आतां कनक प्रभा ॥ प्रशुत जालि कां लगबगा ।।
साठि संवत्सर नारदा ।। प्रशवलि ते हे ।। ५९ ।।
आतां असुरदळणी ।। प्रशवलि अमित्यवस्तु निदानी ।।
मुक्ताफळें हिरेमाणिकें पुक्षराजपाषाण मेदिनी ।। तिये पासोनि जाली।।६०।।
ऐसि हे उत्पति समुळ ॥ सांगितली निर्मळ ।।
निवाडा केला केवळ ।। निपुणत्वें ।। ६१ ।।
हे कथा महापवित्र ॥ जेथें सांगितलें उत्पत्तिचरित्र ।।
लाघवि साक्षांत परमेश्वर ।। यका पासोनि अनेक ।। ६२ ।।
रचना समुळ सांगितली ।। ते प्राकृति बोलिली ।।
अर्थ सर्वांसि साकलीं ।। प्रस्फुट आहे ॥ ६३ ।।
शैयाद्रिखंडिचें मत्त ।। व्याख्यान केलें प्राकृत ।।
तरि हे परउपकारार्थ ।। बोलिलों जे हे ।। ६४ ।।
ब्रह्मोत्तरखंडि निवाडा केला ।। तो हि साक्षसि बोलिला ।।
हा ग्रंथ विख्यात रचिला ।। युग युगी राहावा ।। ६५ ॥
पंढरि युगे अठाविस ।। पुराणि समंत तयेस ।।
तैसें शास्त्र हें सुरस ।। युगा युगा ठाइं राहिलें ।। ६६ ।।
जेथें निवाडा सर्व केला ।। उत्पती सर्व बोलिला ।।
ऐका श्रोते चित्तयुक्ता ।। युक्तार्थ सत्यमेव ।। ६७ ।।
ऐकतां निवती श्रवण ।। हरति दोष महादारुण ।।
पुराणिचें निरोपण ।। भविष्यार्थ कथिला ।। ६८ ॥
वक्ता भगवान् दत्त ।। संमत बोलिले व्याशोक्त ।।
कथा महापवित्र ॥ उत्पती सर्वाची ॥ ६९ ।।
॥ इति श्रीब्रह्मोत्तरखंडे भविष्योत्तरपुराणे
भगवान्दत्तसंवादे उत्पतिअवतारनिवेदन
नाम प्रथमोध्यायः ॥ १ ॥