Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ समान सलासीन मयाव अलफ, सन ११४७
फसली, अवल साल छ ६ सफर २५ मे
१७६७, ज्येष्ठ शुध्द ७ शके १६५९.
वसवें फत्ते झाल्याचें वर्तामान आलें; छ २४ सफर [१२ जून १७३७] छ १९ रविलावल [६ जुलै १७३७] श्रीमंत बाजीरावसाहेब यांची स्वारी हिन्दुस्थान वगैरे स्वारी करून परत आले. हिंदुस्थान, गुजराथ, माळवा वगैरे अंमल बसवून परत आले. छ ४ र॥वल [१ जुलै १७३७] चिमाजी अप्पा ठाणें साष्टी, वगैरे स्वारी करून पुण्यास आले. छ ११ रजब रोजीं [२५ अक्टोबर १७३७] श्रीमंत बाजीरावसाहेब व चिमाजी अप्पा असे उभयतां स्वारीस निघाले ते छ ११ साबान रोजीं [२२ नोव्हेंबर १७३७ ] सांगवीनजीक करवंदबारीनें बाजीराव भोपाळकडे गेले, व अप्पा परतोन खानदेशांत येऊन तारापुराहून साष्टीकडे गेले, छ १४ जिल्काद [२३ फेब्रूवारी १७३८] निजामुन्मुलूक सरोजेस होता. तो भोपाळजवळ चांगली जागा पाहून बाजीराव याची वाट पाहत बसला होता. बाजीरावाचें लष्कर तेथें पोहोंचतांच त्याणीं, निजामुन्मुलूक आसरा धरून बसला; तस्मात् याचे मनांत भीति आहे असें समजून छ ३ रमजान रोजीं [१५ डिसेंबर १७३७] भोपाळाजवळ लढाई सुरू झाली. त्यांत निजामाकडील रजपूत लोक ५०० पडले. घोडेस्वार सातशें मेले. मराठ्याकडील १०० पडले, व ३०० जखमी झाले. तेसमयीं बाजीराव दोन बाणाचे टप्यावर उभा राहून निजामुन्मुलूक आपली जागा सोडून निघाला असतां त्याजवर एकदम हल्ला करावा अशी वाट पहात होता. परंतु ती जागा त्याणें सोडिली नाहीं. मग बाजीराव याणें फौजेच्या टोळ्या करून निजामासभोवतीं गराडा घातला व त्यास धान्य व गवत वगैरे मिळेनासें केलें. छ १९ रमजान रोजीं [३१ डिसेंबर १७३७] याप्रोंं तजवीज केली. निजामास असें संकट प्राप्त झाल्याचें वर्तान कळतांच तिकडून त्याचे मुक्ततेविषयीं कुमक पाठविण्याची तयारी होऊं लागली. परंतु बाजीराव यास पक्कें ठाऊक होतें कीं, खानडौराण वजीर याचें निजामाशीं वांकडे होतें, यामुळें तिकडील फौज येणार नाहीं. कदाचित् हैदराबाद व औरंगाबादेकडून मदत येऊं लागल्यास त्याचे बंदोबस्ताविषयीं पेशवे याणीं व शाहू महाराज याणीं रघोजी भोसले यास लिहिलें असतां त्याणें ऐकिलें नाहीं. बाजीराव याचा भाऊ चिमाजी अप्पा हा मात्र लोक जमा करून तापीच्या कांठीं राहिला होता. त्यास बाजीराव याणें पत्र पाठविलें कीं, यासमयीं तुला फौज मिळेल ती जमा कर; व दक्षिणेंत पत्र पाठवून फत्तेसिंग भोसले व शंभुसिंग जाधव व सरलष्कर यांस आण. बांडे व दाभाडे हे मजकडे येत नसतील तर तूं आपल्याजवळ घेऊन तापीवर राहा. यावेळेस मराठे एकचित्त झाले तर मुसलमान लोक दक्षिणेंतून हाकून द्यावयाची संधी हीच आहे. निजामुन्मुलूक अशा अडचणींत पडला तेव्हां ती जागा सोडून दूर गेला. परंतु तोफा वगैरे सामान फार होतें, सबब तो माघारा फिरून भोपाळचे किल्ल्यांत शिरला. ती जागा लहान; कांही लोक आंत व कांहीं बाहेर असे राहिलें. तेव्हां तो नबाब कांहीं सामान भोपाळ येथें व कांही इसलामगड येथें ठेवून बाहेर पडून दाराई सराई गांवपावेतों पोहोंचला. तेथें पेशवे यांणी शिंदे, होळकर यांस पाठवून मिरमाजीखान फौजदार शाहाजापूरकर मारला. दोन हजार फौज बुडविली. खुद्द पेशवे यांणीं नबाबाचे रोखे जाऊन तीन कोसांचे अंतरानें मुक्काम केला. नबाबानी पाठ देऊन कूच केलें. भोपाळचे तळयाचा आश्रा केला. व पेशवे यांजकडील फौजांनी दाणा, वैरण बंद केली. तीन शेर धान्य नबाबाचे लष्करात झालें. नबाब ढेंकळाचे कुसू रचून अडचणींत राहिले. रात्रंदिवस तिरंदाजी व गोळी पेशवे यांणीं त्याजवर चालविली, यामुळें नबाबाचे लोक रात्रंदिवस घोडयावरील व हत्तीवरील हौदा न उतरतां राहिले. नबाब हौद्यांत बसून राहिले, अशी फजिती होऊं लागली. तेव्हां छ २६ रमजानीं (७ जानेवारी १७३८) सल्ला होऊन तह ठरला कीं, बाजीराव यास चंबळा व नर्मदा यांधील मुलूख आहे, त्याचें अधिपत्य प्राप्त होण्यास बादशहास नवाबानी अनुकूल व्हावें; व याशिवाय पन्नास लक्ष रुपये बाजीराव यास स्वारीखर्चाबद्दल द्यावे, असें ठरून लढाई महकूब झाली. सरकारवाडयापाशीं प्राचीन गांवकुसूं होतें, तें मोडून चिमाजी अप्पा यांणीं पेठ मुद्याबादची जमीन घेऊन केदारवेशीपासून मावळत्या वेशीपर्यंत कोट बांधण्यास आरंभ केला. प्रतिनिधींनी मिरज घेऊन डुबल याजकडे सुभा सांगितला. नजीबउद्दवला मोमीनखान गुजराथचा सुभा झाला. त्यानें रत्नसिंग भांडारी अहमदाबाद याजवर दमाजीकडील मदत रंगोजी यास घेऊन स्वारी करून अहमदाबाद घेतली छ २० मराठी व मोंगल निम्मेंनिम तह ठरला. सुज्याइतखान यास रघोजी भोसले याणीं बुडवून पांच हजार घोडे व हत्ती, पालख्या व जेजाला जाडाव केले. याखुदखान यास परत करून पांच लक्ष रुपये खंड घेऊन सोडून दिलें. पुढें मयत झाल्याची ही खबर आहे.