Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
छ १८ सफर (४ मे १७४०) मीरगड घेतल्याची खबर आली. बाजीरावसाहेब रमजान महिन्यांत (डिसेंबर १७३९) स्वारीस निघाले याचें कारण, निजामाचे बोलण्याप्रों माळव्याची सनद मिळाली नाहीं. त्यावरून निजाम हा घातकी आहे. यास्तव त्याची दक्षिणेतील सत्ता नाहिशी करावी असे मनांत आणून औरंगाबादेस सवाल महिन्यांत (जानेवारी १७४०) गेले. तेथें निजामाचा पुत्र नासिरजंग हा दहा हजार फौजेसुध्दां होता. त्याजवर जाऊन सभोंवता फौजेकडून गराडा घातला. परंतु इतक्यात त्याच्या कुमकेस मोठे सैन्य आल्यामुळे तो हातचा सुटून अहमदनगरचे वाटेने मुलूख लुटीत चालला. इतक्यांत चिमाजीअप्पाकडून ते व त्याचें लष्कर येऊन पोहोंचताच त्यास पुढें न जाऊं देतां माघारा परतविला. नंतर कांही दिवस युध्द होत होतें; परंतु कोणा एकासही लाभ झाला नाहीं. सबब तह छ १० जिल्हेज रोजी (२७ फेब्रुवारी १७४०) झाला की इत:पर कोणी रयतेस उपद्रव करू नये. मोंगलांनी नर्मदेच्या काठी पेशवे यांस जहागीर द्यावी. असा तह झाल्यानंतर बाजीरावसाहेब पुण्याकडे परत न येतां हिंदुस्थानात जात असतां वर लिहिल्याप्रमाणे मयत झाले. बाजीरावसाहेब मयत झाल्यावर निजामुन्मुलूक कितेक दिवस दिल्लीस होता. पुढें बादशहानें त्याचे नावांस अमीरून उमराव असे पद जोडले. त्यास वर्तमान कळलें की, आपला पुत्र नासिरजंग दक्षिणेंत आहे. तो माझी सत्ता नाहिशी करून आपण कारभार करणार. हें बंड मोडण्याकरितां निजाम दक्षिणेंत निघतेसमयी बादशहास विनंति केली की, मला जे पद दिल्हें ते माझा वडील पुत्र ग्यासुदिन यास असावें. रघूजी भोसले व पेशवे यांचे दरम्यान कलह उत्पन्न झाला होता. परंतु नादरशा अफगाणचा बादशहा दिल्लीत आला होता. या गडबडीमुळें तें प्रकरण तसेंच राहिले होते. पुढे त्याची आपसांत समजूत होऊन पुढें कर्नाटकात रघूजी भोसले व प्रतिनिधि व फत्तेसिंग भोसले वगैरे सरदार गेले. त्यांत मुरारजी घोरपडाही आला होता. तो पूर्वीचें सेनापतिपद मागत होता. परंतु ते न देतां कांही पे॥ तुंगभद्रेचे कांठी देऊन वश केला होता. असें एकंदर लष्कर दोस्त अल्लीनबाब याजवर जाऊन त्यास ठार मारला. पुढे दोस्तअल्लीचा पुत्र सफदरअल्ली याणें मराठे यांस कांही द्रव्य देऊन माघारें फिरावें असे केलें. त्या वेळेस त्या सफदरअल्लीचें व भोसले यांचे बोलणें झालें की, त्रिचनापल्लीचा अधिकारी चंदासाहेब यास मराठ्यांनी हाकून द्यावा. त्या करारप्रें॥ मराठे सफदरअल्लीचा मुलूख सोडून माघारें सव्वाशे कोस जाऊन शिवगंगेचे काठी उतरले. त्याचा मनसोबा असा होता की, आपण येथें राहून चंदासाहेब असावध असतां एकदम त्याजवर जाऊन त्यास जिंकू. इतक्यांत रघूजी भोसला तेथून निघून साता-यास आला. आणि बाळाजी बाजीराव यांस पेशवाईची वस्त्रें न देता बाबूजी नाईक बारामतीकर यास पेशवा करावा, असा राजाजवळ उद्योग करूं लागला. आणि शाहू महाराज यांस समजविलें की, बाबूजी नाईक मोठा सावकार आहे; तो पुष्कळ द्रव्य देईल, अशी बहुत खटपट केली. तत्राप ती शेवटास गेली नाही. पुढचे वर्षी ह्मणजे इहिदे अर्बैन सालांत बाळाजी बाजीराव यांस पेशवाईची वस्त्रें र॥ खर महिन्यांत प्राप्त झाली. विरूबाई दाशी कन्हेरखेडकर शिंद्याकडून दिल्लीस शाहू महाराजाचे लग्नसमयी आंदण आली होती, तिजवर महाराजांची बहुत मर्जी होती. ती वर लिहिल्याशिवाय दोघी बायका यावेळेस होत्या. वडील सकुवरबाई व दुसरी सगुणाबाई. येसाजी व कुसाजी भोसले शिराळकर सरकारचे लेकावळे होते. त्यांस शिरोळ सुभा महाराजांनी दिल्हा. तहनामा होऊन नोड प्रांत पेशवे यांस मिळाला.