Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

मराठ्यांचे व पार्चिगीज लोकांचे युध्दप्रसंग बहुत होऊन शेवटी साष्टी प्रांता पे॥ महाल वगैरे खालीं लिहिलें तारखेस पेशवे यांणीं आपला अंमल बसविला. छ ९ जिल्हेज रोजीं (३० मार्च १७३७) उरुळाचें ठाणें सर केलें. याविषयीं वर्तमान पेशवे यांस आले. छ १८ जिल्हेज (८ एप्रिल १७३७) किल्ले दत्ताजी मोरे याणीं घेतल्याची खबर साष्टीस आली. छ १९ जिल्हेज (९ एप्रिल १७३७) बेलापूरचा पडकोट घेतल्याचें वर्तमान आलें. छ २१ जिल्हेज (११ एप्रिल १७३७) ठाणें साष्टीचे कोटास आरंभ केला. छ ७ मोहरम (२७ एप्रिल १७३७) बेलापूर घेतल्याची खबर आली. छ १५ मोहरम (५ मे १७३७) तालीमवाडी व कालदुर्ग फत्ते झाल्याचें वर्तमान हरबाजी ताकपीर याजकडून आलें. घोडबंदरावर छ २७ मोहरम (१७ मे १७३७) साष्टी घेतली, सबब तेथील लोकांस बक्षीस दिलें. ६६ गांव आहेत ह्मणून साष्टी ह्मणतात चैत्र शु॥ ७ शके १७५९ रोजीं घेतली. किल्ले मजारी फत्ते झाल्याची खबर छ १ सफर अखेर सालीं (२० मे १७३७) आली. छ ३ सफर (२२ मे १७३७) वांद्र्याचे कोटास मोर्चे लाविले. नारो शंकर पंत सचीव वारले. दत्तक चिमणाजी नारायण यास घेऊन पदाची वस्त्रें दिलीं. नागेश्वराचें देवालय पुण्यांतील रामभट चित्राव याणीं बांधिलें. जंजीरकर हब्शी याचा व पेशवे यांचा तह पूर्वी अर्बा सलासीनांत संकेत झाल्याप्रें॥ शेवटास गेला. तो प्रकार असा कीं, राजापुरी प्रांत ११ महालापे॥ जंजीरकर याजकडे प॥ १ नांदगांवमुरूड पा १ श्रीवर्धन पा १ दिवें १ ह्मसनें ता १ मांडूळ ता गांवल -॥- गांव ४९ पा दिल्यापा निम्में गांव २४॥, येणेंप्रमाणें साडेपांच महाल जंजीरकर याजकडे जाऊन बाकी ५॥ ह्मणजे मामले तळें १, पा घोसाळें १, ता गोरेगांव १, ता बिरवाडी तर्फ निजामपूर १, ता गोवळ, चाणगांव निम्मे महाल, येणेंप्रमाणें ११ महाल दोहोंकडे वांटणी झाली; परंतु एकंदर ११ महालांत दुतर्फा पाहणीदार फिरून दुतर्फा अंमलदार यांचे विद्यमानें जमाबंदी होऊन ज्याचे महालाचा आकार त्यास देऊन फाजील बाकी बराबर करून घ्यावी असें ठरलें. याशिवाय रायगड १, व तळें १, घोसाळें १, अवचितगड १, बिरबाडी १, हे किल्ले व ता नागोठणें व अष्टमी वशी महाल पाली येथील अंमल निम्मेंनिम आजपर्यंत चालत आला असून या तहापासून हे महाल दरोबस्त पेशवे यांणीं घ्यावे, जंजीरकरांनीं हरकत करूं नये, असें ठरलें. प्रतिनिधीस चव्हाणावर पाठवून त्याचा बंदोबस्त करून ठराव करून घेतला, व दुसरे वर्षी मिरजेवर पाठवून मोंगलांकडून किल्ला घेऊन डुबाल यास सुभा सांगितला. मिरज प्रांत मराठ्यांचे हातीं लागला. शाहू महाराज स्वत: स्वारीस निघाले. सेनासाहेब सुभा, सेनाखासखेल, आघाडीस; प्रतिनिधि व मुख्य प्रधान, अमात्य व सचीव, सोयरे लोक व पंडितराव, सुमंत, न्यायाधीश, चिटणीस, पोतनीस, जामदारखाना मंत्री, उजवेबाजूस; सेनापति व आणखी सरदार, पथकी, फडणीस, दप्तरदार, शिलेदार, डावे बाजूस; पिच्छाडीस सर लष्कर व त्याचे निजबतीचे काकडे व कोकाटे वगैरे; मागें जनानखाना; सर्वांपुढें बिनीवाले त्यामागें निशाण; त्याचे पश्चात् वाद्य; त्याचे पिच्छाडीस हत्ती; नंतर सरदार; तदनंतर इटेकरी; तदनंतर बोथाट्या; त्यामागे खासबारदार; नंतर नगरखाना याप्रों स्वारी निघून शके १६५८ सालीं उंबरजेस आली. दोन वर्षें छावणी तेथें होती. नंतर साता-यास आले.