-२ [ उत्कटक = उक्कडअ = उकडव = उकिडव ( वा-वी-वें ). नासीतोत्कटकस्थितः । वाग्भट-अष्टांगहृदयसूत्रस्थान - द्वितीयाध्याय श्लोक ३६. उत्कटिक = उक्कडिअ = उकिडव. डवरील इ क वर नेली. ] (भा. इ. १८३४)
उकिडवा [ कुट् ६ कौटिल्ये. उत्कुटक = उकिडवा उ = इ ) ] ( घा. सा. श. )
उकिरडा - ह्या शब्दावरून असें दिसतें कीं दारिल व केशव हे दोघे हि secondary प्राकृत म्हणजे प्राकृतिक, मराठी वगैरे भाषा बोलणारे होते.
कौशिक सूत्र २८।२
दारिल:- अवकर = उकुरटिकातृणानि
केशवः- उकरिडिका मार्जनिकातृणं
अर्थात् केशव हा महाराष्ट्रब्राह्मण आहे. ( भा. इ. १८३२ )
उक्ते [ अवक्रयः = मोल ( अमर, द्वितीयकांड: ७९ वैश्यवर्गः ) अवक्रीत = ओकत = ओक्त = उक्त ] साक्षात् मोल देऊन आयतें तयार केलेलें द्रव्य. (भा. इ. १८३२)
महिकावती (माहीम)ची बखर
इतुकें वचन आईकिलें ।। संन्याशानें लोटांगण घातलें ।।
उठोनि हृदइं आळंगिलें ।। तया अयुताचनासी ।। १८३ ॥
धन्य मी आजि जालों । आपलें वंशिकांसि भेटलों ।।
थोर हृदईं सतोषलों ॥ कीर्त आईकोनी ।। १८४ ॥
मग म्हणे तापसी ॥ शामकर्ण नाम आम्हासी ॥
सांडिलें पैठणराज्यासी ॥ संतान नाहि म्हणोनी ॥ १८५ ।।
तरि आतां माझी विज्ञापना ।। राज्य द्यावें तुमचियानंदना ॥
धर्मपुत्र मज सामान्य ।। हा चि अर्थ राया ॥ १८६ ॥
इतुकें वचन ऐकोनी ।। प्रधानासिं बोलावोनी ।।
विचारतां जाला अयुताचन मनी ॥ कैसें करावें ।। १८७ ॥
प्रधानासि मानलें ते वचन ।। ईतर नव्हे आपला वंशिक जाण ।।
मग करोनियां सन्मान ।। शामकर्ण मंदिरी नेला ॥ १८८ ॥
अर्ध्वपाद्यें पूजा केली ।। भोजनविधीं संपादिली ॥
अष्टगंधें चर्चिली ।। येथानिगुती ।। १८९ ।।
विडे घेतले सकळि जाण ॥ पालाणिले चातुरंग सैन्य ।।
आले सर्व मिळोन पैठण ।। प्रधानवर्गी ॥ १९०।।
राया अयुताचनाचा नंदन ।। जो बत्तीसलक्षणि संपूर्ण ॥
धनुर्धरविद्या दारुण ॥ पवित्र पुण्यशिळ ॥ १९१ ।।
ब्राह्मण मेळविले अपार ॥ दाने दीधलिं गंभीर ॥
वांटिली द्रव्याची भांडार ।। ब्राह्मणा कारणे ॥ १९२ ॥
राज्याभिषेक केला वज्रनाभा । सिंहासनि बैसविला वोजा ।।
मोहोत्सव जाला सहजा ।। पैठणि जाणा ॥ १९३ ॥
वज्रनाभ राज्याधिकारि केला ॥ अयुताचन तेथोनि मुरडला ।।
उज्जनीनगरि येवोनि राहिला ॥ सह दळेसीं ॥ १९४ ॥
मग वज्रनाम नांदति पैठणी ।। परंपरा चालली तेथोनी ।।
ते आयेका चित्त देवोनी ॥ सांगतों आतां ॥ १९५ ॥
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
इंद्रावण [ इंद्रवारुणी = इंद्रावण ( वनस्पति ) ] (भा. इ. १८३७)
इन् मिन् तिन् [ इँ, मीँ, तीँ = हीं, मीं आणि तीं ]
अनुनासिकाचा अनुस्वार उच्चारिला. तीन ह्या संख्यावाचक शब्दाशीं तीँ या सानुनासिक शब्दाचा घोंटाळा करून अर्थनिष्पति केली आहे. (भा. इ. १८३२ )
इरीरी [ ईर् गतौ कंपने. ईरईर ( आज्ञार्थ द्वितीय पुरुष अनेकवचन ) = इरीरी ] इरीरी म्ह० चल चल, चलाव चलाव. ( धा. सा. श. )
इवलेंसे [ एतादृश = एआलिस = इवलेंसें ]
इशी, इश्श् - लहान मूल शौच्याला जावयाचें असल्यास त्याला इशीला जावयाचें का, म्हणून विचारतात. विशि विष्टायां ना. को. ३
(माध्यंदिनीय वाजसनेय संहिता-महीधरकृत वेददीप २५-७). विश् म्हणजे विष्टा. विश्= इश् (स्त्री) = इश. बायका घाणेरडा पदार्थ पाहिला असतां इश्श् मेलं असे शब्द उच्चारितात. त्यांतील इश्श् ह्या शब्दाचा अर्थ विष्टा असा आहे. (भा. इ. १८३३)
इशश् [ ह्रीच्छ् लज्जायां. ह्रीच्छ् = ईच्छ् = इशश् ] (ग्रंथमाला)
इश्शरें - [ विस्त्रं = इश्शरँ = इश्शरें ] विस्रं आमगंधि: ( अमर ) = दुर्गंध, वाईट, मलिन, दुष्ट. इश्शरें भांडें म्ह० मलिन भांडें. इश्शरे माणूस म्ह० मलिन माणूस. इश्शरे बायको म्ह० मलिन बायको. तात्पर्य, इश्शरें हा शब्द मराठींत एकारान्त आहे. (भा. इ. १८३४)
इप् ! [ इस् ! = इष् ! ] इस् हा रागाचा, दुःखाचा उद्गार आहे.
इप्प् [ इस् ! (क्रोध, दुःख, इत्यादि दर्शक अव्यय ) = इष्ष् !, इश्श् ! ]
इसव [ विसर्प = इसब (गर्दे-वाग्भट ) = विसाप ] (भा. इ. १८३४)
इसाड [ ईशा (नांगराचा दांडा = इसा + आड=इसाड ] ( भा. इ. १८३४)
इसोण [ ईषदुष्णं = इसोण, विसोण = विसावण ] थोडेसें विसावण घाल म्ह० ईषदुष्ण पाणी घाल.
इळा, इळी [ इली ] (विळा ३ पहा)
इळेपिळे [ इल् ६ स्वप्ने, क्षेपणे, इल् गतौ निद्रायाम्. इल् + प्रेल् = इळेपिळे ] इळेपिळे देणें म्ह० झोपेंतून उठतांना अंगाला वांकडीतिकडी गति देणें. (धा. सा. श.)