Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु ॥ अर्बैन मया व अलफ, सन ११४९ फसली,
अवल साल छ २७ सफर, २५ मे १७४९,
वैशाख वद्य १४ शके १६६१.
छ १ जमादिलावलचे सुमारें (२७ जुलै १७३९) बाजीराव बल्लाळ परत पुण्यास आले. हिंदुस्थानची स्वारी असें वाटतें. छ १० जमादिलाखर रोजी (३ सप्टेंबर १७३९) चिमाजी अप्पा वसई सर करून पुण्यास परत आले. कांही ठाणी किरकोळ घेणें राहिली, ती तेथे सरदार ठेविले त्यांस सोंपून आपण स्वत: परत आले. छ ९ रजब (२ सप्टेंबर १७३९) धाराशीव व वसेवे हे दोन महाल खंडोजी माणकर याणी घेतले. सबब नवस फेडला. छ १० साबान कार्तिक शुध्द ११ (१ नोव्हेंबर १७३९) बाजीराव बल्लाळ मुहूर्त करून स्वारीस निघाले. छ १५ साबान रोजी निघून छ २१ रमजानास (१२ डिसेंबर १७३९) चालते झाले. छ ९ रमजानपर्यंत (३० नोव्हेंबर १७३९) उभयतांची स्वारी एकच होती. पुढें छ १० रमजानीं (१ डिसेंबर १७३९) श्रीमंतांची स्वारी वेगळी होऊन सवाल महिन्यांत (जानेवारी १७४०) औरंगाबादेस होते. तेथून उलटून नजीक हिवरे पे॥ नेवसेंवरून छ १९ जिल्हेज रोजी (७ मार्च १७४०) लोणी पे॥ येकदुणी येथें येऊन हिंदुस्थानचे स्वारीस गेले. अप्पासाहेब देशी निघाले. छ २० जिल्काद रोजी (८ फेब्रुवारी १७४०) औरंगाबादेस गेले. छ २९ सवाल रोजी (१८जानेवारी १७४०) वर्तमान आले की, गोपिकाबाईस ऋतु प्राप्त झाला, नानासाहेब यांचे कुटुंबास छ १६ जिल्काद माघ व॥ २ (४ फेब्रुवारी १७४०) दादासाहेब यांचा व्रतबंध श्रीमंत स्वारीस गेल्यामागें नानासाहेब यांणी केला. मुंजीस शाहू महाराज आले होते. छ १९ जिल्काद (७ फेब्रुवारी १७४०) सदाशिव चिमणाजी यांचे लग्न झालें. नांव उमाबाई ही खमेसनांत वारली. छ १० जिल्हेज (२७ फेब्रुवारी १७४०) मोंगलांचा सल्ला केला. रात्री बोली झाली. मुक्काम हिवरे पो नेवासें. छ १२ जिल्हेज (२९ फेब्रुवारी १७४०) अप्पासाहेब याची व मोंगलांची भेट झाली. मु॥ वरखेड नजीक गंगातीर पो नेवासें. छ १५ जिल्हेज (३ मार्च १७४०) बाजीरावसाहेब यांची नासिरजंगाची भेट झाली, मु॥ वरखेड. छ १७ जिल्हेज (५ मार्च १७४०) पुन्हा मोंगलांवर उलटले. छ २१ जिल्हेज रोजी (९ मार्च १७४०) अप्पासाहेब औरंगाबादेस गेले. यावेळेस तह होऊन नोमाड प्रांत मिळाला. छ १६ मोहरम (३ एप्रिल १७४०) अप्पासाहेब मोंगलाईतून परत येऊन पुण्यास दाखल झाले. बराबर महादजी अंबाजी पुरंदरे होते. छ १७ मोहरम रोजी (४ एप्रिल १७४०) नानासाहेबसुध्दां चिमाजीअप्पा कोंकणांत गेले. छ १८ रोजी (५ एप्रिल १७४०) पालींचें ठाणे फत्ते झालें. पुढे कुलाब्यास गेले. रेवदंडा किल्ला घेण्याचे मसलतीस गेले. आंग्रे याशी लढाई झाली. सफर महिन्यांत (मे १७४०) कुलाब्यास होते. मानाजीचे साहाय्यास गेले. तुळाजी पळून गेला. छ १२ सफर (२८ एप्रिल १७४०) बाजीराव बल्लाळ मु॥ रावरें पो खरगाणें रेवातीरी वारले. बराबर जनार्दनपंत होते. छ २० रविलावल (४ जून १७४०) इहिदे अर्बैनांत परत आले. बाजीरावसाहेब वारल्याचें वर्तमान कुलाब्यास चिमाजीअप्पा व नानासाहेब यांस कळलें. नंतर तेथे क्रिया वगैरे करून छ २६ सफर रोजी (१२ मे १७४०) पुण्यास येण्यास निघाले ते छ १० रा वल (२५ मे १७४०) इहिदे अर्बैन रोजी पुण्यांत दाखल झाले. छ २३ मोहरम (१० एप्रिल १७४०) उरुणचें ठाणें सर केल्याचें वर्तमान आलें. छ १३ सफर (२९ एप्रिल १७४०) फावडी किल्ला ता॥ रत्नगड जावजी मराठे यांणी सर केल्याचे वर्तमान आलें.